अकल्पित भाग -४

Submitted by shilpa mahajan on 26 April, 2012 - 13:17

उषा , तू , मी आणि रवी लहानपणापासून एकाच चाळीत राहिलो , एकाच शाळेत शिकलो, महाविद्यालय देखील एकच निवडले. मोठे होता होता माझी रवी बद्दलची मैत्रीची भावना प्रेमात कधी
बदलली ते माझं मलाच कळलं नाही "
" अगदी खरय ! माझ्या बाबतीत देखील अगदी असंच घडलं . उषा हळूच पुटपुटली . तरीसुद्धा ते निशाला ऐकू गेलंच
" मलाही ते जाणवलं होतंच" निशा म्हणाली
" कसं काय ? मी तर ते उघड होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती !" उषा उद्गारली

" त्यात काय अवघड ? मी पण त्याच अवस्थेतून जात होतेच की !"
चोराच्या वाट चोराला ठाऊक नसणार तर आणखी कोणाला असणार?.
.
म्हणूनच मी रविचे माप कोणाकडे झुकते आहे ते शोधण्याचा प्रयत्न करत होते . ते तुझ्याकडे झुकते आहे असा लक्षात आले असते तर मुकाट्याने तुमच्या मार्गातून बाजूला
व्हायचे असे मी ठरवले होते . "
" अगदी असाच निर्णय मी देखील घेतला होता. " निशा
" तू असे करशील याची देखील मला खात्री होती . अखेर आपण दोघी सख्ख्या मैत्रिणी होतो ना ! ".उषा
" पण मला तशी संधी न देताच तुम्ही दोघे अचानक एक दिवस गायबच झालात.! जणू काही हवेत विरून गेलात ! आता म्हणतेस की माझ्या निर्णयाबद्दल खात्री होती तर मग
मला माघार घेण्याची , आपली मैत्री निभावण्याची संधी ना देता असे पळून का आलात? मी तुमच्या संसारात बिब्बा घालणार नाही याची खात्री वाटत नव्हती? मान्य , त्या वेळी
तशी भीती वाटली असेल तुला . पण किती दिवस? दहा वर्षे? नकळत निशाचा स्वर हळवा झाला
" तुला माझ्याबद्दल अशी शंका का बरे आली ? " उषाने विचारले
त्याचं काय झालं की रवी दोन दिवस कौलेजात आला नाही. माझ्या घरीही आला नाही . त्यामुळे काळजी वाटून मी त्याच्या घरी गेले आणि तो कौलेजला का आला
नाही असे विचारले .
तेव्हा तो एका सेमिनारला चार दिवसांसाठी गेलेला आहे असे कळले ..
वास्तविक पहाता असल्या बातम्या घरी कळण्यापूर्वी आम्हाला माहिती असायच्या . आयुष्यात पहिल्यांदाच उलट घडत होतं. तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली .
नंतर जेव्हा लक्षात आलं की तू देखील गैरहजर आहेस तेव्हा तर माझी खात्रीच झाली की नक्की बाजी तू मारलीस ! माझी शंका खोटी नव्हती हे मी आज स्वतःच्या डोळ्यांनीच
पाहिलं. मला त्याचं दुख्ख नाही ग वाटत! काहीही झालं तरी मला रविला सुखी झालेलं पहायचं होतं. मग तो माझ्याबरोबर असो वा तुझ्याबरोबर " निशाने स्पष्ट केलं.
" मला देखील तसंच वाटत होतं . पण खरं सांगते , मी आणि रवी एकत्र गेलो नव्हतो . उषाने एक उसासा सोडत सांगितलं.
" असं? मग ?" निशाने आश्चर्याने विचारले .
" त्या दिवशी बरं नसल्याने तू कौलेजात आली नव्हतीस . रवी देखील आला नाही .त्यामुळे मला शंका आली की तुम्ही दोघे एकत्र कुठेतरी गेलात की काय . मग मी रविच्या घरी
गेले .त्याच्याबद्दल चौकशी केल्यावर कळले की तो सेमिनारसाठी गेला आहे. मला वाटले की तुम्ही दोघे एकत्र गेलात . रविच्या मनाचा कल आजमावण्यासाठी मी इतकी उतावीळ
झाले होते की मागचा पुढचा विचार न करता रवीचा पत्ता घेऊन सेमिनारच्या ठिकाणी येऊन दाखल झाले . " उषा म्हणाली
" पण तू माझ्या घरी का नाही आलीस ?

