संवाद लिहा स्पर्धा - १

Submitted by माध्यम_प्रायोजक on 14 October, 2011 - 02:04

'देऊळ'निमित्त वेगवेगळ्या स्पर्धा, खेळ घेत असताना आमच्या हाती आली काही प्रकाशचित्रं...

पण नुसती ती चित्रं बघून काही कळेना हो... काय प्रसंग असेल, त्यातल्या व्यक्ती काय बोलत असतील, विचार करून मेंदू शिणला नुसता..

म्हणून ठरवलं, आता मायबोलीकरांनाच दाखवायची ती प्रकाशचित्रं आणि त्यांनाच बनवायचं संवादलेखक...

होय, 'देऊळ'निमित्तानं घेऊन आलो आहोत, प्रकाशचित्रांवरून संवाद लिहिण्याची आणखी एक रंजक स्पर्धा!

खाली दिलेल्या चित्रातल्या दोन व्यक्तींमधला संवाद तुम्हांला इथे लिहायचा आहे.

अट एकच, हा संवाद एकूण पाच वाक्यांपेक्षा जास्त नसावा (दोन्ही पात्रं मिळून).

एका आयडीची एकच प्रवेशिका ग्राह्य धरली जाईल. तुम्हांला आवडलेल्या संवादाला मत देऊन या स्पर्धेचा विजेता तुम्हीच निवडणार आहात.

विजेत्या स्पर्धकाला बक्षीस म्हणून मिळेल 'देऊळ' चित्रपटाची एक ऑडिओ सीडी.

sanvaadoLakha1.JPG

वापरा तर मग तुमची कल्पनाशक्ती आणि वर दिलेल्या प्रकाशचित्रातल्या व्यक्तींमध्ये घडवून आणा संवाद!

Groups audience: 

देवदास : पारू.. ए पारू.. बघ मी आलोय...
पारू : देवदास .. तु आलास .. खरंच आलासं.. माझा तर इश्वासच बसत नाई.
देवदास: असं काय करतीस पारू, बग मला हात लावून म्या खरंच आलोय.
पारू: एवड्यानं धापा टाकायला काय झालं? कुत्रं माग लागलं व्हतं?का ती येडी जनी?
देवदास: नाय गं, आंबराईतला बबन्या बिलवर घेऊन मागं लागलाय.. कच्च्या कैर्‍या तोडल्या ना म्हणून..

ती : अवो, सोडा की हात, असं काय करता, कुणी बघंल की.
तो : अगं कारभारणी, भरल्या घरात असं चोरुनच तुझ्याकडे डोलं भरुन पहावं लागतंय बघ.
ती : व्हय व्हय, माज्जं बी त्येच गार्‍हाणं हाय बगा.
तो : मी असं करतु, मी गुरं घेऊन पाण्यावर जातु आणि तू ही टोपली घे अन् हे तुझं धुवून वाळलेलं लुगडं परत धुवायला पाण्यावर ये या कृष्णाच्या राधेवाणी.
ती : इश्श ! जावा तिकडं.

सोनाली : हात सोडा माझा ...मला नाहि बोलायचे....
गिरिश : का गं राणि ???
सोनालि : मग काय, मला म्हणले होते कानातले घेतु म्हणुन दसर्याला....अजुन नाय घेतले ???
गिरिश : राणि माझि, अशी रागवु नकोस ....दिवळीला नक्कि घेतु बघ.....आईशप्पथ
सोनाली : नक्कि....मग आता नुसते कानातले नको, दिवाळिलाला बांगड्या पण हव्यात मला!!!!

तो : तुझे क्या सुनाऊं मै दिलरुबा ...
ती : बैय्या ना धरो, ओ सजना....
तो : चल री सजनी अब क्या सोचे...
ती : आज फिर जिने की तमन्ना है...

तो: मायेऽऽ पाया पडतू तुम्च्या बगां....
ती: येऽ हाड हाड..
तो: मायेऽऽ आंस नका हाडहुड करु, पाया पडतू बगां तुम्च्या ....
ती: येऽऽ मेल्याऽऽ, आरं हाट्ट, मुडदा बशिवला तुजा, पाया पडतो म्हणूनशान हातच धरतुयास की
तो: लईऽ दीसाचा उपाशी हाय म्या, मायेऽ प्वॉटाला घाला दोन घांस, द्येव तुज कल्याण करील गोऽ माय, द्ये, पोटाला दोन घांस द्ये, तुझी इडापिडा सम्द सम्द टळल

ती: अवं..कुटं गेला व्हता सकालधरना?
तो: अगं पंचाईतीत व्हतो...किसन्याच्या बायकुचा न्याव व्हता न्हवं आज?
ती. आत्ता! काय म्हणावं माझ्या डोस्क्याला..लक्षातच न्हाय र्‍हात काय हल्ली.
तो: म्हंजी? तुला डोस्कं हाय व्हय?
ती: ऑ? काय म्हनलासा?
तो: अगं म्हंजी तसं न्हाय. ते जाऊदे. किसन्याच्या बायकुचं काय झालं इचार की.
ती: व्हय. सांगा की. पर थांबा. गुळ-शेंगदाणं आनते. त्या मेलीचा न्याव चवीनं खाता ईल!

