श्री. शंकर महाराज - धनकवडी - एक श्रीमंत अनुभव

Submitted by नितिन२९ on 6 December, 2011 - 12:35

श्री. शंकर महाराज - धनकवडी - एक श्रीमंत अनुभव,

लहानपणा पासून मी ऐकत आलो आहे कि गुरु आपल्याला शोधात असतो, आपण फक्त त्यांच्या आगमनाची वाट बघायची. काहीच कळाले नाही. कारण वयच असे होते. असे वाटत होते कि फक्त शांत बसून राहायचे तर कशाला शोधाशोध करा. बसा स्वस्थ. खरे म्हणजे आतून ती ओढ पण वाटत नव्हती. मला सगळयात कंटाळा आणणारे काम म्हणजे देव पूजा वाटायचे. जेव्हा जेव्हा पूजा करायची वेळ माझ्या वर यायची तेव्हा मी असे वागायचो कि आता आठवले तरी लाज वाटते. ( देव, मला क्षमा कर ).
साधारण १९९२ -९३ साल असेल मी माझ्या एका नातेवाईकाबरोबर बोलत होतो आणि एक गृहस्थ त्याच्या ओळखीचे आले मला आठवत त्यांचे नाव श्री. राव होते. काही वर्ष ते भुसावळला पण होते. त्यांनी एका पुस्तक चा उल्लेख केला होता " साद देती हिम शिखरे" त्याच बरोबर त्यांनी मला सूचना दिली कि तू ते पुस्तक वाचू नकोस. कारण काय तर माझे आताच विचार वैराग्याचे आहेत पुस्तक वाचून मी सन्यास घ्यायचो अशी त्यांना भीती वाटत होती.
एखादी गोष्ट करू नको म्हटले कि प्रथम तीच गोष्ट करावीशी प्रत्येकाला वाटते तसे मला पण झाले. मुळात मला वाचनाची व्यसन होतेच. त्यात असे कळल्यावर मग आता ते पुस्तक वाचायचे ठरवले. पुस्तक आणले शांतपणे वाचन सुरु केले. मस्त अशी समाधी लागली. वाचन एका दमात पूर्ण केले. खूप आवडले. मला सर्वात आवडले तर त्या पुस्तकाची प्रस्तावना. त्यात श्री. शंकर महाराजानबद्दल माहिती दिली आहे. माझ्या सारखेच नास्तिक श्री. प्रधानांना, महाराजांनी कसे विचारले? हे आठवून मनाची अशी धारणा झाली कि आता पुण्याला गेलो कि धनकवडीला जायचेच. तसा गेलोहि. तिथल्या सिगारेट पेटवून ठेवलेल्या बघून लक्षात आले कि चौकटीतले महाराज नाही, हे अवलिया. मनात ओढ निर्माण झाली. पण ती तेवढ्या पुरतीच. पुढे फक्त त्यांच्या बद्दल वाटत राहायचे पण काही मी केले नाही.
अशी वर्षे जात होती. माझ्या मित्राने पण ते पुस्तक वाचले त्याला पण खूप आश्चर्य वाटले. तो पण मठात जाऊन दर्शन घेऊन आला. पण प्रगती अशी त्या क्षेत्रात झाली नाही.
पुढे संसारात पडलो आणि ह्या विषयाचा थोडा विसरच पडला असे झाले खरे. नाशिकला ज्योती स्टोर्स माहित नाही असे फार कमी लोक असतील. मला पण कधी त्यांच्या कडे कधी काम पडले नाही. त्यामुळे त्यांचे उपक्रम फक्त पेपरमध्ये वाचत होतो. पण माझी वेळ आले होती. श्री. शंकर महाराजांनी मला हाक मारली होती. बस पुढे काय? मी गेलो काही कामा निमित्त आणि मला श्री. शंकर महाराजांचा एक मोठा फोटो दिसला. मी श्री. ज्योतीराव खैरनार ह्यांच्या कडे चौकशी केली. त्यांनी खूप उत्साहाने मला माहिती दिली. काही पुस्तके पण भेट दिली. काहीहि परिचय नाही. मग मी मधून मधून त्यांच्या कडे जात होतो. माझ्या पत्नी मुळात काही देवाची आवड नाही पण असे आम्ही गेलो त्यांच्या कडे आणि हि म्हणाली कि असा मोठा फोटो श्री. शंकर महाराजांचा आपल्या कडे असावा. जणू महाराजांनी हिचे बोलणे ऐकलेच. झाले मला भला मोठा फोटो श्री. ज्योतीराव खैरनार ह्यांनी भेट दिला. मी म्हणालो कि हे बघा मी कर्म सिद्धांत मानतो. त्यामुळे मी फुकट काही घेत नाही. त्यामुळे तुम्ही ह्या फोटो चे किती पैसे झाले मला सांगा? मी जास्त शहाणा. त्यांनीच मार्मिक उत्तर कि मी महाराजांच्या फोटोचे पैसे घेणार नाही. माझा नाईलाज झाला.
