अप्रेझल

Submitted by सुमेधा आदवडे on 22 February, 2009 - 23:03

मार्च महीना संपुन गेला होता. सगळी ईयर एण्डची कामं मी जीवाचा आटापीटा करुन, रात्रीचा दिवस करुन, बऱ्याचदा ओव्हरटाईम करुन, घरातली बाकी सगळी कामं बाजुला ठेऊन, घरात वेळ न देता येत असल्यामुळे घरातल्या लोकांची होणारी चिडचिड या सगळ्याला न जुमानता एकदाची पुर्ण करुन टाकली होती. आता कुठे थोडा श्वास घ्यायला वेळ मिळत होता. आणी आता सगळ्यांसारखीच माझीही नजर लागली होती एप्रीलमध्ये होणार असलेल्या अप्रेझल कडे आणी पगारवाढी कडे.

ऑफिसमध्ये दरवर्षी या वेळेस सर्वात जास्त रुखरुख, सर्वात जास्त चर्चा आणी गॉसीप चालु असतं. आणी महत्वाचं म्हणजे मॅनेजेमेंटच्या आतल्या बाहेरच्या खऱ्या खोट्या गोष्टी सर्वत्र पसरण्याचा हा सुवर्णकाळ असतो. वर्षभरात आपण केलेल्या कामामुळे किती लोकांना कसा आणी किती त्रास झाला, किती फायदा झाला, मुख्य म्हणजे कंपनीला किती प्रॉफीट झाला यावरुन आमच्या अप्रेझलचं भवीतव्य ठरत असतं. आपली कामात दिवसेंदिवस प्रगती व्हावी, आपलं काम सर्वांनी वाखाणण्याजोगं व्हावं असं आणी त्यामुळे आपलं नाव व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं . त्यामुळे प्रत्येक जण ह्या अप्रेझलची खुप अतुरतेनं वाट बघत असतो. ह्यातच इकडच्या गोष्टी तिकडे करुन, एकाचे दोन करुन, लोकं बोलताहेत म्हणुन आपणही कोणाच्या बद्दल चूकीची समजुत करुन घेण्याचे प्रकारही चालु असतात. वर्षभर हाच आजार, आज ही आजी गेली , उद्या इथे जायचं आहे म्हणुन रजा घेऊन अमावस्या-पौरणीमेसारखे कधी कधी दिसणारे चेहरेही ऑफिसमधे रोज दिसु लागतात. काम कसंही करा ( अथवा करु नका Happy ) पण त्याच्या मोबदल्याची आस इथे सर्वांनाच असते.

मलाही ती होती. आणी का असु नये? वर्षभर यासाठीच मी किती जीवाचं रान केलं होतं, किती खस्ता काढल्या होत्या ते माझं मलाच माहीत. शेवटी कितीही म्हटलं तरी पैसा महत्वाचा असतो. "मी पैश्यासाठी काम करत नाही", असं म्हणणाऱ्या प्रत्येक वेतनदार माणसाची मला चीड आहे. आपलं आणी आपल्या मुला-बाळांचं पोट भरायलाच तो सगळे उपदव्याप करतो, तरीही हे असलं विधान करतो, हे माझ्या पचनी पडत नाही. माझा एकच सिध्दांत होता, "मी इथे केलेल्या प्रत्येक कामाचा मला पैसा हवा" घरातला एकुलता एक कमावता माणुस. वडील रीटायर झालेले. बहीण लग्नाची. कसं जमणार होतं सगळं पैश्याशिवाय? सगळी सोंगं करता येतात, पण पैश्याचं सोंग करता नाही येत, हे काही उगाच नाही म्हणत लोक.

