फक्त श्रीकृष्णाचीच पूजा करावी का?

Submitted by न्यूबिर on 1 June, 2011 - 00:12

मला हिन्दू / सनातन / वैदिक धर्मतील देव-देवतांच्या पूजनाबद्दल काही प्रश्न विचरायचे आहेत. ह्या धर्मातील बहुसंख्य लोक अनेक देव-देवताना मानतात. परंतू काही लोक, जसे इस्कोन चे अनुयायी फक्त श्रीकृष्णालाच मानतात. ते बाकी देव-देवताMना मानत नाहीत किMबहुना त्याण्ची पूजा करणे सुद्धा गैर मानतात. त्यासाठी भगवद-गीते मधील काही श्लोकाMचे दाखले देखिल दिले जातात.

माझ्या सध्याच्या समजुतीप्रमाणे मी स्वत: निर्गुण परमात्मा मानतो, पण त्याची निर्गुण उपासना करणे (मला) अवघड असल्याने मी त्याल अन्य शक्ति अथवा देवताMच्या रुपात पूजितो. ह्या सगुण रुपातील भक्तिच सामान्य माणसाला निर्गुण परमात्म्या-पर्यंत पोचवेल (ह्यासाठी कदचित बरेच जन्म लागुही शकतील ) असे माझे सध्याच्या वाचन / समजुती प्रमाणे मत आहे. पण ह्यासाठी एकाच विशिष्ठ देवाची पूजा करावी असे मला वाटत नाही.

पण आत इस्कोन च्य अनुयायन्ची मते ऐकल्यावर मला कळत नाही ही की नक्की कोण बरोबर??

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सनातनवाले- कुलदैवता

डॉ. अनिरुद्ध बापू ( एम डी मेडिसिन)- विष्णू

एस्कॉन- कृष्ण

दास पंथी- राम, मारुती

गोंदवलेकर - राम

बह्माकुमारी- शिव

साईबाबावाले- साईबाबा

दत्तवाले, नाथपंथी- दत्त

याशिवाय नरेंद्र महाराज, समस्त वारकरी संत, विठोबा, शैव, गणेशप्म्थी, देवीची पूजा करणारे, मूर्तीपूजा नको म्हणनारे आर्य समाजी... अशी अनेक कमी अधिक लोकप्रिय झालेली मंडळी आहेतच. सर्वाना भेटून मग निर्णय घ्या. तुमचं ठरलं की आम्हालाही सांगा..

प्रत्यक्षात देवाला मात्र सगळीच रुपे सारखी . एक शिवालाच भजणारा भक्त होता. त्याने दत्तगुरुंची कवने म्हणायला नकार दिला. त्याला शिवाऐवजी दत्तरुपात दर्शन झाले. गंमत म्हणजे असा प्रसंग सगळ्याच पोथ्यांमध्ये भक्ताचे व देवाचे नाव बदलून येतोच.. Happy उदा. रामदासानाही राम रुपात विठ्ठलाने दर्शन दिले असा प्रस्म्ग आहे. Happy

सनातनवाले- कुलदैवता

डॉ. अनिरुद्ध बापू ( एम डी मेडिसिन)- विष्णू

एस्कॉन- कृष्ण

दास पंथी- राम, मारुती

गोंदवलेकर - राम

बह्माकुमारी- शिव

साईबाबावाले- साईबाबा

दत्तवाले, नाथपंथी- दत्त

याशिवाय नरेंद्र महाराज, समस्त वारकरी संत, विठोबा, शैव, गणेशप्म्थी, देवीची पूजा करणारे, मूर्तीपूजा नको म्हणनारे आर्य समाजी... अशी अनेक कमी अधिक लोकप्रिय झालेली मंडळी आहेतच. सर्वाना भेटून मग निर्णय घ्या. तुमचं ठरलं की आम्हालाही सांगा..