मी तो फोटो घरी आणण्यासाठी दुचाकी घेऊन गेलो तर ते म्हणाले कि तुमच्या कडे चारचाकी नाही का? मी म्हणालो कि असा किती मोठा फोटो आहे? बापरे तो तर खूप मोठा फोटो होता...! आता काय करायचे? मी मुलीला - मधुराला म्हणालो तू मागे नीट धरून बस. तिच्या कडे फोटो दिला. फोटो काय तो तर फ्रेम केलेला फोटो होता. ती बसली खरी पण माझा जीव वर खाली. हि जर तो फोटो घेऊन पडली तर? मधुरा म्हणाली कि बाबा गाडी जोरात चालवा मला काही वजन जाणवत नाही आहे. घरी आलो मी जेव्हा ती फ्रेम उचलली तेव्हा माझा विश्वास बसेना हि फ्रेम एवढी जड हिने कशी काय पेलली असेल?
घरी आलो मन भरून आले. काय त्यांचा थाट? माझी काय लायकी? पण सदगुरुनी कृपा केली. त्यांच्या आगमना नंतर एक महत्त्वाचा फरक जाणवला कि घरात कोणी मोठा आधार आला असे वाटायला लागले. सतत त्यांची भेदक नजर आमच्या कडे असायची. पुढे तर मला असा एक फरक जाणवत होता कि त्यांची नजर सुरुवातीला जी भेदक वाटायची ती आता प्रेमळ वाटत होती तसे कधी मिशिकील सुद्धा. रोजच्या ताण तणावात क्षण दोन क्षण जरी बसलो कि झाले संपले ताण तणाव.
पुढे मला श्री. ज्योतीराव खैरनार ह्यांनी श्री शंकर गीता दिली म्हणाले कि रोज एक अध्धाय वाचा अन बघा महाराज भेटतात कि नाही? आम्ही घरात तिघे रोज श्री. शंकर गीता वाचायला लागलो. खरोखर असे जाणवते कि महाराज आमच्या बरोबर आहेत. मग आली दिवाळी. एक दिवाळी अंक मागच्या वर्षी बघितला होता. श्री. शंकर महाराजांवर होता. "ग म भ न" हा अंक फक्त एका दिवसासाठी वाचायला आणला आणि त्यातले इतरांचे अनुभव वाचून तर खूप रडायला आले. खूप भरून आले. महाराजांना विनंती केली महाराज मला तुम्ही ह्या दिवाळी अंकाच्या स्वरुपात हवे आहात. मागच्या वर्षी माझ्याकडे हा मोठा फोटो नव्हता. आता दिवाळी होऊन दोन महिने झालेले. दिवाळी अंक संपलेले. काय करणार? ज्या संस्थेचा अंक होता त्यांना विनंती केली पण त्यांच्या कडे पण एकाच अंक होता. त्यांचा पण नाईलाज झाला. मी त्यांच्या संपादकांना फोन केला विनंती केली कि मला हा अंक नाशिकला मिळेल काय? खूप उशीर झाला आहे पण बघा. त्यांनी मला एक पत्ता सांगितला. मी गेलो अंक होते दोन घेतले एक माझ्या साठी अन एक श्री. खैरानारांसाठी. माझ्या साठी तिथे फोन आला संपादकांचा कि जेवढे अंक त्यांच्या कडे असतील ते तुम्ही घ्या आणि जे महाराजांचे भक्त असतील त्यांना ते द्याल. मी तर रडायला लागलो. माझी काय लायकी आणि महाराजांना मी एक अंक मागितला त्यांनी तर मलाच वाटायला सांगितले. माझा वाटा फक्त एका वीज घेऊन जाणारया वायर इतका फक्त महाराजांचा आदेश मला पाळायचा होता. बाकी सगळी महाराजांची कृपा.
ह्या वर्षी चा ग म भ न चा दिवाळी अंक पण अत्यंत सुंदर आहे. खरोखर महाराजांची सगळ्यात मोठी गम्मत मला वाटते कि सगळे घर जोडले जाते. बहुतेक वेळा असे होते कि घरातील एखादी व्यक्ती देवभक्त असते पण जेव्हा महाराज आमच्या घरी आले आणि सगळे घरच जोडले गेले असे झाले.
आता तिरुपतीला जायचे झाले आहे पण त्या पूर्वी महाराजांना भेटायचे असे मनात होते पण जमणार कसे कारण गाडी मुंबई हून पाकादाची होती आणि धनकवडी ला जाने जमणार कसे? पण महाराजांची म्हटले आहे अशक्य ते शक्य झालेही तसेच मला वरून आदेश पुण्याला एक मिटिंग आहे त्या साठी जाणे आवशक आहे. कार पण दिली आहे आणि हे फक्त महाराजाच करू शकतात. कार मला द्यायची असेल तर इतक्या परवानग्या घ्याव्या लागतात आज मी फक्त लिहिले आणि अगदी वरून आदेश आला मला कार मंजूर झाली. धन्य ते महाराज धन्य त्यांची लीला..."जय श्री शंकर महाराज" तुमची अशीच कृपा आम्हावरी राहू द्या.