ह्यावर्षी एक चिंताजनक गोष्ट म्हणजे अप्रेझलच्या काळात सगळी कडे म्हणजे सगळ्या जगभरात आर्थीक मंदी पसरली होती. संपुर्ण जगात ८६००० हुन अधीक लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असल्याचं मी स्वतः वर्तमानपत्रात वाचलं होतं. ही जागतीक मंदी जणु काही सगळ्या संपत्तीला वेटोळा घालुन आपला फणा काढुन बसली होती. साहजीकच आमची आय.टी कंपनीही यातुन काही सुटली नव्हती. दरवर्षीपेक्षा कितीतरी टक्के कमी प्रॉफीट यावर्षी आमच्या कंपनीला झाल्याच्या बातम्या कानांवर पडत होत्या. त्यामुळे अप्रेझल तर दूर, आधी आपली नोकरी वाचतीये की नाही ते बघा, असं म्हणणाऱ्यांची संख्याही काही कमी नव्हती.

सगळ्यांनी आपआपले अप्रेझल फॉर्म्स भरुन वेळेवर पाठवले होते. ह्या गोष्टीला कधीच उशीर व्हायचा नाही ऑफिसमध्ये. आता सगळे फॉर्म्स मॅनेजेमेंटची लोकं रीव्ह्यु करत होती. गेल्या वर्षभरात कोणी किती आणी कसं काम केलंय, कसं परफॉर्म केलंय ह्या नुसार तो यावर्षी किती पगारवाढीसाठी आणी कोणत्या पोस्टसाठी पात्र आहे हे ठरणार होतं. ह्या चालु आठवड्यात केव्हाही अप्रेझलचा निकाल लागण्याची सगळीकडे कुरकुर होती. त्यानुसार सगळ्यांचे प्लान आखायला सुरूवातही झाली होती.

मी तर बऱ्याच गोष्टी ठरवल्या होत्या या वर्षासाठी. सुनीचा साखरपुडा होऊन ६ महीने उलटुन गेले होते. तिच्या सासरच्या मंडळींनी लग्नासाठी घाई चालु केली होती. आता लग्न म्हटल्यावर काय इतकी सोपी गोष्ट नाही की आज बोललं आणी उद्या झालं. दागीने,कपडे, हॉल, पाहुणे, मानपान, सगळंच आलं त्यात. मग ही सेवींग, हा अकाऊंट, अगदीच अडचणीत कर्जही, ओढुन ताणुन सगळं कार्य पार पाडायचं होतं. आमच्यासारख्या मध्यम वर्गीयांना खुप विचार करावा लागतो ह्या सगळ्या गोष्टींचा. बॅंक बॅलेन्स असल्याशिवाय काही जमणार आहे काय? तरी बरं माझ्या मागच्या दिवाळीतल्या बोनस मधुन आम्ही सुनीचे दागीने करुन घेतले होते. नाहीतर आता सोन्याचा भावही आकाशाला पोचला आहे. हल्ली सगळ्या वस्तुंना सोन्याचा भाव चढला आहे ही गोष्ट अलहीदा. एकदा का माझ्या बहीणीचं लग्न झालं ना, की मी एका मोठ्या जबाबदारीतुन मोकळा होईन.
मग वडीलांच्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे. बरीच वर्ष काढलीत त्यांनी ह्या संधीवात आणी गुडघेदुखीत. आई गेल्यापासुन तर त्यांचा त्रास फार वाढला होता. कष्ट पण भरपुर केले ना आयुष्यभर. एकट्या माणसाच्या तुटपुंज्या पगारात अकरा माणसांचं कुटुंब पोसणं, तेही स्वतःच्या मुलांचं शिक्षण सांभाळुन म्हणजे काही खाऊ नव्हता.आईच्या साथीमुळे अंगातलं बळ आणी मनातली इच्छाशक्ती सतत कायम राहीली, म्हणुन सगळं शक्य झालं. भरपुर केलं बिचाऱ्यांनी आमच्या सगळ्यांसाठी, आणी मुख्य म्हणजे आम्हा दोघा भावंडांसाठी. आता मला त्यांना सुखद, आरामाचं जीवन द्यायचं होतं, मग काही का होईना. सुनीचं लग्न झालं ना, की त्यांच्या ऑपरेशनचं काय ते नक्की करुन टाकणार मी.

