तो, ती, आणि मैत्री...भाग२

Submitted by प्रज्ञासा on 20 November, 2011 - 22:33

" हे बघ, तु काही बोलत पण नाहियेस, मला काही बोलु पण देत नाहीस, तुला माझे विषय नकोयत discussion साठी... आणि हे जीवघेणं पुण्याचं ट्राफिक... अमु मी काय गुन्हा केलाय गं, मला का हे सहन करायला लावतेस्...काहीतरी बोल तरी गधडे.. "

" अजय, तुझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत .. एक तर एफ एम लाव नाही तर गप्प बैस ..आजुबाजुला बघ कोणी सुंदर मुलगी बिलगी दिसते का..आणि ती इंप्रेस होते का तुला बघुन ते. "

अजयने वाकडं तोंड करुन एफ एम लावला.. जगजीत सिंग ह्यांचे सुर गाडीत भरुन राहिले..

ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन ..
जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन..
नयी रीत चला कर तुम, ये रीत अमर कर दो..

आकाश का सुनापन , मेरे तनहा मन मे..
पायल छनकाती तुम, आ जाओ जीवन मे,
सांसे दे कर अपनी, संगीत अमर कर दो,
संगीत अमर कर दो..मेरा गीत अमर कर दो

"खुश ना अमु आता? रडुबाई छाप गाणी लागलियेत..बस आता निवांत तासभर्..आज हे ट्रॅफीक काही हलत नाही असं दिसतंय.." अजय वैतागला होता.. गेला एक तास ते दोघं ट्रॅफीकमधे अडकले होते..

अमुने गाणी बंद केली आणि हसुन म्हणाली.. "चल ठीकयं.. तुझ्या मनासारखं होऊ दे .. बोला काय विषयावर गप्पा मारायच्या आहेत सरकार आपल्याला"

"अमु एक गोष्ट seriously विचारायची आहे.. नेमकं काय झालं होतं.. अभी आणि तुझ्यामधे,सांगशिल? "

"हम्म.. काही विशेष नाही.. फक्त साखरपुडा होऊन लग्न मोडलं आमचं"

"माहीत आहे मला हे अमु... का झालं असं ते सांगशील की नाही मला... "

"का झालं कसं झालं माहीत नाही... सगळी story सांगते तुला.. " अमु म्हणाली

" मी ऑफीस जॉईन केलं आणि काका - काकुंनी स्थळं बघायला सुरुवात केली.. मी असंच सहज बोलुन गेले अभिजीतकडे ...तर तो सरळ आई - बाबांना घेउन आला काकांकडे .. म्हणाला लग्नं करायचं आहे.. काका - काकुंना सगळं ठीक वाटलं.. सर्व गोष्टी अनुरुप आहेत असं म्हणाले सगळे..मग मीही हो म्ह्णाले.. आणि आमचा साखरपुडा पण झाला.."

"लग्नाचा मुहुर्त सहा महिन्यांनंतरचा असल्यामुळे अभिजीत पुन्हा जाणार होता.. म्हणजे असं म्हणाला होता की जाणार आहे १ - २ दिवसांत.... "

"शनिवार होता.. मी आणि अनुजा shopping moll मधे भटकत होतो..आणि आम्ही lift मधे अभिजीतला पाहिलं... एका इंग्रजाळलेल्या मुलीसोबत्..बहुधा भारतियच होती, पण रहाणीमान इंग्रजी होतं..."

"मी आणि अनुजा समोर गेलो तर अभिजीत कसंनुसंच हसला... आणि काही बोलेच् ना..मीच त्याला 'हाय' म्हणाले.. मला वाटल की ती मुलगी त्याच्या ऑफीसमधली वगेरे असेल...

तर तीनेच हस्तांदोलन केलं आणि म्हणाली.. "I'm Natasha.. Abhi's wife.. glad to meet you."

त्यानंतर अभिजीत कधी भेटला नाही.. लग्नं मोडलं हे तुला वेगळं सांगायला नकोच.. " अमुने एक सुस्कारा टाकला..

"सिंपली हॉरीबल..!! मला वाट्लंच नाही असं काही होईल ते... किति काही सहन केलंस तू..अमु मला कधी का नाही सांगितलंस..."

"जाऊ दे अजय.. तुला माहीत करुन घ्यायचं होतं म्हणुन सांगीतलं.. मी कोणाशीच नाही बोलले ह्याबाबत बाकि कधी.. "

"एक विचारु अमु..रागावणार नसशिल तर..?"

" जे काही विचारायचंय ते परवा विचार.. माझं.. आय मीन माझ्या काकांचं घर आलं.. "
"उद्या नाही आहेस ऑफीस मधे? .. काही विशेष... का सहज सुट्टी? " अजयने विचारलंच..
" काही विशेष नाही.. कांदे - पोहे कार्यक्रम आहे.. उद्या सकाळीच आहे. " अमु म्हणाली..बोलताबोलता ती अजयच्या चेहेर्‍यावरचे भाव बदलताहेत का ते पहात होती.

त्याला निर्विकार पाहुन शेवटी अमु म्हणाली," thanks for the lift, anyways..bye and good night "

"काय .. मुलगा आवडला तर फोन कर नक्की... आणि परवा येणार ना ह्या गरीबाच्या गाडीतुन ऑफीसला?" हसत हसत अजय म्हणाला..

क्रमशः

गुलमोहर: 

प्रज्ञासाजी नादखुळा,
कथा आवडली आपल्याला,
तो असा होता ती अशी होती असं वाचण्यापेक्षा त्यांच्यामधील संभाषण वाचायला खूप मजा येते.