नमस्कार मित्रहो !
फूबाईफूचा फिनाले झाला जो तुम्ही २६ डिसेंबरला पाहू शकाल. यानंतर पुढे काय ? हा प्रश्न अनेकांनी विचारला. मीही काही गोष्टीत गुंतलो असताना दोन दिवसापुर्वी फूबाईफूचे ऑनलाईन डायरेक्टर श्री श्रीप्रसाद क्षीरसागर याचा फोन आला. दुसर्या दिवशी रितसर पवईत भेट झाली. गंमत म्हणजे यापुर्वी त्यांना मी फक्त कंट्रोल रुममध्ये पाहील होतं. एवढ्या दिवसात आम्ही कधी एका वाक्याचाही संवाद साधला नव्हता. त्यांनी मला ' श्रीप्रसाद क्षीरसागर' अशी फोनवर ओळख दिली तेव्हा " कोण ? " हा प्रश्नही मी बावळटपणे विचारलो. असो. काल मी विख्यात कलादिग्दर्शक श्री. नितीन चंद्रकांत देसाई यांच्यासमोर त्यांच्या पवई येथील ऑफिसमधील कॉन्फरेंस रुममध्ये त्यांच्या टिमबरोबर चर्चेला बसलो होतो.
आता नमनानंतर मुद्द्यावर येतो. " आयकॉनिक चंद्रकात प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड " ह्या आपल्या कंपनीद्वारे श्री. नितीन चंद्रकात देसाई निघाले आहेत अटकेपार झेंडे फडकवणार्या मराठी कलाकाराच्या शोधात. "झी मराठी" सोबत हा प्रवास सुरु होतोय "मराठी पाऊल पडते पुढे" या कार्यक्रमांतर्गत. आजवर अनेक क्षेत्रात मराठी ठसा उमटला आहे. तरीही मराठी माणसाच्या नावाने ओरड चालूच असते. त्या सगळ्या कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचा हा त्यांचा प्रयत्न. तुम्ही जर सर्वसामान्यांपेक्षा वेगळं काही करत असाल तर.... प्रेक्षक या भुमिकेला सोडून तुम्हाला रंगमंचावरच्या प्रकाशात तुमची कला सादर करायची असेल तर... श्री. श्रीप्रसाद क्षीरसागर यांच्या भाषेत म्हणायचं तर... "ज्याच्या अंगी नाना कला, त्याने ऑडीशनला चला".
तुम्ही काहीही वेगळं करत असाल... गायन, वादन, नृत्य, अभिनय, शारिरीक कसरती, लोककला, परंपरागत कला, शास्त्रशोध किंवा अजून काही.... आग़ळं वेग़ळं अस काहीही.... त्या प्रत्येक कलाकाराच स्वागत आहे. जर तुम्ही अशा एखाद्या कलाकाराला ओळखत असाल तर त्याच्यापर्यंत हा आमचा निरोप पोहचवा. ऑडीशनसाठी आम्ही तुमच्या शहरात येतोय...
३० जानेवारी नागपूर सुमीत ९८९०७२७२६१
२ जानेवारी औरंगाबाद योगेश ९८७३२०२०३०
४ जानेवारी रत्नागिरी मिलिंद ९८२२५५४७७०
५ जानेवारी कोल्हापूर - " - -" -
६ जानेवारी पुणे वैभव ९८९०७९८९०३
८ जानेवारी मुंबई ०२२ ६१४१५९००
ईमेल - shabashmaharashtra01@gmail.com
तर मित्रानो, पुन्हा एकदा नव्याने सज्ज झालोय तुमच्या मनोरंजनासाठी. रिसर्च आणि लेख्नन या दोन जबाबदार्या घेतल्यात खांद्यावर. आपल्या परिने अज्ञात कलाकारांपर्यंत पोहोचण्यासाठी हा आंतरजालीय खटाटोप. यात तुमच्या सर्वांची साथ लागेल. ती मिळेल हा विश्वास आहेच.