हे सगळे विचार डोक्यात चालु असताना माझ्या ऑफिसमधला एक मित्र माझ्या जवळ आला. माझ्या समोरच्या खुर्चीत बसला, मान खाली घालुन. चेहरा पुर्ण पडला होता त्याचा. कुणास ठाऊक काय प्रॉब्लेम झाला होता.
"काय झालं रे?" मी विचारलं त्याला.
"सगळी वाट लागली रे आपली. सब कुछ तमाम हो गया!" तो खालच्या स्वरातच म्हणाला.
" अरे, पण झालंय काय? काही सांगशील की नाही?" आता मला पण टेन्शन येऊ लागलं
" अरे यार, मॅनेजमेंटची नोटीस नाही वाचलीस का तू? सध्या चाललेल्या रीसेशन मुळे आपल्या कंपनीला खुप लॉस झाला आहे. त्यामुळे ह्या वर्षीचं अप्रेझल होणार नाही!"
माझ्या अंगावार एकदम वीज पडल्यासारखं वाटलं मला. एका क्षणात सगळे आखलेले बेत धुळीला मिळतील ह्या भावाने तळपायाची आग मस्तकात गेली.
" अप्रेझल होणार नाही म्हणजे काय? आपण काय वर्षभर पुन्हा त्याच सॅलेरीवर काम करणार?" मी जवळजवळ ओरडलोच
"नाही रे, ते म्हणताहेत की पुढल्या वर्षी सगळा डिफरेन्स देतील म्हणुन. तो पर्यंत ऍडजस्ट करा म्हणे."
" ह्याला काय अर्थ आहे? पुढलं वर्ष कोणी बघीतलंय? आणी तो पर्यंत ह्या असल्या महागाईत आपण त्याच पगारात आपले सगळे प्लॅन्स बाजुला ठेऊन आपल्या गरजा कशातरी भागवत रहायच्या काय? किती वाट बघत होतो आपण अप्रेझलची. हे म्हणजे भरोशाच्या म्हशीचा मेला तोंडगा असं झालं. काय करणार रे आपण आता? मी तर बहीणीचं लग्न करायला काढलंय." मला काही सुचत नव्हतं.
तोही शांत बसुन होता. ऑफिसमध्ये सगळ्यांना ही गोष्ट कळली होती, त्यामुळे हवी तेवढी चर्चा करुन सगळे चेहरे पाडुन बसले होते. पुन्हा कामाला लागले होते. माझं मात्र कशातही लक्ष नव्हतं.
" आपण मॅनेजमेंटला जाब विचारुया. आपण सगळे जाऊया बॉसकढे. अप्रेझल आपला हक्क आहे, आपण तो असा सोडु नाही शकत." मीच शांतता भंग केली.
" वेडा आहेस का रे तू? कसला जाब विचारतोयस? सगळ्या कंपनीजची परिस्थिती वाईट आहे. सगळीकडे मंदी आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पैसाच नाही तर ते कुठुन देणार? पुढल्या वर्षी देणार म्हाणालेत ना. आता गेलास तर, फार फार तर सांगतील, तुम्ही सोडुन जाऊ शकता. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही तुम्हाला सांगितलं आहे. आणी जर जॉब सोडलास, तर ह्या "सुवर्ण काळात" तुझ्या मनासारखा दुसरा जॉब तुला मिळणार आहे का? इथे इतर ऑफिसेस सारखं कॉस्ट कटींग म्हणुन एम्प्लॉईज कमी करायला अजुन सुरूवात झाली नाही आहे, हेच आपलं नशीब समज."
"पण मग आता काय करायचं आपण?"
" काय करायचं म्हणजे? काम चालु ठेवायचं. पुढल्या वर्षी अप्रेझल होईल ना. मी माझे सगळे प्लान्स, गुंतवणुका वगरे पुढे ढकलण्याचा विचार करतोय, म्हणजे तसं करावंच लागेल. चल, मला थोडं काम आहे, ते करुन मी निघतोय घरी." एवढं बोलुन माझा मित्र उठुन गेला.

