मी एक मानव ?

Submitted by विनायक.रानडे on 25 November, 2011 - 21:49

Human-Evolution.jpgमी कोण? माझ्या अस्तित्वाचा उद्देश काय? मी जिवंत आहे म्हणजे काय? असे प्रश्न मी विचारणे चुकीचे का ठरते? पण असेच काहीसे अनुत्तरित प्रश्नांचे ढीग उभे करणारे विचारवंत का गणले जातात? म्हणूनच ह्या सगळ्या घोळाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न मी सुरू केला. "जगा आणि जगू द्या" - ह्या साध्या सोप्या दोन शब्दात मानवाचा अर्थ मला सापडला.

मी एक मानव आहे / नाही हे कोणी ठरवले? इतर मानवांनी, हो त्यांनीच हे ठरवले. कुत्र्या मांजरांना मी मानव आहे की नाही हे ठरवण्याची काय गरज? म्हणजेच काय तर मानव, मानवी / अमानवी, अमानुष हा सगळा घोळ घातला आहे तो मानवानेच. ह्या मानवाचा निर्माता कोण, का निर्माण केले? निर्माता आवश्यक आहे ही कल्पना देखील फक्त मानवाची आहे कारण ह्या निसर्गात मानवाशिवाय इतर कोणाला ही कल्पना करण्याची आवश्यकता असणे शक्य नाही. हे विचार माझ्या डोक्यात सुरू होते तेव्हा मी दूर चित्रवाणी बघत होतो.

020909tv.jpgजगभर चालणार्‍या चित्रवाणी वाहिन्या त्यांच्या चित्रणाचे अनेक विद्युद चुंबकीय लहरींसंच आसमंतात सोडतात. माझ्या घरातील चित्रवाणी संचातून तयार होणार्‍या लहरी आसमंतातील एका विद्युद चुंबकीय लहरीसंच्याशी एकरूप (रिझोनेट) झाल्या म्हणूनच ते चित्रण मी घरबसल्या बघत होतो. प्रत्यक्षात त्या चित्रणातून दिसणार्‍या वस्तू माझ्या घरात आल्या नव्हत्या.

विश्वातील अगणित स्पंदन लहरींचे व त्यातून निर्माण होणार्‍या ऊर्जेचे मोज माप मानवाच्या क्षमते बाहेरचे आहे. ह्या अमाप स्पंदन लहरींचा परिणाम मला आग, वारा, पाणी, पृथ्वी व हे अफाट आसमंत ह्या पाच महाभूतांच्या रूपाने जाणवतो. विश्वातील प्रत्येक सजीव / निर्जीव वस्तूचे अस्तित्व ह्या अमाप स्पंदन लहरींना एकरूप (रिझोनेट) झालेलाच एक एक भाग आहे म्हणूनच माझे अस्तित्व आहे. ह्यात काही उद्देश असणे शक्यच नाही. हे सगळे आपोआप घडते आहे.

ह्या सृष्टीचा सखोल, तर्कशुद्ध अभ्यास आमच्या पूर्वजांनी केलेला आहे व त्याचे मराठीतून ज्ञान उपलब्ध आहे. तो अभ्यासक कोण, कधी केव्हा कसे ह्याच्यात मला शिरायचे नाही पण त्यातून मी काय शिकायचे हे ठरवले आहे. तर विश्वातील अमाप स्पंदन लहरींना एकरूप (रिझोनेट) झालेले चर व अचर हे दोन मुख्य परिणाम आहेत. चर म्हणजे स्वशक्तीने हालचाल करू शकणारे. तर अचर म्हणजे बाह्य शक्ती शिवाय हालचाल घडू शकत नाही. चर प्रकाराचे चार भाग आमच्या अभ्यासकांना दिसले. जे आजही आपण सगळेच अनुभवतो आहे.

जारज, अंडज, श्वेदज, उदबीज असे ते चार प्रकार आहेत.

जारज प्रकारात मादी एका संपूर्ण शरीराला जन्म देते. अंडज प्रकारात मादीच्या शरीरातून एक अंडे बाहेर येते व त्या अंड्यातून मग एक पूर्ण शरीर बाहेर येते. श्वेदज प्रकारात मादीचा संबंध नसून घाम / मल / मूत्रातून जन्माला येणारे जिवाणू व जंतू. उदबीज म्हणजे फळा-फुलातून निर्माण होणारे बीज जमिनीत रुजते व योग्य वातावरणात नव्या रूपाने अस्तित्वात येते.

पण सगळेच जारज मानव नाहीत. जारजात फक्त मानवाला दोन पायाचा व दोन हाताचा वेगळा उपयोग करण्याची क्षमता आहे. जन्मा पासून अंता पर्यंत जातीत जास्त वेळ मानव दोन पायावर उभा असतो. शरीराचा प्रत्येक अवयव जमिनीपासून दूर व काही अंतरावर आहे. तर जारजातील इतर जीवांच्या शरीराचा प्रत्येक अवयव जन्मा पासून अंता पर्यंत जातीत जास्त वेळ जमिनीला समांतर असतो.

चर सृष्टीचे चार प्रकार होण्याचे कारण म्हणजे विश्वातील स्पंदन लहरींची संख्या व ऊर्जेतील क्षमता उगमाशी जास्त आहे तर उगमा पासून दूर ह्या स्पंदन लहरींची संख्या व ऊर्जा कमी होते.

earthquake_scale_md.jpgshim.svg_.pnglabels.svg_.png

हे भूकंपाने निर्माण होणार्‍या लहरींच्या अभ्यासातून जाणवते. म्हणून मी एक मानव आहे, सृष्टीतील इतर सजीवांच्या तुलनेत माझ्यात विश्वातील जास्त स्पंदन लहरी एकरूप झाल्या आहेत त्यांची ऊर्जा शक्ती ह्या मानव रुपी शरीरात जास्त आहे. म्हणूनच मन, मेंदूच्या माध्यमातून ह्या सृष्टीला समजण्याची शक्यता ह्या मानवाला निसर्गातून प्राप्त झाली आहे. ही निसर्गाला समजण्याची क्षमता इतर सजीवांना कमी आहे.

