Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 21 May, 2011 - 02:28
पावसाळ सुरु व्हायला अद्याप १५ दिवस बाकी आहेत. सर्वांनाच पहिल्या पावसाची प्रतिक्षा लागलेली आहे.
तसाही पावसाळा ॠतु, हा ऋतु सर्वांचा आनंदी ॠतु असेल यात शंका नाही. या ऋतुत आपल्याल्या आलेले अनुभव, घेतलेला आनंद यावर जरुर लिहा.
ज्यांना गंभीर अनुभव आले त्यांनीही जरुर लिहावे
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
पावसाळा म्हणले की २६ जुलै
पावसाळा म्हणले की २६ जुलै आठवल्याशिवाय रहात नाही
अमोल केळकर
-----------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा
मुकु, अभिनंदन! छान धागा सुरु
मुकु, अभिनंदन! छान धागा सुरु केलास. सर्वाना आवडणारा विष्य. ज्याना आवडत नसेल ते अरसिक.
मुकु, पावसाळा म्हटलं की मला
मुकु, पावसाळा म्हटलं की मला प्रथम आठवतो तो मन धुंद करणारा मृद्गंध. पहिला पाऊस पडल्या पडल्या प्रगट होणारे लाल रंगाचे मखमली गोल आकाराचे छोटे छोटे किडे. अगदी छोटे न दिसण्यासारखे तुरु तुरु पळणारे खेकडे, छोटी छोटी टणाटण उड्या मारणारी बेडक्यांची पिल्ले. ओलीचिंब होऊन अत्यानंदाने डोलणारी झाडे-झुडपे, वेली. झुळू-झुळू वाहणारे गढूळ पाण्याचे झरे, अंगणात भरलेले पाणी, आणि त्यात आम्ही सोडलेल्या होड्या. बेडकांचे आनंदगीत, नळ्यातून्-कौलातून ओघळणारया पागोळ्या, त्याच्या खाली भांडी लावून घरात भरलेले पाणी. पावसाचा आवाज, गढूळ पाण्याने दुथडी भरून वहाणारी नदी. डोक्यावर धरलेली छत्री उडून जात असतानाही पूर पहायला जाण्याची आमची लगबग. सकाळी लवकर ऊठून बैल आणि नांगर घेऊन जाणारे शेतकरी. आणि बरेच काही आठवते. पण सध्या येथेच थांबते.
आता माझा अनुभव.
आम्ही तेव्हा कोकणात रहात होतो. मी ४थी-५वीत होते. माझी बहीण, ६वी-७वीत होती. आमची शाळा नदीपलीकडे होती. पाऊस जरा थांबला होता. नदीला आलेल्या पुराचे पाणी थोडे कमी झाले होते. म्हणून आम्ही शाळेत निघालो. माझे वडील त्याच शाळेत शिक्षक होते. ते, आम्ही दोघी, आणि आणखी दोन मुले ( बहीणीच्या वर्गातला मुलगा आणि माझ्या वर्गातली त्याची बहीण आमच्याबरोबर होते.)असे निघालो. पण आमच्या घराजवळून नदीपलीकडे जाणे शक्य नव्हते. कारण तिथे नदीचे पात्र रूंद आणि खोल होते. म्हणून आम्ही नदीच्या काठा-काठाने निघलो. हेतू हा कि, जेथे पाणी कमी वाटेल तेथून पलीकडे जायचे.
खूप चालल्यावर एकदाच पाणी कमी दिसलं आणि आम्ही नदीत उतरलो. पाण्याला ओढ फारच होती. आम्ही एकमेकांचे हात धरून चाललो होतो. खांद्याला अडकवलेल दप्तर. एका हाताने दुसरयाला पकडलेले व दुसरया हाताने कपडे न भिजू देण्याची धडपड चालली होती. पायाखाली दिसत नव्हते. त्यामुळे पाय घसरत होते. आम्ही धडपडत होतो. आणि स्वतःला व बरोबरच्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. येवढ्यात काही तरी पडले आणि वाहून जाताना दिसले. आणि बरोबरचा मुलगा त्या मागे पाण्यातून धावण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याचा हात माझ्या वडीलांच्या हातात होता. त्याचा हात घट्ट धरून ते त्याला ओरडले. तो थांबला. नाहीतर तो नक्कीच वाहून गेला असता. झालं अस होतं की, येवढ्या पावसातही हा मुलगा हातात वह्या-पुस्तके घेऊन आला होता. आणि तोल सावरताना हातातील वह्यापुस्तके पाण्यात पडलि होती. आजही तो प्रसंग आठवला की डोळ्यासमोर ऊभा रहातो आणि अंगावर काटा येतो.
