शिर्षक वाचुन विचारात पडला असणार ना! अहो आहेच हा विषय थोडासा तरी विचार करायला लावणारा. आणि हा लिहायला कारणही तसेच घडले. मागे एकदा लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमध्ये आलेला अभिनेत्री शुभांगी गोखले यांचा "शेवटची इच्छा" हा लेख वाचण्यात आला. त्यात त्यांनी आईच्या अंतिम इच्छेबद्दल लिहिले होते. आईच्या आजारपणात आईने जिवापाड सांभाळलेली त्यांची आवडती झाडे त्यांनी त्यांच्या एका मैत्रिणीकडे ठेवायला दिली होती. काहि दिवसानंतर त्यांच्या आईचे निधन झाले. हि गोष्ट त्यांनी आपल्या मैत्रीणीला कळवली असता त्यांनी सांगितले कि, "अग आईची सगळी झाडे अचानक जळुन गेलीत. काल संध्याकाळपर्यंत ठिक होती!!!! . . . . . . . .
सदर लेख वाचला आणि मागे एकदा एफएम गोल्डवर ऐकलेला एक कार्यक्रम आठवला. विषय होता "झाडांना संवेदना असतात का?" त्यात प्रेक्षक आपले अनुभव/किस्से फोन करून सांगत होते. त्यातील काही अनुभव/किस्से खरंच विचार करायला लावणारे होते. त्यातील काहि निवडक या लेखात मांडतो.
एका बाईने गुलाबाचे झाड विकत आणुन कुंडित लावले होते. ती त्याला रोज पाणी, खत वगैरे घालत असे. पण त्या झाडाची हवी तशी वाढ काहि होत नव्हती. हळुहळु ते झाड सुकु लागले. काही दिवसानंतर तीने ते झाड फेकुन देण्यासाठी काढले असता तिच्या शेजारणीने ते मागितले. त्या म्हणाल्या, "अग हे झाड तर पूर्णपणे वाळले आहे. त्याचा तुला काय उपयोग?". तरीही त्या शेजारणीने तिच्याकडुन हट्टाने ते सुकलेले झाड मागुन घेतले. तिच्याकडुन ते रोपटे घरी आणल्यावर पुन्हा ते कुंडित व्यवस्थित लावले. सकाळ संध्याकाळ त्याला नियमित पाणी घालु लागली. रोज पाणी घालताना ती त्याच्याशी गप्पा मारू लागली. "तुला हे घर नवीन, हि जागा नवीन आहे, पण तु घाबरू नकोस, मी तुझी पूर्ण काळजी घेईन," असे म्हणुन ती हळुवारपणे त्या सुकलेल्या रोपटयावर हात फिरवत असे. आणि काय आश्चर्य काही दिवसातच त्या रोपट्याला नविन पालवे फुटु लागली. काहि दिवसात ते पूर्ण बहरात आले.
दुसर्या एका व्यक्तीने सांगितलेला अनुभव असा होता कि त्यांच्या आजीने गावी एक झाड लावले होते. आजी नित्यनियमाने त्या झाडाला पाणी घालत असे आणि रिकाम्या वेळेत त्याच्याशी गप्पाहि मारत असे. कालांतराने त्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर झाले आणि आजीशी त्याची मैत्री घट्ट होते गेली. ज्या दिवशी आजीचे निधन झाले त्या दिवसापासुन ते झाड उदास दिसु लागले. हळुहळु त्याची पाने गळावयास लागली आणि आजीच्या कार्याच्या दिवशी ते पूर्णपणे सुकुन गेले :(.
तिसरा अनुभव एका कॉलेजकन्येचा होता. कॉलेजमधुन घरी आल्यावर ती घराच्या बाल्कनीत जाऊन तासनतास झाडांशी गप्पा मारत बसायची. तिने सांगितले कि झाडांशी गप्पा मारताना तिला असे जाणवायचे कि तेहि अगदी समरसुन तिच्या गप्पा ऐकत आहेत आणि मध्येच पानांची सळसळ करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत.