मी एकदम सुन्न झालो होतो. काहीच सुचत नव्हतं. कसे होणार मी आखलेले बेत पुर्ण? काय करणर होतो मी आता? बाकी सगळं जाऊदे, पण सुनीचं लग्न तर पुढे ढकलणं शक्यच नव्हतं. माझा बॅंक बॅलेन्स लग्नाच्या आखलेल्या खर्चा पर्यंत पोचायला सध्याच्या पगारात बराच वेळ लागेल. काय उत्तर देणार आम्ही तिच्या सासरकडच्यांना? मी लॅपटॉप वगरे बॅगेत भरला, सगळी बॅग पॅक केली आणी निघालो तिथुन बाहेर. रस्त्याने चालताना पण माझ्या विचारांनी मला सोडलं नव्हतं. मला फार चिंता वाटत होती सगळ्याची. स्टेशन जवळ आलो.

प्लॅटफॉर्मवर नेहमी प्रमाणे बरीच गर्दी होती. सगळ्यांची ऑफिस सुटण्याची वेळ, घरी जायला सगळेच घाईत. पण मला आज घरी जावसं वाटतच नव्हतं. काय सांगणार होतो मी वडिलांना? आणी सुनीला काय वाटेल लग्न जवळ आलं असताना अशी अडचण आल्याचं कळल्यावर. बिचारी किती खुश आहे लग्न ठरल्यापासुन. साखरपुड्याच्या दिवशीचा तिचा आनंदी, उत्साही चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला. प्रत्येक मुलीसारखी तिची पण स्वप्न आता पुर्णत्वाला येणार होती. तेव्हाच माझ्या अप्रेझलचा हा गोंधळ. काय करावं आता? स्टेशनवरचा प्रत्येक चेहरा मला उदास दिसु लागला होता.

गाड्यांची ये-जा चालुच होती. मी तिथल्या बाकड्यावर शांत बसुन होतो. आणखी एक गाडी समोरुन येताना दिसली. एका टोकाला एक माणुस रेल्वे ट्रॅक क्रॉस करायला प्लॅटफॉर्म वरुन खाली उतरत होता . गाडी हळुहळु जवळ येऊ लागली . तरी हा पठ्ठ्या शांतपणे चालत होता ट्रॅकवर, एखाद्या बागेत फिरत असल्यासारखा. ह्याचाही काही अप्रेझलचा गोंधळ झालाय की काय म्हणुन हा जीवाशी खेळतोय स्वतःच्या? देवा रे, माझं जर काही बरं वाईट झालं तर माझ्या सुनीचं आणी बाबांचं कसं होणार? विचार करुनच थरकाप होतो जीवाचा.

ह्याच्या घरी ह्याच्या पगारावर कोणी अवलंबुन असेल काय? ह्याच्याही घरचे ह्याची वाट बघत नसतील ना? ह्याला थांबवायला हवं . मी बाकड्यावरुन उठलो. त्याला बाजुला व्हायला सांगावं म्हणुन त्याच्या दिशेने चालु लागलो, म्हणजे पळुच लागलो. गाडीने आता प्लॅटफॉर्मच्या दुसरं टोक गाठलं होतं. हळुहळु ती प्लॅटफोर्मला लागत होती. त्यात चढणाऱ्या उतरणाऱ्यांची भली मोठी गर्दी. मी जवळजवळ पोचलोच सुरुवातीच्या डब्ब्यापर्यंत. आणी गाडी थांबली. डब्बाच्या पुढे आलो तर तिथे ट्रॅकवर गर्दी दिसली. मला शंका आली त्या माणसाला तर काही झालं नसेल. मी जवळ जात होतो त्या गर्दीच्या. त्या माणसाचा हात दिसु लागला. त्याचा शर्ट माझ्याच शर्टसारखा होता. आणखी जवळ गेलो गर्दीतुन वाट काढत. तो माणुस पालथा पडला होता. त्याची पॅण्ट पण मी घातलेल्या पॅण्ट सारखीच होती. सगळे जण नुसते घोळका करुन उभे होते. कोणालाच त्याची मदत करायची बुद्धी होत नव्हती. मीच खाली बसलो आणी पहीले त्याला दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्याला उलट केला. त्याचा श्वास बंदच पडला होता. एवढ्या मोठ्या अपघातातुन वाचणं म्हणजे दैव बलवत्तर असावा लागतं. ह्याचं नशीबही आपल्यासारखंच करंट आहे वाटतं. मग त्याचा चेहरा पाहीला. त्याचा चेहरा बघुन माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तो माझाच चेहरा होता! गळ्यात माझ्याच कंपनीचं आय-कार्ड होतं, नावही माझंच! तो मीच होतो!!!