चला... ट्रेक करायला निघायला
चला... ट्रेक करायला निघायला हवे...
प्लान बनवायला हवा..
सामान भरायला घेतो.. 
पाऊस म्ह्टले की....मला माझ्या
पाऊस म्ह्टले की....मला माझ्या आईची आठवण येते... बाहेर धोधो पाऊस आणी त्यात विजांचा गडगडाट असे असले की आमची आई सगळे दार खिडक्या लावुन बसायला सांगत असे... पावसात भिजु सुद्धा देत नव्हती... पण मला पाऊस खुप आवडतो... मी तर जाणुन बुजुन पावसात भिझायला जाते.. रिमझिम पाऊस सुरु असला की आम्ही तिघेही (मी, माझे पती, मुलगी) बाहेर फिरायला जातो.. मस्त मजा येते...
पावसळा सुरु झाला कि मन
पावसळा सुरु झाला कि मन रोमाचित होते.....पण दुबई ला पाउस पडत नाहि
........मुबई चा पाउस खुप आथवतो.....कोलेज मधुन लेक्चर बक करुन पावसात भिजायला खुप आवडायचे......
अमोल केळकर धन्यवाद शोभा>>>
अमोल केळकर धन्यवाद
शोभा>>> त्याकाळी खरच नदी नाले दुथडी भरुन वहायचे तेव्हा रेनकोट छत्र्याही कित्येक जणांजवळ नसायच्या त्यामुळे भिजतच जाणे असायचे. तेच खर मनाला आनंद देणारे असायचे
धन्यवाद
पक्या ट्रेकींगवर जर पावसात भिजलाच तर अनुभव नक्की लिही
स्मिता> शोमु>> धन्यवाद
पावसाबद्दलची माझी भावना, माझं
पावसाबद्दलची माझी भावना, माझं वेड मी पुर्वी माबोवर इथे मांडलं होतं. बघ नजर मारुन
http://www.maayboli.com/node/16899
धन्यवाद विशाल तुमचा तो अनुभव
धन्यवाद विशाल
तुमचा तो अनुभव दिर्घ काव्य स्वरुपातील आहे. छानच आहे
मस्त विषय मुकु! पाऊस म्हटलं
मस्त विषय मुकु!
पाऊस म्हटलं की मला आठवतो पहिला पाऊस.... उन्हाने आणि उकाड्याने आपण हैराण झालेलो असतांना अचानक मेघ दाटून येऊन पावसाच्या सरी कोसळतात आणि कोरड्या मातीतून येणारा सुगंध आसमंत भरुन राहतो, तो खरा छान पाऊस.
पण हाच पाऊस अवेळी आला, आपल्या ठरवलेल्या कार्यक्रमांवर पाणी फिरवायला आला की मात्र व्हिलन ठरतो, त्याचा राग येतो! जिथे गरज आहे तिथे, जेंव्हा गरज आहे तेंव्हा आणि जेवढा हवा तेवढाच हा पाऊस का नाही येत बरं???
बरं असेल त्याचा काही नाईलाज... तूर्तास चांगल्या पावसाची आठवण काढून आल्याचा चहा आणि गरमागरम कांदा भजी खात मस्त गाणी ऐकावी म्हणते.
संध्याकाळची वेळ , मी कंपनीतुन
संध्याकाळची वेळ , मी कंपनीतुन थोडा उशीरा निघालो त्यामुळे जाण्या साठी काहीच साधन नव्हते. पाऊसाची रिपरीप चालु होती त्यामुळे खाजगी वाहन सुध्दा तुरळक धावत होती. जे वाहन यायचे ते प्रवाश्यांनी आधीच गच्च त्यामुळे मनस्ताप, नुसता मनस्ताप चालु होता.
शेवटी चालतच निघालो. पाऊस चालु. म्हटले शेवटचा प्रयत्न म्हणुन लिफ्ट मागण्याचे ठरविले. अन आश्चर्य एक गाडी थांबली. म्हातारे सदगॄहस्थ होते. थंडीने थरथर कापत होते. त्यांची चहाची टपरी होती तेथे दुध घेऊन चालले होते. मला म्हणाले बरे झाले तुम्ही भेटले कारण माझ्याच्याने गाडी चालवेना.