माझाहि अनुभव काहीसा असाच आहे. आमच्या इमारतीमध्ये एक जोडपं रहात होते. त्यातल्या काकींना झाड लावण्याची खुप आवड होती आणि तळमजल्यालाच घर असल्याने अनायसे भरपुर जागा मिळाली होती. त्यात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची भरपुर झाडे लावली होती (जाईजुईचा मांडव घातला होता, त्या मांडवाखाली फुलांचा सुगंध घेत घेत लहानपणी आम्ही तासनतास खेळत बसायचो, गावठी गुलाब तर अगदी हाताच्या पंजाएव्हढे मोठे यायचे, काटेकोरांटी, जास्वंद, गुलाब यांनी त्यांची बाग सतत बहरलेली असायची). त्यांना स्वतःला मुलबाळ नसल्याने झाडांची अगदी स्वतःच्या मुलांसारखी काळजी घेत होत्या. त्यांनी अगदी सुकलेली फांदी जरी लावली तरी तिला पालवी फुटायची असा त्यांचा "हिरवा हात" होता. आज त्या काकी हि नाही आणि त्यांनी लावलेली ती झाडेहि नाहित.
अशाच प्रकारचा एक अनुभव मी सध्या अनुभवत आहे. आमच्या शेजार्यांनी गुलाबी जास्वंद लावली होती, सुरुवातीचे काहि दिवस त्याला फुलं आली होती (मोजुन अगदी ५-७) नंतर अचानक त्या झाडाला फुलं येणे बंद झाले आणि झाड वेलीसारखे नुसतेच वाढत राहिले. ७-८ महिन्यापूर्वी त्यांनी ते झाड काढुन टाकले, त्यातलीच एक फांदि घेऊन मी कुंडीत लावली आणि आता ते झाड कळ्या फुलांनी बहरले आहे. रोज ३-४ फुलं मला पुजेसाठी मिळतात. अर्थात त्या रोपट्याची तशी जोपासनासुद्धा करतोय. याच गुलाबी जास्वंदीचे काहि फोटो मागे प्रकाशचित्र विभागात मी प्रवास कळीचा या शिर्षकांतर्गत टाकले होते. शेजार्यांनाही या गोष्टीचे आश्चर्य वाटते कि जेंव्हा हे झाड त्यांच्याजवळ होते तेंव्हा फुलं का नाहि फुलत होती (कदाचित याच्यामागे काहि शास्त्रीय कारणही असेल). आता तेच माझ्याकडे येत्या पावसाळ्यात कुंडित लावण्यासाठी झाडाची फांदी मागत आहेत
मागे एकदा वाचनात आले होते कि, पूर्वी गावात हरतालिकेच्या/गौरीच्या पुजेसाठी जी पाने लागत ते तोडण्याआधी बायका, त्या झाडांची परवानगी घेत आणि विचारत, "आम्हाला गौरी/हरतालिकेच्या पुजेसाठी काहि पाने हवी आहेत ती आम्ही घेतो." :-).
"तारे जमींपर" या चित्रपटातसुद्धा अमीरने एका प्रसंगात झाडाच्या उदाहरणाचा उल्लेख केला आहे. कुठल्यातरी आदिवासी जमातीचे लोक झाड तोडण्याआधी त्या झाडाला मनसोक्त शिव्याशाप देतात, ते शिव्याशाप ऐकुन कालांतराने ते झाड आपोआप सुकुन जात असे आणि नंतरच ते त्याला कापत असे.
वरील उदाहरणे, अनुभव वाचुन/ऐकुन, अनुभव घेऊन खरंच मन विचार करायला लागले आहे कि, "झाडांना संवेदना असतात का?"
याहि विषयावर काहि मतमतांतरे किंवा शास्त्रीय कारणे असतील पण तुम्हीसुध्दा एकदातरी हा अनुभव घेऊन बघा. एखादे रोपटे कुंडित्/मोकळ्या जागी लावा. त्याची व्यवस्थित जोपासना करा. त्याच्याशी आपुलकिने वागा. जेंव्हा त्या रोपट्याला पहिल्यांदा फुलं/फळं लागतील तेंव्हा तुम्हाला होणारा आनंद अनुभवा. म्हणजे शिर्षकात असलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपसुकच मिळेल.
aschig चांगला खुलासा केलास.
