''उत्तरच नसलेले कोडे''

Submitted by सखी राधा on 1 February, 2011 - 08:31

स्टुडिओतुन एके दिवशी फोन आला ,'' काम अर्जंट आहे या''
गेल्यावर कळल कि एक documentry लिहायची आहे, महिला व बाल कल्याण खाते महाराष्ट्र ह्यांच्यासाठी. shoot अगोदर करुन झाल होत आणि झालेल्या १३ तासांचे shooting footage बघुन मला लिहायच होत. screeptwriters ना चौकटीत काम करावच लागत , पण इथे चौकट अजुन छोटी झाली होती.कल्पनेच्या आकाशात इथे विहरता येणार नव्हत.
पण १३ तास Sad प्रचंड कंटाळ्वाण ,वाट्ल एकदा नाही म्हणाव ,पण नंतर ठरवल बघु विषय भावला तर लिहु ,अस म्हणुन दुसर्‍या दिवशी सकाळीच dvs बघायला बसले,
dv tape सुरु झाली आणि त्यातल्या चल चित्रणाने मी आतुन हादरुन गेले. मतिमंद , विशेषतः आई वडिल असुनही अनाथ असलेले हे मतिमंद. ''आशाभवन '' नावची एक संस्था अशा मतिमंदाना सांभाळते.त्या मुलांची दिनचर्या , त्यांचे खेळ, त्यांच्या समस्या , त्यांच्या शिक्षकांच्या मुलाखती .त्या १३ तासाच्या फुटेज मध्ये त्या निरागस कोवळ्या जीवांच खुंट्लेल आयुष्य डोळ्यापुढे उभे राहिलं.ते सगळं पाहुन मन आतुन खुप भरुन आल होतं.
लिहायला बसले आणि डोळ्यासमोर आलं बोनसाय , गती खुंट्वलेलं , माणसाने हौसेसाठी निर्माण केलेल, एका गतीशील झाडाची गती तारांनी खुंट्वुन ,त्याला एका छोट्याश्या कुंडीत जायबंदी केलेलं बोनसाय.
मग ही मुलं कोण? परमेश्वरानी निर्माण केलेली बोनसाय . काय मिळाल परमेश्वराला ? त्यांच्या पालकांना काय वाट्त असेल? अश्या असंख्य प्रश्नांनी मनात फेर धरला,आणि मनातली सगळी अस्वस्थता कागदावर उतरली
वेगवेगळे प्रसंग पाहुन एक कविता सुचली. तिला निवेदनाच्या सुरवातीला मध्ये आणि शेवटी टाकली
ही कविता म्हणजे संवाद आहे त्या मुलांचा आणि देवाचा
भेट्ला कधी देव तुला, पाठ्व त्याला माझ्याकडे
विचारायचे आहे ,त्याला उत्तरचं नसलेले कोडे,
काय असा केला गुन्हा ,का दिलास जन्म मला?
शापित ठरवुन देवा, काय मिळाल तुला?

कविता आणि निवेदन पुढे सरकत गेले. कवितेत मुलांचे खुप सुंदर भावपुर्ण प्रसंग आहेत documentry च्या मध्यात एक प्रसंग आहे ,कि एका मतीमंदाला दोन्ही हात नाहीत आणि तिथल्या sisters त्याला खुप प्रेमाने जेवु घालतायेत.
तिथे शब्द सुचले,
कशी होती रे माझी आई? माहित आहे का तुला,
सोड्ण्यापुर्वी एकदातरी, जवळ घेतल होत का मला?
भरवला होता का तिने मला ही काउचा घास
सांग ना जाउन तिला,नाही देणार मी पुन्हा त्रास