तुम्हीच चालवा गाडी आणी मला शहरात सोडुन द्या.
त्यांना व्यवस्थित ईप्सित स्थळी पोहचुन दिले आणी मी आनंदाने घराच्या दिशेने निघालो.
गरज मला होती त्यापेक्षा जास्त गरज त्यांना होती. माझी गरज हे दुसर्याचे मदतीचे कारण झाले आणी याला साक्षीदार होता पाऊस
व्वा राजे मस्त अनुभव....
व्वा राजे मस्त अनुभव....
पाऊस म्हटलं की मला आठवतो
पाऊस म्हटलं की मला आठवतो आमच्या थान्यातिल कच्रराली तलाव!!!! काथोकाथ भरलेला तलाव, तलावात मधोमध एक झाद आहे तिथे आदोश्याला जमा झालेली बदके आनि ते द्रुश्य बघत असलेले आम्हि दोघे, मका खात!!!!!!!!!!!
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्वांचे मनःपूर्वक आभार
मला तो दिवस आठवते पाऊस अगदीच
मला तो दिवस आठवते पाऊस अगदीच तुफान होता, आमचे ३ खोल्याचे घर होते. आम्ही भावंड लहानच होतो, एक माणुस एवढ्या पावसात दार ठोठावत होता, मी एवढ्या वादळी पावसात दार उघडले, तसा तो माणुस एकदम आत आला, वडील घरी नव्हतेच, आई, मी व दोघी बहीणी. मी त्या माणसाला सोफ्यावर बसायला सांगीतले त्याच खोलीत आम्हीही बसलो होतो माणुस ओळखीचा नसल्याने ईकडे तिकडे जाता येत नव्हते. तास २ तासाने पाऊस थांबला. आम्ही त्या माणसाची जाण्याची वाट पाहत होतो. तसा तो जागचा हलेच ना. त्याला २,३ वेळा पाऊस थांबल्या आठवण करुन दिली. मग काही वेळानी हा बाहेर निघाला आणि आम्ही नि:श्वास सोडला.
मला पहिल्यापासूनच पाऊसात
मला पहिल्यापासूनच पाऊसात भिजायला प्रचंड आवडतं...
असा विचार करता करता.. जायचंच असं ठरलं.
आणि आम्ही अगदी पंपाजवळ पोहोचतोय न पोहोचतोय तोपर्यंत निव्वळ मुसळधार पाऊस सुरू झाला... रस्त्याच्या कडेला सगळे लोक थांबले होते.. आणि रस्त्यात फक्त आमची टूव्हिलर धावत होती.. चिंब भिजलो होतो दोघी... तसंच पेट्रोल भरलं आणि भिजत घरी आलो... येताना अर्धा लिटर दूध घेऊन आलो... बेसन वगैरे होतंच... मैत्रिणीने मस्त खेकडा भजी केली, मी टंपासभर चहा केला... आणि पाऊस अजूनही सूरुच होता.. आम्ही खिडकीत बसून चहा आणि भजीबरोबर एन्जॉय केला.. 
मी आणि माझी मैत्रिण दोघीच रहात होतो, तेव्हा दर रविवारी आम्ही गाडीत पेट्रोल भरायला दांडेकर ब्रिजवरच्या पेट्रोलपंपावर जायचो.. म्हणजे आठवडाभर पुन्हा पहायला नको.. असंच एकदा निघता निघता उशिर झाला.. पावसाची लक्षणं दिसत होती... जाऊया की नको?