बापरे! हा काय गोंधळ आहे? म्हणजे मी ह्या जगातुन गेलो? अरे देवा! माझ्या घरच्यांची काय परिस्थिती होईल आता? कशी राहतील ती दोघं माझ्याशिवाय? आणी सुनीचं लग्न ? बाबा काय करतील?

गर्दीत असणाऱ्या माणसांपैकी कोणीतरी मला हाक मारीत होतं. माझं नाव कसं माहीत यांना? मला अश्चर्य वाटलं.
तेवढ्यात खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. माझा मित्र होता. मी अजुन ऑफिसमध्येच होतो.
" अरे यार, कबसे आवाज लगा रहा हूँ तुझे. कुठे हरवलायस एवढा? अप्रेझलची मेल आली का बघ. त्यांनी डीक्लेअर करायला सुरूवात केलीय. काही जणांना आली मेल. सांग मला, तुलाही मेल आली की" एवढं बोलुन तो निघुन गेला.
माझे विचार मला कुठपर्यंत घेऊन गेले ह्याचं मला आश्चर्यही वाटलं आणी गम्मतही. "मन चिंती ते वैरी न चिंती " हेच खरं.

गुलमोहर: 

छानच रंगवली आहेस गं कथा... आवडली.
-----------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

काहीतरी वेगळं...खर्या जिवनाच्या जवळ जाणारं..ह्या वर्षी बहुतेकांची अशीच अवस्था असेल...आशा आहे तुमचा हा लेख नक्कीच निराश मनांना विचार करायला भाग पाडेल.

Sad
शरद

ह्म्म हि वास्तव स्थिति आहे खर. अजुन काय काय आहे ह्यापुधे देवच जाणे. कथा म्हणुन छान आहे .

कथेत काही तांत्रीक चुका झाल्या आहेत..
अप्रेझल आणि इन्क्रिमेन्ट ह्या दोन गोष्टींमध्ये गल्लत झालेली दिसत आहे.
दुसरे म्हणजे अप्रेझल (खरे म्हणजे इन्क्रिमेन्ट तुमच्या कथेच्या संदर्भाने) हा काही घटनेने अथवा कायद्याने दिलेला हक्क नव्हे. (सं: अप्रेझल आपला हक्क आहे, आपण तो असा सोडु नाही शकत.)

सर्वांना धन्यावाद!
टण्या, बर्‍याच कंपनीज मध्ये अप्रेझल आणी इंक्रीमेंट हे शब्द अदलुन बद्लुन वापरले जातात. आणी काही ठीकाणी अप्रेझल ही एक ग्लोबल टर्म आहे, ज्यात इंक्रीमेंट ही गॄहीत असते. उदा. माझी कंपनी, आणी दुसरं म्हणजे, अप्रेझल हा आपला हक्कच मानला जातो, कारण बर्‍याच ठीकाणी, तुम्ही बाँड साईन करताना तसं तुम्हाला लेखी आश्वासन दिलेलं असतं. काही कंपनीज च्या पोलिसीज पण आहेत ज्यानुसार दरवर्षी प्रत्येक एम्प्लोयी अप्रेझलला पात्र असतो. उदा.माझी आगोदरची कंपनी (एच.सी.एल ).
अर्थात हे सगळं माझ्या अनुभवाने मी सांगते, आणी त्यानुसारच लिहीलं आहे. तुमचा अनुभव वेगळा असु शकतो Happy
प्रतिक्रीयेसाठी पुन्हा एकदा धन्यवाद!
शरदजी, कथा आवडली नाही, पटली नाही, नक्की काय झालं ? प्रतिसादावरुन काही स्पष्ट होत नाहीये म्हणुन विचारलं Happy
*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

आवड्ली कथा आणि बरिच वास्तव वाटली.