>>> फोटोतल्या तिच्या चेहर्‍यावर 'हाड हाड' करणारे भाव नाही आहेत. <<<<
भाव नाहीत ही तिची अ‍ॅक्टिन्गमधली चूकी आहे नैतर डायरेक्टरची डुलकि आहे! त्याला मी काय करणार? Proud असो. शेवटच्या त्याच्या वाक्यामुळे तिच्या चेहर्‍यावरचे भाव बदललेत अस समजुन घ्या, काय समजल? Wink

@अश्विनी के.... या वाक्यात मायनर पण महत्वाच्या सुधारणा सुचवतोय बघ पटतात का
>>>>मी असं करतु, मी गुरं घेऊन पाण्यावर जातु आणि तू ही टोपली घे अन् हे तुझं धुवून वाळलेलं लुगडं परत धुवायला पाण्यावर ये या कृष्णाच्या राधेवाणी. <<<

म्या असं करतु, गुरं घेऊन म्या जातु पाण्यावर आन त्वा ही टोपली घे अन् हे तुझं धुवून वाळलेलं लुगडं परत धुवायला पाण्यावर ये या कृष्णाच्या राधेवाणी.

ती,: इश्श लोक बघतील न सोडा की हात ,सोडा म्हणते की!!
तो: बघु दे की, बायको तु माझी, लग्न करुन आणली म्या तुला , लोकास्नी काय घाबरायचे.?
ती: बरं म्या काय म्हणती??????????
तो: म्हण की तु असेच बोलत रहा..आणि म्या तुझ्याकडे नुसतं बघत राहतो

ती: काम केलंस माजं?
तो: अर्र! न्हाई, इसरलोच. आता येत्या दोन दिसांत नक्की..
ती: हाऽऽ निस्ते वायदे कर तू.. आज कर्तो अन् उद्या कर्तो..
तो: न्हाई न्हाई, ह्या दोन दिसांत कायबी करून नक्की. बिनघोर र्हाऊन काम करायला येळंच मिळत न्हाईये ओ.. साऽर्कं कोनी ना कोनी असतंयच बरोबर..
ती: हां हां, बर. पर आता लाष्टं दोन दिस हां.. काम व्हाया होवं, नायतर बघ मग तू..

तो : अग, उघड की दार आता, कधीपासुन इनवतोय तुला.
ती : आता ग बया, आली का आठवण घराची गावभर उंडारुन आल्यावर
तो : अग काम असत्याती
ती : रातीची??? र्‍हावा हिथच उभ आज दिसभर, मी नाय दार उघडायची
तो : बर मंग तू बी र्‍हा हुभी आंग आश्शी

.....

तो : माजे आये, पाया पडतु तुज्या, पुन्यांदा न्हाय व्हनार असं.
ती : पुन्यांदा दारु प्यायला न्हाईच जानार तुमी ह्याची काय बी खात्री न्हाय मला.
तो : लई दिसानी काल प्यायलो तर रातभर घराच्या भायेरच ठिवलंस की.
ती : ह्या सटव्या दारुपायी घरादाराचं वाटुळं व्हईल तवाच कळंल तुमास्नी.
माजा हात सोडा, त्यापरीस सोताचे कान प़कडा न्हाय दारु पिनार म्हून.

तो: येक डाव मापी कर!
ती: कशापायी मापी...जा की तिच्याकडं..हितं कशापायी आलात पुन्यांदा!
तो: अगं,नाय माजे आई,तू समजतेस तसं काय बी नाय!
ती: तुमाला काय मी दूधखुळी वाटली का काय?
तो: आता कसं सांगू तुला? Sad

तो: वैनीss, आयची आन! पुन्यांदा न्हाय भांडणार रख्मीशी. तिला घरला परत यायला सांगा.

ती: चंद्या, अरे एवढी नक्षत्रावाणी बायको मिळालीय आणि तिच्याशी भांडतोस होय रे लहान पोरासारखा... रडून रडून थकून गेलीये पोर नुसती.

तो: काय सांगू वैनी, काल शिवारात साप निगाला, मंग त्येला ठेचण्यात येळ गेला, आन् घरी पोचायला बी लेट झाला. रख्मीला न्हाई न्हाई ते वाटलं आन् भांडण काडलंन माझ्याशी. मंग मी पन बोललो तिला..

