कुजबुज - द व्हिस्पर
"कुजबुज कधी?" चा वाचकांनी लावलेला धोषा ऐकून जुन्या मायबोलीतीलच कुजबुजचा एखादा शिळा अंक नव्या मायबोलीत डकवून द्यायचा चलाख विचार आमच्या मनात सुरू होता. असे केल्याने नव्या वाचकांचे पुन्हा भरपूर प्रतिसाद मिळतात याची उदाहरणे डोळ्यासमोर हल्ली सतत दिसतात पण काही स्पष्टवक्ते जुने वाचक (आहे अजुनही ही जमात शिल्लक) "वर्गणी परत द्या" म्हणून मोर्चा आणतील किंवा पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू करतील या भितीने सादर करीत आहे नविन आणि ताजी "कुजबुज - द व्हिस्पर "
नमस्कार वाचकहो,
हल्लीच्या नविन पिढीची आवड लक्षात घेऊन कुजबुज हे केवळ वरणभाता सारखे साजुक मराठमोळे नाव बदलून आम्ही "कुजबुज - द व्हिस्पर" असा नावात मेकओव्हर केला आहे.
मुळातील गुणवत्ते बरोबरच लूक्सला सुद्धा आजकालच्या जमान्यात महत्व असते हे आता वेगळे सांगायची गरज नाही. शिवाय मेकओव्हर केला की तो चांगला की भिकार यावर लोक ईतकी चर्चा करतात की या एका क्लुप्तीने आपोआप भरपूर प्रतिसाद मिळतील हा अन्तस्थ हेतू आहेच. (पुर्वी लेखकाचे नाव वाचून त्या लिखाणावर टिचकी मारायची का नाही ते ठरत असे तर आता किती संख्येत प्रतिसाद आलेत ते पाहून लिखाण वाचायचे का नाही ते लोक ठरवतात.)
दुसरे कारण म्हणजे लोकसत्ता, म.टा या आघाडीच्या दैनिकांनी केलेल्या सर्वेक्षणा नुसार नविन पिढीला मिन्ग्लीश भाषाच अधिक जवळची वाटते. त्यामुळे या दैनिकांनी मिंग्लीशची कास धरली, मिंग्लिश नावे असलेल्या पुरवण्या काढल्या आणि त्यांचा खप वाढला.
इथे अगदी मायबोलीचेच उदाहरण घ्यायचे झाले तर देवनागरी प्रसार समितीचे नवनिर्वाचीत कार्यकारी अधिकारी ईतर बिबी वर मराठीत लिहा चा आग्रह करत असले तरी आपल्या नेहमीच्या बिबी वर "वास्सप पब्लीक", "नमस्कार पुपुड्युड्स" असे देवनागरीतच पण मिंग्लीश बोलतांना आढळतात.
तेव्हा मायबोलीकरांची नविन पिढी देखील या नव्या कुजबुज द व्हिस्पर चे स्वागत करेल अशी आशा आहे.
*********************************************************
"तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते"
विशेष वार्ताहराकडून :
हितगुजकरांचे विरोधाभासी वागणे कधी कधी बुचकळ्यात पाडते ते असे,
एका कवी महाशयांनी आपल्या कविता गुलमोहरात टाकल्या आणि वर आपले नाव लिहिले प्रा. सतिश चौधरी. तर प्रत्येक कवितेखाली काय नाव लिहितोय म्हणून नाके मुरडली गेली आणि दुसरी कडे डॉ. शीतल आमटे यांनी मुक्तिचित्रे पोस्ट केली तेव्हा त्या छायाचित्रांवर नाव का टाकले नाही म्हणून त्यांना नावासकट पुन्हा पोस्ट करायला लावले. अशा वागण्याने नविन हितगुजकर गोंधळून जाणार नाहीत काय?
*********************************************************
भारतात बनवलेल्या वैद्यकीय उपकरणांची माहिती भुमिकाताईंनी मायबोलीवर विचारली आहे. भुमिकाताईंना आणि ईतर अनेक मायबोली करांना उपयोगी पडतील अशी विविध वैद्यकिय उपकरणे मायबोली मेडिकेअर कंपनी तर्फे बनवण्यात आली आहेत. ही सर्व उपकरणे संपुर्ण भारतीय असून मायबोलीकरांसाठी माफक किमतीला उपलब्ध आहेत.