aschig चांगला खुलासा केलास. पूर्वी internet नव्हतं तेंव्हा माहितीचे स्त्रोत नसल्याने काय खरं काय खोटं कळत नव्हतं आणि आता internet असल्याने एवढी जास्त माहिती उपलब्ध असते की काय खरं आणि काय खोटं ते कळत नाही
कारल्याचि वेल सरपटणारि
कारल्याचि वेल सरपटणारि वनस्पति (क्रिपर) आहे जमिनिच्या वर स्वतःच्या बळावर उभे रहाण्याइतकि ताकद ह्या प्रकारच्या झाडांच्या खोडात नसते. दोर्याचा आधार उपलब्ध होता म्हणुन तिने तो वापरला नसता तर जमिनिच्या आधाराने पुढे गेलि असति. दोर्याच्या आढाराने उभे रहाण्यात सुर्यप्रकाश व पर्यायाने अन्न मिळण्याचि शक्यता जास्त होति म्हणुन तिचे प्राधान्य दोरिला होते.
कीटकभक्षक वनस्पतीची माहिती
कीटकभक्षक वनस्पतीची माहिती माझ्या लहान्पणी किशोर मासिकात वाचली होती.फोटोसकट.
वेलींचा आधार घेत वर जाण्याचा
वेलींचा आधार घेत वर जाण्याचा प्रकार मनीप्लँट (किंवा चीज प्लँट ) मधे फार दिसतो. जंगलात जर त्याचा एखादा तूकडा जमिनीवर पडला, तर तो उजेडाच्या दिशेने न जाता अंधाराच्या दिशेने जातो. कारण अंधार म्हणजे मोठे भक्कम झाड आणि त्याच्या आधाराने, त्याला वर चढता येते. (घराच्या अंधारातही हा वेल वाढू शकतो.)
कीटकभक्षक वनस्पती या नायट्रोजन मिळवण्यासाठी करतात (रोरायमा पर्वतावर हे प्रकार फार आहेत )
पण परागीभवनासाठी, वनस्पती जो किटकांचा, प्राण्यांचा उपयोग करुन घेतात, त्यासाठी सापळे लावतात, क्लृप्त्या करतात, ते सगळे फार मनोरंजक आहे.
वनस्पती, आजूबाजूच्या परिस्थितीशी जूळवून घेण्यासाठी आपल्यात जे बदल करतात, हे एका पिढीत दिसणे, (त्यांच्या वा आपल्या ) अशक्य आहे.
पूर्व आफ्रिकेच्या जंगलात ग्रासलँड, अकाशिया, हत्ती, तृणभक्षक प्राणी, यांचा सदोदीत एक खेळ चाललेला असतो. कधी अकाशिया फोफावतो तर कधी ग्रासलँड प्रभावी ठरते. त्याचे चित्रीकरण बीबीसी ने केलेले आहे. कोण कुणाचा उपयोग करुन घेतेय, हे सांगणे कठीण आहे.
दिनेशदा नी वर लिहिले आहे ते
दिनेशदा नी वर लिहिले आहे ते उक्रांती बद्दल. उत्क्रांती ला संवेदना असतात का (मोट्ठा कालखंड लक्षात घेऊन) हा वेगळा विषय आहे, आणि त्याचेही उत्तर नाही असेच आहे. म्हणजे उत्क्रांती ला दिशा नसते. यातील कोणतेच बदल जाणीव्पुर्वक झालेले/केलेले नसतात. अनेक बदल हओत असतात, आणि जे यशस्वी होतात त्यांचीच चिल्लेपिल्ले जगतात व नंतर दिसु शकतात. डोळ्याचेच उदाहरण घ्यायचे झाले तर तो अवयव कितितरी वेळा थोडा-थोडा येऊन गेला असणार.
आपले अनुभव इतर गोष्टींवर लादल्यामुळे निसर्गाच्या वैविध्यतेला कमी लेखले जाते.
