आर. एम. पी.

Submitted by विवेक देसाई on 2 November, 2009 - 08:24

कथेचा टायटल वाचून तुम्ही निश्चितच संभ्रमात पडला असतालात, हेची माका शंभर टक्के खात्री आसा. काळजी करू नकात, ही खयची नेटवर्किंग किंवा एमेलेम स्कीम नाय हा... ही कथा 'आरोग्य खात्याशी' संबंधीत आसा.

आम्ही १९७५-७६ मधे पिंगुळेत येवन रवलंव, आणी 'कुडाळ हायस्कूलात' शिकाक सुरुवात केली. त्यावेळा कुडाळात हाताच्या बोटार मोजण्याइतकेच डॉक्टर होते. माका आज देखील स्पष्ट आठावता - गवळदेवाचो उतार संपलो काय लगेच डॉ. मसुरेकरांचो दवाखानो लागा. त्याच रस्त्याक पुढे पोलीस लायन आणी पोष्टाच्या मधी डॉ. पंडितांचो दवाखानो, पोष्टाच्या जरासा पुढे गेला काय डॉ. सवदत्तिंचो दवाखानो, काय मगे एस.टी. स्टॅण्डार डॉ. परुळेकरांचां क्लिनिक, आणी बाजारात शिरतानाच डॉ. शिरसाटांचो दवाखानो; इतकेच खाजगी डॉक्टर तेव्हा कुडाळात होते. पोष्टाच्या समोर सरकारी दवाखानो होतो (आणि आजुनय तो थंयच आसा). म्हयन्यातसून एकदाच सावंतवाडीचे डॉ. आचवल (आय पेशालीष्ट) कुडाळच्या लायब्ररीत येवन डोळे तपासून जायत. आज परस्थिती एकदम बदलान गेलीहा, निसतो हवेत जरी हात फिरवल्यात तर हाताक आठ-धा डॉक्टर लागतीत, अशी गत झालीहा. जुन्या पैकी शिल्लक डॉक्टर म्हणजे डॉ. सवदत्ति आणी डॉ. परुळेकर बाकीचे डॉक्टर काळाच्या पडद्या आड गेले. या जुन्या डॉक्टरांच्या सोबतीन कुडाळात आणखीन दोन डॉक्टर होते. पयले होते ते म्हणजे डॉ. साटम आणी दुसरे म्हणजे डॉ. पालव.

या दोनय डॉक्टरांच्या नावाचे पाट्ये माका आज सुद्धा स्पष्ट आठावतत - एका साध्याश्या लाकडी फळकुटावर 'धूळ खावन पिवळो पडलेलो पांढरो रंग, तेच्यार फिकट काळ्या अक्षरात डॉक्टरांचा नांव, फळकुटाच्या वरच्या एका कोपर्‍यात उभी लालफुली (रेड क्रॉस), आणि डॉक्टरांच्या नावाखाली तेंचा कॉलीफिकेशन दाखवणारी - अगदी बारीक टायपात रंगवलेली R. M. P. ही अक्षरा. बरेच दिवस माका ह्यां R. M. P. म्हणजे काय तां म्हायत नाय होता, म्हणान एकदा कोणाक तरी मी विचारलय, तर तेणा माका फटदिशी 'रोगी मारण्यात पटाईत' म्हणान सांगितल्यान. माझो तेच्यार विश्वास बसाक नाय, पण नंतर जेव्हा बारावीत गेलंय तेव्हा माकां समाजला की Registered Medical Practitionar म्हणजे R. M. P. असो. तर ह्ये दोनय डॉक्टर R. M. P. होते. (सहज आठावला म्हणान लिहितंय - माझ्या भावाच्या वर्गातली एक मुलगी R.M.P. होवन सध्या जामसंडे, तळे-बाजार एरियात 'एक प्रतिष्ठीत डॉक्टर' म्हणान मिरावताहा.)

