मोठ्या उत्साहाने डॉ. विजय वॉर्डात शिरले. हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा वॉर्ड . सकाळी ८ वाजता इथूनच त्यांच्या राऊंडसना सुरुवात व्हायची. बरेच वेळा ते दिवसरात्र ह्या वॉर्डात रमले होते . आजही आत शिरताना मोठ्या अभिमानाने त्यांनी वॉर्डच्या दारावरची पाटी वाचली . " गुलमोहोर" आणि त्यांना स्वतःच्या कल्पकतेचे कौतुक वाटले. नेहेमीप्रमाणे काही जण लवकर उठून खेळ मांडून बसले होते. डॉक्टरांकडे त्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही. कसनुसं प्रसन्न हसत डॉ. नी इंटरेस्ट घेतला.
अरे वा काय खेळताय ?
"आज (?) आम्ही कविता कविता खेळतोय " त्यातल्या त्यात भानावर असलेला एक जण म्हणाला .
डॉ. ना आजही कुतुहल वाटले.
"हो का? हा कसला खेळ बुवा? आम्हाला नाही का सांगणार?"
"सांगतो की सांगतो की" म्हणत एक निरागस बीचारा खेळातून बाजूला झाला.
"तुमाला मायताय का काका , या खेळात कितीही जण असू शकतात. एकमेकांची विचारपूस करण्याइतकं प्रेम ज्यांच्यात आहे ते सग्ग्गळे. मग किनै एक जण कविता करतो आणि बाकीचे छान छान म्हणतात"
"अरेच्चा ! हा काय खेळ झाला? एकावरच सतत राज्य?"
"नाय ओ ! आधी तुम्ही हे लक्षात घ्या की ह्या खेळात छान म्हणणा-यावर राज्य असतं. आणि मिळतो की सगळ्यांना चान्स . एकाची लिहून आणि छान म्हणून झाली की लगेच दुसरा करतो"
"अच्छा अस आहे होय . पण तरी काही पटलं नाही बुवा. असं लिहायचं , छान म्हणायचं ह्यात कशी मज्जा येणार"
"अहो ऐका तरी सगळे नियम. म्हणजे समजा ही .. ही जी आहे ना बसलेली , ही फक्त छान म्हणते. आम्ही तशीच ट्रेन केलिये तिला. अर्थात अजून टायमिंग चा घोळ आहे. काल कविता लिहायच्या आधीच छान म्हणाली पण शिकेल हळू हळू. आणि ही जी दुसरी आहे ना , देवकी खंडित , ती छान म्हणते, पण "पण" पण म्हणते. शंभर टक्के कुठल्याही गोष्टीला छान म्हणायचं नाही असा तिचा दंडक आहे. तो जो तिकडे आहे ना तो जरा चालू आहे. तो दुस-याच्या कवितेवर आपली कविता मारून झब्बू देतो . अर्थात त्या आधी डोळ्यांनी विचारपूस झालेली असते त्यामुळे हुकूमवाला नाराज होत नाही. "
डॉ. चा कंठ एकदम दाटून आला. "किती सांभाळून घेता एकमेकाला"
"धन्स".
"आणि हे कोण आहेत ? एकदम सुममधे दिसताय्त हे , "तुमच्यात असून तुमच्यात नाही" टाईप्स"
"लाईन छान आहे .आम्ही घेऊ शकतो तुम्हाला खेळात " असे म्हणत बीचा-याने ओळख करून देणे पुढे सुरू केले." हे आमच्या ग्रुप चे गुरू कामदेव. निरनिराळ्या प्राणिमात्रांना ऑकवर्ड आसनांत टिपून त्याचे काव्यात्म वर्णन करून अध्यात्म गाठणारे कवी म्हणून ज्ञात आहेत हे "
"म्हणजे काय?" डॉ. ना हे वाक्य मायबोलीत असूनही झेपले नाही.
"च!" बीचा-याने आपल्या निरागस उजव्या नाकपुडीवर तर्जनी मारत व्याकूळ नजरेने डॉ. कडे पाहिले.
"पवित्र गाय ! " डॉ.नी मायबोलीतच बसलेला धक्का व्यक्त केला." पण हे असं , असं बाकीच्यांना चालतं? "
"चालायचं काय? खेळाचा भाग आहे तो ही . इथे आम्ही उगाच नाही ती बंधनं घालत नाही. प्रत्येकाला कलेचं अंग असतंच आणि त्याला ब आणि क दर्जाची बाजू असतेच त्यांचाच इथे सर्वांगीण विकास होईल हे ह्या वॉर्डाचे ध्येयवाक्य तुम्हीच पाठ करवून घेतलेत ना?"