अग माझ्या मनावर इतका ताण आला की ही साधी गोष्ट मला सुचलीच नाही ! तू रविला किंवा
रवी तुला लग्नासाठी विचारून टाकेल आणि माझ्या मनातली गोष्ट माझ्या मनातच ठेवावी लागेल , व्यक्त
करायची संधीच मिळणार नाही अशा विचाराने असे काही घडण्या आधी तुम्हाला गाठायचे एवढा एकच विचार करून मी ते पाउल उचलले . शिवाय विधिलिखित जसे घडायचे असेल तशीच बुद्धी होणार ना ?
" विधिलिखित ? म्हणजे काय ? " निशाने विचारले
" काही नाही . पुढे घरी काय झाले ते तू सांगितलेच नाहीस " उषाने विषय बदलला .
" काय होणार ? खूप दिवस वाट पाहिली तुमच्या दोघांची ! तू रविसोबत गेलीस हे त्याच्या घराच्या लोकांना देखील माहिती नव्हतं . जेव्हा तुझ्या घरचे लोक रवीची वाट पहायला लागले तेव्हा
कुठे तू त्याच्या सोबत आहेस हे त्यांना कळले . आधी वाटलं कि सेमिनार लांबला असेल , सेमिनारला गेलेले इतर लोक परत आले तेव्हा सगळ्यांना काळजी वाटायला लागली . प्रवासात
काही अडचण आली असेल असे वाटले पण तुम्ही संपर्क साधत नव्हतात आणि घरचे लोक संपर्क साधू पहात होते पण तुमचा फोन लागत नव्हता.शेवटी पोलिसात तक्रार दिली . पोलिसांना
मुंबईला जाणाऱ्या गाडीमध्ये तुमच्या दोघांची रिझर्वेशंस मिळाली. पण मुंबईत तुमचा पत्ता लागला नाही . मग मीच सर्वांना आपल्या तिघांच्या मनातल्या भावना सांगितल्या . कदाचित मला
व इतर लोकांना तुमच्या निर्णयाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही जाणून बुजून संपर्क टाळत आहात असे सर्वांनाच वाटू लागले . तुम्ही आपण होऊन संपर्क साधण्याची किंवा प्रत्यक्ष भेटायला येण्याची वाट पहात दिवस ढकलत आहेत .

माझ्या बाबतीत म्हणाल तर लग्न हा विषय मी माझ्या आयुष्यातून कायमचा काढून टाकला . कौलेजात शिकवून मी आपले मन रमवत आहे .संपली माझी कहाणी .माझ्या आयुष्यात यापेक्षा जास्त सांगण्यासारखे नाही . गेले कित्येक दिवस ह्या गावाला येण्याची प्रेरणा होत होती , पण ह्याच गावात मी तुम्हा दोघांना गमावले असल्याची आठवण मला येऊ देत नव्हती . या वेळी काय झाले कोण जाणे , आई बाबांचा विरोध असूनही मी आलेच . कदाचित तुमची दोघांची भेट व्हायची असेल म्हणूनच असेल !
" अगदी खरे आहे ते ! तुझ्या भेटीची आमची तीव्र इच्छाच तुला इथे घेऊन आली आहे .

गुलमोहर: 

काकू तुम्ही हे प्रकाशित न करता सेव करू शकता, म्हणजे दोन वेळचे एकदम प्रकाशित टाकले तर मोठा भाग तयार होईल. येऊ द्या, वाचतोय आम्ही.. Happy