कुडाळ शहराची एकूण लोकसंख्या आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीची लोकसंख्या इतक्या भांडवलावर या सगळ्या डॉक्टरांचे दवाखाने चलत. डॉ. मसुरेकरांच्या (प्रसिद्ध अभिनेते अविनाश मसुरेकर हेंचे वडील) दवाखान्यात काही ठराविकच 'धेंडां' जायत. डॉ. पंडितांचो 'करारी चेहरो' आणि 'भारदस्त' व्यक्तिमत्वामुळे लोक सहसा तेंच्याकडे जायत नाय, पण प्रत्यक्षात डॉक्टर अतिशय प्रेमळ आणि हाताक 'गुण' असणारे. डॉ. सवदत्तिंचो दवाखानो म्हणजे कायम भरलेला 'मॅटरनिटी होम'. डॉ. परुळेकरांचा क्लिनिक अगदी स्टँडाक लागानच असल्यामुळे भायर गावासून एस.टी.न येणारे पेशंट तेंच्याकडे जायत. डॉ. सवदत्तिंचो दवाखानो अगदीच 'हाउसफुल' असात तर मगे लोकां डॉ. शिरसाटांकडे जायत. अगदीच जेंची परिस्थिती नसा ते लोक 'सरकारी दवाखान्यात' जायत. असा असताना देखील डॉ. साटम आणि डॉ. पालव या दोघांचेय दवाखाने पेशंटांनी कायम भरलेले असत. आणि तेचीच गोष्ट मी तुमका आज सांगतहय.

या दोनय डॉक्टरांची कामाची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. मुळात R.M.P. असल्यामुळे, हेंची ट्रीटमेंट खूपच मर्यादित स्वरूपात होती. आणि असलेच केशी आजू-बाजूच्या गावातसून या दोघांकडे येयत. उदा. सर्दी, ताप, अर्ध-शिशीन कपाळ फाटणा, पोटात चावरी उठणा, कलकलणी भरणा, गरगरल्या सारख्या होणा, छातीत/ पोटात नळ उठणा, पोटाक फुगारो मारणा, हवाळी लागणा, बायल माणसांचे इतर आजार, ई. हे असले आजार काही ठराविक जनरल औषधानी बरे होणारे असत. आणी दवाखान्यात येणार्‍या अगदी सामान्य पेशंटांका असले ट्रीटमेंट परवाडणारे असत. तेच्यामुळे या दोनय डॉक्टरांचे दवाखाने कायम तेजीत असत.

