तो, ती आणि मैत्री...भाग४

Submitted by प्रज्ञासा on 21 November, 2011 - 22:32

अजयने चावीने दार उघडलं आणि अमु सोफ्यावर बसुन टेबलावरच्या पुस्तकांवर तुटून पडली.. तीला हेही भान नव्हतं की घरी कोणी नाहीये.. अजय कॉफी आणि मॅगी बनवून घेऊन आला तर.. अमु चक्क सोफ्यावर बसल्या बसल्याच झोपून गेली होती.. हातात वपुर्झा..अजयला हसूच आलं..आणि मग विचारांचं चक्र.. अमूच्याच बाबतीत असं का... एक तर लहानपणीच आई वारलेली..बाबा परदेशी असतात.. काका - काकूंकडे लहानाची मोठी झालेली..आणि लग्न ठरलं तेही मोडलं..बिचारी... देव खरंच असतो का? आपला तर विश्वासच नाहीये..पण अमू देववेडी आहे अगदी... मग देव असं का करतो....

झोपलेली कित्ती निरागस दिसतिये..आणि कित्ती सुंदर ....

नकळत त्याचा हात खिशाकडे वळला आणि त्याने अमूचा एक फोटोही घेउन टाकला चट्कन मोबाईलमधे..

"मॅडम्..कॉफी.." अजयने अमूला उठवलंच.." काय अमूबाई..कसलं स्वप्नं बघत होतात..." अजय मिश्किलपणे म्हणाला

"अम्म् ..झोप कशी लागली कोण जाणे.. अमू ओशाळून म्हणाली.."

"नो प्रॉब्लेम.. कॉफी घे..आणि मॅगी खा..आय होप तुला आवडते..."
" आवडते पण मूड नाहीये... आणि हो..कॉफी अगदी झक्कास झालीये..अगदी मला पाहिजे तशी..स्ट्राँग आणि कमी गोड .. धन्यवाद .. मॅनेजर साहेब.."

"अमू मॅगी पण खा... चल...नाहीतर मी जबरदस्ती भरवेन आता.. " असं म्हणून अजय खरंच भरवायला लागला तिला..
"अजय, मला कधीच कोणी नाही रे असं भरवलं....आई..." अमूच्या डोळ्यांतून ट्चकन पाणी आलं....आणि ती हमसून हमसून रडायलाच लागली एकदम..

अजयला समजेना की आता काय करावं.. सांत्वन म्हणून त्याने अमूच्या खांद्यावर हात ठेवला.. तर अमू लहान मुलीसारखी त्याच्या कुशीतच शिरली..आणि धाय मोकलून रडायला लागली.

कित्ती वेळ झाला कोण जाणे.. अमू अजयच्या मिठीतच होती..अश्रूंनी अजयचा शर्ट ओला झाला होता...अजयने दूर होण्याचा प्रयत्न केला तर ती आणखीनच रडत होती आणि बिलगत होती..

शेवटी अजयने सुटकेचा प्रयत्न सोडला..आणि सांत्वन करत राहिला..तिच्या केसांमधून हात फिरवत राहिला..

दारावरच्या बेलने दोघं भानावर आले..अमू चट्कन दूर झाली..आणि अजयने मनातल्या मनात बाहेर आलेल्या माणसांचा उद्धार केला.. काय पण टायमिंग आहे .. तो म्हणाला.. दरवाज्यात शेजारच्या काकूच होत्या.. आई नाहिये म्हट्ल्यावर त्या निरोप देऊन गेल्या लगेचच.

अमूने घड्याळ पाहिले तर साडे सात वाजत आले होते.. निघायलाच हवं असा विचार करुन तीने पर्स उचलली.
" अमू थोडा वेळ थांब ना गं.. खूप अस्वस्थ वाटतंय मला.." अजय म्हणाला.
"ठीकय्..मी बसते इकडेच .. अमूने पर्स खाली ठेवली आणि बसली..
"अमू.. रागावणार नाहीस ..प्रॉमीस कर.. मला तुला काहीतरी विचारायचंय.."
"बोला .. नाही रागावणार ..प्रॉमीस " अमू उद्गारली.
" अमू तुझं प्रेम होतं अभिजीतवर?"
" मुळीच नाही.." अमू निक्षून म्हणाली.
"तू खरं बोलतीयेस..?"
" मी कधीच नाही बोलत खोटं..तुला माहितिये.."

"मग.... मग लग्नाला का हो म्हणालेलीस?" अजयने कडवट सुरात विचारलं.

" अजय, मला वाटायचं, म्हणजे अजूनही वाटतं, की प्रेम बीम सगळं बकवास आहे.. पोरकटपणा आहे.. टाईमपास आहे.. माझं मत आहे की मी माझ्या नवर्‍यावरच करीन प्रेम...

आणि खरं सांगू का.. एक मुलगा आणि एक मुलगी ह्यांच्या मैत्रीमधे.. असं होतं..
" असं म्हणजे नेमकं कसं?"
"असं म्हणजे ...कधी कधी असं वाटू शकतं.. की... आपला मित्र किंवा आपली मैत्रीण आपली चांगली बायको बनू शकते... असं.." अमू म्हणाली, " अजय, तुला एक सांगू का..मैत्री आणि प्रेमाची बॉर्डरलाईन खूप खूप अस्पष्ट असते रे.. कधी कधी खूप कठीण असतं डिसीजन घेणं.."

" माहित नाही.. पण मी.."

" तू काय?"..

" काही नाही. उद्या भेटू ऑफीसमधे.."

" उद्या शनिवार आहे अजय.. मी नाहीये ऑफीसला.. तु आहेस?"

" तुझ्या नादात तारीख वार सगळं विसरलोय.. खरच..! "
"काहीहीईईईई..."

" बरं उद्या मी फिरयला जाणार आहे मी.. येतियेस?"
" मी कशाला.. माझा काय संबंध.."
" संबंध नाही कसा..घरात बसून काय करणार आहेस.. "
" काकूला विचारते.. चल उशिर होतोय.. बाय".

गुलमोहर: 

कथा छान आहे पण वाचायला सुरुवात करेपर्यंत संपूण जाते.....
थोडे मोठे भाग टाकले तर बरे होइल.

.मैत्री आणि प्रेमाची बॉर्डरलाईन खूप खूप अस्पष्ट असते रे.. कधी कधी खूप कठीण असतं डिसीजन घेणं..".....मस्तच...अगदी बरोबर....