गुलमोहर: 

तो तुम्ही वापरा. याबद्दल कोणीही आक्षेप घेणार नाही. पण या ग्रंथांना/आरत्यांना किळसवाणे म्हणणे हे आवडले नाही >>>

मे बी मी जरा जास्तच हार्श लिहिले. आपली श्रद्धा मला मान्य आहे. पण आजकाल हे फारच जास्त होत चालले आहे.

मग हे थांबवण्यासाठी तू काय करतो आहेस, किवा मी काय कराव अस सांगशील. मायबोली वरच्या नपुंसक (unproductive) चर्चांनी काय होणार. कर्म-कांडाच्या पल्याड असलेला परमेश्वर कसा भेटवायचा???

मग हे थांबवण्यासाठी तू काय करतो आहेस, किवा मी काय कराव अस सांगशील.<<<
ज्याला हे थांबवावंसं वाटतं तो नक्कीच स्वतः या प्रकारात पडत नाही. दुसर्‍याने काय करावं हे कोण सांगणार. सांगायला गेलं की आमची श्रद्धा तुम्ही दुखावता म्हणून अंगावर येतात लोक उदाहरणार्थ कल्पू वरच्या अनेक पोस्टींमधली एक विशिष्ट घाणेरडी पोस्ट वाच. कुणी काहीच विषय काढलेला नसताना इतकी घाण पोस्ट तर कुणी सांगायला गेलं तर किती घाण उडवली जाईल. रिझन असलेलं बोलणं शक्य होत नाही अश्यांशी.

उदाहरण म्हणून....... मागे त्या बापू बीबी वर पण तेच झालं. एखाददुसरा अपवाद वगळता यच्चयावत बापूभक्त अतिशय खालच्या पातळीवर उतरून बोलू लागले. परत विचारलेल्या एकाही प्रश्नाला उत्तर नाही. तुम्ही वांद्र्याला या मग तुम्हाला कळेल एवढंच बोलत रहायचं. थोडक्यात आपला कल्ट वाढवण्याचे केवळ प्रयत्न बाकी काही नाही. इतके देवधर्म, सत्संग करून केवळ आम्ही हे करतो म्हणून आम्ही इतरांपेक्षा बर्‍या पातळीची माणसे आहोत असा इगो पोसला जाणे यापलिकडे काहीच घडताना दिसत नाही बहुतेक लोकांच्या बाबतीत. (सन्माननीय अपवाद आहेत पण ते अपवादांच्या इतकेच आहेत.).