"हो हो ! म्हणजे काय मी तर तुमची परीक्षा घेत होतो " म्हणून डॉ. उगाच जोरजोरात हसले. कुणी बघणार नाही असं त्यांना वाटलं होतं पण त्यांनी नेमलेल्या वॉर्डाच्या चोवीस ताशी निरीक्षकाने ह्याचाही बॅकअप घेतलाच. डॉ. नी वचपा म्हणून बीचा-याला अर्धवट ठेवत कामदेवबाबांकडे मोर्चा वळवला.
"कसं वाटतंय इथे बाबा?"
"मी इथे नाही , इथे असतो " म्हणत बाबांनी आपला खरा पत्ता पुढे केला.
डॉ. ना क्षणभर हे कुठलं व्हीपीएन आसन कळेना. असेल काहीतरी म्हणून त्यांनी आत्मीयतेने पुढे चौकशी सुरू केली.
"कधीपासून होतं तुम्हाला असं? बाकी काय काय तक्रारी आहेत? म्हणजे तुमचं वाचून इतरांची भूक मरते का? झोप उडते का?"
"वाचकजातीच्या हाव-या
पोटात भुकेचा डोंब
नेटाने ब्रॉडबॅंडकरवी
उदरात कवीता कोंब" बाबा वदले
"छान" :- आली .ही नक्की तीच.
"कविता छान आहे मात्र ब्रॉडबॅंडच्या जागी डायल अप वापरलं तर मात्रात बसेल" :- आली. खंडित.
"मस्त पण इतकी काही खास नाही , असं आपलं मला वाटतं " आला.३ नं.
"किती खाल , किती खाल
रोज उठते पंगत
ढेकरीच्या नावाने बोंब " - खण्णकन झब्बू आला.
डॉ. नी कळवळून बोंब ठोकली. गजनी ने डोक्यात जॅक मारल्यागत भण्ण अवस्था आली त्यांना. पण कालच्याच लॉंग वीकएंड ला कटिंग करून घेतलेली असल्याने पुन्हा हा खर्च ह्या देशात , निदान ह्या काळात तरी परवडणार नाही म्हणून त्यांनी घाव हसून सोसला. अचानक त्यांचे लक्ष जरासे लांब बसलेल्याकडे गेले. पान पानभर काहीतरी खरडत असावा. डॉ. नी जवळ जाऊन चौकशी केली.
"तुम्ही ह्या खेळात नाही का?"
" आहे की , कोण नाही म्हणतो ?ऑं ?"
" नाही तसं नाही. रागावू नकात. पण हे काय करताय तुम्ही?"
"काय म्हणजे? बाबांच्या आत्ताच्या कवनावर विवेचन आहे हे"
"माझा देव ! " डॉं पुन्हा थक्क झाले. " हे एवढं? अहो ती कवीता केवढी , हे विवेचन केवढं? २५ पैश्याच्या पतंगाला ५ मीटर शेपटीसारखं झालं हे तर"
" मग तेच बघतोय ना मी? मीटरच तपासलं" म्हणून गुरकावत त्याने विवेचन चौकात टाकलं पण.
"छान" :- आली . तीच ती.
" ह्म्म्म्म , आता जरा कळल्यागत वाटतीय" :- हा नवाच.
" हे छान आणि ते पण छान " :- अजून एक काठावरची
" हे ठीके पण ते पण ठीके " :- कन्फ़्यूज्ड कविता आणि प्रतिक्रियांचा ठेका असलेली एक.
इतक्यात डॉ.च्या कानावर शेजारून जोरदार हसण्याचा आवाज आला. ७-८ जण मिळून गड सर केल्याच्या आनंदात हसत होते. "नमस्कार, काय म्हणताय आज सगळे?" इति डॉ.
"कविता म्हणतो आहोत" ४-५ हिरवे चेहरे
"अरे वा , इकडेही तेच का? "
"नाही नाही. तिकडच्याच आहेत , इकडच्या स्वारीला ऐकवतेय फक्त "
"छान छान पण मग हसताय का इतके? कळू द्या आम्हालाही"
" अहो तुम्ही तिकडूनच आलात ना? तुम्हाला हसू आलं नाही , काय कविता !"
"ओह असं आहे होय. मग तुम्ही त्यांना जाऊन सांगत का नाही तुमचं मत?"