प्रत्यक्षात देवाला मात्र सगळीच रुपे सारखी . एक शिवालाच भजणारा भक्त होता. त्याने दत्तगुरुंची कवने म्हणायला नकार दिला. त्याला शिवाऐवजी दत्तरुपात दर्शन झाले. गंमत म्हणजे असा प्रसंग सगळ्याच पोथ्यांमध्ये भक्ताचे व देवाचे नाव बदलून येतोच.. Happy उदा. रामदासानाही राम रुपात विठ्ठलाने दर्शन दिले असा प्रस्म्ग आहे. Happy

पण आत इस्कोन च्य अनुयायन्ची मते ऐकल्यावर मला कळत नाही ही की नक्की कोण बरोबर

३३ कोटी देव उगीचच निर्माण केलेत काय?? देव ज्याला ज्या रुपात भावला त्याने त्या रुपात त्याला पुजावे. कुठल्याही देवाला केलेला नमस्कार शेवटी केशवालाच पोचतो अशा अर्थाचे एक संस्क्रुत सुभाषित आहे. त्यामुळे मनात किंतु न बाळगता केशवाच्या ३३कोटी रुपांपैकी एका रुपाला निवडा नी करा सुरवात. हाकानाका.

आपल्याकडे पाच प्रमुख देवतांची उपासना करावयास सांगितली आहे. श्री गणेश, शिव, विष्णु, शक्ती व सुर्य. सर्वात महत्वाचे पाचांमध्ये भेद करू नये असेही सांगितले आहे. सर्व एक ब्रम्ह आहे त्यामुळे पाचांपैकी कोणाचीही पण उपासना करावी. त्याबरोबरच इतर देवता ज्या अनुषंगिक कार्यात पुजिल्या जातात, जसे की नवग्रह, वास्तुदेवता, स्थानदेवता वगैरे.

डॉ. अनिरुद्ध बापू ( एम डी मेडिसिन)- विष्णू >>> अर्धसत्य.

उरलेलं अर्धं सत्यही सांगाल तर बरे होईल

डॉ. अनिरुद्ध बापू ( एम डी मेडिसिन)- विष्णू >>> अर्धसत्य.

अश्विनी : असत्य म्हणायचे आहे का?

इस्कॉन ह्यांच्या 'Gita as it is' अशा भगवद-गीतेवरील निरुपणा-वरून असे वाटते की भगवान श्रीकृष्ण सोडून इतर कुठल्याही देव-देवतांची पूजा करणे योग्य नाही. खाली काही पानांचे दुवे देत आहे, ज्यावरून हे अधिक स्पष्ट होईल. असा उल्लेख बऱ्याच इतरही बऱ्याच ठिकाणी आलेला दिसतो. त्यामुळे मला प्रश्न पडला.

http://www.bhagavad-gita.us/articles/376/1/Bhagavad-Gita-720/Page1.html
http://www.bhagavad-gita.us/articles/375/1/Bhagavad-Gita-721/Page1.html
http://www.bhagavad-gita.us/articles/374/1/Bhagavad-Gita-722/Page1.html
http://www.bhagavad-gita.us/articles/373/1/Bhagavad-Gita-723/Page1.html
http://www.bhagavad-gita.us/articles/373/1/Bhagavad-Gita-724/Page1.html
http://www.bhagavad-gita.us/articles/302/1/Bhagavad-Gita-102/Page1.html

इस्कॉन मधील शिकवणुकीत श्रीकृष्ण हेच फक्त परमात्मा असे सारखे बिंबवण्यात येते. हे मला बाकी पंथ अथवा गुरूंच्या शिकवणीत अजून तरी सापडले नाही आहे.

गोंदवलेकर महाराज ह्यांच्या चरित्रात किंवा इतर प्रवचनात असा अट्टाहास दिसत नाही की फक्त श्रीरामाचीच पूजा करावी आणी बाकी देवांची पूजा करणे चूक आहे. गोंदवलेकर महाराज ह्यांच्या समाधी मंदिराच्या इथे श्रीकृष्णाची मूर्ती सुद्धा आहे (स्वत: जाऊन आलेलो नाही, पण असे वाचनात आले आहे). मला नीटसे आठवत नाही पण त्यांच्या चरित्रात असाही उलेख आहे की महाराजांना श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व आवडत असे (जसच्या-तसं वाक्य लक्षात नाही).

श्री कृष्ण महाभारतकाली साधारण ५००० वर्षापूर्वी झाला. त्यापूर्वीचे हिंदु कोणाची पूजा करत होते? ते सगळे नरकार गेले की काय? राम, दशरथ, लव कुश यांचाही काळ त्याच्याअधीचाच आहे, तेही सगळे चुकीचीच पूजा करत होते की काय? Happy

न्यूबिर,

१. या दुव्यावर पहा
http://www.bhagavad-gita.us/articles/376/1/Bhagavad-Gita-720/Page1.html

इथं लिहिलय की ऐहिक वासनांच्या सपाट्यात बांधलेले लोक (एखाद्या देवतेची) मनमानी साधना करतात. परंतु तुम्ही जर शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि निष्काम अशी साधना केलीत तर हा श्लोक लागू पडत नाही.