असे शिष्यगण/ भक्तगण असतील तर खरंतर ती त्या त्या गुरू/ बाबा/ बापु/ बुवा/ महाराज यांची चालतीबोलती बदनामीच असते. विश्वास नाही म्हणून नाकारणार्‍यांपेक्षा हे लोकच इतकी सुरेख बदनामी करत असतात की अजून काही करायची गरजच पडत नाही.

अजून एक उदाहरण... कल्पूच्या गुरूंनी सांगितलेलं एक वाक्य कल्पूने एका बाफवर टाकलं होतं. ते वाक्य आणि त्यातली भावना इतकी सुंदर आणि माणुसकीच्या दृष्टीकोनातून करेक्ट होती तसेच तिने ज्या प्रकारे अवडंबर न माजवता, चमत्कारांचे दाखले न देता ते सांगितले होते की एखाद्याला त्या गुरूंबद्दल खरंच आदरयुक्त कुतूहल तरी वाटेलच.

असो विषय फारच वाह्यला. माफ करणे.

कर्म-कांडाच्या पल्याड असलेला परमेश्वर कसा भेटवायचा???

खरंच का इतका अवघड आहे असा परमेश्वर मिळणं?
आपला विश्वास असेल तर डोळे मिटताच मनातला परमेश्वर मिळेल काही खास कर्मकांडं करायची गरज नाही.
विश्वास नसेल तर लाख्खो कोटींच्या पूजा घालूनहि निसटेलच हातातून.

देवाला भक्तांची आई म्हटलं तर आईला भेटायला कशाला हवेत हे मध्यस्थी पांगूळगाडे?

नी, छान पोस्ट. Happy

असे शिष्यगण/ भक्तगण असतील तर खरंतर ती त्या त्या गुरू/ बाबा/ बापु/ बुवा/ महाराज यांची चालतीबोलती बदनामीच असते. विश्वास नाही म्हणून नाकारणार्‍यांपेक्षा हे लोकच इतकी सुरेख बदनामी करत असतात की अजून काही करायची गरजच पडत नाही. >>> याला अनुमोदन. कित्येक भक्त चमत्कार म्हणून जी काही घटना सांगतात ती अक्षरश: हास्यास्पद असते.

साती- मस्त पोस्ट.

दुर्दैवाने जे पंचेंद्रियाना दिसत नाहीत ते डिसमिस करायची वृत्ती असते किंवा न दिसणार्‍या देवाला कर्मकांडाने खूष करायची प्रवृत्ती बोकाळते.

खर तर आपल्या संस्कृतीत अध्यात्मिक गुरुला खूप महत्व आहे. आपण खरोखरच कोण आहोत, आपल इथल काम काय, ते कस करायच, आपण इथून कुठे जाणार या प्रश्नांची उकल करून आपल्या अध्यात्मिक अस्तित्वाची वा आपल्या मधील परमेश्वराची जाणिव करून देण, आपल्याला योग्य मार्गदर्शन करण हे गुरुच काम. आणि संसाराचा रहाट गाडगा रेटणार्‍या सामान्य माणसाला तर अश्या मार्गदर्शनाची खूप जरूर असते. संसारात राहून, माझ काम करत मी माझी अध्यात्मिक उन्नती कशी साधू असा प्रश्न खूप लोकांना असतो. यात काही वावग नाही. त्यांनी योग्य गुरुचा शोध जरूर घ्यावा की जेणेकरून त्यांना एक योग्य दिशा मिळेल.

