विंडोज लॅपटॉप वर लिनक्स वापरायचे आहे

Submitted by रंगासेठ on 5 July, 2011 - 00:39

नमस्कार, माझ्याकडे विंडोज ७ असलेला लॅपटॉप आहे. मला त्यावर लिनक्स टाकयचे आहे. तर त्यासाठी मदत हवी आहे. माझा उद्देश लिनक्स वापरुन स्क्रिप्टिंग करण्याचा आहे तसेच प्रोग्रॅमिंग पण.

१) विंडोज आणि लिनक्स (रेडहॅट) एकत्र सुखाने नांदू शकतात काय?
२) विंडोज अनइन्स्टॉल करुनच लिनक्स टाकावे लागेल काय?
३) माझ्याकडे external Harddisk आहे, त्यावर लिनक्स टाकून लॅपी बूट करताना लिनक्स / विंडोज असे पर्याय दिसू शकतील?
४) याच लिनक्स वर मला पर्ल पण install करायचे आहे तर तेही शक्य आहे?
५) रेडहॅट चांगले की उबंटू?
६) मला System Administration चा सराव करायचा आहे, तो हेतू साध्य करणे कितपत शक्य आहे?
७) महत्वाचे : लिनक्स इंस्टॉल कसे करायचे, मला काहीच कल्पना नाही. Sad

आणखी काही तुमच्याकडून सूचना असतील तर अवश्या द्या. धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. होय. Dual Boot करु शकता किंवा virtual machine करुन
२. नाही.
३. नाही
४. माहीत नाही
५. दोन्ही. उबुंटु सोपे आहे.
६. ---
७. नेट वर भरपूर माहिती आहे.

फक्त तुमच्या लॅपटॉप मॉडेल चे लिनक्स साठीचे ड्रायवर्स शोधुन ठेवा.

१) हो
२) विंडोज अन इन्स्टॉल करुन मग हार्डडिस्क पार्टीशन करुन दोन ओएस टाकता येतील. किंवा
३) एस्क्ट हार्डडीस्क वर सुद्धा इन्स्टॉल करता येते (असे ऐकले आहे) पण बायोस मधे चेंज करुन बुटेबल डिव्हाइस सिलेक्ट करावे लागेल.
४) हो लिनक्स वर पर्ल टाकता येईल ( फक्त पर्ल स्क्रिप्टींग शिकायचे आहे म्हणुन लिनक्स इन्स्टॉल करताय का?, तसे असेल तर विंडोज वर पण पर्ल चालतं . )
५) माहित नाही. पण तुम्हाला नुसते शिकायचे असेल तर कुठलेही असेल तरी चालेल, खुप फरक पडणार नाही.
६) अर्थातच शक्य आहे लिनक्स इन्स्टॉल करुन त्यात वेगवेगळे सर्व्हर टाकणे , युझर मॅनेज करणे शक्य आहे. लिनक्स सिस्टीम मधे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी फाईल स्ट्रक्चर, युजर परमिशन्स आणि मॅनुअल वाचुन फॉलो करता येणे. या गोष्टी आल्यातर मला वाटत सगळं सोप्प आहे.
७) हे माहित नाही. पण याच्या इन्स्ट्रक्शन नेट वर सहज मिळतील.

धन्यवाद. पाहतो प्रयत्न करुन. Happy उबंटू वर प्रोग्रॅमिंग / स्क्रिप्टिंग करता येईल काय?
मला पर्ल प्रोग्रॅमिंग पण करायचेय, ते विंडो बेस्ड पर्ल पण पाहतो.

ऊबूंतू (खरा आफ्रिकन शब्द असाच आहे! Happy ) टाका, सोपं आहे ते इन्स्टॉल करण्यास सुद्धा.
लिनक्स मध्ये सगळं करता येईल, फक्त आवश्यक पॅकेजेस इनस्टॉल करावे लागतील.
बाकी भ्रमर आणि सावली यांनी सांगितलंच आहे.
काही प्रॉब्लेम आला तर इथे शोधा, सर्व काही सापडेल.
http://ubuntuforums.org/

२ व ५ वगळता सगळ्याची उत्तरे होकारार्थी आहेत. २ ची आवश्यकता नाहि, partition किंवा external boot करून वापरता येईल. नेटवर ह्याबद्दल भरपूर माहिती आहे. ५ चे उत्तर तुम्हाला नक्की काय करायचे आहे ह्यावर आहे. घरगुती trial and error असेल तर ubuntu बघा. आवश्यक packages टाकावे लागतील. परत forums वर भरपूर माहिती मिळते.

डूअल बूट अजिबात करू नका. एकदा ते केलं, की काढता येत नाही. त्यापेक्षा हे करा (मेमरी चांगली भरपूर पाहिजे ४ GB )

- http://www.virtualbox.org/ ला जा व VIRTUAL BOX घ्या. फुकट आहे. खरेदी करण्याची पण प्रणाली मिळते (उदा. VMWARE )
- VIRTUAL BOX टाका आणी नवीन VIRTUAL MACHINE बनवा.
- तुमच्या LINUX च्या INSTALLATION DISK वापरून INSTALL करा.
- पुढे कधीही LINUX चालवायच्या वेळी, WINDOWS ला जायचं. VIRTUAL BOX सुरु करायचा, आणि तिथून LINUX चं VIRTUAL MACHINE सुरु करायचा.
- काही गडबड झालीच तर तो VIRTUAL MACHINE उडवून नवीन करायचा.
- किवा VIRTUAL MACHINE कोपी करून पण ठेवता येत, की जे नंतर पुन्हा वापरता येत कोपी बनवून.

