'काकाक'डे

Submitted by लाजो on 17 July, 2011 - 23:29

Happy

बेत काय करावा यावर
विचार करणारी मी
आज 'काकाक'डे जेवायला जाऊ
असे हळुच सुचवणारा तु..

गुलमोहोर गल्लीतल्या त्या
५व्या वाड्यातल्या 'काकाक'डे
भाकरी अन पोळी कशी लुसलुशीत असते..

लोणचे, मुरंबा आणि चटणी डावी कडे
खमंग फोडणीची कोशिंबीर, पापड अनलिमीटेड...
चविष्ट भाजी अन वाफाळते वरण
वाटीत कधी असते गोड गोड शिकरण...

आपुलकीने सगळे आग्रह करतात
आणि पोटभर जेवल्यावर फक्कड विडाही देतात...

अहो... ऊठा... पान वाढलंय...

आज तुम्ही नुसता कढी-भातच खा..
'काकाक'डे उद्या पंचपक्वान्नांचा बेत आहे म्हणे
फोन करुन सांगितलय आमच्यासाठी जागा राखा... Proud

.....................................................

भारी ! ए मी पण येणार संध्याकाळी 'काकाक'डे ; मला कंटाळा आलाय स्वयंपाकाचा Proud

हं गुलमोहोराच्या दुसर्‍या फ्लॅट मधे गेल्या पेक्षा काका कडे जाण खुपच सोप आहे. लिप्ट ही २ र्‍या मजल्याचे वरचेच जास्त वापरतात ना.
मस्त !

[ 'काकाक' फक्त 'प्युअर व्हेज' थाळीच देतो हें मात्र कांहीसं खटकलं. ] >> आता बाकी 'नॉन व्हेज' पदार्थाना जागा कुठे आहे ताटात (सॉरी, पानात..) Happy