"मस्साला चिकन"

Submitted by अवल on 25 March, 2012 - 02:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन अर्धा किलो
कांदे २
लसूण १२ पाकळ्या
आलं अर्धा इंच
हिरवी मिरच्या २
टॉमेटो २
हळद अर्धा चमचा
तिखट १ चमचा
मीठ अर्धा चमचा
लवंगा ५
मिरी ८
दालचिनीचा तुकडा १ इंच
खसखस १ चमचा
बडिशेप १ चमचा
धणे १ चमचा
ओवा अर्धा चमचा
कसुरी मेथी १ चमचा
दही २ चमचे
तेल ४ चमचे
एक कप पाणी

क्रमवार पाककृती: 

१. चिकन स्वच्छ धुवून घ्यावे.
२. लसूण, आलं, हिरवी मिरच्या, हळद, तिखट, मीठ, लवंगा, मिरी, दालचिनी, खसखस, बडिशेप, धणे, दही हे सगळे मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
३. हे वाटण चिकनला लावून ठेवावे.
४. कांदे बारीक चिरून घ्यावेत.
५. टॉमेटो बारीक चिरून घ्यावेत.
६. पसरट भांड्यात तेल तापवून त्यात चिरलेले कांदे घालावेत. कांदे लाल झाले की त्यात चिरलेल टॉमेटो टाकावेत.
७. तेल सुटे पर्यंत परतावे.
८. आता त्यात वाटण लावलेले चिकन टाकावे. कसूरी मेथी आणि ओवा त्यात टाकावा. आता हे सगळे पुन्हा नीट परतावे. किमान ५-८ मिनिटं.
९. यात पाणी घालावे, व हलवावे. उकळी आली की झाकण ठेऊन १० मिनिटे मंद आचेवर शिजवावे.
१०. ५ मिनिटांनी वाफ जिरल्यावर "मस्साला चिकन" तयार !

DSC_0105.JPGDSC_0103.JPG

वाढणी/प्रमाण: 
तिघांसाठी पुरावे :)
अधिक टिपा: 

हे चिकन सुके असल्याने फुलक्यांबरोबर छान लागते. किंवा नुसतेही मस्त लागते Happy

माहितीचा स्रोत: 
माझेच प्रयोग :)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा छान! मस्त आहे रेसिपी.
आणि बरोबर लंचच्या वेळेवर टाकलेय. तो दुसरा फोटो बघून सरळ जेवायलाच बसावे असे वाटले. Happy

वेताळा, घे जेऊन Happy माझ्या लेकासाठी वाङ्हलेले ताट आहे ते. अन कधी कधी फार त्रास दिला तर मी हाक मारते त्याला "वेताळा " Happy

मस्तच!!!!
सोपं आणि चटपटीत वाटतय Happy
तोंपासु नाही म्हणू शकत कारण मी शाकाहारी... पण फोटु भारीये Happy

हं............! दिसतंय छान. आणि आफ्टरऑल.........अवलची कलाकृती आहे!
पण मीही शाकाहारी(घासफूस खाणारी) असल्याने इतकंच.

धन्यवाद सर्वांना Happy मला वाटलं माझ्या गोर्‍यापान फुलक्यांचंच जास्ती कौतुक होईल. पण सगळे खादाड चिकनवर तुटून पडले Proud निदान शाकाहारींनी तरी बघायचं त्यांच्याकडे Wink
मानुषी, धन्स गं Happy

मला आत्ताच्या आत्ता हवय हे अवल. तोंपासु <<<<<<<< +१०००००००००००००००
मला पण पाहीजे

अवल कांदे २ घेतेले तर जास्त नाही का होणार ?

नाही गं. मसाले इतके आहेत ना की त्यांना थोडं हलकं करण्यासाठी लागतात २ कांदे Happy सर्वसाधारणपणे आलं-लसूण्-मिरची / तिखट / लवंगा-मिरे-दालचिनी या तीन प्रकारच्या तिखटांपैकी दोन एकत्र केले तर फार त्रास होत नाही तिखटाचा पण तिन्ही एकत्र आले की फणकारा खुपच वाढतो. मग त्याला कांदा अधिक वापरणे हा मार्ग असतो Happy शिवाय इथे खोबरेपण नाहीये ना.