उपोद्घात व उपसंहार
काही शब्द आपल्याला त्यांच्या अर्थामुळे तर काही त्यांच्या नादामुळे आवडतात. नादमाधुर्यामुळे मला आवडणारे हे दोन शब्द, उपोदघात व उपसंहार.उपोदघात कादंबरीच्या आधी व उपसंहार कादंबरीच्या नंतर येत असल्यामुळे मला मतितार्थ माहित होता, पण नेमका शब्दश: अर्थ माहित नव्हता. पण काही गोष्टी कशा अकस्मातपणे उलगडत जातात!
एक दिवस माझ्या कानावर ’उदघाटन’ हा शब्द पडला आणि विचारांची एक मालिकाच सुरू झाली. ’उदघाटन’ या शब्दाचा मूळ धातू असणार ’उदघात’ म्हणजे नक्कीच ’सुरुवात’ असा असणार. आणि कादंबरीची प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वीचा भाग म्हणून ’उप+उद्घात= उपोद्घात’ असा उलगडा झाला. ’उपसंहार’ चा अर्थ उलगडणं त्या मानाने सोपं आहे. ’उप+संहार=उपसंहार= शेवटानंतरचा भाग’ किंवा उपशेवट!!! यामुळे एक गंमत अशी झाली की संहार चा शब्दशः अर्थ ठार मारणे असा समजला जातो, तसा नसून शेवट करणे असा आहे अशी ज्ञानात भर पडली.
या शब्दांचे इंग्रजी प्रतिशब्द आहेत क्रमशः prologue व epilogue. त्यामुळे थोडा तर्क लढवून pro,epi,व logue या शब्दांचाही शब्दशः अर्थ समजला. logue म्हणजे नक्कीच लेखन, त्यामुळे log शब्द जोडलेल्या इतर शब्दांकडे गाडी वळली. logarithm=log+arithm= लिखित गणित. catalogue=cata+log=रकान्यात विभागलेले लेखन (categorised लेखन?) इत्यादी...
pro म्हणजे सुरुवात हे ओघाने आलंच.त्यामुळे proactive, promotion,procreate या शब्दांशी खेळत बसलो थोडा वेळ. पण ’लांबवणे’ याला ’prolong' का म्हणत असावेत इथे गाडी अडली आणी epi कडे मोर्चा वळवला.epi म्हणजे शेवट. लगेच आठवलं ते...epidemic! democracy शब्दामुळे demo/demi यांचा ’लोक’ या शब्दाशी संबंध आहे हा अंदाज होताच. म्हणजेच epidemic=epi+demic=लोकांचा शेवट करणारा!!! epidemic चा साथीचा रोग हा अर्थ माहीत होता, पण शब्दशः अर्थ किती भयंकर निघाला! मग epi राहिला बाजूला आणि demi शब्दानेच लक्ष वेधून घेतलं. वेतोबा, म्हसोबा इत्यादी देवांना demi-gods का म्हणतात ते समजलं. लोकदैवत!!! किती छान अर्थ!
शब्दांचे मूलशब्द आणि त्यांचे शब्दशः अर्थ शोधणं हे एक खूप मोठं शास्त्र आहे , आणि मी वर जे काही जावईशोध लावले आहेत त्यातील बरेचसे चुकिचेही असतील. पण वाचकांना शब्दार्थ सांगणे हा माझा हेतू नव्हताच मुळी! मनातल्या मनात मी जी काही कसरत केली, ज्या तार्किक कोलांट्याउड्या मारल्या, त्यातील मजा वाचकांपर्यंत पोचवणे एवढाच हेतू. ती मजा dictionary घेउन अर्थ शोधायला आली नसती.
असं वाटतं की माझ्या मनात ज्या शब्दांचे शब्दशः अर्थ उलगडत नाहियेत त्यांची एक मोठाली माळ होती, जणु काही फ़टाक्यांची माळ. ’उद्घाटन’ या शब्दाचे कानावर पडणे म्हणजे जणू काही ती वात पेटवली जाणे. आणि धडाधड फ़टाके फ़ुटत जावेत तसे एकेका शब्दाचे अर्थ उलगडत गेले. या माळेतील काही फ़टाके न फ़ुटलेले राहतात तसे episode,epilleptic,epicentre इत्यादी काही शब्द न उलगडता तसेच राहिले. भूकंपाला epicentre असतं, म्हणजे काय? ’शेवटचा केंद्रबिंदू’?
कुणास ठाऊक, या शब्दांचा अर्थ समजेल तेव्हा फ़टाक्यांच्या एका नव्या माळेचा ’उपोद्घात’ होइल कदाचित!!!
उपोद्घात व उपसंहार
Submitted by आदित्य डोंगरे on 24 October, 2011 - 13:08
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मी अजूनही डिकशनरी पहायची
मी अजूनही डिकशनरी पहायची हिम्मत केलेली नाही!....कुणाला माझ्या ज्ञानात भर घालायची असल्यास स्वागत आहे
(No subject)
छानच आहे कीं ही बौद्धीक कसरत
छानच आहे कीं ही बौद्धीक कसरत !!
'उपोद्घात व उपसंहार ', - ह. ना. आपटेंच्या जमान्यातील पूर्वी आधाशीपणे वाचलेल्या कांदंबर्या सर्कन नजरेसमोर आल्या व खूप बरं वाटलं. धन्यवाद.
(No subject)
Oxford better word power या
Oxford better word power या पुस्तकात असे अर्थ मिळाले :
demi : half
demo : the people
epi : upon, above
logue : talk
अर्थात तुमच्या कोलांट्या आवडल्या.
आदित्य, सही. सही. मस्त
आदित्य,
सही. सही. मस्त लिहीलेत.
असं वाटतं की माझ्या मनात ज्या शब्दांचे शब्दशः अर्थ उलगडत नाहियेत त्यांची एक मोठाली माळ होती, जणु काही फ़टाक्यांची माळ. >> टाळ्या.
गो भरत. धन्यवाद हो.
Epi-: Prefix taken from the
Epi-: Prefix taken from the Greek that means "on, upon, at, by, near, over, on top of, toward, against, among
logue or -log suff. Speech; discourse: travelogue
छान आहे कि हा खेळ. आता प्र हे
छान आहे कि हा खेळ.
आता प्र हे अक्षर पण बर्याच वेळा आधी लागते..
शिक्षण-प्रशिक्षण, वर्ग-प्रवर्ग, पत्र-प्रपत्र असे करतकरत मग माझी गाडी घात - प्रघात पर्यंत जाते !!!
प्र-भात, प्र-भाकर यांचं काय?
प्र-भात, प्र-भाकर यांचं काय? भात भाकरीला का प्र लावलं?
आवडलं.
आवडलं.
खूप छान...
खूप छान...
अरे वा! मजा आली वाचायला
अरे वा! मजा आली वाचायला
माझ्या मनातही असा खेळ सुरुच असतो. असा तर्क लावून लावून मी बंगाली, गुजराती आणि जर्मन समजून घ्यायला शिकले. जर्मन आता अजिबातच विसरलेय पण.. असो. 
प्रभात आणि प्रभाकर मध्ये
प्रभात आणि प्रभाकर मध्ये 'प्र' अक्षर उपसर्ग म्हणून स्वतन्त्रपणे येत नाही. प्रभा = उजेड करणारा तो प्रभाकर तसेच प्रभात चाही संबंध प्रभाशीच आहे. त्यामुळे भात आणि भाकरीची संबंध नाही. अर्थात तेवढा जामोप्या यांचा अभ्यास आहे. केवळ विनोद म्हणून त्यानी लिहिले आहे ...
चांगला धागा.
( हो तो विनोदच आहे.. कुणातरी
( हो तो विनोदच आहे.. कुणातरी एका व्यक्तीला नेहमी प्रत्येक गोष्टीमागे प्र लावायची सवय असते.. प्रशिक्षण, प्रभाग, प्रपत्र .. ई शब्द वापरावेत असा त्यांचा अट्टाहास असतो.. ते एकदा मित्राला विचारतात.. आज काय खाल्लेस.. तो म्हणतो प्रभाकर, प्रभात...
या २ व्यक्ती कोण हे मला माहीत नाही.)
