एखाद्या सदस्याला 'संपर्क सेवा' वापरून व्यक्तिगत निरोप (ई-मेल) कसा पाठवावा?

Submitted by मदत_समिती on 15 July, 2008 - 18:11

जुन्या हितगुज प्रमाणे ई-मेल ने व्यक्तिगत संपर्काची सोय आता नवीन मायबोलीवर उपलब्ध आहे.
ही सोय मायबोलीकरांच्या प्रोफाईल मधे गेल्यावर "संपर्क" अशा टॅब वरून उपलब्ध आहे.
तुम्ही स्वतःसाठी संपर्कसेवा उपलब्ध केली असल्यास, इतरांना हा टॅब दिसेल.
ही सुविधा वापरून आलेला निरोप, तुमच्या ससस्यत्वाशी निगडीत असलेल्या ईमेल पत्त्यावर मिळेल.
[तुमचा ईमेल पत्ता तुम्ही स्वतः इतरांना संपर्क केल्याशिवाय, अथवा संपर्कातून आलेल्या ईमेलला उत्तर दिल्याशिवाय इतरांना कळणार नाही]

या सुविधेचा गैरवापर टाळावा म्हणून एका तासात फक्त ४ संदेश पाठवता येतील.
या नवीन सुविधेत देवनागरीत संदेश पाठवणे शक्य आहे.

मला भविष्य विषयाच्या ग्रूप मधे सभासद व्हायचे आहे . वेळोवेळी हा मेसेज दिसतो

हे पान पहायची परवानगी नाही.
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. (हे जर ग्रूप मधले पान असेल तर ग्रूपचे सभासद होऊन पहा. पुष्कळदा काही पाने फक्त ग्रूपच्या सभासदांसाठीच मर्यादित असतात)

काय करावे लागेल?

I need help...few days back I read oen article (dont remember the author) its title was "सुटलेल्या पोटाची राजगडावर ...." Cn anybody PLEASE send me link fo this article? I want to read it again......

http://www.maayboli.com/node/13210

मी सुरू केलेला हा धागा काही जणांना सापडत नाहीय्ये..( मलाही सापडत नव्हता).. पाऊलखुणामधून शोधून काढल्यावर ही लिंक द्यायचा प्रयत्न केला असता ते ही शक्य होत नाही..
( धागा का दिसत नसावा ?)

deleted

किरण तुम्ही तो धागा चित्रपट या ग्रूप मध्ये काढला आहे आणि तो त्या ग्रूप पुरताच मर्यादित आहे. त्यामुळे जे लोक चित्रपट या ग्रूपचे सदस्य नाहीत त्यांना तो बघता येणार नाही. तर त्या लोकांना ग्रूपचे सदस्यत्व घ्यायला सांगा. अथवा तो धागा संपादन मध्ये जावुन (ग्रूप या लिंक वर टिचकी मारून) सार्वजनिक करा.

मी माझी एक कविता (आई ) लिहीलेली आहे, मला आणखीन काही कवितेचं लिखान करायचे आहे
तर ते कसे करू?

विजय गोतपागर,
तुम्हाला तुमचे स्वतःचे साहित्य मायबोलीवर लिहायचे असेल तर पानाच्या उजव्या बाजुला 'नवीन लेखन करा' असा दुवा आहे त्यावर टिचकी मारा. तिथे तुम्हाला गुलमोहर/साहित्य लेखन हा धागा मिळेल. तो वापरून तुम्ही हवा तो साहित्य प्रकार लिहू शकता.

समई तुम्ही स्वतःच्या प्रोफाईलमध्ये बघून हे म्हणत असाल तर - स्वतःचा संपर्क टॅब फक्त इतर सदस्यांना दिसतो स्वतःला नाही.
तसेच काही सदस्यांच्या प्रोफाईलमध्ये हा टॅब दिसत नाही कारण संपर्क सुविधा (तसेच विचारपूस) बंद ठेवण्याची सोय आहे. ज्या ज्या लोकांनी ही सुविधा वापरून संपर्क (किंवा विचारपूस) बंद केला आहे त्यांच्या प्रोफाईल मध्ये "संपर्क" दिसत नाही.

.

स्वाती२, मायबोलीशी संलग्न इमेल बघितलेत ना? खात्री करून बघा.
मी तुम्हाला व श्रीला मेल केली आहे. 'नंद्या' या नावाचा शोध तुमच्या मेलबॉक्समध्ये घेऊन सापडते आहे का बघणार का?

माझ्या सदस्यत्वात खाजगी माहितीत व्यक्तीगत संपर्काची सोय हवी आहे यापुढे चेक करुनही माझ्या खात्यात संपर्क ही सोय दिसत नाही. असे का होत असावे?

विशाल,
मला तुझ्या खात्यात 'संपर्क' ही सोय दिसते आहे. तुझा मायबोलीशी संलग्न ईमेल आयडी तपासून पहा.

या बाफच्या हेडरमध्ये वाच, तुम्ही स्वतःसाठी संपर्कसेवा उपलब्ध केली असल्यास, इतरांना हा टॅब दिसेल.

तूच तुझ्याशी संपर्क कसा काय साधणार? Proud

उप्स Proud

<<<संपर्क सुविधा बंद आहे का? अरेरे>>>...हो ना, मेल जात नाही आहे बहुदा कारण स्वत:ला ही संदेशाची प्रत मिळत नाहीये.