तो, ती, आणि मैत्री...भाग१

Submitted by प्रज्ञासा on 18 November, 2011 - 03:39

शरबती तेरि आखोंकी ..झील सी गेहेराइ मे मैं डूब... डूब जाता हू..

"प्लिज हे ट्पोरी गाणं बंद करायला काय घेशील? " अमु चा रोजचा dialog..

"ए... गाडी माझी, आणि रोज दादागिरी मात्र तुझी... खपवुन घेणार नाही बरं का.. " इती अजय

"रोजच्या ह्या torcher पुढे पीएमटी परवडली रे बाबा.. नको उद्यापासून तुझे उपकार मला"

"काहीतरी फालतु बोलु नकोस." अजय चिडून ओरडला.

तीने न रहावुन गाणे बंद करायला हात सरसावला....आणि जणु माहित असावं की ती असा प्रयत्न करेल, अजयने तिचा हात पकडला..

अमुसाठी हे जरा अनपेक्षित होतं..

"अजय गाडी थांबव.." अमु रडवेली झाली.

"I'm sorry..!" अजयने गाणं बंद केलं आणि अमुकडे पाहिलं.. अश्रुंनी तिच्या डोळ्यांच्या कडा भरल्या होत्या.

"मी उद्यापासुन नाही येणार तुझ्यासोबत.."

" अगं मी सॉरी म्ह्णालो ना... उद्यापासुन तु म्हणशील ती गाणी लावेन्..रडूबाइ टाइप गाणी लावेन.. खुश?"

हे आता रोजचंच झालं होतं.. रोजच अमु चिडायची, म्हणजे अजयच ती चिडेल असं काहीतरी करायचा आणि मग मस्का मारायचा.
अजय, अम्रुता आणि अभिजीत - तिघे एकाच इन्जीनीयरिंग कॉलेजमधले. अजय आणि अभिजीत एका वर्गात, तर अमु त्यांची ३ वर्षे ज्युनियर

कॉलेजमधे नोट्सची मदत करण्यापासुन, ते खडूस किंवा विचित्र प्रोफेसरांपासुन अम्रुताला वाचवणे - सगळी कामे हे दोघे आपले आद्यकर्तव्य समजुन करीत. त्यामुळे नगण्य मुली असलेल्या मेक. इन्जीनीयरिंगच्या त्या डिपार्ट्मेंटमधे अमुचे पहिले वर्ष फार सुखासुखी गेले.

अजय, अम्रुता आणि अभिजीत - तिघे एकाच इन्जीनीयरिंग कॉलेजमधले.

कॉलेजनंतर अभिजीतने अमेरिकन कंपनीची ऑफर घेतली, तर अजय उच्चशिक्षणासाठी गेला. अमु,अजय आणि अभिजीत,बरयाच वेळा ऑनलाइन भेटुन खुशाली कळवायचे, गप्पा मारायचे. ३ - ४ वर्षं सहज निघूनही गेली.
अमुने पण एक MNC मधे नोकरी मिळवली. आणि एक दिवस अजय अचानक समोर आला.

"आइशप्पथ, तू इकडे कसा काय.. what a pleasant surprise...!! " अमु किंचाळलीच त्याला कँटीनमधे बघुन..

"अगं माझी आई हळू बोल.. आपलं कॉलेज नाही आहे हे बाळ..!"

अजयने परत येउन नेमकी अमुच्याच कंपनीमधे मॅनेजरच्या पोस्ट्वर नोकरी पत्करली होती. कितिदातरई लिफ्ट नाकरुन, स्कूटीवरुन जाणारी अमु तिच्या स्कूटर अपघातानंतर अजयच्या कारमधून ऑफीसला जा-ये करु लागली होती...

पण आज काय झालं होतं कोण जाणे,.. अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते..

"अमु आता बास यार.. मी गम्मत केली तुझी जरा.. अगं प्लिज नको ना गं रडूस.. आजूबाजूचे लोक खुन्नस देताहेत मला..की काय माणूस आहे एका सुंदर मुलीला उगीचच रडवतोय.." अजयने तीला हसवण्याचा एक निष्फळ प्रयत्न करुन पाहीला.

"मी खरंच नाही येणार उद्यापासुन.. तुला फार त्रास झाला माझा... I'm sorry.. " अमु डोळे पुसत म्हणाली..

"काय झालंय अमु, तु अचानक अशी का वागतियेस... तू तर मस्करी केल्यावर रागवत नव्हतीस पूर्वी..इतर बावळट मुलिंसारखी?"

"पुर्वी आणि आतामधे जमीन्-अस्मानाचा फरक आहे अजय.. पूलाखालुन फार पाणि वाहुन गेलंय.."

असं काय झालंय अमु, कि तु पुर्वीसारखी आनंदी नाही राहू शकत? तो अभी मला कुठे भेटला ना....!!"

"मला तो विषय नकोय अजय.."

गुलमोहर: 

वेग आहे कथेला.... Happy

एक suggestion आहे, काही वाक्य copy-paste झालीयेत बहुधा चुकून... ती delete कराल का?
जसे की...
>>>>अजयने परत येउन नेमकी अमुच्याच कंपनीमधे मॅनेजरच्या पोस्ट्वर नोकरी पत्करली होती. कितिदातरई लिफ्ट नाकरुन, स्कूटीवरुन जाणारी अमु तिच्या स्कूटर अपघातानंतर अजयच्या कारमधून ऑफीसला जा-ये करु लागली होती... पण आज काय झालं होतं कोण जाणे, अजयने परत येउन नेमकी अमुच्याच कंपनीमधे मॅनेजरच्या पोस्ट्वर नोकरी पत्करली होती. कितिदातरई लिफ्ट नाकरुन, स्कूटीवरुन जाणारी अमु तिच्या गेल्या आठवड्यात झालेल्या एका छोट्याश्या स्कूटर अपघातानंतर अजयच्या कारमधून ऑफीसला जा-ये करु लागली होती...

पुलेशु......... Happy

अरे यार मस्त सुरुवात आहे.
keep it up पण लहान भाग नको.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

मस्तंच मी पण आज वाचली.. B-)

पुढचे भाग...

maayboli.com/search_results?as_q=%E0%A4%A4%E0%A5%8B%2C+%E0%A4%A4%E0%A5%80%2C+%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF+%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80...