२. आणि इथेही पहा
http://www.bhagavad-gita.us/articles/375/1/Bhagavad-Gita-721/Page1.html

इथे तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच भक्ताची देवतेविषयीची श्रद्धा दृढ करतोय. याला कारण आहे ती भक्ताची वासना. म्हणून निष्काम साधना केंव्हाही श्रेष्ठ. मग ती कोणाचीही करा.

३. उरलेले दुवे बघितले नाहीत. मात्र त्यांचा अंगुलीनिर्देश निष्कामपणाकडे असावा असं वाटतं.

४. माझं मत विचारलं तर कुलदैवताचा जप करणे सर्वात सोपे असते. त्याचा आपल्याला त्रास होत नाही. त्याच्यामुळेच आपल्याला हे शरीर प्राप्त झालेले असते. निष्काम साधना असेल तर देवता आपसूक हवे नको ते देतातच. योगक्षेमं वहाम्यहम्.

|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||

-निनाद

निनाद,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

पहिल्या दोन दुव्यांचा अर्थ मी सुद्धा जवळ-पास तसाच काढलेला, परंतु इतर दुवे पूर्णतः निष्कामपणा दाखवितात असे वाटत नाही. मी मुद्दाम सहाही दुवे अशासाठी दिले, कारण वरील दोन दुवे वगळले असता इतर दुवे संदर्भ-विरहीत झाले असते.

काही ठिकाणी शब्दश: अर्थ काढून "फक्त" श्रीकृष्ण=परमात्मा=सर्वोच्च-देवता असे बिंबवले जाते ते मला सध्या तरी समजत नाही आणि पटतही नाही. निर्गुण परमात्मा हा इथे श्रीकृष्णाचे सगुण रूप घेऊन बोलत आहे असे माझे आत्तापर्यंतचे तरी मत आहे.

कुठल्याही देवतेची निष्काम भक्ती ही केव्हाही चांगलीच, पण ह्यात श्रीकृष्ण सुद्धा आलेच ना?? अर्थात तशी निष्काम वृत्ती अथवा अध्यात्मिक पातळी गाठणे तितकेसे सोपे नाही, आणि कदाचित ते आपल्या हातात सुद्धा नाही (एकदा सगळे जग 'त्याच्या' इच्छे-प्रमाणे चालले आहे असे म्हणाल्यावर आपण काही केले/करत आहोत/करू असे म्हणणे चुकीचे ठरेल).

न्यूबिर

निष्काम वृत्ती अथवा अध्यात्मिक पातळी गाठणे तितकेसे सोपे नाही

सिंपल लिविंग हाय थिंकिंग ठेवले की होते..

माझे असे मत आहे कि प्रत्येक मनुष्य आपापल्या विचार करण्याच्या प्रक्रियेप्रमाणे, आपल्या आवडीनुसार , आपल्याला एखादी गोष्ट या देवतेकडुन मिळेल या हेतुने ,पारंपारिकरीत्या ज्या देवतेची पुजा घराण्यात होत आली आहे त्या देवतेची, आई-वडिलांना एखाद्या देवतेचा चांगला अनुभव आला असेल तर त्यांचानुसार विविध देवतेची पुजा अर्चना करतो.

जसे महाराष्ट्रात गणपतीची, उत्तर भारतात शिव शंभोची, बंगाल मध्ये दुर्गा देविची, दशिण भारतात कार्तिकेय स्वामिची, गुजरातमध्ये क्रुष्णाची पुजा मोठया प्रमाणात होते त्याला पौराणिक्,एतिहासिक कारणे आहेत. तसेच सर्वसाधारण लोक सहसा एकाच देवतेची पुजा करुन इतर देवतांना कमी लेखले आहे असे करीत नाहित. ते गणपतीला जेवढ्या प्रेमाने नमस्कार करतिल तेवढयाच प्रेमाने रामाला करतील. ते त्या देवतेचे श्रेष्ठत्व मान्य करतात.