डॉ. पालवांची ट्रीटमेंटची पद्धत कशी होती, तर - डॉ. हातानीच पेशंटाक तपासून बघीत. 'स्टेथोस्कोप' नावापुरतो गळ्यात अडकवन ठेवीत (म्हणजे पेशंटाक बारा वाटाचां म्हणान), अगदी क्वचितच ते 'स्टेथोस्कोप'चो वापर करीत. पेशंटाचो आजार अगदीच जनरल असात तर आपल्याकडची कामचलावू 'जेनेरिक' औषधा देवन पेशंट पाठवन देयत, कधीतरी वाटलाच तर चिठी लिवन देवन पेशंटाक परवाडणारी औषधा तेका दुकानातसुन घेवक लावीत. जरा थोडी वरची केस असात तर, इतर डॉक्टरांकडे पेशंट पाठवन, पेशंटाक 'आडमिट' करून तेका 'सलायन' लावची व्यवस्था डॉक्टर करीत, आणि पेशंट दुरुस्त करीत. डॉक्टर 'इंजेक्षान' क्वचितच देयत; जवळ-जवळ नायच, कारण डॉक्टरांच्या सांगण्या प्रमाणा डॉक्टरांचो 'हात जड' होतो. एकदम वरच्या केसच्या बाबतीत डॉक्टरांची ट्रीटमेंटची पद्धत पूर्णपणे बदलान जाय. डॉक्टर पेशंटाक गादयेर झोपवित. हातांनी पेशंट तपासून घेयत, गरज वाटली तर पेशंटचे डोळे, कान, जीभ, घसो बॅटरी मारून तपासून घेयत. जरा विचार करून पेशंट बरोबर इलेल्या 'जाणत्या' माणसाक एका बाजूक बोलावन घेयत आणि तेका पेशंटची परस्थिती सांगत. तो संवाद साधारणपणे असो होय: -
डॉ.: - 'खयसून ईलात तुम्ही?'. पेशंट नवखो असात तर 'जाणतो' गावाचा नाव सांगा, नेहमीचो असात तर संवाद पुढे चालू होय,
डॉ.: - 'बरां केलात, माझ्याकडे लवकर ईलात ते'. जाणतो साधारण 'प्रेशर' खाली येय. आणि हो संवाद अत्यंत खाजगी स्वरूपात होय.
डॉ.: - 'माझ्यान जितक्या होयत तितक्या मी करतंय. माझ्याकडचे गोळ्ये देतंय. तुमका भायर खुय गावाचे नाय. पण एक सांगतंय, जरा 'भायली-भितुरली' चौकशी करुक सुरुवात करा. प्रकरण थोडा वेगळा दिसताहा'. जाणतो आणखीन प्रेशर खाली येय.
डॉ.: - 'गाव खयचो तुमचो?'. जाणतो आपला गाव सांगा.
डॉ.: - 'म्हणजे तुमची देवता .....'. जाणतो चकित होवन जाय आणी 'होय' म्हणान सांगा. अगदीच नवखो असात तर 'म्हायत नाय' म्हणान सांगान टाकी, आणि डॉक्टर नेमक्या ह्याच हेरून ठेवीत.
डॉ.: 'तुमचा आडनाव .... बरोबर? तर मग तुमचा कुलदैवत ....., माकां विचारा! ईतर खयचोय डॉक्टर तुमका ह्ये गोष्टी सांगाचो नाय', डॉक्टर 'जाणत्याचो स्क्रू' आणखीन पिळून घेयत, आणि जाणतोय निमुटपणे कबूल होवन जाय.
डॉ.: 'आता सांगतय तसा करा, तुमच्या कुलदैवताकडे जावा, तेका नारळ, पान-सुपारी काय ता ठेवा आणी सांगणा करा किंवा प्रसाद लावा, म्हणाचा 'कुडीची हेच्यातसुन मोकळीक कर, तुका ..... देयन', बघा फरक पडता की नाय तो. हा, मात्र तुम्ही ह्या सगळा एकट्यान करू नकात. थयसर .... गुरव/ घाडी असतलो तेका करुक सांगा. नायतर असा करा, तेका (म्हणजे गुरवाक/ घाडीयाक) माझा नाव सांगा आणि ही कामगत लवकर आटपून घेवा'. जाणतो बापडो निमुटपणे सगळा आयकान घेय.
डॉ.: 'बघा, पुढच्या खेपेक येताना बरो झालेलो पेशंट घेवन माझ्याकडे येतालात'. या सगळ्या Consultation ची फी किती? जास्तीत जास्त वीस रुपये. डॉ. पालवांकडे डॉक्टरी पेशा व्यतिरिक्त, अश्या प्रकारचा अतिरिक्त Consultation मिळा म्हणान डॉ. पालवांची प्रॅक्टीस जोरात चला.