"मग आमचा टाईमपास कसा होणार?" एक हिरवा चेहरा
"का गं म्हणजे आम्ही बोअर करतो का? " एक पिवळा + डोळे मिटलेला + एक उदास हिरवा चेहरा
"आणि काय उपयोग? म्हणजे उपयोग काय? नाही म्हणजे काय उपयोग?" -लाल चेहरा
डॉ. ना ह्याच चेह-यसमोर आरसा धरायला हवा हे लक्षात आलं.
" अहो मला एक सांगा , तुम्हाला आवडत नाहीत का?"
"नाही !"
"सगळ्या?"
"नाही !"
"मग?"
"काही!"
"मग निदान उरलेल्यांना जाऊन चांगलं म्हणता का?" डॉ.नी आरसा काढला
"......" चेहरा निळा जांभळा होत होत पिवळा झाला. "नाही"
"व्हेरी गुड. उद्यापासून दिवसातून तीन वेळा चांगल्याला चांगलं म्हणत चला. फरक पडेल " म्हणून डॉ. पुढे निघाले (आणि मागून पुन्हा जोरदार हसण्याचा आवाज आला)
...... क्रमशः ......
छान !!!
छान !!!
ह्याचं
ह्याचं विवेचन करण्याचं कोण मनावर घेणार? :p
छानच
मेट्र्न,
मेट्र्न, व्वा!. आवडलं.
विनोदाच्या शैलीवरुन लेखक ओळखीचा वाटतोय.
त्या विन्चूकर तात्यांनी तर नाहीना पेटवंल तुम्हाला?
मस्तच....!!!
मस्तच....!!! मार्मिक.. पुढे येऊ द्यात!
मस्त
मस्त
धन्यवाद.
धन्यवाद.
अरे काय
अरे काय चाल्लयं काय? इकडे माझ नाव, तिकडे पार्ल्यात माझ नावं. छे भगवान कृष्णाच नाव घेतल अस्त तर जिवन नैय्या पार नस्ती का लागली?
अहो लालू, आधिच धन्यवाद का देता, पुढचा भाग लिहा. बर झाल तुम्ही स्फोटाची खोटी जबाबदारी घेतली ते.
जबाबदारी
जबाबदारी कसली?? अहो तात्या, हे छान लिहिलंय, करमणूक झाली वाचून म्हणून त्या मेट्रन ना धन्यवाद दिले हो! आणि जबाबदारी घेतली असती तरी 'खोटी' हे तुम्हाला काय माहित?
(No subject)
(No subject)
छान
-----------------------------------------
सह्हीच !
अरे वा
अरे वा वा...क्या बात है !
(अशी दाद (व्यक्ती नव्हे) राहिली) :p
**** तुम्ही
****
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे.
मस्त....
मस्त....
जबरी
जबरी लिहिलंय
-----------------------------------
शेवटी साथ नशीबाचीच!
होळी
होळी पेटवायचे दिवस जवळ आले.....
लालू
(No subject)
सहीच! --------------
----------------------
एवढंच ना!
एक लंबर..
एक लंबर.. लिव्हलंय मेट्रन..
मंजू
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...
मेट्रन
मेट्रन महाशय..... मायबोली जॉईन करुन फक्त दिड तासात हा लेख लिहीलात...धन्य !!!
टिंगलटवाळी करायची एवढी हौस आहे...तर मुखवटा घालुन (डुप्लिकेट आय डी घेऊन)यायची गरज का पडली ते कळाले नाही !
बाकी तुमची प्रतिभाशक्ती जोरात आहे...अजुन लिहायला शुभेच्छा !
मेट्रन लै
मेट्रन लै भारी.. बाकी तुम्ही ओळखीचेच दिसताय..
आकडा लावणार का कोण 'मेट्रन कोण?' मटक्यावर
मस्तच
मस्तच

अगदी नविन ष्टाईल मध्ये कुजबूज
------------------------
देवा तुझे किती सुंदर आभाळ
खी खी...
मेट्रन
मेट्रन महाशय? मेट्रन बाई असतात सामान्यतः! हेरगिरीतज्ञ आहे का कुणी?
अरे
अरे कवितावालों(वालियों), जाग जाओ. आपल्या लेखनस्वातंत्र्यावर हल्ला सुरू झाला आहे. आणि तुम्ही गप्प बसला आहात? अरे उठा! आपल्या लेखण्या घ्या आणि लिहायला लागा:
"एक लेखणी द्या मज आणुन
लिहीन कविता स्व-शाईने
किती जाहले अत्याचारी
फाडुन टाकू सारी पाने...
शरद
झब्बू आला.
झब्बू आला.
(No subject)
झब्बू
झब्बू अजुन एकेरीच आहे
झब्बू आला >>
झब्बू आला >>
Pages