रंगासेठ,
लिनक्स मध्ये सगळं करता येतं..
तरी आपण हा प्रश्न दोनदा विचारलाय, म्हणून विचारतो नक्की कसलं प्रोग्रॅमिंग्/स्क्रिप्टिंग करायचं आहे तुम्हाला?

माझा गोंधळ उडाला , मला लिनक्स म्हणजे रेडहॅटच असं वाटलं. Sad
मला स्क्रिप्टींग म्हणजे साधे हॅलो वर्ल्ड सारख्या प्रोग्रॅमपासून काँप्लेक्ग्स स्क्रिप्ट्स जसे की सर्वर वरील डेटा GUI मध्ये दाखवणे आणि तो नियमितपणे अपडेट करणे इ.

ऑफिस मधे सगळे सर्वर्स क्लायंट मशिन वर आहेत, त्यामुळे विशेष किडे करता येत नाही आणि आम्च r&D सर्वर यायला अजून अवकाश आहे. आम्ही काही मॅन्युअल टास्कचे ऑटेमेशन करण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी स्क्रिप्ट्स लिहितोय. त्यामुळे घरात शक्य असेल तर लिनक्स सोबत सर्वर्स आणि डेटाबेस ची जुळणा करायचे चालले आहे.

हे सगळं लिनक्स मध्ये शक्य आहे.
रेडहॅट हे एक Distribution आहे, इतर ही बरेच आहेत, जसं की - Ubuntu, Debian, Gentoo, Mandrake, Suse, etc. etc.

माझा उद्देश लिनक्स वापरुन स्क्रिप्टिंग करण्याचा आहे तसेच प्रोग्रॅमिंग पण. >> मायक्रोसॉफ्ट वगैरेंचे पेटेंटेड प्रोग्रामिंग प्लॅट्फोर्म सोडले तर इतर सर्व प्रोग्रामिंग प्लॅटफोर्‍मला लिनक्स मधे नेटिव सपोर्ट असतो.

१) विंडोज आणि लिनक्स (रेडहॅट) एकत्र सुखाने नांदू शकतात काय?
हो. पण विंडोज चा प्रोब्लेम असा आहे की लिनक्स टाकताना विंडोजच एमबीआर ओव्हरराईट होतो त्यामुळे जर भविष्यात तुम्हाला लिनक्स काढुन टाकायचे असेल तर विंडोज रिईन्स्टॉल करावे लागेल. बाकी काही प्रोब्लेम नाही.
२) विंडोज अनइन्स्टॉल करुनच लिनक्स टाकावे लागेल काय?
नाही
३) माझ्याकडे external Harddisk आहे, त्यावर लिनक्स टाकून लॅपी बूट करताना लिनक्स / विंडोज असे पर्याय दिसू शकतील?
बायडिफॉल्ट दिसणार नाहीत. मॅनुअलि एड करावे लागेल.
४) याच लिनक्स वर मला पर्ल पण install करायचे आहे तर तेही शक्य आहे?
मुळात पर्ल ही ओपन सोस्र प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. लिनक्स मधे तिला खुप चांगला सपोर्टा आहे.
५) रेडहॅट चांगले की उबंटू?
मिलियन डॉलर क्वेश्चन. दोन्ही लाइव सीडी मधे ट्राय करून बघा. जे चांगले वाटेल ते वापरा.
६) मला System Administration चा सराव करायचा आहे, तो हेतू साध्य करणे कितपत शक्य आहे?
१००% शक्य आहे. सुरुवातीच्या काळात लिनक्स मुळातच सर्वर ओएस म्हणुनच वापरात होती. डेस्क्टॉप व्हर्जन नंतर निघाले.
७) महत्वाचे : लिनक्स इंस्टॉल कसे करायचे, मला काहीच कल्पना नाही.
यासाठी प्रोपर वेबसाइट वरचे डॉकुमेंटेशनच वाचा. नेटवर भरपुर गाइड्स आहेत.
व्यवस्थीत काळजी न घेतल्यास लिनक्स इन्स्टॉल करनाता तुमची विंडोज आणि डेट पुर्ण डिलिट होउ शकतो.
काही उपयोगी वेबसाईट
http://askubuntu.com/
http://www.ubuntu.com/support
http://www.linux.com/

अवांतर -
फ्रि सॉफ्टवेयर म्हणजे काय?
http://www.fsf.org/
प्रोपायटरी सोफ्टवेयर का वापरु नये?
http://en.windows7sins.org/

१) हो
२) विंडोज अन इन्स्टॉल करुन मग हार्डडिस्क पार्टीशन करुन दोन ओएस टाकता येतील. किंवा
३) एस्क्ट हार्डडीस्क वर सुद्धा इन्स्टॉल करता येते (असे ऐकले आहे) पण बायोस मधे चेंज करुन बुटेबल डिव्हाइस सिलेक्ट करावे लागेल.
४) हो लिनक्स वर पर्ल टाकता येईल ( फक्त पर्ल स्क्रिप्टींग शिकायचे आहे म्हणुन लिनक्स इन्स्टॉल करताय का?, तसे असेल तर विंडोज वर पण पर्ल चालतं . )

external Harddisk वर लिनक्स ईन्स्टॉल होते की माहित नाही पण विंडोज ७ नक्की होते, मी केलय Happy आणि बुट मध्ये जर external Harddisk म्हणजे युएसबीबुट दाखवलं (शक्यतो असं होत नाही) नाहीच तर Plop Boot Manager ह्या सॉफ्ट्वेअर मधून बुटेबल सीडी बनवून त्यातून युएस्बी डिवाईस बुट करता येतो.