मात्र काही व्यक्ती जणू हे ज्ञान घेऊनच जन्माला येतात. त्यांच्या आजूबाजूच वातावरण (उदा. पालक, शिक्षक, मित्र, अनुभव इ. ) सुद्धा त्यांना ही जाणिव लवकर करून द्यायलाच जणू निर्माण केलेल असत. मला भेटलेली अशी एक व्यक्ती म्हणजे प्रकाश आमटे. त्यांच्या कडे बघून कळत की he knows who he is, what is his mission on this earth and how to achive his mission. व्रत-वैकल्य, उपास-तापस, पूजा-अर्चा न करता हा माणूस देवाच्या एवढा जवळ आहे की देव भेटल्याची प्रचिती येते.

मी एका कार्यरत, हयात व्यक्तीच उदाहरण घेतल कारण त्याची प्रचिती मला स्वतःला आली आहे.

निधपः फारच छान पोस्ट. माझ्या गुरुंच मांसाहाराबद्दलच विधान तुला खूपच भावलेल दिसतय. Happy
चांगली गोष्ट आहे. गंमत म्हणून माझा गुरु, त्याची संस्था, भक्तगण Happy या बद्दल लिहिन कधी तरी.

मला भेटलेली अशी एक व्यक्ती म्हणजे प्रकाश आमटे. त्यांच्या कडे बघून कळत की he knows who he is, what is his mission on this earth and how to achive his mission. व्रत-वैकल्य, उपास-तापस, पूजा-अर्चा न करता हा माणूस देवाच्या एवढा जवळ आहे की देव भेटल्याची प्रचिती येते.>>>>> __/\__ मस्तच.. Happy
बाकी या बाफविषयी काही बोललो तर बर्‍याच हिंदुत्ववाद्याना कोलीत मिळेल म्हणुन मौनम सर्वार्थ साधनम..:)

मला या सर्व गर्दीमधे गोंदावलेकर महाराजांचे वेगळेपण जाणवते. त्यांनी स्वतः तर कधीच कसले अवडंबर केले नाही, आणि त्यांच्या नंतर अगदी अद्याप पर्यंत तिथले साधेपण आणि (इतर फालतू गोष्टी सोडून) नाम/भक्तीला दिले जाणारे महत्व जाणवत रहाते. हे एकमेव ठिकाण असे दिसले की जे अजुनपर्यंत बुवाबाजी आणि अवाजवी आर्थिक उलाढालींचे केंद्र बनलेले नाही.

>>> मला या सर्व गर्दीमधे गोंदावलेकर महाराजांचे वेगळेपण जाणवते. त्यांनी स्वतः तर कधीच कसले अवडंबर केले नाही, आणि त्यांच्या नंतर अगदी अद्याप पर्यंत तिथले साधेपण आणि (इतर फालतू गोष्टी सोडून) नाम/भक्तीला दिले जाणारे महत्व जाणवत रहाते. हे एकमेव ठिकाण असे दिसले की जे अजुनपर्यंत बुवाबाजी आणि अवाजवी आर्थिक उलाढालींचे केंद्र बनलेले नाही.

महेश,

+१. संपूर्ण सहमत!

इथे कुणी तरी मॉडरेटर साहेबांना मी लिहिलेल्या पोष्टींची अ‍ॅलर्जी आहे.
असो.
तुमची साईट आहे.
फक्त, पोस्ट उडवलीत, तर तोंड वर करून सांगा, की का उडवली?
लिंब्याच्या पोस्टिला संग्राह्य म्हणून कॉपीपेस्ट केलं होतं फक्त. अध्यात्माच्या पोस्टीत गू अन काय काय लिहिलेलं त्याने :))
हहपुवा.
च्याय्ला. लाज वाटु द्या हो. लिंब्याची पोस्ट तशीच. मी तेच कॉपी पेस्ट केलं ते उडवलं.

