Submitted by लाजो on 6 June, 2012 - 04:31
कालपर्यंत होते तुझे माझ्यावर प्रेम
आवडायचे आपल्याला सगळे सेम टु सेम....
.
पण असं वाटतय आता विस्कटतोय आपला गेम
तुझ्या वागण्याचा हल्ली लागत नाहिये नेम...
.
महत्वाचं आहे का हे दिखावा आणि फेम
आपल्या जवळ असताना दोन अनमोल जेम...
.
संभाळत्येय मी तुला कशीबशी जेमतेम
सहन करता करता डोळ्यात पाणी केम...
.
वाटलं होतं थांबु जरा, सगळं होइल क्षेम
पण कारण दिलीस तु मला ती सगळी होती लेम....
.
मलाच वाटत्येय आता माझ्या हट्टावर शेम
माहित असुन सुद्धा की तुला मुश्किल करणं टेम...
.
आता मिच केलाय निश्चय, मिच बदलत्येय एम
मारून तुला डिच..........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आणत्येय चष्म्याची नवी फ्रेम.....
---------------------------
गुलमोहर:
शेअर करा
काल मैत्रिण जाम वैतागली होती
काल मैत्रिण जाम वैतागली होती तिच्या कॉटॅक्ट लेन्सेसवर... रागवून म्हणाली 'या लेन्सेस पेक्षा चष्माच बरा'.. मग काय सुटली आमची गाडी... आणि घाटली एक काकाक
Bhari
Bhari
जबरी!!!! फ्रेम्सही एकसे एक
फ्रेम्सही एकसे एक आहेत. कोणती निवडलीस?
जो काय ग हे
जो काय ग हे
लाजो, काही राहिला नाही आता
लाजो,
काही राहिला नाही आता तुझा नेम
करशील काकाक आणि समोरच्याचा गेम!
सही. शेवटी कलाटणीच दिलिस की
सही. शेवटी कलाटणीच दिलिस की ग.
मस्त. खरच या लेन्सेसना टेम
मस्त. खरच या लेन्सेसना टेम करण कठिण!
़
मामी, मी नाही गं,
मामी, मी नाही गं, मैत्रिण.....

पण मला दुसरी फ्रेम आवडली
लाजोडी
लाजोडी

लाजो...
लाजो...
बाई ग लाजो किती ते 'म'वर
बाई ग लाजो किती ते 'म'वर प्रेम
तुझा आता खरंच काही नाही नेम
लिहावं वाटतंय काहीतरी सेमटुसेम
म्हणू नको माझ्या कवितेला लेम
थीम चोरली म्हणून करू नको ब्लेम
प्रामाणिक प्रयत्न आहे नाही कसला गेम
लाजो हे काही साधे नाही नेम (name)
काकाकची राणी हे पद देते अक्लेम
आमची धाव येवढीच......