मराठी शब्दकोश

Submitted by भरत. on 4 May, 2012 - 08:53

माझा मराठी->मराठी आणि संस्कृत-> मराठी छापील शब्दकोश घ्यायचा विचार आहे. कोणते घ्यावेत? कृपया कोशकार, प्रकाशक यांची नावे सुचवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ya raa daate yancha shabdakosh uttam ahe. 2 ani 3 khandanchya avruttya ahet. Mazya samajutinusar varada books ne ha kosh prasiddha kela aahe.

१.
कोशकार डॉ. जी. डी. देवस्थळी कृत
दि स्टुडण्टस न्यू संस्कृत डिक्शनरी

संस्कृत > इंग्रजी > मराठी > गुजराती
प्रकाशन: केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
किंमत रुपये २०० ( आवृत्ती २०११)
मस्त शब्दकोश आहे. अगदी संग्रही असावाच असा!

----
२.

कोशकार कै. वासुदेव गोविंद आपटे कृत
मराठी शब्दरत्नाकर
मराठी > मराठी
प्रकाशन: केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
हा पण अगदी संग्रही असावाच असा!
याची मराठी भाषेची शब्द संपत्ती ही प्रस्तावना वाचावी यासाठी तरी हा कोश घ्या, असे म्हणेन. इतका द्रष्टा कोशकार परत मराठी भाषेत होणे नाही!

---
३.
कोशकार चाऊस कृत
चाऊस डिक्शनरी
मराठी > इंग्रजी
प्रकाशन: सलामचाऊस
जाफर नगर मशिद कॉम्प्लेक्स ११० जाफर नगर, नागपुर ४४००१३
फो. ०७१२ २५९६६४५,२२५८३५७६
किंमतः रुपये १५० (२००५)
(रुपये १५० मनि ऑर्डर ने पाठवल्यावर रजि. पोस्टाने पाठवतात त्यासाठी जास्तीचे पैसे घेत नाहीत!)
इंग्रजी ते मराठी असे अनेक कोश आहेत पण मराठी ते इंग्रजी साठी फार कमी आहेत!
जे आहेत ते धड नाहीत. म्हणून मी पाहिलेल्यातला हा सर्वोत्तम कोश!

आशा आहे या माहितीचा उपयोग होईल

सगळ्यांना धन्यवाद.

कोश घेतले की इथे लिहीन.

निनाद, दुकानात संस्कृत-> मराठी मागितल्यावर तुम्ही म्हणताय तोच(पहिला) असल्याचे सांगितले; म्हणजे या शब्दकोशाचा खप चांगला दिसतोय. पण त्यातील मूळ संस्कृत-शब्द- संख्या कमी असेल ना?

मजजवळ प्रा. माधव देशपांडे कृत सुविचार प्रकाशन नागपूर यांचा मराठी-इंग्रजी शब्दकोश आहे. १९६८ ची आवृत्ती किंमत १० रुपये Happy ६०४ पृष्टे.

मोल्सवर्थचा मराठी--> इंग्लिश कोश पण बघा. ब्रिटिशांनी तयार केलेला तो मराठीचा पहिला कोश. अजूनही अनेक शब्दांचे प्रमाणभूत अर्थ पहायला उपयोग होतो. पुनर्प्रकाशित झालाय.

मराठी शब्दरत्नाकर - वा गो आपटे घेतला.

वरदांनी सांगितलेला मोल्सवर्थचा शब्दकोश इथे पाहतो.
तिथेच यशवंत दाते कृत शब्दकोश आहे, तोही पाहतो. (माझ्या कामासाठी छापील कोशापेक्षा नेटवरचा शब्दकोश पाहणं सोपं आणि वेळ वाचवणारं आहे.)
आज महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळावर शब्दकोश दिसले.

संस्कृत मराठी शब्दकोशाची गरज तितकीशी भासत नाही. धागा काढताना तो का हवासा वाटला तेही आठवत नाही.

वरील क्र.१ वरील कोशकार डॉ. जी. डी. देवस्थळी कृत
दि स्टुडण्टस न्यू संस्कृत डिक्शनरी

संस्कृत > इंग्रजी > मराठी > गुजराती
प्रकाशन: केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
किंमत रुपये २०० ( आवृत्ती २०११)
हा शब्दकोश कोणा कडे उपलब्ध असल्यास कळवणे. तो सध्या out of print आहे। मी प्रकाशकांकडे तसेंच संस्कृत साहित्य रत्नाकर पुणे येथेही विचारले। मला हवा आहे। कोणाकडे सुस्थितीतील second hand असला तरी चालेल। madhavbhope@gmail.com वर संपर्क करून कळवणे।