छोट्या जाहिरातीं मधे पहा या संबन्धी जाहिराती.
***
सगळीकडे गोड गोड बोलत हिंडताय? सर्वच साहित्याला छान छान प्रतिक्रिया देताय? मग आजच वापरा मायबोली मेडिकेअरचे "डायबिचेक शुगर डिटेक्टर". बोलण्यातली साखर जास्त झाल्याचे कळेल आता एका क्षणात. प्रत्येक मायबोलीकरा जवळ असायलाच हवे असे उपयोगी यंत्र!
गुलमोहराच्या रसिक वाचकांसाठी खास सवलतीच्या दरात उपलब्ध.
***
हाय... मी आहे चाफा... गेले अनेक दिवस मला एक प्रॉब्लेम होता. एक अतिशय खाजगी प्रॉब्लेम ज्यावर उपाय कुठेच दिसत नव्हता. कामात अतिशय व्यस्त असल्याने मायबोलीवर माझे येणे खूप कमी झाले होते. नविन मायबोलीत कुठे काय सुरू आहे ते मला अजिबात कळत नसे. त्यामुळे पार्ल्यात लोक जोक्स करत असतांना मी केवळ गोंधळलेला चेहरा करून बघत असे. अशाने सगळे लोक माझ्याकडे दुर्लक्ष करू लागले. मी अतिशय निराश झालो होतो.
आणि एक दिवस मला उपाय सापडला. मला मिळाले मायबोली मेडीकेअरचे एक अफलातून प्रॉडक्ट "हितगुज पेसमेकर". हे प्रॉडक्ट वापरल्या नंतर मला आता दिसतात हितगुजवरील निवडक हीट ऍन्ड हॉट बीबी, चुकवु नयेत अशी भांडणे आणि विनोद आयते माझ्या स्क्रीन वर!
आता मी आठवडाभर फिरकलो नाही तरी हितगुजवरील चालू घडमोडींशी सहज पेस जुळवून घेतो. ती गोंधळलेली निळी बाहुली वापरायची मला कधीच वेळ येत नाही. माझ्या मैत्रिणि सुद्धा आता माझ्याशी प्रेमाने बोलतात. मी अतिशय आनंदी आहे. तुम्ही पण हितगुज पेसमेकर आजच मागवा. निळ्या बाहुलीला विसरा, पिवळ्या स्मिताला जवळ करा.
***
"नाही सहन होत आता हे प्रदुषण
जिथे जावे तिथे वाद आणि भांडण
गुलमोहरात सुटलाय काव्य कचर्याचा वास
कसा दूर होईल कायमचा हा त्रास?"
अहो उत्तर अगदी सोप्पय!
वापरा मायबोली मेडीकेअर निर्मीत "निर्मळ ऑक्सीजन मास्क"
मायबोलीवर फिरतांना नाकाला लावा, मिळेल फक्त शुद्ध निर्मळ हवा!!
***
MRI (Maayboli RealID Imaging) Scan
डुप्लीकेट आयडीं पासून आता मिळवा कायमची मुक्ती.
डाऊटफूल आयडींचे करा MRI Scan, निगेटीव रिपोर्ट दिसताच करा बॅन.
*विचारपूशीत सलगी दाखवणार्या अनोळखी व्यक्तींचे स्कॅन करायला अत्यंत उपयुक्त.
***
देवनागरी दातवण
तोन्डात भरलेल्या मिन्ग्लीशच्या किटकांना करा टाटा, आजच देवनागरी दातवण वापरा!
रोज मायबोलीवर येण्यापुर्वी तोन्डात धरून बत्तिस वेळा चावा. नन्तर स्वच्छ पाण्याने खळखळून चूळ भरा.
वाहून जातील सारे मिन्ग्लीशचे किटक्-कोळी आणि तोंडात राहील शुद्ध मायबोली!
