पुण्यात कार रेंट कशी करावी?

Submitted by शिरीन on 3 November, 2011 - 20:40

पुण्याला ३/४ अठ्वड्याच्या सुट्टी साठी गेले की transportation ची खुप डोकेदुखी होते. २ लहान मुलिंना घेउन मला फिरायच असत पण रीक्शा वर depend नाहि करता येत अजीबात. कार + driver काहि दिवसांकरत मिळाला तर खुप सोय होइल. पण महित नाहि कस शोधायच ते. कुणाला काहि कल्पना आहे का? खर्चिक होइल का खुप? rate कसा लवतात दिवसाचा/ अठ्वद्याचा?
-शिरीन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१५० किंवा २५० किमी एका दिवसाचे फिक्स असतात. तेवढे द्यावेच लागतात.
इंडिका टाइपची गाडी असेल तर हल्ली साधारण ७-९ रूपये प्रत्येक किमी मागे असा हिशोब असतो.
कधीकधी ड्रायव्हरचे जेवणखाण यातच धरलेले असते तर कधी ते तुम्हाला मॅनेज करायचे असते.
रात्री ठराविक वेळेपेक्षा उशीर झाला तर ड्रायव्हरचे काहीतरी वेगळे चार्जेस असतात ते १००-१५० की तत्सम जास्तीचे द्यावे लागतात.
यामधे आठवडाभरासाठी बुक केल्यास कमी जास्त किंवा काय ते त्या त्या व्यक्तीशी बोलूनच ठरते. ओळखीचा ट्रान्स्पोर्टवाला असेल तर जमू शकते.

जर आपल्या घरची गाडी असेल/ कोण गाडी स्पेअर करू शकत असेल तेवढ्या दिवसांसाठी तर ड्रायव्हर्स दिवसाच्या हिशोबाने मिळू शकतात. त्यांचे दर दिवसाचे ४०० च्या आसपास असतात. + जेवणखाण. आणि अर्थातच पेट्रोल आपले. Happy

शिरिन,
माझ्यामते प्रायव्हेट कार हायर करण्यापेक्षा कधीही विंग्ज रेडिओ कॅब्ज बर्‍या पडतात.
त्यांचा फोन नं. 40100100 असा आहे. फोन केला की लगेच तुमचं बुकिंग नोंदवल्याचा समस येतो, पिकप टायमिंगच्या अर्धा तास अगोदर ड्रायव्हरच्या डिटेल्स चा समस येतो. त्यांची सर्व्हिस अत्यंत चांगली, विश्वासू आहे. पिकप पॉईंट ते ड्रॉप पॉईंट पर्यंत चार्जेस स्विकारतात. (रू.१६/- प्रती कि.मी. बहुतेक) आणि वेटींग ला एका मिनिटाला एक रूपया. शिवाय २४ तास बुकिंग करू शकत असल्याने नो प्रॉब्लेम. प्रायव्हेट वाल्यांच्या गाड्या कधी योग्य स्थितीत नसतात, ड्रायव्हर्स शिकाऊ असतात. हिडन चार्जेस मागतात, वेळेत येत नाहीत. त्यापेक्षा हे बरं. हे माझं मत.
एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी ड्रॉप घेतल्यावर तिथे ती कार वेटींग ला ठेवण्यापेक्षा निघण्याच्या वेळेपुर्वी नविन बुकिंग करायचं वेटींग चे पैसे वाचतात.

गिरीकंद ट्रॅव्हल्सनी पुण्यात कार रेन्टलची नवीन सेवा सुरु केली आहे.. ड्रायव्हर सह किंवा शिवय दोन्ही प्रकारे गाड्या देतात... नेट वर मिळेल माहिती..

thanks सगळ्यांनाच. गिकिकन्द चि साइट चेक करते. दक्शिणा ही कॅब्ज ची idea पण चान्गली आहे. गेल्या वेळेला गेले होते तेव्हा दिसल्या नहित फारशा, पण option attractive आहे निश्चित.

नी- तऊ सान्गितलेला पर्याय एक दिवसाचि ट्रिप वगैरे करायला मस्त आहे. पन तुला काहि contacts /businesses माहित असले तर नाव पण देशील का?म्हण्जे जातानाच homework करून जाइन.
धन्यवाद.
शिरीन

माझी स्वतः ची ही सेवा देनारी संस्था आहे Happy
आधी बुकिंग केल्यास योग्य दर अन विश्वासर्ह सुखद प्रवास.
गेली ७ वर्शे मी हेच तर करतोय अन ड्रायव्हर विश्वासु उगाच कमिशन एजंट प्रमाणे नाही.
फक्त आधी बुकिंग महत्वाचे. श्री ट्र्यावलींग सर्वीसेस पुणे.

पुण्यात अजुन एक ट्रॅव्हल कंपनी आहे.. मी एकदा त्यांची सर्विस वापरली होती..

कारट्रॅक - ९८५०११२३०२

त्यांच्या कडे खूप कस्टमाईझ्ड पर्याय आहेत.. फक्त ड्रायव्हर , कार + ड्रायव्हर, कार ऑन कॉल..
छान सर्विस आहे..