चारचौघी एक अनुभव-२

Submitted by prashansa on 9 August, 2008 - 01:48

त्यानन्तर आमची एक जोरदार चर्चा झाली.बाकी बर्‍याच गोष्टीन्वर एकमत झाले तरी एका गोष्टीवर मात्र आमची खडाजन्गी झाली!ती गोष्ट म्हणजे 'कुठली व्यक्तीरेखा आवडली आणि का?'माझे उत्तर होते"बेथ".मला "बेथ"आवडली !!तिचा हळुवारपणा,सर्वाना समजून घ्यायची वृत्ती,सतत सर्वान्च्या मदतीला धावण्याची आवड या सर्व गोष्टीन्मुळे मला "बेथ" आवडली.
गौरीने हे माझे मत पुर्ण खोडून काढले!तिला "ज्यो"आवडली होती.आणि माझ्या व्यक्तीमत्त्वाशी "ज्यो'चच व्यक्तीमत्त्व अधिक जुळत अस तिच मत होते.खूप वाद घालण्याचे,थोडे मोकळेपणाने बोलण्याचे,बराच आत्मविश्वास असणारे,लिहिण्याची आवड असणारे...असे!शिवाय "बेथ"चा अकाली झालेला मृत्यु तिच्या व्यक्तीमत्त्वाचा पुर्ण विकास पुस्तकात दाखवत नाही!त्यामुळे जी व्यक्तीरेखा अपुर्ण आहे ती कशी आवडली?असा तिचा युक्तीवाद होता.माझ यावरचे उत्तर होते "जे आपल्याकडे नसते तेच आपल्याला भुरळ घालते!शिवाय 'गोडी अपुर्णतेची लावेल वेड जीवा!'नाही का?"त्यासाठी मी तिला एक कवीता ही ऐकवली-तू डोळ्यासमोर आलीस
क्षणभरातच भावून गेलीस
आदर्शात समाविष्ट झालीस
अनपेक्षितच मला सोडून गेलीस
अन्तरन्ग तरीही व्यपून राहीलीस
सोशिकता समाधान भावुकता
लाजरेपणाही शिकवत राहीलीस
मी मला तुझ्यात पहात राहिले
तुला माझ्यात शोधत रहिले
दोन्हीही सारखे कुठेच नाही गवसले!
वाढल्या लता फुलल्या कळ्या
फुलली स्वप्ने डोळा डोळा
लाभेना उन्ची पण बावर्‍या निर्मलतेला!
पण त्यावेळी मते पक्की बनली नव्हती.इतरान्चे प्रभाव 'स्व' वर असण्याचे दिवस होते!त्यामुळे गौरीचे मत सहज मान्य करून टाकले!पण,एक अस्वस्थता बरेच वर्षे टिकून राहीली 'इतरान्प्रमाणे मलाही 'ज्यो' का नाही आवडली?मला 'बेथ' का आवडली?'आणि बरेच वर्षानी मला या प्रश्नाचे उत्तर मिळाले!अगदी अनपेक्षितपणे!!"शान्ता शेळके" यान्चे "सन्स्मरणे"हे पुस्तक परवा वाचनात आले.त्यात त्यान्चा एक लेख आहे'बेथ'!तो लेख वाचला आणि खूप आनन्द झाला.त्यानाही "बेथ'खुप आवडली होती.चारही बहिणीत 'बेथ'ने त्याच्यावर भुरळ पाडली होती.कदाचित म्हणूनच त्यान्चे ते भाषान्तर वाचताना मला 'बेथ'आवडली होती.वाचकाच्या लेखकाशी नकळतच तारा जुळत असतात ना त्या अशा...जणु या ह्रुदयीचे त्या ह्रुदयी घातले!!

गुलमोहर: