चांगले फॅमिली डॉक्टर सुचवाल का?

Submitted by मेधावि on 17 October, 2011 - 09:25

कुणाला पुण्यात कोथरुड भागात चांगले फॅमिली डॉ. माहीत आहेत का? अनुभवी असावेत. रुग्ण्सेवा राहुदे, पण किमान माणूसकी असावी एवढी अपेक्षा..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ.सेलवाकुमार.. कॄष्णा हॉस्पिटल्च्या बाजुच्या लेन मध्ये, नैवेद्यमच्या बाजुला त्यांचे क्लिनीक आहे.. गेल्या ४-५ वर्षांपासुन माहीत आहेत.

आमचे फॅमिली डॉक्टर 'अभिनव विद्यालया'समोरचे डॉ. बापट आहेत. (०२०-२५४६१६२९)
डायबेटीस, थायरॉईड, एबडॉमिनल इन्फेक्शन, किंवा इतर कुठल्या नाक-कान-हाडाच्या डॉक्टरचे रेफेरेंस हवे असेल तर त्यांच्या सल्ल्यानेच जातो. पक्के पुणेरी खडूस डॉक्टर आहेत, पण पेशंटला बरं करून सोडल्याशिवाय राहत नाहीत. Happy

जोक्स वगळता, खूपच अनुभवी आहेत, पण म्हणूनच त्यांच्याकडे गर्दी खूप असते. ते गरीब पेशंट्सवर मोफत किंवा माफक दरात इलाज करतात. लांबून आलेल्यांना तिथे प्राधान्य असते. या सगळ्या कारणांमुळे जवळ जवळ अर्धा दिवस जाईल, या हिशोबाने त्यांच्याकडे जावे लागते. पण गुण येतोच येतो.
अवांतरः ते साध्या सर्दी-पडशावर इलाज नाही करत. फक्त थोड्या मोठ्या विकारांवरच इलाज करतात. आणि हो! त्यांची फी बाकीच्यांइतकी नसते. आम्ही पहिल्यांदा दोन पेशंट्सची मिळून फक्त ३० रुपये फी बघून (ती पण एवढया मोठ्या डॉक्टरची) चक्रावलो होतो. Wink

dhaaraa , तु बोलतेय्स ते डॉक्टर m.d. आहेत..
काही तसच मोठं झालं असेल तर दाखवायला..
पन बेश्ट आहेत.. माता गेलि होती एकदा त्यांच्या कडे

....

डॉ. जया जोशी
गिरिशंकर मध्ये क्लिनिक आहे.
छोट्या आजारांसाठी चांगल्या आहेत. तसेच वाटलं तर एम. डी चा रेफरन्स ही चांगला देतात्.मुख्य म्हणजे गुण येतो पट्कन.

हेम चा आरोग्य विषयक लेख आणि इतरांना केलेले मार्गदर्शन वाचून मला आमच्या family doctor चे नाव इथे सुचवावेसे वाटले.

बोरिवलीला LIC Colony मध्ये डॉक्टर मोरोणे म्हणून आहेत. आर्मी डॉक्टर होते. पण बोलायला खूप छान कि अर्धा आजार तिथेच बारा होतो. डॉक्टर देवाचे दुसरे रूप आहे याची प्रचीती त्यांना भेटून येते . १०१ % आजाराचे निदान, उगाच antibiotics देणे नाही .
पोटात दुखत असताना पेशंट ला 'तुम्ही काल कलिंगड जास्त खाल्ले का? त्यामुळे पोटात दुखतंय औषधाची गरज नाही' असे सांगणारे डॉक्टर दुर्मिळ.ओळखीतल्या एका मुलाच्या चेहऱ्याला अलर्जी झाली होती खूप स्कीन specialist करून झाले , बाबांनी सुचविल्या वर तो डॉक्टरांकडे गेला. त्यांनी त्याला दाढीचे साहित्य रोज सुके करून ज्या ग्लास मध्ये ठेवतो ते रोज धुवायला सांगितले . and it worked . माझ्या ओळखीच्या खूप केसेस आहेत पण त्या सगळ्याच इथे देऊ शकत नाही. शेवटी प्रत्येकाचा स्वताचा निर्णय आहे.

पण जे बोरिवलीच्या आसपास राहतात आणि चांगल्या family doctor चा contact हवा असेल तर डोळे झाकून जा. त्यांच्या कडे लांबून येणारे पण लोक आहेत. इवन माझ्या कुटुंब मध्ये सगळे लहान मुलांना सुद्धा child specialist पेक्षा त्यांच्याकडे घेऊन जातात.

विपु मधून contact number share करू शकते
- सामी

पुण्यात लॉ कॉलेज रोड वर फिल्म ईन्स्टिट्युट शेजारी प्रभात मेडिकल च्या मागे -- बिल्डिंग मध्ये
डॉ. पुर्णिमा पंडित चांगल्या आहेत.
योग्य ती पुर्ण माहिती विचारुन / तपासुन , जर गरज असेल तरच औषधे देतात.