कधी पाऊस हवाहवासा, तर कधी
कधी पाऊस हवाहवासा, तर कधी नकोसा
कधी बेधुंद करणारा, तर कधी डोळ्यांसवे बरसणारा
कधी चातकासारखी वाट पहायला लावणारा,
तर कधी ' थांब एकदाचा' अस त्रागा करुन म्हणायला लावणारा
'पाऊस' असंख्य आठवणी जागवणारा,
तर कधी स्वतःबरोबर त्या वाहुन नेणारा
पाऊस पहिल्या प्रेमात तिची ओढ लावणारा,
तर विरहात स्वतःबरोबर आक्रंदुन रडवणारा
'पाऊस' तिला नखशिखांत भिजवुन आनंद देणारा,
तर त्याला तिने हट्टाने ओढण्याची वाट पहाणारा
सही
सही
धन्यवाद दक्षिणा, शुकु,
धन्यवाद दक्षिणा,
शुकु, धन्यवाद, कविता मस्त जमली आहे
कधी चातकासारखी वाट पहायला लावणारा,
तर कधी ' थांब एकदाचा' असा त्रागा करायला लावणारा
असे चांगले वाटते
'पाऊस' असंख्य आठवणी जागवणारा,
तर कधी स्वतःबरोबर त्या वाहुन नेणारा
निदाण हाय आठवणी नेटवर असल्याने वाहुन जायला नको
मला बर्याचदा पाउस आला की
मला बर्याचदा पाउस आला की नव्या कोर्या पुस्तकान्च्या वास आठ्वतो.कारण हेच दिवस शाळा सुरु होण्याचे असायचे.
पाउस म्हटाले की मला २
पाउस म्हटाले की मला २ वर्षापुर्वीचा पाउस आठवतो. रविवार होता. मुलाला न्हाव्याकडे बसवुन एक छोटेसे काम करावे म्हणुन स्कुटरवर एकटीच निघाले. अताशा स्कुटरचा वापर तेव्हडा होत नव्हता.. नुकताच पाउस पडुन गेला होता. मस्त रोड रिकामा होता.. हवेत सुखद गारवा... आणी एखादा पावसाचा थेंब.. अहाहा काय मस्त वातावरण होते. चेहर्यावर काहीही बांधलेले नसल्यामुळे सगळे मस्त अनुभवता येत होते. फक्त कानसेन असणारी मी अचानक गुनगुनायला लागले. आणि अजुन छान वाटावे या आशेने कधी स्कुटरचा स्पीड वाढला कळालेच नाही. समोरच्या रिक्षावाल्याला मधेच वळायची हुक्की आली.. आणी कच्च्क्कन ब्रेक दाबल्यामुळे गाडि स्लीप होउन मी रस्त्यावर आडवी. मागुन बस येत होती.. मनात विचार आलाच शेवटचे क्षण तरी मस्त एजॉय केले आपण... डोळे गच्च मिटले... बसच्या ब्रेकचा मोठा आवाज झाला आणि कुणितरी मला हाताने उठवत असल्याचे कळाले. मस्त उठले गाडि चालु केली आणि काहीही झाले नसल्याच्या आविर्भावात निघुन गेले... बसचा ड्रायवर शिव्यांचा जप करत बसला.
अजुनही पाउस म्हटले की ते पडणे आठवते आणि त्यावेळि लागलेला मुका मार... आईग... अजुनही अंग दुखतय
वर्षे पोरग नाव्ह्याकडे आहे
वर्षे पोरग नाव्ह्याकडे आहे अजुन घरी ने
वर्षे,अग पोरगं कुठे आहे
वर्षे,अग पोरगं कुठे आहे ?मग...
अरे खरच की पुढचा पार्ट राहिला
अरे खरच की पुढचा पार्ट राहिला लिहाय्चा. लेकाला उचलले दुकानातुन.. कशीबशी गाडी घेउन घरी आले... त्या नंतर २ दिवस मला आणि महिनाभर गाडीला विश्रांती मिळाली

तशी विश्रांतीसाठी ही आयडीया पण भारीये... ज्या प्रमाना हातपाक काळेनिळे दिसतात तेव्हडे पेन्किलर घेत्ल्यामुळे दुखत नाहीत..
अगागा वर्षे बघ त्या स्मिताला
अगागा वर्षे बघ त्या स्मिताला तुझ्या मुलाची काळजी!
मामी अगं ... हो.न..तिने आधी
मामी अगं ... हो.न..तिने आधी तसेच लिहले होते...
