लॅपटॉपची १/४ स्क्रीन ब्लँक झाली आहे

Submitted by वर्षा_म on 6 June, 2011 - 00:44

लॅपटॉपची १/४ स्क्रीन ब्लँक झाली आहे. कुणाला सोलुशन माहित आहे का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

सोल्युशन स्क्रीन संपुर्ण ब्लँक करण्यासाठी हवी आहे का? Proud Light 1

जोक्स अपार्ट, रिफ्रेश करून पाहिलंस का? कॉम्प्स्/लॅपटॉप रिस्टार्ट करून पाहिलंस का? Uhoh

रिफ्रेश करून पाहिलंस का? कॉम्प्स्/लॅपटॉप रिस्टार्ट करून पाहिलंस का? >>> हो हो.. करुन पहिले हेही

लॅपटॉप एका कॉर्नर ला धरुन उचलला होता का? असे केले असेल तर त्या कॉर्नरला स्क्रीन ब्लंक होतो.. पण ते रिपेयर करायला काही उपाय नाही .. बदलावाच लागतो स्क्रीन Sad

मृनीश तुम्हाला अनुभव आहे का असा. मागेही २ वेळेस झाला होता असा स्क्रीनचा प्रॉबलेम. पण नक्की कशाने सॉल्व्ह झाला हे कळाले नाही. या वेळी जरा जास्तच वेळ लागतोय नीट व्हायला Sad

एका साईडची १/४ आणी खालची छोटीशी पट्टीही ब्लँक आहे.

बदलावा लागणार स्क्रीन. >> यापुर्वी २ वेळा प्रॉबलेम आला तेव्हा न बदलता नीट झालीये

मॅग्नेट फिरव स्क्रीन्वरून.. >> याने काय होइल Uhoh

मॅग्नेट फिरवून स्क्रिन डिमॅग्नेटाईझ होतो..
कधी कधी कलर्स वेगळे दिसतात किव्वा काहि area मधे स्क्रिनला प्रॉब्लेम होतो म्हणजे नॉर्मल स्क्रिनपेक्षा वेगळं दिसतं तेव्हा मॅग्नेट फिरवून प्रोब्लेम सोल्व होऊ शकतो.

मृनीश तुम्हाला अनुभव आहे का असा. >> हो Happy
पण लॅपटॉप कंपनीचा आणि वॉरंटीत असल्याने त्याने फारसे प्रयत्न न करता हे नीट होत नाही स्क्रीन बदलावा लागेल असे सांगुन बदलुन टाकला.. सो रिपेअर होतो का नाही ते नक्कि माहित नाही..

मॅग्नेट फिरवून स्क्रिन डिमॅग्नेटाईझ होतो..>> सम्या, LCD मधे मॅग्नेट कसं येईल???

LCD मधलं Liquid spill झालं असाव. ९९% बदलावा लागेल.

LCD मधलं Liquid spill झालं असाव. ९९% बदलावा लागेल. >> अरे विंडो पुर्ण दिसतेय. म्हणजे हार्डवेअरचा प्रॉबलेम नसेल. तसे असते तर विंडो ट्रीम केल्यासारखे झाले असते ना Uhoh

"dead pixel budd" नावाचा सॉफ्टवेअर चकटफु आहे गुगलंल कि, ते वापरुन पहा. स्क्रीनचे किती आणि कोणते पिक्सेल डेड झालेत ते सांगेल.
http://www.softpedia.com/get/System/Benchmarks/Dead-Pixel-Buddy.shtml

पिक्सेल डेड झाले नसतील तर जास्ती प्रॉब्लेम नाही पण हार्डवेअरच (पिक्सेल डेड) गेले असेल तर बदलण्याशिवाय उपाय नाही.

पिक्सेल डेड झाले असते तर विंडो अर्धवट दिसली असती ना? पण माझ्या स्क्रीनवर विंडो पुर्ण दिसतेय.