इब्लिस, माझ्या माहितीप्रमाणे, अध्यात्मात बर्‍यापैकी उच्चपदाला पोचल्यानन्तरच्या एका साधनेत, अखिल वस्तुमात्रात इश्वरच आहे हे समजुन घेऊन देखिल, जसा वस्तुमात्राचा मोह त्यागायचा, तशाच प्रकारे, मानवी शरिरभावा/बुद्धी प्रमाणे अखिल वस्तुमात्रातील विशिष्ट वस्तून्बद्दलची किळस/घाण वाटणे वा अन्य कोणत्याही प्रकारे, निर्माण होणारि परकेपणाची भावना देखिल त्यागली जावी (अर्थात मन/बुद्धि सर्वच बाबतीत तटस्थ-त्रयस्थ व्हावी) म्हणून पंचगव्याप्रमाणेच, मानवी विष्ठा वा तत्सम पदार्थ ग्रहण करणे हा एक पूर्वापार परिपाठ आहे. अर्थात फार क्वचित संतपदाची व्यक्ति असे करू शकते, अन अर्थातच मिडियावगैरेला बोलावुन करत नसल्याने तुम्हा-आम्हाला माहित असण्याचे कारणच नाही. नै का?
तेव्हा अध्यात्माच्या-धार्मिक धाग्यावर माझे ते वाक्य तसे का हा प्रश्न खरे तर पडू नये. तरीही....
याबाबत, खूप पूर्वी म्हणजे जवळपास तीसेक वर्षान्पूर्वी माझे आईशी संभाषण झाले होते. तेव्हा तिने मला एक सुन्दर दाखला दिला होताच शिवाय, साधना म्हणून हे वरील काही विशिष्ट पदार्थ ग्रहण करणे म्हणजे "तुम्ही स्वतःच तसे ठरविल्याशिवाय" विशेष वेगळे असेही नाही हे बजावले होते.
तिच्या मते, लहान बाळाचे संगोपन करणारी आई/दाई, बाळाची हगलीमुतली कापडं/दुपटी बदलते, तेव्हा तिला किळस वाटत नसेल का? तिच्या हाताला मलमूत्राचा स्पर्ष होत नसेल का? कित्येक वेळेस आडगावात वगैरे पाण्याच्या टंचाईमुळे ते नीट पणे धुतले जात असतीलच असे असेल का? अन त्याचा अंश तिच्या हाताद्वारे (वा अन्य काही प्रसन्गोपात - प्रसन्गाचे वर्णन इथे देत नाही, जिज्ञासुन्नी विपुमधे विचारावे) तिच्या पोटात जात नसेलच असे कशावरून? अन तरीही हे समजुनही ती ते बाळाचे संगोपन अत्यन्त निष्ठेने कसलीही अपेक्षा न ठेवता करतच अस्ते ना? अन या करण्याला केवळ "वात्सल्य / करुणा / अपत्यप्रेम / जिव्हाळा" इतक्याच मोजमापाच्या तराजुत कसे काय मोजता येईल? यापेक्षाही वेगळे असे काही तिच्यात उपजतच नस्ते का? ते असल्याशिवायच का "वात्सल्य / करुणा / अपत्यप्रेम / जिव्हाळा" निर्माण होतो? ते "असणे" हीच "इश्वरतत्वाच्या उपजत असलेल्या जाणिवेची" खूण आहे. मी तिचे हे विश्लेषण ऐकुन घेतले होते, अजुनही समजुन घ्यायचा प्रयत्न करतो आहे.
आता इतक्या टोकाचे विश्लेषण माहित असणार्‍या मला, माझ्या वरिल वाक्यातील "तो" उल्लेख खटकला नाही. अन्य कुणाला खटकू शकतो हे मान्य. पण मग आता सान्गा की या पोस्ट मधे मी तीन वेळेस त्याच गोष्टीचा उल्लेख केला आहे, तो तुम्हाला खटकतोय का? Wink Proud
