विक्रम आणी वेताळ

Submitted by mee_na on 27 December, 2008 - 17:19

काल बर्याच वर्षानंतर विक्रम आणी वेताळ ची रामानंद सागर यांची serialपाहीली.त्याच धर्तीवर ही एक कथा....
राजा विक्रम ने फिर एक बार वेताळ को पकडा. आणी दोघे घनदाट अरण्यातुन चालु लागले. वेताळ म्हणाला, राजा एक गोष्ट सांगतो ऐक. पण जर तु एक शब्दही बोललास तर मी परत माझ्या झाडावर उडुन जाईल.
तर ऐक. ...
सुंदरपुर नावचे एक सुंदर गाव होते. त्या गावात एक व्यापारी राहत असे. त्याला अतिशय गुणी आणी रुपवान अश्या तीन कन्या होत्या. रुपवती, धनवती, गुणवती. तीनीही कन्या अतिशय सुंदर, सालस आणी कामात हुशार अश्या होत्या. तीनही कन्यांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते. एकमेकींसाठी, प्रसंगी आपले सुख त्या सोडुन द्यायला तयार होत असे.
अश्या या तीन कन्या, कालपरत्वे मोठ्या झाल्या. व्यापारी आता मोठीच्या लग्नाची चिंता करु लागला. रुपवती दिसायला अतिशय सुंदर होती. त्या मुळे तिला खुप eligible युवकांकडुन मागण्या येवु लागल्या.
त्याच नगरात एक हशार युवक राहत असे. त्याचे नाव सुंदरलाल. तो व्यापार्याकडे नेहमी येत असे. त्या व्यापार्याकडुन त्याला व्यापार शिकायचा होता. त्याला पण खुप मोठे व्यापारी व्हायचे होते.
त्याला फार वाटे आपण रुपवतीशी लग्न करावे. पण त्याची तसे बोलण्याची कधी हिंमत झाली नाही.
धनवती व्यापर्याची दुसरी कन्या. तिने त्याचे व्यवहार चतुर गुण जाणले होते. तिला वाटे हा नक्की आपल्या बाबांसारखा मोठा व्यापारी होणार. तिने मनोमन सुंदरलालला आपला पति म्हणुन वरले होते. पण त्यालाही तिच्या प्रेमाची काहीच कल्पना नव्हती. तिच्या भावनांची कल्पना नव्हती. पण व्यापार्याच्या चतुर नजरेतुन तिच्या भावना सुट्ल्या नव्हत्या. त्याने मनात नक्की ठरवले, की रुपवतीचे लग्न झाले की, आपण सुंदरलाल आणी धनवतीचे लग्न लावुन देउ.
त्याने योग्य असा वर बघुन रुपवतीचे लग्न धूमधड्याक्यात साजरे केले.
रुपवती सासरी गेल्यावर त्याने धनवतीला विचारले, की तुला सुंदरलाल बद्द्ल काय वाट्ते? मला वाटते की तुझे आणी सुंदरलालचे लग्न लावुन द्यावे. धनवतीने सलज्ज नकार दिला आणी आपल्याला सुंदरलाल पसंत नसल्याचे कळवले. व्यापार्याला आश्चर्य वाट्ले. पण आपल्या मुलीच्या ईछेचा मान राखत त्याने तिच्याकरता दुसरा वर पाहुन योग्य वेळी तिचे लग्न लावुन दिले.
त्या नंतर तो सुंदरलाल करता योग्य वधु शोधु लागला. कारण त्याने सुंदरलालला आपला मुलगाच मानले होते. सुंदरलालला त्याने आपल्या धंद्यातिल सगळे बारकावे शिकवले होते. आता सुंदरलाल समजातिल एक प्रतिष्ठीत व्यक्ती बनला होता. त्याच्या हाताखाली २० माणसे काम करीत. तोही आपल्या गुरुच्या, म्हणजे व्यापार्याच्या शब्दाबाहेर नव्हता.
असेच दिवस जात राहीले. सुंदरलालला कोणतिही वधु पसंत पडेना. आता गुणवतीही मोठी झाली. तिच्यासाठी वर शोधण्याचे काम पण व्यापार्यावर पडले. त्याने आपले दुत चारी दिशांना धाडले.
असे असता, सुंदरलालने, गुणवतीला एक दिवस आपण तिच्याशी लग्न करु इछितो असे सांगितले. आणी मोठ्या प्रेमाने विचारले, की तिला त्याच्याशी लग्न करायचे आहे का ? गुणवतीने त्याला स्प्ष्ट नकार दिला. आणी म्हणाली, तु आमच्या घरातला एक आहेस. त्या मुळे मी तुला वर मानु शकत नाही. ...
इतके सांगुन वेताळ राजाला म्हणाला.. राजन... तु हुशार आहेस तुला मानवी स्वभावाचा अभ्यास आहे. तर मग माझा प्रश्न ऐक. आणी मला
उत्तर दे. जर तु माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर मी तुझ्या डोक्याचे तुकडे तुकडे करुन टाकेन. ..
तर प्रश्न असा.. की सुंदरलालवर धनवतीचे प्रेम होते तरि व्यापार्याने विचारल्यावर तिने लग्नाला नाही का म्हटले? आणी गुणवतीने सुंदरलालला नाही का म्हटले ? ...
सांग राजा सांग... नाहीतर तुझ्या डोक्याचे तुकडे तु़कडे करुन टाकेल.

