एका पेक्षा एक - (भाग २)

Submitted by Yo.Rocks on 12 July, 2008 - 23:13

एका पेक्षा एक मधी डान्स असतो का... ??????
डान्सपेक्षा सचिन चे आत्मचरीत्र कथनच जास्ती चालु असते..

बर त्या दिवशी तर प्रदिपने त्याच्या चक्क पाया पडुन कहरच केला.. नि त्या महागुरु ने पण मोठ्या दिमाखाने एखाद्या राजाप्रमाणे त्याला पुर्णपणे पाया पडु दिले.. हे पाहुन विचित्रच वाटले.. भले सचिन वयाने नि अनुभवाने सिनीयर असेल.. पण शेवटी प्रदिपही त्याच काळातला सहकारी.. मग हे पाया पडणे वैगरे अतिच वाटले..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुचित्रा बांदेकर म्हणजे त्या भांड्याच्या साबणाच्या जाहीरातीतली ना? ती राणी पेक्षा बेटर आहे. Proud
अँक्या.. सॉलिड कल्पना आहे.. Lol

>>> सूड म्हणून दोघांना एकत्र एका उंटावर बसून एकमकांशी गप्पा मारयची शिक्षा Lol
"एकमेकान्कडे तोन्ड करुन बसायची" असही हव! Proud
...;
आपला, लिम्बुटिम्बु

च्यामारी, कँक्या ऊंट ताबडतोब आत्महत्या करतील...

काल म्हणजे कहर केला! खरे-खोटे चे गाणे होते काहीतरी..आणि सचिन पार शुभा खोटेंपर्यंत जाऊन पोचला! "खोटे आडनावाची माणसं फार चांगली आहेत" असं एक निर्बुध्द वाक्य बडबडला. मला वाटलं आता खरे वरुन इकडे "संदीप खरे" ला भेटायला येतोय की काय? झालंच तर "गाढवे नावाची माणसं फार हुशार असतात" असलंही काहीतरी.
त्यावर कडी म्हणजे आदेश म्हणे, "एकापेक्षाएक मध्ये आपण घेणार आहहोत एक खराखुरा ब्रेक!" Uhoh Angry
आणि सध्या हे "थोरले बंधू" नवीन टोपणनाव दिलेले दिसतंय आदेश ला.
तुम्ही एक नोटिस केलंय का? जेव्हा सचिनला असंबध्द काहीतरी बरळायचं असतं तेव्हा त्याची सुरुवात तो "बरं का आदेश," अशी करतो. त्याची वटवट ऐकायला पगारी श्रोता ठेवलाच आहे त्याने मग आपण त्यावेळी खुशाल म्युट करायला हरकत नाही. ते वाक्य एक ऍलर्ट म्हणून समजावे.
ता.क. : हे सगळं जरी खरं असलं तरी, नाचातलं सचिनचं बारीक निरीक्षण, आणि त्यावर केलेल्या सूचना यांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ही फालतूची बडबड वगळता थोडा सीरीयसली हा कार्यक्रम झाला तर दर्जा सुधारु शकेल अशी आशा.
----------------------
सुख है अलग और चैन अलग है.. चैन अपना और सुख है पराए
ये जो देखे वो नैना अलग है

आशु, तु ता.क. मधे जे लिहीलंयस ते खरंच खरंय(!?). सचिनचं निरीक्षण आणि परीक्षणसुद्धा फारच छान आहे.
-योगेश

मला तरी असं फील होतं की सचिन त्या ईतर ज्युरींना काडीचंही महत्व देत नाही. त्यांना नावाला बसंवल्यासारखं वाटतं. कारण ज्यरींपैकी कुणीही एखादी काही सुचना केली की " हे असं झालं असतं तर जास्त छान झालं असतं" वगैरे, तरि सचिन एकदाही त्याला दुजोरा देत नाही, त्याचं नवीनच प्रवचन चालू करतो आणि त्याच्या चेहर्‍यावरचे भाव पण असे असतात की या जुरींना काही कळत नाही.
कधी कधी गर्विष्ठ असल्यासारखा वाटतो.

अरे व्वा.. १ पेक्षा १ चे दर्शक कमी झालेत म्हणजे एकंदर प्रगती आहे.. Proud
हल्ली नोकियाच्या मोबाईल वर ड्यान्सचा सराव करतात अस दाखवतात.. जाहिरात करायची म्हणुन कैच्या काय..

काहीच्या काही बोलत असतो त्यामधे सचिन. आणि आदेश चं निवेदन पण फार फार टुकार. माझा नवरा विनोदी कार्यक्रम म्हणुन ते बघतो. पण मला तेवढा पण सहन होत्त नाही तो कार्यक्रम. ते लागलं की चिडचिड होते माझी.

हल्लीच झालेल्या म्.टा. सन्मान पुरस्करात कॉमेडी एक्स्प्रेसच्या टिमने "एका पेक्षा एक"ची सॉलिड टर उडवली होती.. सचिन नि आदेश ने तो पुरस्कार सोहळा बघायला हवा होता Proud

Pages