ती: बरं बरं सांगते मी तिला.. आणि तू पण तिच्याशी समजून वाग जरा. बोलताना विचार करून बोल.

तो: व्हय! व्हय वैनी.

तो : तुही शपथ म्या खरच पीली नाही
ती : मग ईतला वेळ झाला कुठी गेले
तो : पहीले घरत घे
ती : आ हा हा लय बनवता

-- नाही! धनी आहेत न्हाणीघरात. कुणी बघेल, तू इथनं जा बघू.
-- एकदाच अगं.. एकदाच!
-- नाही म्हणजे नाही! ते येतील आता आंघोळ करून. वय वाढलंय, पण काठी दणकट आहे त्यांची, सांगून ठेवत्ये!
-- एकदाच ना, फक्त एकदा..
-- नाही सांगितलं ना मेल्या! खायची भ्रांत पडलीय, पण गुरं राखायला हवीय तुला सोन्याच्या मुठीची काठी. जा जंगलात आणि तोड एखाद्या बोरी-बाभळीची दणकट काठी!

ती : (वैतागून) "तू? आत्ता ??"
तो: (अजिजीने)"थोडं पैकं हवं होतं."
ती: "हात सोड आदी माजा, बगंल कोनतरी, कालच दिले हुते नव्हं,"
तो: (विनवणीच्या सुरात)"फकस्त एक डाव, पुन्यांदा नाय मागायला येनार, येक डाव मदत कर"
ती: "ठिके ठिके, बगते हायत का, हात तर सोडशीला का न्हाय"

तो : ए, चल ना जाऊ या पळून. घे ते वाळत असलेलं येक लुगडं न चल माझ्या संगट, तुझा न्हवरा यायच्या आत!
ती : आत्ता, लग्गेच? नको नको. या खिडकीतून मला भायेर येता नाय यायचं. एक महिन्यानं ये. तोवर डायेटिंग करून बारीक होते.
तो : अग जरा धडपड व्हईल पण जमेल की. परयत्न तर कर!
ती : आज न्हाय बा! आज मी जेवायला कोंबडी शिजवलीये.

ती:आत्ता गं बया! तुमी हितं काय करताय सा?? अन मी म्हन्ते रातभर कुठं उलथला व्हता?
तो: आगं ते समदं सांगतुया, आदी मले घरात घ्याची येवस्ता कर्शील का न्हाई?? वाइच पानी तर पाजशील.? हितं लपून कवाधरनं तुही वाट बघून बघून नरडं पार सुकुन गेलंया!
ती: आवं पन आबा लई चिडल्याती, कुनाचं बी आईकनार न्हाईत त्ये, तुमचं तोंडसुदीक बघायची विच्छा न्हाय म्हनत्यात बगा!
तो:शके त्ये तुजी इनंती नक्की आईकतील, मले ठाव हाय म्या चुकलो, आइच्यान सांगतुया पुन्यांदा आसं वंगाळ काम कवाबी न्हाय करनार!
ती: ठीक हाय , तुमी म्हन्तासा तर म्या परयत्न करून बघती!

ती = जावा तिकडं घरला.
हिथ कशापायी
आलसा. तुमची माय
हाय की तिकड.

तो = अग माजे सोने.
ऐक माजं.
म्हातारी जालीया आये
किरकिर करते ठाव
हाय मला.
पन तू अजाबात लक्ष
देऊ नको. चल घरला.
समदी वाट बघत्यात.

ती = कशाला तुमच्या
मायची बोलणी
खायला?
बाई बाई काय ते वचा वचा बोलणं!
कधी भाकरी नीटन्हाय
तर कधी भाजीत मीठ
जास्त पडलय.
तरी बरं केललं सगळं
चवीनं खात्यात.
म्या म्हनते जरा सुखान
ऱ्‍हा की न आमाला बी
जगू द्या.
हाड गेली मसणात
तरी कमरच्या
किल्लीची हाव सुटंना.
मांजरासारख्या
डोल्यानी समदीकडं
लक्ष ठिवाचं अन्
सांच्याला सुनेच्या
कुटाळक्या करायच्या.
ते काय नाय मी बाबा
नाय येणार तिकडं.

तो = चल ग रानी तुला
हव ते घिउन देतो.
नवीन साडी, पाटल्या
काय हव ते.
गजरा पन घेउ.
आयेकडं नग लक्ष दिउ
चल बिगीबिगीनं.
जीव राहवना
तुज्याशिवाय माजा.