......................

what do you all think ? Answer will come in next 8 days.. till then can you tell ? ...

गुलमोहर: 

मी ना अगो उत्तर कधी येणार आहे?

मस्त.. एकदम चांदोबा मधल्या विक्रम वेताळाच्या गोष्टी आठवल्या.. Happy

एकदम सोप्पं उत्तर असं देता येईल : (पण हे सोप्पं उत्तर बरोबर असेलच असे नाही!)

धनवतीने दिलेला नकार फक्त सलज्ज नकार होता. म्हणजे दिलमें हाँ, लबपे ना वाला! पण तो त्या व्यापा-याला कळला नाही!

गुणवतीने दिलेला नकार दोन कारणांसाठी असू शकतो-
१. त्या दोघांच्या वयांतलं अतर बरंच जास्त असू शकेल (हे हे हे Happy )
२. तिला माहित असेल की धनवतीला सुंदरलाल आवडत होता

Dhanvatila Sundarlal manapsun avadat hota, paratu tyacha vyaparvishayak abhyas purna zala navhta, ani ti Sundarlala ek yeshashvi Vyapari Mhanun pahat hoti

Gunavantine nakar dila karan ticya wadilanni tyala apla mulaga manle, mhanje to ticha bhau zal

Marathi typingcha sarav suru kela ahe
to paryant...........

मि..ना, अग तुझा १ दिवस किती तासांचा आहे? विक्रम वेताळ दोघेही विसरले की काय उत्तर द्यायला?

mala ase vatte ki, dhanvati chya nakarache karan he asel ki tila aapli mothi bahin sundarlal var prem kare hi gotht samjali asel. karan तीनही कन्यांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते. एकमेकींसाठी, प्रसंगी आपले सुख त्या सोडुन द्यायला तयार होत असे. aani gunvati chya nakarache karan var dilele aslya pramane he asu sakte Gunavantine nakar dila karan ticya wadilanni tyala apla mulaga manle, mhanje to ticha bhau zala गुणवतीने त्याला स्प्ष्ट नकार दिला. आणी म्हणाली, तु आमच्या घरातला एक आहेस. त्या मुळे मी तुला वर मानु शकत नाही. ...

धनवतीने सुंदरलालशी विवाह करण्यास नकार दिला कारण तिच्या वडिलांना पण तिच्या भावना लक्षात आल्या पण सुंदरलालला अजुन त्या जाणवल्या नाहित याचा अर्थ
१) सुंदरलालचा भावनात्मक IQ आणि निरिक्षणशक्ति अत्यंत तोकडी आहे, किंवा
२) सुंदरलालला तिच्याशी लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही.

गुणवतीला जर माहित असेल की सुंदरलालला रुपमती आवडत होती आणि धनवतीला सुंदरलाल
१) तर या त्र्यांगड्यात आणखी स्वतःला अडकवुन घेणे नक्कीच तिला बरोबर वाटले नसणार.
२) सुंदरलालला इतके वर्ष कोणीच पसंत पडत नसेल तर त्याचा गुणवतीशी विवाह केवळ तिच्या वडिलांचा मान राखावा म्हणुन सुंदरलाल करेल हे कोणालाही आवडणार नाही.
(अर्थात गुणवतीचा दुसरा कोणी बॉयफ्रेंड पण आजकाल असु शकतो पण तो फक्त अंदाज आहे :-))

माझं उत्तर!

१. सुंदरलालवर धनवतीच प्रेम होतंच. पण त्याचं रुपवतीवर असल्याचं तिला कळलं असावं, त्यामुळे तिने नकार दिला असावा. कारण कुठल्याही मुलीला आपल्या पतीची फर्स्ट चॉईस आपण असावी हे वाटतं, रादर एक तडजोड म्हणून....
२. गुणवतीने नकार देण्याचं कारण म्हणजे धनवतीने त्याला आधी नकार दिला होता. त्यामुळे धनवतीने किंवा बहिणीने नाकारलेल्या मुलाशीच लग्न करणे म्हणजे बहिणीपेक्षा कमीपणा घेणे हा होता. दुसरं म्हणजे बाबांनी हा वर आधी धनवतीसाठी निवडला, आणि तिने नकार दिला म्हणून आपल्यासाठी येणं, हा गुणवतीसाठी कमीपणाच होता, सो तिने नकार दिला...