तो आला होता. माझ्यासमोर बसला होता. कुणी कुणी काहि बाही बोलत होते. मी मात्र हळुच डोळ्याच्या कोपर्या कोपर्यातुन त्याला बघण्याचा प्रयत्न करत होते. आधी त्याचे पाय दिसले. किती गुलाबी छान बोटं, पाय एकावर एक ठेउन बसल्यानं त्याची एक टाचही दिसत होती. टमाटो सारखी लालसर गुलाबी. हा कसा असेल दिसायला. माझी तडफड चालली होती नुसती. आई, अण्णा त्यांच्याशी काय काय बोलत होते. माझं सगळं लक्ष त्याला पहाण्याकडे... 'अगं पल्लु, ऐकतेस ना' आईचा आवाज आला मी जराशी दचकले. 'ऑ? क.... काय?' खरंतर माझ्या घरच्या नावाने मारलेली हाक मला त्याक्षणी फार छान वाटली. त्यानंही ती ऐकली, म्हणजे उद्या लग्न झाल्यावर तोही अशीच प्रेमानं ह्याच नावानं मला हाक मारील बहुधा. मी उगाचच अंग चोरुन बसले होते. माझ्या साडीवरची नक्षी कधी नव्हे ते मी इतकी निरखुन पहात होते. विकत घेतानाही इतकी निरखली नसेल. पुन्हा त्याला बघण्याचा प्रयत्न सुरु झाला... आता त्याचे हात दिसत होते. सरळ सोट स्वच्छ बोटं. व्यवस्थित नखं कापलेली. मी मनातल्या मनांत त्याचा हात हातात सुद्धा घेतला. डोक्यापर्यंत एक हवी हवीशी शिरशिरी येउन गेली. मला त्याचा चेहरा पाह्यचा होता. तसा तो ओळखीतलाच. काल परवा फोटो पाहुन पसंती झाली म्हणुन तर आज हा दाखवणे कार्यक्रम! खरंतर मला फार राग आला होता दाखवणे कार्यक्रमाचा पण मैत्रीण म्हणाली 'अगं दाखवणे कसलं, आपणच त्याला पाह्यचं गं....' कसलं काय, माझ्या छातीत इतकी धड्धड चालु होती की काय सांगु! कुणाला ऐकु जायची बाप रे! अचानक थंडी वाजत होती. तर मधुनच अचानक उकडत होतं. शरिरातलं सगळं रक्त चेहर्यावर आलंय की काय असं वाटुन घाम फुटत होता. नक्कीच माझे गाल, नाक, कानशिलं लाल झाली असणार. अचानक काहीतरी जाणवलं आणि मी रप्पकन् वर पाह्यलं तर.... तो माझ्याचकडे बघत होता. आई ग्गं, कळ आली हृदयात. हार्ट ऍटॅक येणार मला बहुतेक.... तेव्हढ्यात पंखा कुणीतरी मोठा केला आणि त्याच्या वार्यानं माझे केस एकदम कपाळावर आले, माझ्या नाकात गेले. नाक जरासं हुळहुळलं. मी बोटानं केस मागे सारले आणि नाकपुडी खुळ्यासारखी चोळली. माझा हा वेंधळेपणा पाहुन तो हळुच गालात हसला. अहह, त्याच्या गालावर माझ्या गालावरच्या खळीसारखीच छोटीशी खळी पडली होती. मेड फॉर इच अदर. मी आतुन बाहेरुन सुखावले. त्याची हनुवटी थोडीशी डबल होती. किती गोड वाटत होतं. मनांत लाडु कसले? मोठ मोठाले नारळ फुटत होते आनंदाने! तेवढ्यात कुणीतरी आलं, म्हणुन त्याच्या खांद्यावरुन नजर पुढे सरकवुन मी दाराकडे पाहण्याचा हलकासा प्रयत्न केला. पण.... नजर पुढे जाइचना. . . त्याच्या शर्टाची कडक इस्त्री, कॉलरपाशी थोडी उचलली गेली होती. हा नककीच रोज सूर्यनमस्कार, व्यायाम वगैरे करत असणार. श्शी, बाई. आपण मुलखाच्या आळशी. झोपायला आवडतं मला. मग ह्याच्यासोबत सकाळी उठुन व्यायाम वगैरे कसं जमणार? करेन, ह्याच्यासाठी तेही करेन. हाय काय नी नाय काय...
अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसला तसा मला फक्त तोच दिसत होता. डोळ्यांच्या वेगवेगळ्या कोनातुन. तोच. फक्त तोच. म्हणजे हा माझं भक्ष्य! माझं लक्ष्य!! किती लोभस...... सगळे म्हणाले, होकार तर झालाच आहे पण तुम्ही दोघे एकमेकांशी बोलुन घ्या. त्याच्या चेहर्यावर कसले तरी मिश्किल भाव तरळल्याचे मला दिसले. हा नक्कीच काही तरी खट्याळपणा करणार!. सगळे उठुन बाहेर गेले. कुणी दाराबाहेर, कुणी खिडकीतुन, कुणी पंख्याच्या बटणातुन. कुणी जमिनीतुन. कुणी छतातुन. तर कुणी चक्क टी.व्ही. तुन.... तो माझ्या जवळ सरकत होता, हळुहळु.... 'पल्ले, उठ...' अचानक माझा नवरा आला आणि आमच्या दोघांच्या मधे सरकुन बसला. मी स्सॉल्लीड उडाले. हा कसा टपकला नेमका मोक्याच्या क्षणाला? पण तो उडाला नाही. खुर्चीतल्या खुर्चीतच तो विरघळुन दिसेनासा झाला. माझा नवरा अजुनी बोंबलत होता, 'ए उठ्ठ. उशीर झालाय. चहा टाक. पिल्ल्याच्या ड्रेसला इस्त्री आहे ना?' खाडकन् माझे डोळे उघडले. च्या...@$#$$^.... काय रे, जरा दोन मिनिटं थांबला असतास तर. मस्त जमुन आलं होतं सगळं. ऑलमोस्ट झालंच होतं. हट्... चांगलं स्थळ चालुन आलं होतं. नशिबातच नाही माझ्या...' 'गधडे, स्वप्न काय बघतीस? उठ. .... मला माहित असतं की तुझं लग्न ठरतय, स्वप्नात का होइना, तर मी आजच काय, दोन दिवस तुला उठवली नसती. हे चक्रम चांगल्या घरात पडतंय म्हणुन मी निवांत झालो असतो. छॅ. नशिबात नाही माझ्या. चांगली संधी घालवली.'
बघ ना
Submitted by पल्ली on 5 January, 2009 - 01:46
गुलमोहर:
शेअर करा
शॉल्लेड
शॉल्लेड बाँब टाकलास.....
हे चक्रम चांगल्या घरात पडतंय म्हणुन मी निवांत झालो असतो >>>> माझा चेहरा दिसतोय ना तुला?
---------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
कंटाळला गं
कंटाळला गं बिचारा..............! मस्त जमलंय.
@$#$$^" हे पण छान आहे हो.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
झकास
झकास जमलय.
सागर आढाव
औरंगाबाद
(No subject)
अग शहाणे
अग शहाणे तुझ्या त्या हरिणीसारखा हा पण फुसका बार की
लै भारी, मी भयंकर उत्सुकतेने वाचत गेले तर काय
बादवे...चेहरा नै का दिसला?
माझ्या
माझ्या साडीवरची नक्षी कधी नव्हे ते मी इतकी निरखुन पहात होते. विकत घेतानाही इतकी निरखली नसेल >>
अचानक थंडी वाजत होती. तर मधुनच अचानक उकडत होतं. शरिरातलं सगळं रक्त चेहर्यावर आलंय की काय असं वाटुन घाम फुटत होता. नक्कीच माझे गाल, नाक, कानशिलं लाल झाली असणार>>
काय अचूक पकडलंयस गं शब्दात त्या वेळेसच्या मुलीच्या मनःस्थितीला! जबरी.. खूपच आवडलं.
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!!