डॉ. साटमांची ट्रीटमेंटची पद्धत खूपच वेगळी होती. मुळात तेंच्या ट्रीटमेंटचो सगळो भर असायचो तो 'स्वच्छते'वर, 'पेशंट मुळात नीट स्वच्छ रवणत नाय, पोट साफ ठेवणत नाय, तेच्यामुळे तेंका आजार होतंत' ह्या डॉ. साटमांचा बेसिक निदान, आणि बर्‍याच वेळा तां खरा देखील असायचा. या निदानाच्या सोबत 'कोठो साफ नाय आसा', 'पोटात कृमी झालेत' ही दोन सपोरटिव निदाना डॉक्टरांची ठरलेली असत, आणी याच निदानांच्या आधारार डॉक्टर ट्रीटमेंट देयत. तेच्यामुळे डॉक्टर पेशंट तपासुच्या भानगडीत शक्यतो पडत नाय, आणी म्हणान डॉक्टर कधी 'स्टेथोस्कोप' वापरीतच नायत. पेशंटाची 'नाडी' तपासल्यांनी काय डॉक्टरांका पेशंटची 'कन्डिक्शन' समजान येय आणी मगे डॉक्टर पेशंटाक ट्रीटमेंट देयत. ट्रीटमेंटचो संवाद साधारणपणे असो होय: -
डॉ:. - 'हा, सांग काय होताहा?'
पेशंट: - 'काय नाय, दोन दिस झाले, पोटाक फुगारो मारलोहा, आंबट ढेकर येतहत'.
डॉ.: - 'काय खाल्ललं?'
पेशंट: - 'काय नाय, आपला नेहमीचाच...'
डॉ.: - 'व्हाळार कितीदा गेल्ललं?'. पेशंट गप्प बसान रवा.
डॉ.: - 'कधी न्हाल्ललं?'. पेशंट तरी देखील गप्प बसान रवा. तो पर्यंत डॉक्टर पेशंटाची नाडी तपासून घेयत.
डॉ.: - 'रे, दिवसातसून एकदा तरी न्हायत जा... जमतीत तशे हात-पाय धुयत जा, निदान जेवच्या-खावच्या आधीतरी.. ' पेशंट निमुटपणे आयकान घेय.
डॉ.: - 'थांब, औषध देतंय हां तुका... बाटली हाडलहं?', या डॉक्टरांकडे जाताना पेशंटाक 'बाटली' घेवन जावचा लागा. डॉक्टर पेशंटाक बाटलेतसुन औषध देयत. बाटली लहान दिसली तर 'केदी ती बाटली हाडलहं! चार दिवसाचा औषध रवाचां नाय तेतूर' म्हणान डॉक्टर सांगीत. आणी बाटली जरा मोठी दिसली तर ' तुका बरा नाय आसा मा? माका वाटला घरातल्या सगळ्यांका शिसो भरून वषेध न्हेतं की काय?'. मगे डॉक्टर बाटली घेवन आतल्या खोलीयेत जायत आणी थोड्या वेळान बाटलेत औषध घालून, बाटली हलवीत भायर येयत. आणी मगे डॉक्टरांचो आणी पेशंटाचो पुढचो संवाद सुरु होय...
पेशंट: - 'पिंतान डोक्या चढता मधीच...'
डॉ.: - 'हेतुरच आसा..'
पेशंट: - 'पोटात चावरी झाता कधीतरी...'
डॉ.:- 'घातलंय हेतुर...'
पेशंट: - 'वांयच झाड्याचा औषद घालशात तर...'
डॉ.: - 'घातलेलां आसा, काळजी करू नको..' डॉक्टरांचा बाटली हलवना सुरूच. बाटली अगदी व्यवस्थित हलवन झाली काय मगे डॉक्टर कागदाची एक बारीक पट्टी 'डोसाच्या मात्रे प्रमाणा' षटकोनी आकारात कापून बट्लेवर चिकटवीत. बाटले सोबत आपल्या 'ष्टाकातले' साधारण निळसर-पांढरे बारीक गोळ्ये आणी तसलेच पिवळे गोळ्ये काढून कागदाच्या पुडयेत बांधून, पेशंटाक 'डोस' समजावन सांगत. डॉक्टरांका दहा रुपये फी देवन पेशंट निघान जाय. पेशंटांच्या भाषेत डाक्तर बाटलेतसुन 'साल्टाचा (Salt) औषध' देयत, म्हणजे कसला औषध देयत ता मात्र कोणाकच म्हायत नाय होता, पण पेशंटाक त्या औषधान 'गुण' येय.