ती = एक सबूद बोलू
नगासा.
काय ते एकदाच ठरवा.
तुमच्या घराकडं राब
राबून काय हालत
जाली बगा माजी.
वर तुमची माय हाय
की बोलायला.
बा कडं रानीवानी
राहत हुते म्या.
मोलकरीण केलीत
मला.
ते काय नाय चालनार.
बा ला भेटा आन
सोक्षमोक्ष लावा.
माज्या बा ला काय मी
जड नाय सांगून
ठिवते.

तो : येक डाव माफी कर की गं, पुन्यांदा न्हाई म्या आसं वागायचा.... तुज्या गळ्याची आन!

ती : आता की गं बया! काय नगंसा आन बिन घ्येऊ... माला काय समजत न्हाय व्हंय तुमचं गूळ लावणं... वाईच हाता-पाया पडाल, खोटी आन घ्याल आन् नंतर पुन्ना ये रं माज्या मागल्या! त्ये काय न्हाय, म्यां तुमास्नी पैकं द्येनार न्हाय म्हंजे न्हाय!

तो : आसं नगं बोलूस गं, माज्या गळ्याची आन घ्येतो, पोरांच्या गळ्याची आन घ्येतो.... मग तर झालं? या वक्ताला म्या दिलेला सबुद खाली न्हाय पडू द्येनार!

तो - काल, "अंडादिन हाय, कोंबडी नाय धरायची" म्हनलीस; आज ...
ती - संकष्टी हाय. हात गावल, भात नाय ;
तो - उद्या आयतवारीं तरी...
ती - नवरा घरला हाय, तू रे कशाला हवाय ?

तो:आज नाय जान्हार गं बये तमाशाला, लई वाटोळं केलय बग म्या संसाराच, तू हाईस म्हुन टिकला इथपातूर, आता न्हाई वंगाळ वागनार म्या

ती: तुमी जानार न्हाई ह्ये माहितीये मला, आता मला बी ईश्वास वाटू लागलाय तसा, कितींदा आता माफी मांगता... जा करा आपली कामं

तो: श्यानी माजी बाय, आई ची आण घेउन सांगतो करनार नाई बग मी पुन्यांदा

तो: अग, अग, असं काय करतीयास? चांगलं हसून निरोप द्येशीला म्हून आलो व्हतो तर तुजं कायतरी इपरितच.
ती: अ‍ॅहॅ, म्हनं हसून निरोप द्ये. येव्हढ्या सटव्या हायती त्या घरामंदी, समद्या तोकडी कापडं ल्यालेल्या....
तो: मंग? असू द्येत की. तुज्यासारकी येक तरी हायं का? डोस्क्यात फुलं घातलेली, हातभर असा चुडा ल्यालेली, कपालाला माज्या नावाचं कुकु लावनारी, गल्यात माझ्या नावाचं डोरलं बांधलेली.....आं?
ती: जावा तकडं. बोलन्यात तुमी कोनाला हार जानार व्हय? पर येक ध्येनात ठ्येवा. म्या परत्येक येपिसोड डोल्यात त्याल घालूनशान बगनार हाय. जराबी वाकडं पाऊल टाकलंत तर माज्याशी गाठ हाये येव्हढं ध्येनात राहू द्या. एकेकीच्या झिंज्या नाय येऊन उपटल्या तर नावाची गंगी न्हाय मी. जावा आता.
तो: गुनाची माजी बाय ती. मोट्या सायबा, आलो रं म्या......

तो : पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
-२ : हे बघ, स्वयंपाक करण्याचे स्वप्न पडले की सफल होते असे नाही.
तो : शरण आता धाव अंबे.
अंबा : "अबोला"
तो : झाला गडबड घोटाळा.

(ठमादेवी यांच्या टाकलेला नवरा या शीर्षकावरून)

तो: रानी, आज तरी घरला चल. अशी किती दिवस मला टाकून दुसरीकडं राहनार? तुझ्यासाठी मी कायबी करायला तयार हाये.

ती: म्या लक्षुमीला सोडून त्या अवदसेकडं गेला हुतात.. तिनंही टाकलं की काय तुम्हास्नी? आनि माझ्यासाठी कायबी करायला तयार हायेस?! अस्सं.. तर मग उद्यापासनं - यायचं सातच्या आत घरात, समदा पगार ठेवायचा माझ्या हातात, घर घ्यायचं झाडून अन् भाजी ठेवायची चिरून..

तो: आरं बाबा.. एवढं सगळं! अगं संसार रथाची दोन चाकं असत्यात. दोन्ही चाकं मलाच बनवतीस की काय? मग तू काय करनार?

ती: आरं खुळ्या!! म्या तो रथ चालविनार.. म्हनजे तू हे सगळं करत्योस की नाही तेच्यावर लक्ष ठेवनार!

Proud