सॉलीड !! मी
सॉलीड !! मी पण अगदी सरसावून बसले होते...... तू पण अगदी माझ्यासारखीच दिसतेस..... स्वप्नांच्या बाबतीत
एकदम झकास
एकदम झकास आहे
चेहरा निट
पल्लि, मस्त
पल्लि,
मस्त लिहिले आहेस ग.. climax तर खासच होता. एकदम solid.
jayavi... 'तू पण अगदी माझ्यासारखीच दिसतेस..... स्वप्नांच्या बाबतीत '.
पल्लि मला पण अगदि हेच म्हणायचे आहे, ''तू पण अगदी माझ्यासारखीच दिसतेस..... स्वप्नांच्या बाबतीत ".
वर्षा
(No subject)
पल्ली...
पल्ली... धमाल आहेस तु
हसुन हसुन पुरेवाट...
तु या ओळी लिहिल्या आहेत ना की "आधी त्याचे पाय दिसले. किती गुलाबी छान बोटं, पाय एकावर एक ठेउन बसल्यानं त्याची एक टाचही दिसत होती. टमाटो सारखी लालसर गुलाबी. हा कसा असेल दिसायला. ">>>> त्या वाचल्यावर मला वाटले की काही तरी धक्कातंत्र असेल .. आणि एखादा भुभु आणला असेल घरी आई-बाबांनी .... त्याची introduction सुरु असेल... पण पुढे तर भलतेच धक्के बसले... . मी पण जरा अतर्क्यच विचार केला आहे
पण तु लय भारी आहेस गं!
पल्लवी
पल्ली
पल्ली मस्तच
आधी त्याचे पाय दिसले. किती गुलाबी छान बोटं, पाय एकावर एक ठेउन बसल्यानं त्याची एक टाचही दिसत होती. टमाटो सारखी लालसर गुलाबी. हा कसा असेल दिसायला. मला वाटल नुकत्याच जन्म झालेल्या बाळाबद्दल बोलत आहेस.
मलाही
मला पण
मला पण वाटलं एखादं गोंडस बाळ असेल. पण मस्त.. एकदम खास लिहिलय.
खुप छान
खुप छान लिहल आहे
भारीच हं!!!!
लई भारी.
लई भारी.
(No subject)
छानच
छानच
हेहेहे
हेहेहे
लईच भारी.... पल्ले....
मस्तच आवडल
मस्तच आवडल धक्का तंत्र
ठांकु
ठांकु ठांकु
****************************
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
फारच
फारच उत्तम!
मि आजच मायबोलिकर झालो अनि पहिला लेख आपला वाचला
हाय काय नी
हाय काय नी नाय काय...
हे वाचल आणि वाटल हि पल्लवीच.... एकदम भन्नाट लिहिले आहेस. तु पुढच्यावेळि spoiler warning देत जा म्हणजे office मधे वाचताना काळजी घेवु.....
जबरी... सही
जबरी... सही होतं हे...
सुरुवातीला वाचताना मला पण वाटलं होतं एखादं माजरीचं पिल्लू असेल म्हणून...
बाकी, बारीकसारीक वर्णन एकदमच झक्कास...
मस्त...
मस्त... झक्कास... लईच भारी..... छान... सुंदर.... अप्रतिम...
शेवटी
शेवटी धक्का आसणार हे ओळाखलं होतं... पण मलापण ते लहान बाळ आसेल असं वाटलं.
हं... तर अस काही चाललेल आसतं का मुलीच्या मनात?!!
सध्याच्या काळातही असं होतं का? मस्करी म्हणुन नाही ... खरंच विचारतोय...
बाकी मला जायचं होतं अशा चहा-पोह्यांना, पण माझी आणि जवळच्या मित्रांचे प्रेम-विवाह झाल्यामुळे ते शक्य झालं नाही...
माझ्या
माझ्या पल्लवी नावाच्याच मैत्रीनीला तिच्या लग्नानंतर एक स्वप्न पडलं होत. त्यात तिच लग्न सोनू निगमशी झालं होत. तेच आठवलं.
एकुनात पल्लवी, लग्न आणि स्वप्न हे कॉमन दिसतयं.
मस्त लिहीलयं.
Pages