कुत्री मांजरं स्वत:चे वा दुसर्‍याचे पिलू छान ओळखते पण प्रसूतीतले पहिले पिलू खाऊन टाकताना आढळते, सिंव्ह पहिल्या नराची पिले मारून स्वत:चे अस्तित्व प्रस्थापित करतो हा प्रकार अपवाद वगळता मानवाच्या बाबतीत घडत नाही व तसे घडू नये म्हणूनच योग्य संस्कार, नियम ह्यांचे महत्त्व वाढले. मानवाचा लहान जीव जन्माला येताच निसर्गाला कमीजास्त प्रमाणात समजण्याची क्षमता घेऊन येतो. ह्या समज क्षमतेला मार्ग दर्शन व खतपाणी भोवतालच्या परिस्थितीतून मिळते. हे मी समजण्याचे कारण माझ्या जन्मदात्यांना त्या काळात कुटुंब नियोजनाचे नियम नसल्याने एकाच आईने जन्म दिलेल्या सहा जीवांना माझ्या क्षमतेनुसार समजण्याची संधी मला मिळाली.

मानव रुपातील प्रत्येक जीवाच्या शरीरातील अंतर्बाह्य स्वरूपातील विविधता इतर सजीवांच्या तुलनेत जास्त जाणवते. ह्याचे मुख्य कारण अमर्याद, काळवेळ, स्थानाची कोणतीही बंधने नसलेली शरीरसुख उपभोगण्याची निसर्गाने बहाल केलेली क्षमता हेच आहे. म्हणूनच ३६५ दिवसाच्या प्रत्येक सेकंदाला ह्या पृथ्वी वर एक नवीन मानव एक वेगळे स्वत्व घेऊन जन्माला येतो, कारण त्या क्षणाला सृष्टीतील ठरावीक स्पंदन लहरींना एकरूप (रिझोनेट) झालेलाच तो एक जीव असतो. इतर ग्रह राशींच्या स्पंदन लहरींच्या ऊर्जेचा परिणामाचे ते एक स्वरूप असते, म्हणून त्या मानव जीवाचे इतर मानवी जीवाशी साम्य नसते.

हे इतर जारज जीवांच्या बाबतीत घडत नाही. त्यांच्या शरीरसुख उपभोगण्यावर ठरावीक काळाची मर्यादा असल्याने नवीन जन्माला येणार्‍या जीवाच्या स्वरूपात फारसा फरक नसतो. पण एकाच आईच्या पोटी जन्माला येणारे प्रत्येक बाळ शरीराचे एक आगळेवेगळे अंतर्बाह्य स्वरूप घेऊन जन्माला येते.

रिम्पा सिवा एक तरूण तबला वादक मुलीच्या ह्या चित्रणातून तर हेच सिद्ध होते, फक्त मानवाला ह्या आगळ्यावेगळ्या क्षमतांची निसर्गाने दिलेली देणगी आहे व ही देणगी समजण्याचे भाग्य मला लाभले आहे म्हणून मी एक मानव असण्याचा मला अभिमान आहे. ह्या मिळालेल्या मानव जन्माचा मी किती चांगला उपयोग करू शकतो हे मात्र माझ्यावर झालेल्या संस्कारांशी संबंधित आहे. ते कसे हे पण सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पुढील भाग - नियम, संस्कार? ह्या लेखात आहे.

*** सगळ्या प्रतिमा गूगल प्रतिमा शोध मधून मिळवल्या आहेत. ***

गुलमोहर: 

> चर सृष्टीचे चार प्रकार होण्याचे कारण म्हणजे विश्वातील स्पंदन लहरींची संख्या व ऊर्जेतील क्षमता उगमाशी जास्त आहे तर उगमा पासून दूर ह्या स्पंदन लहरींची संख्या व ऊर्जा कमी होते.

हे कळले नाही.

> पण प्रसूतीतले पहिले पिलू खाऊन टाकताना आढळते

पहिले की सगळ्यात अशक्त?

> कारण त्या क्षणाला सृष्टीतील ठरावीक स्पंदन लहरींना एकरूप (रिझोनेट) झालेलाच तो एक जीव असतो. इतर ग्रह राशींच्या स्पंदन लहरींच्या ऊर्जेचा परिणामाचे ते एक स्वरूप असते, म्हणून त्या मानव जीवाचे इतर मानवी जीवाशी साम्य नसते.

ही उडी कशाच्या आधारावर ते कळले नाही. पटले तर नाहीच.

टेस्ट ट्युब बेबीज बद्दल काय म्हणाल? स्टेम सेल रिसर्च बद्दल?

रच्याकने, पृथ्वीच्या वातावरणाबाहेर स्पंदने नसतात. विद्युतचुंबकीय उर्जेला तुम्ही स्पंदने म्हणत असाल तर ती सर्व प्राणीमात्रांना, चराचरांना सारखीच जाणवतात व ते बिचारे ग्रह मधे कडमडत नाहीत.

" ही उडी कशाच्या आधारावर ते कळले नाही. पटले तर नाहीच." कबुली दिलीत, एक तरी वाचक लाभल्याचा आनंद मिळाला !!!