काही कंपन्यांमधे पगार वाढ तर सोडाच पण पगार कपात झाली आहे ( अमेरिकेमधे) नोकरी आहे ना मग उत्तम अशी परिस्थिती आहे सध्या.

सुमेधा,

काही गैरसमज होतोय. कथा आवडली नाही असे नाही. छान आहे. वास्तवाच्या जवळ जाणारी आहे.

शरद
["तुला जे म्हणायचे आहे, ते कदाचित मला पटणार नाही; पण ते म्हणण्याचा तुझा अधिकार मी प्राणपणाने जपेन." वोल्तेयर]

सुमेधा, छान आहे कथा. हक्क हा कायद्यानेच असावा असं नाही. मर मर काम केल्यावर पगारवाढ किंवा बोनस हा हक्कच बनतो.
माझ्याही कंपनीत नोकरीच्या करावर बोनस आणि पगारवाढीचे नियम दिलेले आहेत. हे कायदेशीर झालं. पण आधीच्या कंपनीत कायदेशीर नसूनही, आम्हाला तो आमचा "नैतिक" हक्कच वाटला.
असो... कथा चांगली फुलवलीयेस.

सुमेधा आवडली कथा.

सर्वांचे मनापासुन आभार!
गैरसमज नाही हो शरदजी, मला समजलंच नव्हतं, म्हणुन विचारलं Happy क.लो.अ

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

यार, उगाच टेन्शन वाढवलंस अजुन. आमच्या कंपनीत असलं काही लेखी वगैरे दिलेलं नाही. Sad
अर्थात माझ्या कंपनीत आमच्या प्रॉडक्टची टेक्निकल डिटेल्स इन्डिटेल माहीती असणारा मी एकटाच आहे.
खरेतर ओमनीस्टारचा भारतात मी एकटाच एम्प्लॉयी आहे आज. त्यामुळे मला फारसा धोका नाही.
अप्रेझल ? ....छे , आमच्याकडे असल्या काही पद्धती नाहीत बरका ! कंपनीच्या मनात आलं तर मोरया नाहीतर ...पुढच्या वर्षी लवकर या !! Biggrin

छान लिहीलेयस. मनातली तगमग सार्थपणे उतरलीय.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

आभारी आहे इट्स्मी Happy

विशाल Lol

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

अप्रेझल नाही म्हणून आत्महत्येचा विचार? आणि सगळं घर ज्यावर अवलंबून आहे तो बहिणीचं लग्न केवळ इन्क्रिमेंटच्या भरवशावर ठेवतो? त्या दोन तीन महिन्यांच्या अ‍ॅरियर्स वरच सगळं अवलंबून ये बात कुछ हाजम नही हुई. असो. विषय नवीन आहे. आणि ज्वलंत आहे हे मान्य. Happy

कंपनीच्या मनात आलं तर मोरया नाहीतर ...पुढच्या वर्षी लवकर या !! >>>>
विशाल सही आह एहे वाक्य. जाम आवडले मला

कथा आवडली. नकारात्मक विचार साहजिकच आहेत. नोकरी नसणार्‍यांना विचारा त्यांचं काय होतं ते. जाऊ द्या. नका विचारू. उगाच जखमेवर मीठ.
...................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

सुमेधा, छान लिहिलयस गं

वास्तवाच्या खुप जवळ जाणारी कथा आहे. सुमेधा सुरेख मांडलय.