परंतु ज्यावेळी तुम्हाला अध्यात्मिक प्रगती करायची असते त्यावेळी तुम्हाला आपोआपच एखाद्या देवतेविषयी जास्त आत्मियता निर्माण होते व तुम्ही त्या एका देवतेचे भक्त बनता व तुमचे सर्व जीवन त्या देवतेला समर्पीत करता , मग ती देवता तुमच्या आवडीनुसार कोणतीही असो त्याने तुमची अध्यात्मिक प्रगती सुरु होते. कारण तुम्ही परमेश्वराच्या अनेक रुपापैकी एका रुपावर अनुरुक्त / एकाग्र होता , त्याचे नामस्मरण करता. आपले मन जेवढे एखाद्या गोष्टीवर एकाग्र होते, अंतर्मुख होते तेवढे आपल्याला अध्यात्मिक अनुभव मिळत जातात, आपले सैरभैर झालेले मन शांत होते व आपण आंनदाचा अनुभव घेतो.

खूप जूना धागा आहे पण लिहिल्याशिवाय राहवेना.
प्रत्येकाचा कोणत्यातरी देवतेशी ऋणानुबंध असतो. योग्य वेळी गुरु त्या देवतेची उपासना देतात.
उदा:
गोन्दवलेकर महाराजांनी एका भक्तास शिवोपासना पण करायची आज्ञा केली.
तुम्ही स्वतःच्या मनाने कोणतीही उपासना सुरु केली तरी त्याचे फळ फक्त गुरुप्राप्ती हेच असते. ते तुमचे देवतेशी असणारे ऋणानुबंध जाणून असतात.
संदर्भ: संत नामदेव. संत गोंदवलेकर महाराज (तुकामाई विठ्ठल भक्त होते). योगानंद परमहंस (युक्तेश्वर निर्गुणोपासक होते).
मुद्दा एवढाच - तुम्ही गुळ बना - मुंगळे (गुरु आणि देव) आपोआप येतील.
जुना धागा मी वर काढला नाही - आधीच पहिल्या पानावर होता Happy

गा.पै,

१००%

कुल-दैवतच आपल्याला तारुन नेण्यास समर्थ असते.
जशी ठेच लागल्यावर, आपसुक "आई ग " अशी हाक तोंडी येते तसे कुलदैवतेचे नाव आपल्या तोंडी यावे

मला एक प्रश विचारायचा आहे त्यासाठी नविन धागा काढत नाही.

आमच्या देवघरात गणपतिचि लहान मुर्ती होति. ती भग्न अवस्थेत होती.(तिच्या हाताचि बोटे तुटलेलि दिसत होति) म्हणुन मी ती मुर्ति विसर्जन केलि.
आता मला नविन मुर्ती स्थापन करायचि आहे.ती भटजिला न बोलवता कशी स्थापन करण्यात येउ शकते.माझ्याकडे गिफ्ट स्वरुपात आलेलि एक मुर्ति बंदिस्त बोक्समध्ये आहे ती मि स्थापन करु शकते का? ति कश्या प्रकारे करु ते कृपया मार्गदर्शन करावे.

<<<<<<<<<आता मला नविन मुर्ती स्थापन करायचि आहे.ती भटजिला न बोलवता>>>>>>>>>>>>फार सोप आहे, देवाला म्हणावे "देवा आता तुझे या विग्रहात पूजन करते बर.तू अगोदर हि तिथे होतासच .पण माझ्या माझ्या समाधानासाठी तुला या मूर्तीत बोलावते आहे बर". मुळात श्रद्धा हे एकमेव परिमाण आहे.पटल तर घ्या.आणि आवड असेल साग्रसंगीत केले तरी चालेल .भाव तेथे देव.

धागा चांगला आहे
इस्कॉन वाल्यांचे ऐकू नका
गामा व आराध्या बरोबर सांगताय्त
अविगा शात्रशुद्धच पूजा प्राणप्रतिष्ठा करा भटजी नको असेल तर सर्व विधी नीट शिकून मगच करा

आकाशनील वाक्य आवडले धन्स !!<<<<तुम्ही गुळ बना - मुंगळे (गुरु आणि देव) आपोआप येतील.

१५ जानेवारीच्या गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातील तळटीप अशी आहे.
१५. तुम्ही नाम घेत गेलात तर तुम्हांला संत धुंडीत जाण्याची जरूरीच नाही, तेच तुम्हांला धुंडीत येतील.