एकदा मी, लहान भाऊ राजे व ईतर
एकदा मी, लहान भाऊ राजे व ईतर ५, ६ मित्र सायकलने अजिंठा गेलो होतो. तेथील डोंगर दर्या, जंगलात मन मस्त रमले होते, मी व एक मित्र लेणी पाहुन एका झोपडीवजा गोठ्यात आराम करत बसलो होतो. बाकी राजे व ईतर मित्र लेणी पाहुन आजुबाजुला टवाळक्या करायला थांबले, मी त्यां परत चलन्या विषयी बोललो तर ते पुढे हो म्हणाले. तास २ तास झाले हे काही आले नाही तशात अचानक तुफान वारा सुटला, त्यातच हा गोठा, आभाळही काळेकुट्ट वर येताना दिसत होते, मी तडक सायकल काढली पुन्हा लेणी जवळ पोहोचलो तर हे महाशय कुठे तरी टकमका पाहत होते. मी रागावलो, अशावेळी फालतुपणा करुनका म्हणालो पण कोणी मनावर घेतले नाही, एव्हान जोराचा पाऊस सुरु झाला, डोंगरावरून ओहोळ, मोट्या धारा वाहत खाली येत होत्या. मन प्रसन्न करणारे वातावरण असले तरी कडाडणार्या विजा, निवारा नाही. मी तसाच निघालो तरी हे काही आले नाही. मी दुसर्या मित्राला म्हटले थोडावेळ वाट पाहु, आणि नंतर निघु. पावसाचा जोर वाढतच होता. त्यात ४ कि.मी घाट चढायचा होता. एव्हाण हे पोहोचले. आम्ही तडक येथुन निघायचा निर्णय घेतला, कारण जंगल, ओलांडुन आम्हाला रात्रीचे आत बुलढाणा गाढायचे होते. भर पावसात सायकलीने घाट चढने कठीन जात होते, जागोजागी साप निघत होते. कसे तरी घाट चढुन रात्री १० ला बुलढाणा पोहोचलो. त्याचे आदले दिवशीच मित्राला ६ ठिकाणी विंचु चावला. पण तेथील एका माणसाने त्यावर उतारा येण्यासाठी युरीया व पाणी आलटुन पालटुन टाकण्यास सांगीतले. कसे बसे ते विष उतरले. आता तो अनुभव आठवला की मन आनंदी होते.
छत्री जवळ असली की पाऊस यायचा
छत्री जवळ असली की पाऊस यायचा नाही आणि छत्री नसली की मात्र हमखास येवून मला नखशिखांत भिजवल्याशिवाय राहायचा नाही. असा आमचा पाठशिवणीचा खेळ. बस्स... इतकीच काय ती आठवण..!
आणि एक. जास्त पाऊस पडून लोकल बंद झाल्या म्हणजे सुट्टी व्हायची. तेव्हा पावसाला मनातून धन्यवाद द्यायचे.
गुरूवारी २६ ला पिंपरी वरून
गुरूवारी २६ ला पिंपरी वरून दुचाकीवरून पुण्याकडे चाललो होतो. पावसाळी वातावरण होते. बायकोचा पेपर होता पिंपरीला, येताना म्हणाली भुक लागली म्हणुन भेळ खाण्यासाठी ब्रेमेन चौकात थांबलो. परिहार चौकाकडे जाणार्या रस्त्यावर एक सचिन नावाची भेळेची गाडी असते.
भेळेची ऑर्डर दिली आणि पावसाला सुरवात झाली. अडोसा होता तरीपण पाऊस इतका आडवा-तिडवा कोसळत होता की तिथे थांबणे अशक्य झाले. मग गाडीवर बसलो आणि भिजत जायचे ठरवले. गाडी चालु करे पर्यंत नखशिखांत भिजलो. वादळी वारा आणि तुफान पाऊस आगदी १० फुटांपुढचे सुद्धा दिसत नव्हते. कसे बसे संभाळत, गार वार्याने कुडकुडत होतो आणि पावसाचे थेंब सुई टोचावी असे होते. विद्यापिठ चौका पर्यंत आलो मग जरा पावसाचा जोर कमी झाल्याचे जाणवले. शिवाजी नगर जवळ पाऊस जवळ जवळ थांबलाच होता. आणि जरा हवेत उबदार पणा पण जाणवत होता. आजुन पुढे आल्यावर मंगला टॉकिज पासुनचा पुढचा रस्ता कोरडा ठणठणीत. बाजूने जाणारे आमच्या कडे कुठुन आले हे लोक असे बघत होते. घरी पोहोचले तर घरच्यांची अशीच प्रतिक्रीया.
पाऊस म्हणाल्यावर पुणेकरांना
पाऊस म्हणाल्यावर पुणेकरांना हमखास आठवतो सिंहगड.
तिथे पावसात भिजायचं ( कोणाबरोबर ते आपला आपण ठरवावं) आणि मग दमून मस्त गरम गरम कांदा भजी चापावी!!!
Pages