मला माहीत नाही मी हा प्रसंग
मला माहीत नाही मी हा प्रसंग इथे लिहावा कि नाही ! मला झाडांची प्रचंड आवड आहे. फक्त भारतातीलच नव्हे इतर देशातील झाडेही आहेत माझ्याकडे. मला लहानपणापासुन झाडांना पाणी घालताना त्यांच्या बरोबर बोलायची सवय आहे. मला वाटायचे की त्यांच्यात देव राहतो.झाडांच्या रुपाने मी त्याच्या बरोबर बोलायचा प्रयत्न करायचो. मला कळत नाहीये मी सांगतोय त्यावर तुम्ही विश्वास ठेवाल की नाही. पण ज्यादिवशी माझे बाबा वारले त्या दिवशी मी सगळा राग माझ्या पपईच्या झाडावर काढला. मी सहावीत होतो तेव्हा. मला काही कळत नव्हते. मम्मीला तर प्राचंड धक्का बसला होता.ती ना रडत होती ना काही बोलत होती. शुन्यात नजर लावुन बसलेली होती. सगळे जण तिला रडायला संगत होते पण तिला जणु काही ऐकुच जात नव्हतं. मला जवळ घेऊन् गप्प बसलेली होती. माझी अवस्था तर विमनस्कच! हा सगळा ताण, राग अनावर झाला आणि मी त्या झाडाला बोललो की" तुला काय कळनारएय आज काय झालेय ते. आजपासुन मी तुझ्याबरोबर बोलणार नाही. तुझ्या मुळे माझे पप्पा गेले .....जर माझ्या मम्मीला काय झाले तर आयुष्यभर बोलणार नाही तुझ्याशी." खरं तर हे सगळं मी (माझ्या समजुती प्रमाणे झाडात असलेल्या) देवाला उद्देशुन बोलत होतो. पण,
त्या दिवसांनंतर तिसर्या दिवशी ते झाड पुर्ण वाळले,
kulu खरच झाडांना संवेदना आणि
kulu
खरच झाडांना संवेदना आणि भावना असतात.
हे ललित मधे का? असो. >>>>
हे ललित मधे का? असो.
>>>> "झाडांना संवेदना असतात का?" <<<< अर्थात अस्तात!
पण माझ्यापुढे भलताच प्रश्न पडलेला आहे की "झाडान्च्या संवेदना कळायची इतकुश्शी तरी अक्कल माझ्याकडे आहे का?"
नसेल, तर काय उपायाने ती मिळविता येईल?
जिप्सी, मस्त लेख! 'अनुभव
जिप्सी, मस्त लेख! 'अनुभव चित्ता चित्त जाणे!' असं काहीसं आहे हे!
वनस्पतींशी संवाद साधणार्या प्रत्येक व्यक्तीला असा अनुभव आहे की त्या आपल्याशी संवाद साधतात. त्या व्यक्त होतात. त्यांना सुख-दु:ख असतं,भाव-भावना असतात. त्या रुसतात,रागावतात,लाड करून घेतात. आपलं बोलणं लक्ष पूर्वक ऐकतात. अशा अनेक गोष्टी आहेत.
मस्त लेख! खूप आवडला.
चांगला धागा.. वर आणल्याबद्दल
चांगला धागा..
वर आणल्याबद्दल धन्यवाद.. 
बहिणाबाई चौधरी शेतातील
बहिणाबाई चौधरी शेतातील झाडांशी बोलायच्या असे शालेय पुस्तकातल्या धड्यात वाचले होते... मलापण झाडांशी ( आणि मांजराशी) बोलायला आवडते..
हा अनुभव सांगितला तर कुणाला
हा अनुभव सांगितला तर कुणाला खरे वाटणार नाही, पण मला बागेतली फुले चक्क हाक मारतात असे वाटते. अगदी नकळत मी त्यांच्याकडे ओढला जातो. एरवी सोबत असणार्या लोकांना, न दिसणारी फुले मला बरोबर दिसतात.