वि.प.धन्स

अविगा शात्रशुद्धच पूजा प्राणप्रतिष्ठा करा भटजी नको असेल तर सर्व विधी नीट शिकून मगच करा >>>>
वै.व.कु. तुम्हि याबद्द्ल माहिति देउ शकता का ? इतर कोणाला महिति असल्यास सांगावी.

>>>> माझ्याकडे गिफ्ट स्वरुपात आलेलि एक मुर्ति बंदिस्त बोक्समध्ये आहे ती मि स्थापन करु शकते का? ति <<<<<
भटजी का नको याचे कारण कळले नाही. समजुन घेण्याची उत्सुकता आहे.
असो.
मूर्ति बन्दिस्त पेटीत असल्याने व पेटी उघडता येत नसेल, तर प्राणप्रतिष्ठापना अवघड आहे कारण प्राणप्रतिष्ठापने मधे विशिष्ट मंत्रांनी मूर्तिच्या हृदयाला हात लावणे, डोळ्यांना साजूक तुप लावणे इत्यादी विधी असतात.
पण अन्य पर्याय नसतील, भटजीही बोलवायचाच नसेल व हीच मूर्ति बसवायचि असेल, तर
हातात अक्षता घेऊन "ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे...... " या श्लोकाने देवाचे ध्यान करुन "वक्रतुण्ड महाकाय..." याश्लोकाने आवाहन करुन मुर्तिवर वहाव्यात. मग षोडशोपचारे पूजन करावे.
अर्थातच, देव म्हणल्यावर हिन्दू धर्मातील चालीरितीपरंपरारिवाज याप्रमाणे देवाचे वेगळेपण पावित्र्य जरुर जपावे हे वेगळे सान्गायला नकोच, नाही का?
साधारणतः अशाप्रकारे आवाहित दैवताचे उत्तरपूजेने विसर्जन करायचा शिरस्ता आहे. मात्र आपण आपल्या श्रद्धेप्रमाणे उत्तरपूजा न करता देव घरात ठेऊ शकता, पण मग एक जिवन्त वडिलधारे माणूस घरात असल्याची जाणीव ज्याप्रमाणे आपण बाळगतो, तशीच बाळगुन देवाची आराधना व घरातील वागणूक असावी लागते हे विसरू नका.
प्राणप्रतिष्ठापना हा पूर्णपणे वेगळा विषय आहे, व शक्यतो दगडी/धातूच्या टीकाऊ मूर्ति व ज्या पंचायतनामधे देवघरात सुरक्षित ठेवता येतिल अशांचीच करावी (असा दंडक नाही, पण तेच योग्य होय)

न्युबिर, तुम्हाला विसोबा खेचरांची गोष्ट माहित आहे का? नामदेवा संदर्भाने आहे बहुतेक, तसेच खाम्बातून प्रकट झालेल्या नृसिंहअवताराची गोष्ट, आशय असा की देव सर्वत्र सर्व रूपात आहे. तर ती गोष्ट वाचलीत तर वरील प्रश्न पडणार नाही.
एक नक्कीच खरे की केवळ श्रीकृष्णाची पूजा करुन देखिल इप्सित प्राप्ती होऊ शकते.

आभारि आहे लिम्बुटिंबु..
भटजी का नको याचे कारण कळले नाही. समजुन घेण्याची उत्सुकता आहे.>>>>

कारण प्रत्येक वेळि भटजि बोलवण्या पेक्शा स्वत: आत्मसात केले तर चांगले असे वाटते.

मुर्ति मी दुसरि आणायचि असे ठरविले आहे
ती कोणत्या प्रकारचि आणावि आणी त्याचा व्यवस्थीत पुजा विधी कृपया सांगावा जेवढा शक्य होईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करेन.