पुन्हा एकदा सर्वांचे आभार!! आशा करुया की या वर्षी सर्वांचं अप्रेझल अगदीच मनासारखं नसलं तरी थोड्या फार प्रमाणात चांगलं व्हावं Happy
*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

सध्याच्या परिस्थितिनुसार्,सर्वांच्या होणार्‍या घालमेलीच अचुक वर्णन्.अत्यन्त समर्पक कथा.खुप छान flow.मनापासन आवडली.

------------------------------
जीवन सोहळा जणु !!!!!
www.gulmohar.wordpress.com

सुमेधा, छान लिहीली आहेस कथा. आवडली.

सुमेधा,

कथानक छान आहे पण (हा पण एवढ्याचसाठी आहे की मी पी.जी. करायच्या आधी एका प्रख्यात आय.टी. कं. मनुष्यबळ विकास खात्यात कामाला होतो मी अप्रायजल वर काम केलेल आहे म्हणून - म्हणतो की >>> काही कंपनीज च्या पोलिसीज पण आहेत ज्यानुसार दरवर्षी प्रत्येक एम्प्लोयी अप्रेझलला पात्र असतो>>> अस असल तरी त्याचा अर्थ हा ही होतो की तुमच्या कामाचा आढावा घेऊन तुम्हाला पगारवाढ, बढती मिळेल (किंवा नाही!) व ती नक्कीच कं. च्या आर्थिक कामगिरीवर अवलंबून असते. सो अप्रेझलला पात्र >> ह्या चा अर्थ पगारवाढ व बढती असा सरसकट होत नाही!

बादवे, लकी आहेस तुझ्याकडे जॉब आहे! (मेरे पास तो (अभी)वो भी नहीं )

थोड्या फार प्रमाणात चांगलं व्हावं >> हो होईल साधारण दुसर्‍या त्रैमासिक उला ढालींचा निकाल लागल्यावर!

Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!! Wink

छान लिहिलंत.... वाचताना वाटलं... माझीच कथा सांगताय...

विष्णु.... एक जास्वंद!
*******************************************
माणसांच्या मध्यरात्रि हिंडणारा सूर्य मी... माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा...

छान लिहिलय! Happy ओघवत, टर्निन्ग पॉईण्ट घेऊनही सुखान्त शेवट! Happy
पहिले दोन तीन पॅरे वाचताना ही कथा एका स्त्री ची आहे असे भासत होते
नन्तरच्या वर्णनावरून कथानायक पुरुष आहे हे कळले
मात्र लेखिका स्त्री आहे हे पहिल्या दोन तीन पॅर्‍यात जाणवत राहिले तरीही लेखन करणारी आयडी बघता अन्दाज येत नव्हता, शेवटी प्रोफाईल बघुन खात्री केली! Happy
चान्गलाच प्रयत्न! Happy
बोम्बलायला आमचेही फॉर्म्स भरुन घेतलेत! Happy गेल्या वर्षापासून मी ढीगभर लिहून देण्या ऐवजी एक किन्वा दोन पानात सम्पवतो! परिणामस्वरुप, गेल्या सहामाहीला मला व्हीआय शून्य मिळाला! आख्ख्या फॅक्टरीतील एकमेव केस! कारणे अनेक! पण सगळ्याला मीच जबाबदार नसून, "माझ नशिब" जबाबदार!
आता या वेळेस बघू! Happy घोडामैदान लाम्ब नाही! तर या सगळ्याची ज्वलन्त बोचरी आठवण या गोष्टीमुळे झाली! Happy
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