इतकेच नव्हे तर बंद दाराआडची फुले पण मला हाक मारतात. आणि मी तिथे जातोच.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=Z5sNwErulHg
परवाच बीबीसी वर झाडांच्या आणि
परवाच बीबीसी वर झाडांच्या आणि एकूणच जीवनाच्या उत्क्रांतीवर एक कार्यक्रम पहिला. भारतात दिसेल की नाही माहिती नाही पण बीबीसीच्या आयप्लेयर वर असेल कदाचित. त्या मध्ये एक प्रयोग दाखविला की दोन सारख्या जातकुळीची झाडे निरीक्षणाखाली ठेवली. एका झाडाची पाने कापली. तर असे दिसून आले की झाड एक प्रकारचा वायू सोडतो. त्यामुळे दुसऱ्या झाडत पण बायलोगीकॅल बदल दिसून आले. थोडक्यात झाडे पण एक मेकांना संदेश देतात की हल्ला होतो आहे आपल्याला वाचवा. त्यात असेही एक सांगितले की सर्व पृथीवर एके काळी झाडांचे साम्राज्य होते. नंतर डायनासोर आले आणि त्यांच्या निम्म्या जाती ह्या शाकाहारी होत्या. त्यामुळे झाडांचे राज्य कमी झाले पण हे अजस्त्र प्राणी आणि झाडे ह्यांच्या झगडा चालू झाला. कधी झाडे जिंकत होती तर कधी दाय्नोसोर्स. झाडांच्या वेगवेगळ्या जाती, त्यांना येणारे काटे, काट्यांचे प्रकार टोकदार प्रकार आणि मुख्य म्हणजे झाडांची उंची हे सगळे प्रकार म्हणजे एक प्रकारचे हत्यार आहे. जेणेकरून आपल्याला खाता येऊ नये. असो त्याचा अर्थ झाडांना नक्कीच संवेदना असतात.
जशा आपल्याला
जशा आपल्याला पंचेद्रियांद्वारे संवेदना असतात तशा अर्थाने खूपशा बहुपेशिय सजिवाना संवेदना असतात.
आपण विचार करतो तसे विचार प्राणी/क्रुमि/कीटक कमिअधिक प्रमणात करतात. वनस्पति त्या अर्थाने विचार करतात का याचे उत्तर बहुतांशी नाही. पण "विचार म्हणजे काय" यावर हा निष्कर्ष अवलंबून आहे. (circular definition in this argument)
artificial intelligence हे प्रश्न अधिकच जटिल करतो. त्यावर कधितरी नन्तर जर वेळ मिळाला तर.
झाडारडती ची
झाडारडती ची रिक्षा:
http://www.maayboli.com/node/27512
माझा स्वतःचा असा अनुभव नाही.
माझा स्वतःचा असा अनुभव नाही. पण माझी आज्जी(आईची आई), आजोबा(बाबांचे बाबा) आणि आई... सगळेच हिरवेअंगठे बहाद्दर!
तिघांनाही मी झाडांशी बोलताना बघितलय, त्यांना गोंजारताना बघितलय.
एक असा विचार करूया... जगात जे काही अस्तित्वात आहे त्याला एकच तत्वं बांधून आहे - ब्रह्मंतत्वं. त्या नेणीवेनं संपर्कं झाला तर? त्या तत्वाचा एक अविष्कार दुसर्याशी संधान बांधू शकेल का?
कोणत्याही भौतिक जोडणीशिवाय (physical connection or communication link) निव्वळ विचारांच्या माध्यमातून संवाद साधणं माणसाला ज्ञात आहे. (टेलेपथी??). किंवा जवळच्या माणसाच्या बाबतीत झालेली विशेष घटना (दुर्घटना)... आपल्या मनात उमटते हा ही अनेकांचा अनुभव असेल. हे कोणत्या प्रकारचं "बोलणं" आहे?
मला वाटतं, झाडांशी "बोलू" शकणं, किंवा आपलं संवेदन त्यांच्याशी वाटून घेणं ही माणसाची केवळ सुरुवात आहे.
झाडं आपल्यापेक्षा अधिक प्रगत आहेत का...अशा प्रकारच्या कम्युनिकेशनमधे?
प्रश्नं आहे की झाडांना संवेदना आहे का? संवेदनेचे जे स्तर आपण माणसं डिफाईन करून आहोत त्या स्तरावर त्यांना संवेदना असणं किंवा नसणं असं म्हणणं चूक होईल असं मला वाटतं. त्यांची संवेदना त्यांच्या स्तरावर डिफाईन व्हायला हवी नाही का?
(भलतच वळण देतेय... आणि पळतेय)
Pages