शेवट मात्र आशादायी केला, कारण ही सगळी मुल तिथे खुप आनंदात आहे
एक अपंग मतीमंद मुलगा wheelchair वरुन खाली पड्तो आणि दुसरा मतीमंद धावत जाउन त्याला आधार देउन उठ्वतो हे चित्रच इतक आशादायी वाटल कि तिथे शब्द आले,
देवा जवळ ये हळुच , सांगतो तुझ्या कानात
सुखी आहे मी इथे हे आल का तुझ्या ध्यानात
नाही आता खंत एकट असण्याची
मिळाली नवी आशा सुंदर जीवन जगण्याची
पंखात आल बळ मिळाल नवं आकाश
क्षितीज आता दुर नाही वाट्तो हा विश्वास

हसरे चेहरे आणि डोळ्यातील आशा ह्या सोबत फिल्म संपली पण खुप प्रश्न अनुत्तरित राहिले मनात , पुढे ह्या मुलांचे भविष्य काय? फिल्म लिहुन माझ कर्तव्य संपत नाही पण ह्या फिल्म च्या निमीत्ताने समाजातील ह्या निरागस जीवांच दु:ख समाजापुढे आल तरी , गेली अनेक वर्षे मी सोशल वर्क करते, समाजातला हा घटक मात्र खुप दुर्लक्षित राहिलाय हे खरय,
आणि म्हणुनच मी ठरवलय ह्या निरागस जीवाच्या चेहर्‍यावर हसु फुलवायच ,उत्तरचं नसलेल्या ह्या कोड्याच उत्तर शोधायच .

गुलमोहर: 

अप्रतिम लिहिलेस सखी.....

उत्तर शोधायच्या तुझ्या मोहिमेला शुभेछा.......!!!

...

मला हे नाही मिळालं,ते नाही मिळालं अशी सारखी कटकट करणारे आपण्,मी जेव्हा ही स्पेशल मुलं पाहीली तेव्हा पासून अशी तक्रार करणं,उच्चारणं सोडून दिलंय.

सुरेख रेखाटलं आहेस ,सखी राधा. Happy

खरच अश्या मुलांकडे पाहिल स्वत:ची सगळी दु:ख/समस्या तोकड्या वाटायला लागतात.
तुम्ही छान मांडलय. Happy

उत्तरच नसलेल्या ह्या कोड्याच उत्तर शोधायच .,>>>> ह्या मोहिमेसाठी शुभेच्छा आणि मदतीचा हात सुद्धा --- आपली मोहीम सांगा आणि आम्ही सोबत करु Happy

इथे मी लहान मुलातच असते .वर्गाबरोबर प्रगती न करणार्‍या मुलांवर खूप खूप मेहनत घेते .आता दर
वर्षी मुंबईला यायच ठरवल आहे .चर्चगेट ते बोरीवली या टप्प्यात गरजू लहान मुलाना मदत करणार्‍या
संस्थांची जर माहिती असेल तर जरूर कळवणे .

अप्रतिम.... एका डोळ्यात वाईट वाटलं त्याचा अश्रू अन दुसर्‍यात तुझ्या सारख्या संवेदनशील व्यक्ती समाजात आहेत या समाधानातून आलेला आश्रू...... खुप छान लिहिलयस अन लिहिलस हेही खुप छान Happy

समाजात अजुनही खुप संवेदनशील व्यक्ति आहेत हे बघुन खुप बरं वाट्लं
मला खात्री आहे आता मला ह्या कोड्याच उत्तर नक्कीच सापड्णार !!!!!

कुणाला न सापडलेलं, उत्तर त्या बालकांना सापडलेलं असतं. त्यांनी तर त्या कोडे घालणार्‍यालाच कोड्यात टाकलेले असते.

सखी खरच फार छान लिहील आहेस.
आपल्याला सगळ मिळूनहि आपली तक्रार संपत नाही. आपण फारच असमाधानी आहोत.
>>अश्रु आणले डोळ्यात<< अगदी खर.
अवलला अनुमोदन.
तुला खूप खूप शुभेच्छा! मला काही करन्यासारखा असेल तर जरूर सांग.

खुप छान लिहिलं आहेस सखी.... उत्तरच नसलेल्या ह्या कोड्याचं उत्तर शोधायच्या मोहिमेला तुला अनेक शुभेच्छा! चांगलं काम करतेयस... Happy

Pages