मना सज्जना....

Submitted by मी_आर्या on 19 January, 2009 - 23:02

(अर्थात श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरणी लीन होउन आणि त्यांची त्रिवार क्षमा मागुन....)

मना सज्जना, तु होस्टेलवरतीच रहावे
स्वातंत्र्य, समता, बंधुता मिळवावे
धर्मपंथ जातीभेद सोडोनी द्यावे
आर्थिक हितसंबंध जोडोनी घ्यावे !!

प्रभाते उठल्यास शिविगाळ करावी
दुपारची झोप कधी ना चुकवावी
रात्री झोपल्यास थोबाडीत मारावी
आकर्षक नट्यांनी रुम ती सजवावी !!

शांतता शब्दासी वैरता पत्करावी
ज्युनियर मुलांना दादागिरी दाखवावी
वस्त्रांची बंधने फेकोनी द्यावी
लज्जा नदीत सोडोनी द्यावी!!

स्वच्छतेशी संबंध कधी न दाखवावा
स्नानाचा हेतु अंगी न धरावा
फुकट मिळाल्यास साबण जरुर वापरावा
न पेक्षा कधीतरी पार्टनरचा चोरावा!!

निंदेसाठी भिंतीचा वापर करावा
कागद कपट्यांनी कॉरीडोर सजवावा
गुटखा तंबाखुचा चोथा कसाही थुंकावा
आदर्श होस्टेलचा असाच देखावा!!

कँटीन मधे सतत पडीक असावे
कॉलेजला काळे तोंड कधी न दाखवावे
प्रतिदिनी आयपॉडशी संबंधीत असावे
मल्टीप्लेक्सला मधुन मधुन फिरकीत जावे!!

सिगारेटची कांडी जाळत ठेवावी
उत्तेजक पेये नजर चुकवुन ठेवावी
स्वतःवरची जाणिव काढुन टाकावी
पब/बारची भेट कधी न चुकवावी!!

दोन मास मजेत निद्रेत घालवावे
तिस-या मासी टर्मवर्क night tea मारोनी करावे
चवथ्या मासी सिलॅबस शोधीत जावे
फुल नाईट मारोनी सर्व कव्हर करावे!!

गुलमोहर: 

नयना... मस्तच जमलंय एकदम.. Lol

मस्तच Happy
~~~
पकाक पॅक पॅक पॅक पॅक

छान आहे .
**********************************
क्षीण बुद्धीच्या अन हीण वृत्तीच्या लोकांचा राग मी धरत नाही Happy

मस्त आहे कविता
अग्निपंख,

Rofl Biggrin

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?

च्यायला नयना..
मी काय बघतोय हे? मस्त.. Happy

हाहा मस्तच...

समीर धन्स..! अरे मी ही हॉस्टेलवर दिवसा काढलेले/ ढकललेले आहेत..! म्हणुन येत हे सगळं ...:)

हे हेहेहे... झक्क आहे, नवा गुण कळला आपला मॅडम.. Happy

अभियंता आहात का................?

नाही... मायक्रोबायॉलॉजिस्ट! Happy

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
भावना अनावर झाल्या की अश्रुंचे सैनिक पापण्यांच्या तटावरुन पटापटा उड्या घेतात..
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

अगदी अचूक वर्णन... शेवटचं तर अगदीच अगदी Happy

    ***
    The Truth Shall Make Ye Fret. - The Truth, Terry Pratchett

    ही तर समस्त होस्टेलाइट्सची युनिव्हर्सल कथा आहे. अगदी हेच केलय होस्टेलवर असतांना. Happy

    व्वा ! नयने, व्वा. अगदी झाक लिहलयसा. पर म्या म्ह॑तो समदीच॑ पोर्‍ह॑ अशीच असताव का हास्टेलवरची?
    आमच्या सरप॑चाचा पोर्‍या बी हास्टेलात र्‍हातो. पर त्यो फकस्त अभ्यासच करतो. हा॑ म्हणा, त्याला कारण बी तस॑च हाय. त्याच्या बापुसचे लय चा॑गले स॑स्कार हायीत त्याच्यावर. शेवटी "खाण चा॑गली तर खापर॑ बी चा॑गलीच र्‍हातील ना." आपण समद्या॑नी हे था॑बवायला हव॑ ना! बघ ईचार करुन.

    नयना, तुझे विड॑बन छान आहे. पर॑तू, मना सज्जना नको होत॑. मना॑वर असे स॑स्कार नको रे बाबा!

    रवी॑द्र.................. .

    धन्स! दाद, स्लार्टी, रुनी अन रवी१४३!

    आणि खरच सांगते... शेवटच्या कडव्यातील प्रकार आम्हीसुद्धा केलेत..फुल नाईट (along with night tea)मारुन सर्व कव्हर करत होतो..! Lol

    नयना,
    आणि खरच सांगते... शेवटच्या कडव्यातील प्रकार आम्हीसुद्धा केलेत..फुल नाईट (along with night tea)मारुन सर्व कव्हर करत होतो..!

    मग जमल का सगळ॑ व्यवस्थीत?

    छान झालेत रिकामदास स्वामींचे नवे मनाचे श्लोक !:-)

    नयना अंडरस्कोअर मोरया....

    खुपच छान लिहिले आहे...:)..होस्तेल च्या आठवणी ताज्या झाल्या Happy

    प्रभाते उठल्यास शिविगाळ करावी
    दुपारची झोप कधी ना चुकवावी......आता कसली आलिय दुपरची झोप ??;(
    ही ऑळ जास्त आवडली....;)

    keep it up!!

    - केदार जोशी.
    तोक्यो जपान.

    खुपच छान आर्या,

    एकदा माझी मोठी बहिण मला कुस्त्रो वाडीयाच्या होस्टेलवर भेटायला आली. मी १८ वर्षांचा होतो. साधारण ५ सिगारेट्स दिवसभरात ओढायचो. माझा मित्र तिला वेटींगरुम मधे पाहुन मला न सांगता डायरेक्ट रुमवर घेऊन आला. मग काय विचारता. पायाने बरीच थोटक बेडखाली सरकवली. तरी एक थोटुक तिच्या नजरेला पडलच. ते माझ नसुन रुम पार्टनरच आहे हे धादांत खोट मी ठोकल.

    Pages