सन्घमित्रा, अग तसच कराव लागत ग बाई! Happy
मी त्याही पुढे जाऊन, सन्ध्याकाळी घरी गेल्यावर आमच्या इथल्या चौकात वडापावची हातगाडी लावावी का सन्ध्याकाळी याचा गाम्बिर्याने विचार करत होतो! Happy अगदीच ते जमल नाही तर इकडच्या कोणत्याही देशी गुत्त्याबाहेर उभारुन शेन्गदाणे/चणेफुटाणे, उकडलेली अन्डी अस काही पण विकता येत! Proud
बाईग, परिस्थितीपुढे "शहाणपण" चालत नाही!
मागे एकदा, माझ्या मुलाचा पाय शाळेत खेळताना मोडला! मोडला म्हणजे शब्दशः दोन तुकडे झाले मान्डीच्या हाडाचे, कमरेपासच्या जोडा खाली दोन इन्चावर!
त्याला दवाखान्यात वगैरे नेले होते शाळेने, पण इकडे कम्पनीत माझी बोम्ब झालेली, पैसा नको उपचाराला? अशा कामास आयओयू मिळत नाही! तेव्हा सॅलरी अ‍ॅडव्हान्स मागितला, त्याचा अर्ज, सॅन्क्शन वगैरे माझ्या कलिगने केले व सन्ध्याकाळी मला दवाखान्यात पाच हजार रुपये आणून दिले
पण हे करताना, माझ्या त्यावेळच्या एका गर्भश्रीमन्त घरातून आलेल्या यन्ग सीएस बॉसने कलिगला विचारलेच, काय रे? इतकी वर्शे नोकरी करतो हा, याच्याकडे पाच हजाराची सोय नाही? अ‍ॅडव्हान्स घ्यावा लागावा????
यावर माझा कलिग काय बोलणार कप्पाळ!
अत्यन्त सुरक्षित वातावरणात वाढलेल्यान्ना, हातावरती पोट असलेल्या आम्हा "मध्यमवर्गियान्ची" दु:खे काय कळणार? अन आम्हिही, अशा परिस्थितीन्चे वर्णन करुन सहानुभूतीची भीक मागणारे साहित्य कधी लिहीले नसल्याले, कोणिही उठून, मध्यमवर्गीय ते गान्डूळासारखे जगणारे असे अकलेचे तारे तोडण्यास मोकळे अस्तात........ असो!
तर सान्गायचा मुद्दा काय, की कथानायक, इन्क्रिमेण्ट वर आधारीत जी गणित ठरवतोय, ती तशी प्रत्य्क्षात अस्तात, त्यात विशेष असे काही मला तरी वाटले नाही!
आमच्या जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे!
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

सर्वाचे आभार!!

धन्यवाद लिंबु Happy
अत्यन्त सुरक्षित वातावरणात वाढलेल्यान्ना, हातावरती पोट असलेल्या आम्हा "मध्यमवर्गियान्ची" दु:खे काय कळणार? >>>> १००% टक्के पटलं
तुम्ही जे काय लिहीलंय ते माझी आई सतत मला सांगत असते, पण ही कथा लिहीताना मी अगदी तेवढा विचार नाही केला, हे कन्फेस करते.
आमचे अप्रेझल नंतरचे बेत म्हणजे एवढे नवीन ड्रेस घ्यायचे, एखाद्या मोठ्या दुकानात बरेच दिवस आधी पाहीलेली एखादी पर्स घ्यायची वगरे वगरे इथपर्यंत सध्यातरी Happy
मंडळी सगळ्यांना अप्रेझलसाठी शु्भेच्छा, नक्की कळवा किती झाले (की नाही ?) Happy

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

मन्दिच्या दिवसत एक धन्द चलविन खूप अवघद अस्ते . पैशचे सोन्ग मालकल पन आन्त येत नाहि. क्क्रिपया मालकचि बाजु पन सम्जून घ्यावि.

छान आहे कथा......... Happy
"मन चिंती ते वैरी न चिंती " हेच खरं

ह्यावर शेवट अतिशय मार्मिक आहे.,... Happy
......................................................
निवडणुकीव्यतिरिक्त माझे मत फारसे कुणी विचारात घेत नाही... Wink

मंडळी, हवा तेवढा जीव टांगणीला लावुन बोनस आणी अप्रेझल डीक्लेर केलाय आमच्या कंपनीत. फुल नाही फुलाची पाखळी म्हणुन ६ % वाढ झाली पगारात. चला....या मंदीत हेही नसे थोडके...:)
बाकी कोणा कोणाचं अप्रेझल झालंय? नक्की कळवा.

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************