एकदा काय झाला, बाविचो एक ईसम - लोकांच्या शेतीत राबान आपला आणी घरकारनीचा पॉट भरनारो, घरकारनिक घेवन या डॉक्टरांकडे ईलो. गेले आठ-धा दिवस बायलेक भूक लागा होती नाय, अन्नावरची वासना उडालेली, मधीच कधीतरी उलटी इल्यासारा होय, अशे तक्रारी घेवन दोघायजणा डॉक्टरांकडे ईली. डॉक्टरांनी तिका तापासल्यांनी आणी दोघांकाय सांगीतल्यांनी,
'काय नाय पोटात कृमी झालेहत. औषध देतंय बरां वाटात'. डॉक्टरांनी आपल्या कडचा पातळ औषध आणी गोळ्ये देवन ट्रीटमेंट पूर्ण केल्यानी. चार दिवसांनी दोघायजणा डॉक्टरांसमोर परत हजर. डॉक्टरांनी विचारल्यांनी,
'काय रे परत काय झाला?'.
इसम: - 'तुमच्या वषेधान पयलो एकच दिवस फरक जानावलो, परत आसा तसाच आसा...'
डॉ.: - 'फरक नाय कसो? आता बघ कशी तरतरीत दिसताहा ती! तुझ्या लक्षात नाय येवचा, तुका ती रोचीच झालीहा, पण माका जाणावताहा. जरा थांब, तपासून बघुया'. डॉक्टरांनी 'तिची' परत तपासणी केल्यानी आणी सांगल्यांनी,
'काय झालाहा, कृमी पडान गेले तरी कोठो साफ होवक नाय आसा. तीचो कोठो साफ झाल्या शिवाय पूर्णपणे बरां वाटाचा नाय तीका'. डॉक्टरांनी तीका 'कोठ्याचा औषध' देवन पाठवन दिल्यानी. तरी काय फरक पडयनां. आपला 'आसा तसाच आसा'. शेवटी शेजार-पाजारच्या लोकांच्या सांगण्या वरसून 'तो बापडो' बायलेक घेवन डॉ. सवदत्तींकडे घेवन गेलो.
डॉ. सवदत्तिनि तिका व्यवस्थित तपासल्यानी. भायर येवन तिच्या 'घोवाचा' अभिनंदन केल्यानी आणि परत 'पुढच्या म्हयन्यात तपासणेक घेवन ये' म्हणान सांग्ल्यानी...
झालेला काय तर, घोवा-बायलेचो दोघांचोच संसार. घरात जाणता असां 'बायल माणूस' कोणच नाय. तेच्यामुळे 'त्या बापडेक' लग्नानंतर दोन वर्षानी 'दिवस गेलेले' तिच्या घोवाक सांगतलो कोण? बरां ती बापडी पयलटकारीन... तीकाय बापडेक हेचो काय अनुभव नाय होतो. तेच्यामुळे डॉ. साटम तिका 'कृमीचा' आणी 'कोठो साफ' होवचा औषध देवन मोकळे झाले.

गुलमोहर: 

विवेक, मस्तच!! RMP चो फुलफॉर्म कोकणातली माणसाच करु जाणे! Proud
कुडाळ बाजारात एक नाबर डॉक्टर होते मा रे? आमचे खनदानी डॉक्टर ते. आता त्यांचा चेडु आणि जावय चालवतत दवाखानो!

Lol मजा आली वाचायला देसायानु! आमचा पेशल "राम राम" घ्या! तुमच्या "पणजोबा" (त्यांनीच तसं सांगितलं) विनय देसाईंना मी ओळखतो Happy