तुमचाच
कौतुक शिरोडकर
कौतुक तुमचं अभिनंदन. एका
कौतुक तुमचं अभिनंदन. एका मायबोलीकराचं पाऊल पुढे पडतं आहे ह्याबद्दल अभिमान वाटतो.
बाकी कार्यक्रमाविषयी मला थोडीशी विसंगती वाटली. बहुतेक नितीन देसाई ह्या नावाने माझ्या अपेक्षा काहीश्या उंचावलेल्या असतील. असोत ह्याबद्दल सविस्तर इथे लिहिलच.
कालचा एपिसोड चांगला होता...
कालचा एपिसोड चांगला होता... सगळेच कलाकार मस्त होते.फकस्त त्या तांदुळावर कारागिरि करणार्या कलाकाराला कडा द्यायला पाहिजे होता असे वाटले.तो मल्लखांबावार एखाद्या सापासारखा कसरत करणारा छोट्या तर लय भारी होता. बाकी हा कार्यक्रम खरच खुप स्तुत्य आहे.
छान
छान
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा कौतुक. फु बाई फु च्या फायनलला तुम्ही आला असाल असं वाटलं होतं. तुमचं नाव घेतल्यावर वाट बघत होतो.
आजच्या एपिसोड मध्ये सिलेक्ट
आजच्या एपिसोड मध्ये सिलेक्ट झालेले सगळे प्रकार झक्कास होते.....
भारुड तर महान... त्यात जे काही मांडले होते ते भन्नाट होते.. लेखन एक नंबर आणि सादरीकरणही तितकेच जबरी...
देवीच्या विविध रुपांवर आधारित केलेले नृत्य पण मस्त होते.. त्या मुलांनी एकही बीट चुकवली नाही...
भारुड जे सादर झालं,ते जसंच्या
भारुड जे सादर झालं,ते जसंच्या तसं ''मराठी बाणा'' मध्ये सादर होतं.....
हेहे... ते कालिकामातेच नृत्य
हेहे...
ते कालिकामातेच नृत्य आमच्या उरणच्या मुलांनी केल काल. खुप अभिमान वाटतोय त्यांचा.
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
भारुड जे सादर झालं,ते जसंच्या
भारुड जे सादर झालं,ते जसंच्या तसं ''मराठी बाणा'' मध्ये सादर होतं.....>> अगदी अगदी. नक्की कोणाच ओरिजिनील आहे???? मराठी बाणा वाल्यांच की कालच?? कि मराठी बाणातलाच तो कलाकार होता(स्वतंत्रपणे आलेला) ? आवाजही तसाच होता त्याचा...
निरंजन भाकरेच मराठी बाणात ते
निरंजन भाकरेच मराठी बाणात ते भारुड सादर करतात. अवलिया कलाकार आहे तो.
शुभेच्छा
शुभेच्छा
निरंजन भाकरेच मराठी बाणात ते
निरंजन भाकरेच मराठी बाणात ते भारुड सादर करतात. अवलिया कलाकार आहे तो..........>>>>>
अगदी अगदी... आणि कौतुकने त्याचे,'' वडीलांनी जन्मच न व्हावा म्हणून केलेला प्रयत्न्,त्याला कावीळ झाल्यावर जिवावर बेतलेली परिस्थिती,आदि बाबी अगदी खणून काढून जितेंद्र करवी सर्वांस ज्ञात केल्या''.....
खरंच अवलिया कलाकार आहे. हॅट्स ऑफ.
खुप चांगला कार्यक्रम माफ करा
खुप चांगला कार्यक्रम
माफ करा मात्र परिक्षक अधीक चांगले मिळू शकले असते
अमोल केळकर
----------------------------------------------------------------
मला इथे भेटा
(No subject)
मित्रांनो, तेवढा भाग आपल्या
मित्रांनो, तेवढा भाग आपल्या हातात नाही. त्यामुळे परिक्षकांबद्दल काहीही बोलणे संभवत नाही. तुमचं चालू द्या. लिखाणात काही कमी जास्त वाटल्यास नक्की कळवा. तसा आधीच मी एडिटने हैराण झालोय.
Pages