भाकरी, भाजी, वरण-भात

Submitted by वर्षा_म on 13 July, 2011 - 01:10

भाकरी

शहरातल्या पोळीसारखी
लुससुशीत नसेल मी
गावाकडची चुलीवरच्या
भाकरीसारखी नक्कीच आहे

अलगद पापुद्रा काढुन बघ
दिसेल तुला मउ मन!

*********************************

भाजी

मान्य आहे लग्नाच्यावेळी
शेवग्याची शेंग असलेली मी
आता जराशी सुटलेय

मला दुधी भोपळा म्हणताना
जरा आरश्यात पाहिलेस
तर तुलाही ढेरीचा
Pumpkin झालेला दिसेल!

*********************************

वरण-भात

कधीतरी लग्नाकार्याला
मेकअप छान वाटतो

रोजरोज बिर्यानी-पुलावापेक्षा
साधा सात्विक वरण-भातच आवडतो!

वर्षा, तुम्ही लोक इतक्या सुंदर कविता लिहिता, मला इथे आवडलेल्या कवितेला छान छान प्रतिसाद लिहिताना पण दम लागतो. शब्द सापडत नाहीत गं तुमच्यासारखे हाताला. मस्त, एकदम छान, जबरी... एवढीच माझी मजल.

जास्तच आवडली तुझी कविता म्हणुन जरा विचार करकरुन भरभरुन लिहिलं तर त्या द्रुपालने ( मी तर द्वारपाल म्हणते, नेमकीच दारं बंद करुन घेतात माबोची) घोळ की गं केला.

तर एकुणात काय - तुझी कविता मस्त, एकदम छान, जबरी... Happy

माझ्या नवर्‍याला नाही म्हणु शकत मी भोपळा, पण मैत्रिणींना ऐकवेन तुझी कविता. चालु कुठेचे ( नवरे)! स्वतःला आरशात बघतच नाहीत वाटतं.

वरण भात पण जबरी आवडला.

वरण भात Rocks! >> अरेरे... निवडायचे राहिले वाटते तांदुळ.. तरीच तुला खडा ( Rock ) लागला Proud

धन्यवाद Happy

वर्षामाय.... Happy तुमच्या कल्पनाशक्तीला कितीही दाद दिली तरी ती कमीच.... एकाच वाढणीत किती चवदार पदार्थ आणता तुम्ही! म...हा...न... आहात!!!! Happy

भाकरीचा पापुद्रा आणि pumpkin Biggrin अतिशयच झक्कास जमलेय!! Happy

वर्षा, तुम्ही लोक इतक्या सुंदर कविता लिहिता, मला इथे आवडलेल्या कवितेला छान छान प्रतिसाद लिहिताना पण दम लागतो. शब्द सापडत नाहीत गं तुमच्यासारखे हाताला. मस्त, एकदम छान, जबरी... एवढीच माझी मजल >> अनुमोदन... Happy मलातरं.. अगदीचं शब्द सापडत नाहित..