असो.
तुम्हाला वा अजुन कुणाला जरुर तर, असेही स्वातन्त्र्य आहे की "आई करत असलेले बाळाचे सर्व प्रकारचे संगोपन" हे तिच्या मेन्दूतील "केमिकल लोच्यामुळेच" होते, त्यात बाकी श्रद्धा/जिव्हाळा/प्रेम/वात्सल्य वगैरे कवीकल्पना शोधायची/मानायची गरज नाही, तर तुम्ही तसे समजु शकता, फक्त ते त्या त्या विषयाशी संबन्धित वेगळ्या धाग्यावर मान्डले जावे Happy
अलबत, या धाग्यावर शन्करमहाराजान्शी सम्बन्धित एक श्रद्धाळू आपले अनुभव मान्डीत असताना, नेमके तिथेच येऊन, "समाजात बोकाळलेली बुवाबाजी/श्रद्धा-अन्धश्रद्धा/धन्दा" अन मग धन्देवाईक देवस्थाने, अन पुढे जाऊन भाव आहे तर कर्मकाण्ड हवेच कशाला वगैरे फाटे किंम निमित्ये फोडले जाताहेत? त्या सर्वस्वी "विरोधी" मतान्करता तुम्हा कुणाला "शन्करमहाराज - एक धादान्त असत्य" वगैरे "आकर्षक" नावाचे धागे उघडून तिथे विरोधी चर्चा करायला कुणी इथे बन्दी घातलीये का? करा की, पण इथेच लिहायचा अट्टाहास का? अन हे नेहेमीच होते आहे, कोणताही धार्मिक धागा काढला की आपले बुप्रावादी विचार तित्थ्थेच जाऊन मान्डले पाहिजेत हा आग्रहा का? अन समजा लिहीलेत, तर माझ्यासारखे विक्षिप्त/आगाऊ "देखिल" काही पचकले तर त्यावर कशाला बोट ठेवताय?
बर तर बर, मी जी जी वाक्ये लिहीली आहेत, त्यात "असंसदीय" असा एकही शब्द/वाक्यरचना नाही. तरी ती खुपली, तर तुम्ही कान्गावा केलेला चालतो/चालवुन घ्यावा अशी अपेक्षा, पण मग धागाकर्त्याच्या श्रद्धेला "चेष्टेचा/मस्करीचा अन जोडीला समाजसुधारणेचा" रन्ग लावुन जे काय वर केले ते बाकिच्यान्नी चालवुनच घ्यावे ही अपेक्षा कशी काय करता बुवा? क्रियेला प्रतिक्रिया हा तर विज्ञानाचा नियम, तो विसरता? असो.
काल टीव्ही बघत होतो, हिन्दी शिवाजी मालिका लागलीये, सुन्दर गम्भिर प्रसन्ग रन्गविलेला, बाजी बान्दलाच्या मृत्युचा, मधेच ब्रेक होतो, अन "वाजले की बारा " ही लावणी बघायला/ऐकायला मिळते. टीव्ही बघत अस्ता, हसाव की रडाव हे कळेनास झाल होत. या धाग्यावर शन्करमहाराजान्बद्दलच्या श्रद्धायुक्त वर्णनाच्या पहिल्या पोस्ट नन्तर आलेल्या विषयाशी पुर्णतया विसन्गत पोस्ट्स या मला त्या टीव्हीवरील शिवाजी महाराजान्वरील सेरियलमधेच लुडुबुडणार्‍या "ब्रेकमधिल" "वाजले की बारा..." सारख्याच वाटल्या म्हणून मी देखिल, पण विषयाला धरुन, मधे लुडबुडलो, इतकेच. Happy
कळावे,
लोभ आहेच, वृद्धिन्गत व्हावा!