R. M. P. 'रोगी मारण्यात पटाईत' >> Lol
डॉ. साटम नि पालव मस्त व्यक्तिरेखा.. Happy

मस्त लिहिलंय. मी फोंडाघाटला एक वर्ष मेडिकल ऑफिसर ( म्हणजे सरकारी डॉक्टर Happy ) होतो.. डिग्री झाल्या झाल्या पहिलेच पोस्टिंग. अगदी असेच अनुभव तिथेही यायचे... लहान मुलाना अंगावर जखमा होतात, त्याला पायोडर्मा म्हणतात. कोकणातले लोक त्याला खांडकं म्हणतात. अंगावं खांडकं इलेती, जरा बघा, असे काहीतरी पहिल्याच दिवशी एका पेशंटने म्हटले. मला आधी काहीच कळले नव्हते. Happy .. फुरसं चावलं की त्याला इषार की विषार म्हणतात. रात्री बायकोला डिलिवरीच्या कळा चालू झाल्या म्हणून नवरा रिक्षा आणायला गेला आणि त्याला फुरसं चावलं, दोघेही एकाच रिक्षातून येऊन एकदमच अ‍ॅडमिट झाले, हाही एक तिथला अनुभव. एकदा डॉगबाइटची इंजेक्शने संपली, तेंव्हा सेनेच्या लोकानी आम्हाला घेराव घातला होता. दुसर्‍या दिवशी पेपरात बातमी पण होती, हाही एक न विसरणारा अनुभव आहे. Happy . कोकणात त्या एक वर्षात मी खूप काही शिकलो, जे मोठ्या सिव्हिलमध्येही क्वचित शिकायला मिळते. खाजगी काय नि सरकारी काय, सगळेच डॉक्टर क्लिनिकल नॉलेज जास्त वापरतात, तपासण्या आणि औषधे कमी. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आजही तिथे प्रेमाने जपलेली असणार. ( मी २०००-०१ मध्ये होतो.) खास हे शिकायला प्रत्येक नव्या डॉक्टरला कोकणात एक वर्ष सक्तीने पाठवलेच पाहिजे. Happy तिथे जवळच करंजे-नागवे म्हणून गावे आहेत. तिथले डॉ. नागवेकर घोड्यावरून विजिटला जात होते, ( ५० वर्षापूर्वीची कथा. ) असे लोक सांगायचे. त्या डॉक्टरांचे सुपुत्र म्हणजे कणकवलीचे डॉ. नागवेकर- स्त्री रोग तज्ञ. ते लॅपरोस्कोपी सर्जरी करतात.

पिंगुळी पण एकदा पाहिले आहे. पिंगुळीला जुवेनाईल कोर्ट आहे. बाल गुन्हेगारीचे खटले तिथे चालतात. तिथे एकदा कामासाठी गेलो होतो. कोकणाबाबत आणखी लिहा.

मस्त! मजा आली अगदी वाचायला. खेड्या / गावांतले डॉक्टर्स अन त्यांचे पेशंटस हा एक भारीच विषय आहे खरंच. Happy

देसायांनू, मस्तच.. Proud
तुमका फुडच्या लेखनाक शुभेच्छा.. Happy
कुडाळतलो नाबर डॉक्टर ठावूक असा रे भ्रमर.. Happy

च्यामारी , हा विवेक म्हणजे विनय देसाईचा ड्यु आय डी आहे की काय? इतका सारखेपणा? की हाच लिहून देतो त्या विनोबाला ? Proud

>> 'रोगी मारण्यात पटाईत' > Lol
>>अतिरिक्त Consultation >> Biggrin
'कृमीचा' आणी 'कोठो साफ' होवचा औषध देवन >> Proud

खय दडवलेल्यात ह्या? बघूकच नव्हता कधी! प्रज्ञान खणून काढला म्हणान दिसला तरी आणि वाचूक गावला! मस्त एकदम! Happy

छान !
छोट्या शहरात, खेड्यात डॉक्टरकी करण्यासाठी वैद्यकीय ज्ञानाबरोबर तिथल्यांच्या मानसिकतेचाही अभ्यास लगतोच. कल्पना येते आपल्या वरील अनुभवांवरून.

आजच वाचलय.. छान लिवलास.
गुरुकाकानी वाचुक नाय काय ? तेन्चो दवाखानो होतोना गावाक ?

शशांक, कान्त, दक्षिणा...
धन्यवाद...!!!

प्रतिसाद बघून खूप बरां वाट्लां...
Happy

मस्त! ह्या भाषेत वाचायला जास्त मजा येते >>+१
(मराठीच्या) आणखीन (ईतर बोलीत) भाषेत पण असे (लेख) यावे असे वाट्ते.....