मायबोली मेडीकेअरच्या वरील उत्पादनां शिवाय गॉसीप स्पष्ट ऐकण्यासाठी हितगुज हिअरींग एड, बोबडं बोलणार्या नव्या सदस्यांसाठी सुस्पष्ट कवळ्या, दृष्टीकोन बदलणारे चष्मे, आणि डुप्लीकेट आयडीं साठी प्लास्टीक सर्जरीसाठीची विविध उत्पादने सुद्धा मिळतील.
*********************************************************
मायबोलीवरील एका पेक्षा एक व्यक्ती आणि वल्ली ज्यांच्या मुळे ही कुजबुज आम्हाला लिहीता येते त्या सर्वांचा सन्मान करण्यासाठी या वर्षीपासून सुरू करीत आहे,
"कुजबुज गौरव पुरस्कार"
या वेळचे पुरस्कार विजेते आहेत,
सर्वोत्तम नवोदीत काकू - ट्युलिप आणि नन्दिनी.
"वाचा"ळ व्यक्ती २००९ - टण्या बेडेकर आणि रैना.
दक्ष मायबोलीकर पुरस्कार - चिनूक्स आणि पीएसजी.
आणि
बेस्ट कंपू अवार्ड (अल्पावधीतच कंपू बनवून दाखविल्या बद्दल) - कट्टा बीबी
*********************************************************
टाईमपास
चित्रपटांची नावे आणि मायबोलीकर यांच्या जोड्या जुळविण्याचा!
एम एन सी : दैव जाणिले कुणी
झक्की अणि रॉबीनहूड : तू तिथे मी
आर आर एम : आम्ही जातो अमुच्या गावा
पार्ल्याक्का : जाऊ बाई जोरात
महिन् : आली अंगावर
सतिश चौधरी : वळू
विशाल्_कुलकर्णी :दादा फक्त तुझ्याचसाठी
सावली९९ : जगाच्या पाठीवर
एनजे बा.फ.: वाट चुकलेले नवरे
अहिराणी मंडळ, टेक्सास, जुन्नर ई.: साधी माणसे
पुण्यातले पुणेकर : येथे शहाणे रहतात
पार्ले : जाऊ तिथे खाऊ
कट्टा आणि सिंहगड रोड : सामना
कविता विभाग : सरीवर सरी
*********************************************************
M(irchi) Tv:
स. ६.०० वा. :कार्यक्रम : काव्य पहाट
स. ६:३० वा. :कार्यक्रम : काव्योदय
स. ७.०० वा. :कार्यक्रम : काव्य गजर
स. ७:३० वा. :कार्यक्रम : काव्य विधी
स. ८.०० वा. :कार्यक्रम : काव्य स्नान
स.१० वाजता: कार्यक्रम : भटकंती ( एक प्रवास चर्वण) : कवितां ईतक्याच वेगाने हल्ली येऊ लागलेल्या या प्रकारा बद्दल माहिती देतील पी एसजी, मिलिंदा, श्रावण मोडक आणि दादरणिय विशाल कुलकर्णी. विशेष आकर्षण श्री स्वरांग राहुल यांचा विविध शहरांच्या छायाचित्रांचा स्लाईड शो. या नंतर ईतर अनेक मायबोलीकर आपल्या हितगुज वरील प्रवासाची वर्णने सांगतील.
स. ११ वाजता : "आमच्या जीटीजीची बोलू कवतिके"
सहभाग - मायबोलीवरील विविध कंपुतील जीटीजी आयोजक आणि वृत्तांत लेखक.
अनौपचारीक जीटीजी यशस्वी रित्या आयोजीत करून त्याचे औपचारीक आणि जाहीर व्रुत्तांत प्रकाशित करण्याची कला कशी आत्मसात करावी यावर सुद्धा हे मान्यवर बोलतील.
दु. १२ वा. : श्री. माणुस यांचा " केकाटे फाड फाड ईंग्लीश " क्लास.
ह्या शैक्षणिक कार्यक्रमाकडे देवनागरी प्रसार समिती काणाडोळा करेल.
दु. २ वा. : कार्यक्रम - गोष्टी सांगेन शिस्तीच्या चार : सौ.लाल्वाक्का आणि श्री. मिलिंदा सादर करतील पाककलेवरच्या बेशिस्त लोकांना लावलेल्या शिस्तीचे अनुभव कथन.
