परवलीचा शब्द (पासवर्ड) कसा बदलावा?

Submitted by मदत_समिती on 24 March, 2008 - 18:02

तुमचा सध्याचा परवलीचा शब्द वापरुन मायबोलीत प्रवेश करा. "माझे सदस्यत्व" या विभागात गेल्यावर तुम्हाला आपले सदस्य खाते दिसेल. तिथे "संपादन" या उपविभागात जाऊन तुम्ही आपला परवलीचा शब्द बदलू शकता.

माझे सदस्यत्व हा कॉलम कुटए आहे?

उजु,
तुम्ही मायबोलीवर लॉग इन केले की डाव्या बाजुला असलेल्या टॅब मध्ये तुम्हाला 'माझे सदस्यत्व' सापडेल

TUSHAR

माझ नाव आता मराठीत करण्यात आल आहे. आता लॉगिन करताना ते मराठीतच टाईप करायच का ?
पण लॉगिनच्या खिडकीत तर मराठी टाईपच होत नाही. शिवाय, माझा पासवर्ड मराठीत टाईप झाला आहे की इंग्रजीत हे कळायलाही मार्ग नाही. मला हा प्रश्न भेडसावतोय.
हा माझाच वेंधळेपणा आहे की खरच काही अडचण आहे ?

नमस्कार भाऊ नमसकर,
लॉगइन करताना खाली असलेल्या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये 'इंग्रजी' या पर्यायाऐवजी 'मराठी' असे निवडले की तुम्हाला तुमचे नाव मराठीत लिहिता येईल. या ड्रॉपडाऊनमध्ये हा पर्याय मराठी असा आपोआप निवडलेला कसा राहेल हे सध्या अ‍ॅडमिन बघत आहेत.

कोणताही पर्याय निवडलेला असला तरी पासवर्ड इंग्रजीतच आपोआप टाईप होतो. त्यासाठी तुम्हाला वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही.

धन्यवाद.

मला पासवर्ड बदलण्याची विनंती न करताही मायबोलीकडून पासवर्ड बदलण्यासाठी इमेल आले आहे. हा माझा युजरआयडी हयाक करण्याचा प्रयत्न तर नाही ना? कि मायबोलीने ठराविक काळानंतर पासवर्ड बदलणे अनिवार्य केले आहे? तसे इमेल आल्यानंतरही माझा जुना पासवर्ड अजुनही कार्यरत आहे.

नम्स्कार मला पासवडर्‍ बदलावयाला मद्त करा.एक पासवड कसा असावा याचा एक नमुना पाटवा मेल पत्तावर धन्यवाद.

नम्स्कार मला पासवडर्‍ बदलावयाला मद्त करा.एक पासवड कसा असावा याचा एक नमुना पाटवा मेल पत्तावर धन्यवाद.

माझ्या मित्रांनी अनुक्रमे
१. vvdeogaonkar@gmail.com
2.poetvinayak@gmail.com या uesr id ने registration दि १६/०६/१३ ला केले मेल वरून आलेला पासवर्ड टाकून उघडताना account not activated or blocked असा संदेश येत होता म्हणून आज दि १७/०६/१३ रोजी पाहिल्यास नवीन पासवर्ड मागा असा संदेश येत असल्याने त्याची प्रक्रिया केल्यास हा मेल आयडी अस्तित्वात नाही असा संदेश येतो म्हणून पुनर् नोंदणी करताना मात्र हा आयडीआधीच अस्तित्वात आहे असा संदेश येतो तेव्हा तुमच्या मदतीची तातडीने आवशकता आहे कृपया मदत करा

काल माझ्या मैत्रीणीला स्वाती मार्के ला माबो मेंबर व्हायचे होते अद्यापही Active झाले नाही काय ते अकाऊंट
मेलवर आलेल्या लिंकर तिने क्लिक केले होते तरी होत नाही कॄपाया Active करुन देण्यात यावे

नमस्कार, माझा आधीच आयडी अपर्णा. काही कारणाने मी पासवर्ड विसरले आणि जीमेल आयडी सुद्धा पासवर्ड मुळे लॉक झाला आहे. मला माझा अपर्णा. हाच आयडी हवाय कारण तो तीन वर्ष जुना आहे. माझा जुना आयडी मिळाल्यावर हा नवीन आयडी डिलीट केलात तरी चालेल. कारण मी हा आयडी माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी क्रिएट केला आहे. प्लीज मला मदत करा माझा अपर्णा. आयडि मिळवायला. प्लीज... प्लीज.

नमस्कार, माझा आधीच आयडी अपर्णा. काही कारणाने मी पासवर्ड विसरले आणि जीमेल आयडी सुद्धा पासवर्ड मुळे लॉक झाला आहे. मला माझा अपर्णा. हाच आयडी हवाय कारण तो तीन वर्ष जुना आहे. माझा जुना आयडी मिळाल्यावर हा नवीन आयडी डिलीट केलात तरी चालेल. कारण मी हा आयडी माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी क्रिएट केला आहे. प्लीज मला मदत करा माझा अपर्णा. आयडि मिळवायला. प्लीज... प्लीज.

मी मायबोलीवर नवीन सभासदत्व घेतले आहे. वन टाइम लॉग इन वरून अकौंट validet केल्यानंतर मला तुमच्याकडून पाठवण्यात आलेला पासवर्ड ई-मेल मध्ये दिसत नाही त्यामुळे मला तो बद्दलताही येत नाही. याबद्दल जरा मार्गदर्शन करावे.