बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी

Submitted by जागोमोहनप्यारे on 10 January, 2012 - 11:16

बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी

आमच्या गावात एका डॉक्टरांकडे बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी आहे.

१. काश्यपसंहिता, भैषज्यरत्नावली यांचा आधार
२. सुवर्णभस्मयुक्त गाईचे तूप, ब्राह्मी, वचा, शंखपुष्पी, अश्वगंधा, पिप्पली व इतर औषधींचा वापर
३. हे औषध कोणत्याही महिन्याच्या पुष्य नक्षत्रादिवशी सुरु करावे.
४. वयोगट : जन्मजात बालक ते १२ वर्षे

कुणाला याबाबत माहिती आहे का? या औषधाचे नेमके फायदे काय आहेत?

Happy
balak.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतक्या लहान वयात सुवर्ण प्राशन म्हणजे हा मुलगा मोठा झाल्यावर सोनार किंवा काँग्रेसचा पुढारी होणार.

इतक्या लहान वयात सुवर्ण प्राशन म्हणजे हा मुलगा मोठा झाल्यावर सोनार किंवा काँग्रेसचा पुढारी होणार.
>>>>>>>>>>>

पुण्याच्या आसपासच्या गावतला असेल तर "राष्ट्रवादी टग्या" होणार.

इतक्या लहान वयात सुवर्ण प्राशन म्हणजे हा मुलगा मोठा झाल्यावर कोण होणार????

अ. रमेश वांजळे
ब. बप्पी लाहिरी
क. वामन हरी पेठे
ड. पु. ना. गाडगीळ

इतक्या लहान वयात सुवर्ण प्राशन म्हणजे हा मुलगा मोठा झाल्यावर सोनार किंवा काँग्रेसचा पुढारी होणार. >>> Lol मग माती खाणारा मुलगा काय होईल ? Proud

हा बा.फ. योग आणि आर्युवेद ह्या विभागात दिसतोय, पण प्रतिसाद मात्र "विरंगुळा" या सदरात मोडतायत. Sad

हा बा.फ. योग आणि आर्युवेद ह्या विभागात दिसतोय, पण प्रतिसाद मात्र "विरंगुळा" या सदरात मोडतायत.
----- हसत खेळत वैद्यकशास्त्रीय ज्ञानाचा प्रसार समाजातल्या तळागाळां पर्यंत करण्याचे पवित्र कार्य सिद्धीस नेण्याचे कंकण जामोप्या ह्यांनी बांधले आहे. आता त्यांनी नवा धागा सुरु केला आहे ह्यापेक्षा विरंगुळा अजुन कशाला म्हणायचा असा (मी सोडुन :स्मित:) काही लोकांनी समज करवुन घेतलेला असेल तर तो पुर्णपणे चुकीचा आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल असे मला वाटते. येथे धागा कोणत्या विभागांत सुरु केलेला आहे ह्याला खुप महत्व रहांत नाही.

सुवर्ण किती कॅरेटचे असायला हवे ह्याबद्दल काही माहिती मिळू शकेल का ? सुवर्ण नसेल तर भंगारातल्या पत्र्याने काम चालेल का ?

जामोप्या, चांगला विषया वर धागा काढल्या बद्दल धन्यवाद.......
माझी एक मौत्रिण ख्रिचनं आहे, त्याच्याकडे नवजात मुलांनां तुम्ही वर सान्गिंतल्या बद्दल सुवर्णभस्म देतात....
मी माहिती गोळा करुन तुम्हाला सान्गेल.....

बाकी लोकांचा timepass चालूदे.....

>>>अ. रमेश वांजळे
बाप रे!! त्या पेक्षा पर्याय ब बरा. Happy

हे मत चूकीचे असू शकते. वांजळे गेल्यावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना मायबोलीवरच्या कित्येकांनी वांजळ्यांसारखा चांगला माणुस गेल्याबद्दल दु:ख व्यक्त केलेले.

बालकांसाठी सुवर्ण प्राशन >> बद्दल डॉ. चे मत आहे की त्याने एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते. ख. खो. मा. ना.

यावर कोणी अजुन सविस्तर लिहिले तर बरे होईल.

सुवर्णभस्मयुक्त गाय कशी असते?

>>>> मंजूडी, इथे 'सुवर्णभस्मयुक्त बॉय' बद्दल चर्चा चालूहे. तो बॉय मोठा झाला की 'सुवर्णभस्मयुक्त गाय' आपोआप मिळेल. Proud

>>>> मंजूडी, इथे 'सुवर्णभस्मयुक्त बॉय' बद्दल चर्चा चालूहे. तो बॉय मोठा झाला की 'सुवर्णभस्मयुक्त गाय' आपोआप मिळेल. >>> Lol

बाकी आधी हि ऑफर ५ वर्षाच्या मुलांपर्यंत होती. आता १२ झाली काय?

मंजूडी, इथे 'सुवर्णभस्मयुक्त बॉय' बद्दल चर्चा चालूहे. तो बॉय मोठा झाला की 'सुवर्णभस्मयुक्त गाय' आपोआप मिळेल.
>>>>>>>>>

मा........................मी Biggrin Rofl

इशानचा जन्म झालेला तेव्हा आम्हाला त्याचं दर्शन व्हायच्या आधीच डॉक्टरनी आम्हाला कडक समज दिली होती सोन, मध इ इ चाटवण्याचा प्रयत्नदेखील करु नका कोणाच्याही सांगण्यावरुन. नवजात अर्भकाचा श्वास कोंडु शकतो अशा गोष्टीने.

वर उल्लेखलेलं काही वेगेळाच प्रकरण दिसतय.

मुंबईत poddar hospital, worli ला हा डोस दिला जातो, आणि खुप गर्दि पण असते तिथे. नालासोपारा, सायन इथे हि दिला जातो.

नवजात अर्भकाचा श्वास कोंडु शकतो अशा गोष्टीने.>
पण मि तर ऐकल आहे की सुवर्ण प्रशन २-३ महिन्यांनी द्यायच असत. अगदी वयाची ५ वर्ष होइपर्यंत.

डॉक्टरनी आम्हाला कडक समज दिली >
डॉ तर लहान मुलांना काजळ पण घालु नका अस सांगतात.

दर महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर द्यायचे असते.. या नक्षत्रामुळे नेमके काय होते?

जामोप्या... सध्या पुष्य नक्षत्र चालू आहे रे....

लगे हाथ पोरांना काय ते भरवून घ्या सुवर्ण... Proud हाण तिच्या मारी...!!!

>>> दर महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर द्यायचे असते.. या नक्षत्रामुळे नेमके काय होते?

या नक्षत्रावर खाल्लेले सोने पचवता येते. म्हणून तर पुष्य नक्षत्राच्या दिवशी सोनारांची चांदी होते.

मला वाटते सुवर्णभस्म या नावाने घोटाळा होत आहे.. जसा "देवकण" म्हणजे देवाचे अस्तित्व सिद्ध झाले असा काहीनी गैरसमज करुन घेतला Happy .. तसे हे जे काही टॉनिक आहे त्याचे फक्त नाव सुवर्णभस्म असावे त्यात सोन्याचा अंश असतो हे कोणाला नक्की माहित आहे का? (३०,०००रु. तोळा आहे.. यात सोन्याचा अंश असता तर लोकानी हे "औषधाला" शिल्लक ठेवले असते काय?) Happy

Pages