संध्या. ५ वा.: "मायबोलीच्या पाठीवर जगण्याच्या मर्यादा”": सहभागी होतील नवे विरुद्ध जुने मायबोलीकर.
रात्री ८ वा. : सामूहिक धर्मांतराचा कार्यक्रम. मायबोलीभर पसरलेले टवाळधर्मी हितगुजकर गुलमोहराच्या बहराखाली काव्यधर्माची दीक्षा घेतील. या प्रसंगी धर्मांतर विरोधी समितीचे अध्यक्ष असल्याने चिन्या१९८५ निदर्शने करतील.
रात्री १० वा. : अन्नुलेख सिरीज अंतर्गत कार्यक्रम : "बासरी वादन": कलाकार - अनुस्विनी.
*********************कार्यक्रम समाप्त***************************
वा! वा! तरीच
वा! वा! तरीच पार्ल्यात दिसली नाहीस बरेच दिवस.
MRI (Maayboli RealID Imaging) Scan हे भारी!
मेडिकेअर मी आधी मिडिओकर वाचलं
पांशा माझा अनुल्लेख ???
पांशा
अरे वा
अरे वा बरेच दिवसांनी कुजबूज आली.
MRI, MTv सही आहेत.
कुजबूजचा
कुजबूजचा मेकओव्हर करुन लिहायचं मनावर घेतल्याबद्दल अभिनंदन.
नेहमीसारखंच खुसखुशीत. शालजोडीतले, कोपरखळ्या जागच्याजागी चपखल बसल्या आहेत. तुला कुजबूज लिहून एक काळ झाला हे वाचताना जाणवलं
व्वा व्वा
व्वा व्वा व्वा व्वा!
मस्त
मस्त लिहिलंय एकदम...
मस्त एच एच..
मस्त एच एच.. मजा आला.. (खरं सांगू.. अगदी झणझणित/ खमंग नाही वाटलं पण, डायबिचेक घेतलास का लिहायच्या आधी? ) पण तरीही चविष्ट
MRI (Maayboli RealID
MRI (Maayboli RealID Imaging) Scan, एनजे बा.फ.: वाट चुकलेले नवरे >>>
बाप रे एक दोन वाक्यांवर मोठ्याने हसायला झाले एकदम
मस्तच आहे कुजबुज. आता खंड पडु देऊ नकोस 
(No subject)
मायबोली
मायबोली मेडीकेअर कंपनीची सगळीच वैद्यकिय उपकरणे झक्कास!!!
कुजबूज मेकओवर छान आहे!! ह्या मेकओवर मधे हुडाची मदत घेतली असल्याची शंका येतेय
-----------------------------------
क्यूं इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान तू
दुनिया सजी तेरे लिये, खुदको जरा पेहचान तू!
दोन तीन
दोन तीन ठिकाणी एकदम जबरी, पण एकूण यावेळेस एवढे खमंग नाही वाटले. मूळ लेखन सेन्सॉर करून लिहीले आहे काय?
प्रत्यक्षात फारशी नावे न घेता काही पॅटर्न्स वर अचूक बोट ठेवायची पद्धत एकदम आवडायची, ती दिसली नाही फारशी यावेळेस.
चाफ्याचा
चाफ्याचा पॅरा सहीच आहे
पांशामो ऑनः टिव्हीवर अजमेरी बाबाच्या अॅडची आठवण झाली मला पांशमो ऑफ.
वा, वा.
वा, वा. बरेच दिवसांनी आलात. बरे वाटले.
<<पुण्यातले पुणेकर : येथे शहाणे रहतात>>
उत्कृष्ट विनोदाचे येत्या तीन वर्षांचे पारितोषिक.
तुमचा काही बाबतीत गैरसमज झाला आहे तो नम्रपणे दूर करू इव्च्छितो.
<<एनजे बा.फ.: वाट चुकलेले नवरे>>
प्रथम या बा. फ.चे नाव बा. रा. बा. फ. आहे हे लक्षात घ्या. नि इथे वाट 'सापडलेले' नवरे नि वाट चुकलेल्या बायका येतात. कारण त्या बायकांना खरे तर पार्ले बा. फ. वर जाऊन खाडपणा करायचा असतो, बा. रा. बा. फ. वाटेतच येतो म्हणून मग इथे पण लिहीतात.