फटाकड्यांची लडी मस्तच. जागो,
फटाकड्यांची लडी मस्तच.
जागो, LOL! चांगला होता विनोद.
लेख मस्त! मला बायॉलॉजी
लेख मस्त! मला बायॉलॉजी शिकवताना त्यातले शब्द सोपे करुन सांगण्यासाठी या 'वर्ड रुट्स' चा प्रचंड फायदा होतो.
अत्र्यांनी अशी कायतरी कविता केली होती ना? - 'अंगी त्यांच्या सत्कोट, सत्पगडीचा वर थाट'!!!!!!
सुसुमनांच्या सुसरी गळ्यात !!
सुसुमनांच्या सुसरी गळ्यात !! (हे पण अत्र्यांचेच असे वाटतेय.)
मस्त.. असं स्वत:च्या बुद्धीला
मस्त.. असं स्वत:च्या बुद्धीला जागृत ठेवणारे उद्योग.. एकदम मस्तच!
बॉटनी , झूलॉजी मधले अगम्य
बॉटनी , झूलॉजी मधले अगम्य शब्द हे सुरुवातीस नॉन्सेन्स सिलॅबलच वाटतात. त्यामुळे ते अर्थहीन वाटून लक्षात राहात नाहीत हे आनखी वेगळेच . पण नन्तर त्या ल्याटीन शब्दांचा अर्थ समजायला लागल्यानन्तर सगळेच सोपे होऊन गेले. पण त्यावेळी फारच उशीर झाला होता.
आवडला लेख! बहुधा स्पेलिंग बी
आवडला लेख! बहुधा स्पेलिंग बी मधे भाग घेणारे अशाच शब्दांच्या फोडी करून लक्षात ठेवतात.
मस्त लेख. फटाके
मस्त लेख. फटाके आवडले.
प्रभात, सुसरी
छानच विषय उलगडत चालला
छानच विषय उलगडत चालला आहे.
त्यात माझीही भर!
उपसर्गानी शब्दाचा अर्थ तो बदलतो पुरा ।
प्रहार-आहार-विहार-संहारा परी तो स्मरा ॥
एक साधासा वाटणारा शब्द आहे सर्ग. म्हणजे अध्याय. प्रकरण. मात्र उपसर्गामुळे त्याचे खालीलप्रमाणे कितीतरी शब्द घडू शकतात, ज्यांचे अर्थ निरनिराळे आहेत.
निसर्ग = नि+सर्ग = Nature
विसर्ग = वि+सर्ग = Discharge
उत्सर्ग = उत्+सर्ग = Ejection, Emition
उपसर्ग = उप+सर्ग = Modifier, Affection
संसर्ग = सं+सर्ग = Exposure, Infection
कसरत छान संस्कृतात २२ उपसर्ग
कसरत छान
संस्कृतात २२ उपसर्ग आहेत http://www.astro.caltech.edu/~aam/sanskrit/upasarga.html
लॅटीन मधेही थोड्याफार फरकानी तसेच आहेत.
शब्दांची फोड करणे सुरु केले (वि-श्लेषण) तर भाषेची अनेक अंगे उलगडतात (तुम्ही लिहिल्याप्रमाणे).
prepone हा शब्द गमतीदार आहे. postpone च्या विरुद्धार्थी असा हा भारतात बनविल्या गेला आहे - ईंग्रजांच्या ईंग्रजीत तसा शब्दच नाही. किंवा नव्हता असे म्हणुया.
वा! या निमित्ताने एवढी मस्त
वा! या निमित्ताने एवढी मस्त चर्चा झाली याचे फारच बरे वाटले!......सर्वांचेच खूप खूप मनापासून आभार!!!
बनविल्या गेला आहे >> हे
बनविल्या गेला आहे
>>
हे मात्र चुकीचे मराठी आहे. विदर्भात बोलले जाणारे (आणि आता चक्क छपलेही जाणारे !:()
(No subject)
बाळू जोशी साहेब, कदाचित
बाळू जोशी साहेब, कदाचित अस्चिग यांनी चुकून तसे टाईप केले असेल, जसे की तुम्ही छापले ऐवजी छपले असे टाईप केलेले आहे
छान आहे लेख.
छान आहे लेख.