टीव्ही बघत अस्ता, हसाव की रडाव हे कळेनास झाल होत

आता मला कळेना हसावं की रडावं! जाहीरती देणार्‍याला टायम दिलेला असतो, यावेळात तुझं गाणं वाजव म्हणून... आता त्याच्या अधीचा सीन लग्नाचा होता की मयताचा, हे त्याने बघत बसायचे का?

( माझी ही पोस्ट देखील मध्ये आलेली जाहिरात समजा, आणि तुमचं सिरियल किलर चालू द्या.. Proud )

>>> सिगारेटचा नैवेद्य!

एक स्पष्टीकरण द्यायचे आहे. श्री शंकर महाराज मठाची व्यवस्था एका विश्वस्त मंडळामार्फत बघितली जाते. कोणतीही एखादी विशिष्ट व्यक्तीची तिथे मालकी नाही. तिथल्या पुजार्‍यांना मंडळातर्फे दर महिन्याला पगार दिला जातो.

'सिगारेटचा नैवेद्य' हा शब्दप्रयोग चूक आहे. मंडळातर्फे सिगारेटचा नैवेद्य दाखविला जात नाही. दररोज भाताच्या खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो. मी आधी लिहिल्याप्रमाणे काही भक्त स्वतःच सिगरेट हाताने पेटवून १-२ मिनिटे सिगरेटचा समाधीला स्पर्श करून नंतर बाहेर एका रक्षापात्रात उदबत्तीप्रमाणे खोचून ठेवत असत. अंदाजे १९९० च्या आसपास समाधीला स्पर्श करणे बंद झाले व त्या अनुषंगाने सिगरेट पेटविणे हे बंद झाल्यासारखे दिसत आहे. अजून हे चालू असल्यास माझ्या बघण्यात आलेले नाही.

१९९० पूर्वी काही भक्त स्वतः हे करत असत. परंतु देवस्थानने अधिकृतपणे असे कधीही केले नाही व करण्याला प्रोत्साहन दिलेले नाही.

'सिगारेटचा नैवेद्य' या शब्दाने तेथील पुजारीच असा नैवेद्य दाखवितात किंवा असे करणे ही तिथली रोजची पूजेची प्रथा आहे असा गैरसमज निर्माण होऊ शकतो, म्हणून हा खुलासा.

लिंबाजीराव,

अलबत, या धाग्यावर शन्करमहाराजान्शी सम्बन्धित एक श्रद्धाळू आपले अनुभव मान्डीत असताना, नेमके तिथेच येऊन, "समाजात बोकाळलेली बुवाबाजी/श्रद्धा-अन्धश्रद्धा/धन्दा" अन मग धन्देवाईक देवस्थाने, अन पुढे जाऊन भाव आहे तर कर्मकाण्ड हवेच कशाला वगैरे फाटे किंम निमित्ये फोडले जाताहेत?

<<

या धाग्यावर अप्रस्तुत असे मी कुठे अन काय लिहिले ते मला कळेल काय? एकही वाक्य कुणालाही दुखावेल असे लिहिलेले नाही.

फक्त तुमची पोस्ट संग्राह्य होती, असे म्हटलो, अन त्यातील काही शेलकी अवतरणे ठळक करून दाखविली होती, जेणेकरून अध्यात्मानंदासाठी येथे येणार्‍यांना तुमच्या 'उग्र' साधनेची पावती / पुरावा दिसायचा चुकणार नाही.

बाकी या बाफविषयी काही बोललो तर बर्‍याच हिंदुत्ववाद्याना कोलीत मिळेल म्हणुन मौनम सर्वार्थ साधनम >>

राम, तुमचा एक प्रचंड गैरसमज आहे की हिंदूत्ववादी बुवाबाजीला प्रोत्साहन देतात. तो काढून टाका. हिंदूत्ववादात बुवाबाजी बसत नसते. कशावरूनही इथे हिंदुत्ववाद, ब्राह्मण हे सर्व अचानक मध्ये येऊन टपकतात. कमाल आहे!

छान

बरोबर पंत...

सुवर्णसुत्राणि न उच्चारणीयानि ||

१०० टक्के खरे...

जामोप्या... दत्त संप्रदाय गूढ अनुभवानी युक्त असाच आहे. हे ही इतकेच खरे..

किंवा थोडे दिवस थांबा कुणी अमेरिकन माणूस रीसर्च करून, स्वानुभवावरून-- शंकर महाराज हे कसे पराकोटीचे उच्च योगी आणि अवलिया अहेत हे आपल्याला पटवतील. मग तर आपण नक्कीच मान्य करू. असो. …कल्पुला अनुमोदन. स्टीव जोब्च्या biography त पान ५२७ वर Autobiography of a yogi चा उल्लेख बघा : More revealingly, there was just one book that he had downloaded: Autobiography of a yogi
इ. स्टीव्ह जोब तरूण असताना भारतात प्रथम हे पुस्तक वाचले आणि दरवषी एकदा ते पुस्तक वाचत असे.
The Autobiography of a yogi या पुस्तकचे प्रचंड सामर्थ्य आहे .

Pages