डिस्प्ले प्रॉपर्टीजच्या सेटींग्स चेंज करुन पाहिले, पण नाही झाला प्रॉबलेम सॉल्व Sad

भ्रमर साधारण असे दिसते. उअजवीकडची ब्लॅकच, खाली पांढरट

original[1].jpg

पिक्सेल डेड झाले असते तर विंडो अर्धवट दिसली असती ना? >> नाही, पिक्सेल डेड झाले तर स्क्रीन दिसते पण तो भाग शक्यतो एकाच रंगात दिसतो ( थोडाफार हिरवट, जेंव्हा आपण स्क्रीनसमोर लोहचुंबक धरतो तो रंग). सॉ.वे. रन केले (आणि हा.वे. ईश्यु असल) तर बर्‍यापैकी एंदाज येईल.

मला म्हणायचे आहे पिक्सेल डेड असले तर त्या भागात डेटा असेल, जो नीट दिसणार नाही. पण माझ्या केस मधे तिथे डेटा नाहीये. मला पुर्णपणे काम करता येतेय.

ह्म्मम्म, या केसमध्ये ग्राफीक्स ड्रायव्हर्स री-इंस्टॉल करुन पाहिले का?

अरे हा तर मग वेगळाच प्रॉब्लेम आहे.. नक्किच ग्राफीक्स ड्रायव्हर्स किंवा डिस्प्ले प्रॉपर्टीज चा प्रॉब्लेम दिसतोय..
मलाहि ईतका वेळ असेच वाटत होते की त्या एरिआत तुम्हाला काहिच दिसत नाहिये..

ओके आणि external moniter ला VGA ने कनेक्ट केले तरीही त्या moniter वरसुध्दा असच दिसते का?

ओके आणि external moniter ला VGA ने कनेक्ट केले तरीही त्या moniter वरसुध्दा असच दिसते का? >> नाही. मी आत्ता पाहिले कनेक्ट करुन. external moniter नीट दिसतेय. लॅपटोपचे मॅक्झीमम रिझॉलुशन १०२४ * ७६८ झाले आहे. आधी ते या पेक्षा जास्त असायचे. म्हणजे उप्पर् लिमीटच बदलले आहे Uhoh

१०२४ * ७६८ >> हे शक्यतो १२०० / १३०० असले तर नॉर्मल दिसेल अस वाटतय कारण माझ्या मशीनवर सेम आहे.

external moniter वर नीट दिसतय म्हणजे ग्राफिक्स कार्डचा प्रॉब्लेम नाही, आता राहिलं म्हणजे LCD चे सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर गेलं आहे. सॉफ्टवेअर जाण्याचे चान्स कमी असावेत कारण मॉनीटरवर नीट दिसतय.

सो, वर,भ्रमरने लिहिल्याप्रमाणे LCD मधलं Liquid spill झालं असाव.

६ ते १४ तारखेपर्यंत असाच लॅपटॉप दिवसभर वापरणे सुरु होते. काल सकाळी सुरु केला तर आपोआप नीट ( पुर्ण ) झाली स्क्रीन Uhoh Happy

नवर्‍याच्या डेल वोस्ट्रो १०१४ या लॅपटॉपची स्क्रीन मधूनच फ्लिकर होतेय. काम करता करता अचानक वरच्या बाजूला एक काळसर डॉट्स /चौकोन असलेली छोटी स्ट्रीप येवून जाते एखाद्या सेकंदापुरती. कालपासून हा त्रास जाणवतोय. आज याची फ्रि॑क्वेंसी वाढलिये.
लॅपटॉप वॉरंटी काळात असल्याने डेलवाल्यांना फोन करेनच. पण हे असं व्हायचं काय कारण असतं. (त्यांच्या साइटवर लिहिलंय की जर एलसीडी स्क्रीनला क्रॅक गेला असेल तर ते वॉरंटीमध्ये येत नाही)