>>>कारण प्रत्येक वेळि भटजि बोलवण्या पेक्शा स्वत: आत्मसात केले तर चांगले असे वाटते. <<<
मॅडम, माझ्या उभ्या आयुष्यात, (वार्षिक पार्थिव गणेशमूर्तिची प्राणप्रतिष्ठापना सोडल्यास) आजवर मी माझ्याकरता एकाही मूर्तिची प्राणप्रतिष्ठापना केली नाहीये. घरात जे देव आहेत, ते वडीलान्नी स्थापलेले आहेत, व माझ्या लग्नाच्या वेळेस लिम्बीकडून आणलेला बाळकृष्ण/अन्नपूर्णा वगळता मी कोणताच देव नव्याने स्थापला नाहीये. एक चांदिचा गणपती लिम्बीने स्थापला पण तो आधी अष्टविनायकास नेऊन आणला व स्थापला (प्राणप्रतिष्ठाना नाही). हे सान्गायचे कारण की आयुष्यात फार कमी वेळेस प्राणप्रतिष्ठापने करता भटजी बोलवायची वेळ येते, "प्रत्येक वेळी" नाही. असो.
जर पूजेत नविन धातू/दगडी मूर्ति आणणार असाल तर माझा सल्ला असाच राहील की गुरुजी(भटजी) बोलावून विधीपूर्वक षोडशोपचारे अभिषेकासहित पूजन करुन घ्यावे.
न पेक्षा, धार्मिक पुस्तकांच्या दुकानात, साग्रसंगित विधींचे पुस्तक मिळते तेच घ्यावे लागेल, इथे नेटवर इतका तपशील लिहून सान्गणे मला तरी अवघड आहे. मात्र छापिल पुस्तके जरुर उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घ्यावा. "तुमचे पौरोहित्य तुम्हिच करा" इत्यादिक व सर्वच धार्मिक विधींचे तपशीलवार वर्णन असलेली पुस्तके आहेत. ती एरवीदेखिल उपयोगी पडतात असा अनुभव आहे. हरतालिका, वटसावित्री व अन्य अनेक व्रतवैकल्यात, लिम्बी अशाच पुस्तकांचा वापर करुन भिशीच्या बायकांना बरोबर घेऊन पुजाविधी करते. (इथे मात्र दरवेळेस ब्राह्मण (गुरुजी/भटजी) बोलावणे अशक्य होते ही बाब लागू पडते, प्राणप्रतिष्ठापनेकरता नाही असे माझे मत)
आपणांस शुभेच्छा!

आमच्या देवघरात गणपतिचि लहान मुर्ती होति. ती भग्न अवस्थेत होती.(तिच्या हाताचि बोटे तुटलेलि दिसत होति) म्हणुन मी ती मुर्ति विसर्जन केलि.>>> म्हणुन दुसरि मुर्तिचि प्राणप्रतिष्ठापना करायची आहे.

अविगा चर्चा माझ्यामते पुरेशी झाली आहे
प्राणप्रतिष्ठा करून दगडी/धातूची मूर्तीच बसवा लहानशा आकाराची
श्रद्धा तर तुमच्याकडे भरपूर दिसतेच आहे
स्वतःच पौरोहित्य करण्याचा निर्णय खूप आवडला मनःपूर्वक समर्थन

सर्व प्रकारची मराठी व्रतवैकल्ये , सर्व विधी पूजा , नेहमीच्या आराधनेतले मन्त्र व श्लोक यांचे एक संग्रहित पुस्तक आमच्या पंढरपुरात मिळते ते तुम्हाला पाठवून देवू का ??आपले पूर्ण व खरे नाव आपलाखरा पत्ता फोन नंबर विपूतून कळवा (धार्मिक पूस्तके इकडे बरीच स्वस्त मिळतात )

कळावे आपला
-वैवकु

लिंबूटींबू
१०० % अनुमोदन,

अविगा,

देवाला देव्हार्यात स्थापन करण्याला "प्राणप्रतिष्ठा" म्हणतात कारण त्या देवाला (ज्या देवाची
मुर्ती आहे तो देव) आपण त्या मुर्तीमध्ये आवाहन करतो. ह्या प्राणप्रतिष्ठा विधीपुर्वक
करणे आवश्यक असते, कारण देव्हार्यातील देव आपल्या घरात आपल्या बरोबर रहातो.
उत्सवाच्या वेळी आणलेल्या मुर्ती प्राण प्रतिष्ठा करुन ही नंतर उत्तर पुजा करून विसर्जीत केल्या
जातात. त्यामूळे त्या मुर्तींचे पावित्र काही दिवसापुरतच ठेवाव लागत, घरात अस होऊ शकत
नाही.

दुसर देव्हार्यातील मुर्ती मांडण्या मागेही शास्त्र आहे. पंचायतनात पाच देवता आपल्या
आपल्या ठरावील स्थानावर मांडून त्यांची पुजा करण अपेक्षीत आहे,

पंचायतन : पाच देवता = पंच महाभुते,

थोडक्यात देवतांची पुजा कशी करावी ह्या मागे शास्त्र आहे आणि ते आपण नाकारु शकत नाही.

वर आपली मर्जी !!