वाह भारी
वाह भारी मेकओव्हर !! :))
सगळी यमकं अफलातून बसवली आहेत!
दादरणीय शब्द कुठून मिळाला?? लोल..
मिरची टीव्ही सगळाच कार्यक्रम हहपुवा आहे!!
कितीला पडतं हो सबस्क्रिप्शन त्याचं, ऑनलाईन बघाय्चं म्हटलं तर??
अज्जुन येऊदे !!
मायबोली
मायबोली मेडिकेअर लय आवडले
माझ्या
माझ्या नावाचे मराठी स्पेलींग चुकीचे लिहीले आहे.
मायबोली
मायबोली मेडिकेअर प्रॉडक्ट्स मस्त.. पण आधीएवढी मजा नाही आली...
सॉल्लिड!! ह
सॉल्लिड!!
हेल्थ इन्श्युरन्स नसलेल्या पण आवश्यकता असलेल्या मायबोलीकरांना आवश्यक ती उपकरणे फुकटात मिळावी ही विनंती.
हवे!
हवे! बर्याच दिवसांनी कुजबुज! काहि पंचेस नेहमिप्रमाणे सॉल्लिड.. तरि सेसॉर संमत केल्या सारखा का वाटतोय
इस बार बात
इस बार बात कुछ जमी नही ऐसा लगरेला है! "माझं काय चुकलं?" ह्या बाफ वर कदाचित उत्तर मिळेल.
पण मेकप भारी कियेला है! हे जोरात हसणारे हहच्या कंपू मधले आहेत अशी मला शंका येतेय.
<<हहच्या
<<हहच्या कंपू मधले आहेत >> - म्हणजे त्यांना विनोद कळतो, ज्यांना कळत नाही त्यांना कंपूत घेत नाहीत!

हवे
हवे मेकओव्हर आवडला, चित्र पण आवडली. पण एक्-दोन पंचेस सोडले तर मागच्या वेळसारखी झणझणीत नाही गं.
मस्तच! माझ
माझा पेसमेकर विकणे नाही, उगाच चौकश्या करू नयेत.
माझा
माझा पेसमेकर विकणे नाही कारण पिवळ्या स्मिताला सोडवत नाही!!!
कारण
कारण पिवळ्या स्मिताला सोडवत नाही!!! >>> काय चाफ्या, ही पिवळी स्मिता कोण???
AA, झकास. पण प्रत्यक्ष नावे लिहिल्याने नेहेमीप्रमाणे मजा आली नाही. पण खुप दिवसांनी लिहिलेस हे हि नसे थोडके..
बात कुछ
बात कुछ जमी नही..
नेहमीसारखी हहपुवा झाली नाही.
कुणीतरी वर म्हणल्याप्रमाणे सेन्सॉरची कात्री जोरदार चाललीये अशी शंका आली.
कर्कश्श मोड ऑन
आमची वर्गणी पूर्ण ची आहे. हे असं कात्री चालवलेलं आम्हाला नको बै...
कर्कश्श मोड ऑफ
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
हो ना
हो ना ब्लॉकबस्टर मधे जाउन बघतो अनरेटेड डीव्हीडी मिळतेय का
दाल
दाल तडकाच्या ऐवजी साधे वरण मिळाले ह्यावेळी.. पण तरी भारीये.. सगळ्यात जबरी 'अनुल्लेख सिरीज'
असलं काहीतरी लिहीणे तुलाच शक्य.
'उत्पादने'
'उत्पादने' मात्र महान आहेत - कवळ्या आणि चष्मे जबरी

तसेच पुरस्कार ही - विशेषतः चिन्मय आणि पूनम ला मिळालेला
"कुजबुज - द
"कुजबुज - द व्हिस्पर " >>>
हे आणि त्यामागचे कारण सर्वात भन्नाट !

निळ्या बाहुलीला विसरा, पिवळ्या स्मिताला जवळ करा... मिर्ची टीव्ही... >>>
चित्रे सहीच. पण नाव न घेता लिहिण्याची पद्धत मात्र जास्त सही होती
***
दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)
जबरी!
Pages