कुत्र्याविषयी थोडे..

Submitted by अजय भागवत on 21 January, 2011 - 19:41

लहानपणी कुत्रा पाळण्याचा हट्ट पालकांकडे करणारे अनेक असतात. अशा हौशीपायी कुत्र्यांबद्द्ल अनेक गमतीजमती माहीती झाल्यात, त्याच येथे मांडल्या आहेत.

कान आणि नखे

पाळलेल्या पहील्या कुत्रीचे नाव लायका ठेवले होते. लायका हे रशियाने मानवाला अंतराळात पाठवण्याआधी ज्या कुत्रीला पाठवले होते तिचे नाव. जिन्याखालील त्रिकोणी जागेत तिचे घर मस्तपैकी सजवले होते. तिला पिल्ले झाली, त्यात प्रत्येकाचे स्वभाव वैशिष्ठ्य समजुन घेता-घेता माहीती साठत गेली.
Laika.jpg

असे लक्षात आले की, सरळ कानाचा कुत्रा जास्त तिखट असतो, तो अंगावर धावुन येतो, भुंकतो, घाण खात नाही. ह्याउलट खाली कान पडलेले कुत्रे तुलनात्मक सौम्य असतात. कुत्रीला ४-५ पिल्ले झाली की, एखाद-दुसरे सरळ उभ्या कानाचे पिल्लू असते.
नखांच्या संखेवरुनही कुत्र्याचा स्वभाव ओळखता येतो. कुत्र्याला पुढच्या पायाला नेहमी ५-५ नखे असतात- ४ पंजाला व एक थोडे वर-मागील बाजुला (आपल्या पायाच्या घोट्याजवळ येइलसे).
DogDewClawJake1_wb.jpg

पण मागच्या पायांची नखसंख्या मात्र वेगवेगळी असते. ढोबळमानाने ८०% कुत्र्यांच्या मागील पायाला ४-४ नखे असतात. उरलेल्या २०% कुत्र्यात ५-४, ५-५, ५-६, ६-६ अशी संख्या असु शकते. मी ह्यातील प्रत्येक प्रकारचे कुत्रे पाळलेले आहे. आम्ही अशा कुत्र्यांना त्यांच्या नखांवरुनच ओळखत असु- १८ नखी, १९, २०, २१, २२ नखी. त्यात एखादे कुत्रे सरळ कानी असेल तर डब्बल धमाल. जितकी जास्त नखे, तितके ते कुत्रे हुशार असते.
800px-HindLegDualDewClaw.jpg

कुत्र्याचे पिल्लू रस्त्यावरुन उचलूनच आणावे लागे (किंवा एखादा दयाळू हवे तर एखादे पिल्लू घेऊन जा असे सांगे)- दुकानातून विकत आणणे वगैरे प्रकार अलिकडचे. मित्र-मित्र मिळून कुत्रा-शोध मोहीमेला जात असु. कुणाकडे तरी आधीच माहीती आलेली असे की, अमक्या-तमक्या गल्लीत कुत्र्याची पिल्ले बघितली. मग त्या पिल्लांच्या वर्णन करण्यात तो रमुन जाई. त्यात अनेक बाता पण मारल्या जात. "त्याच्या कपाळावर टिळा आहे / ओम आहे", "काळे-पांढरे ठिपक्यावालं पिल्लू सरळ कानावालं आहे". कधी एकदा जाऊन ती पिल्ले डोळे भरुन पाहतोय असे सगळ्यांना होई. पिल्ले शोधतांना सतत मागील पायाकडे लक्ष ठेवुन जास्तीत जास्त नखांचे कुत्रे मिळवण्यासाठी धडपड असे. असे कुत्रे मिळाले की, इतका आनंद होई की बस!

पाळणे व गमावणे

पिल्लू रस्त्यावरुन आणलेले असल्यामुळे ते अगदी घाणेरडे जरी नसले तरी, असेच धरुन न आणता, पोत्यात घालून आणत असु. म्हणजे कुत्रीपण मागे लागायची शक्यता नसे. घरी आणून धाब्यावर नेले जाई व त्यास आंघोळ घालून त्याच्या अंगावरील / कानातील जळवा-सदृश आळ्या काढल्या की, एकदम शांतपणे झोपी जाई. ह्यानंतर नामकरण केले जाई व भरपूर दुध आणि त्यात चपात्या कुस्करुन त्याच्या दिमतीला ते ठेवले जाई. रात्रभर कुई-कुई करत त्यास आईची आठवण येई, आम्हालाही वाईट वाटे पण स्वत:ला समजावत असु की, अरे, आपण तर ह्याची जास्त काळजी घेतोय, वगैरे. कुई-कुई आवजाने शेजारी वैतागुन जात पण शेजारी समंजस असत.
दुस-या दिवशी शाळेत गेलो की, घरी येई पर्यंत त्यास खाऊ-पिऊ घालायची जबाबदारी अर्थातच घरच्यांची असे. असे दोन-चार दिवस गेले की, ते पिल्लू अचानक गायब होई; रात्रीतून, किंवा, दिवसा. कसे ते आजपर्यंत नाही कळले. मग पुन्हा नवा शोध सुरु.

काही प्रसंग

कुत्र्याइतका लोभस पाळीव प्राणी नाही असे माझे ठाम मत आहे. सध्या ताण घालवण्यासाठी अनेक जण कुत्रे पाळतात. दिवसभरचा थकवा / शीण एका मिनीटात घालवण्याची किमया ह्या कुत्र्यात असते. ते तुमच्याशी खेळू लागते, आढून बाहेर घेऊन जाते, कोप-यातील एखादी त्याची नेहमीची वस्तू तोंडात धरुन घेऊन येते व तुमच्या समोर टाकून लांबवर जाऊन उभे राहते व सांगते, की, टाक ती वस्तू, मी घेऊन येतो. बाहेर जायचे असल्यास, गाडीचे दार उघडले की, आधी आत जाऊन बसते. फार मजा येते.
800px-Puppy_near_Coltani_-_17_apr_2010.jpg

एका स्नेह्यांकडे कुत्रे पाळले होते. ते त्यास कधीच बांधून ठेवत नसत. त्यामुळे ते जितके तास घरी असे त्यापेक्षा जास्त बाहेर असे. कधी-कधी २-३ दिवसांनी परत येई. त्यांच्याकडे घरी दत्ताचे पारायण होत असे व अनेकदा हे कुत्रे त्यावेळेस देवघरासमोर बसलेले असे. ह्या कुत्र्याचा किस्सा असा आहे- ह्याच्या बाहेर जाण्याच्या सवयीमुळे त्याला इतर गल्लीतील कुत्र्यांच्या भांडणास तोंड द्यावे लागे. अशाच एका भांडणातून ह्याला खोल जखमा झाल्या पण हे कुत्रे घरी न येता समोरील इमारतीच्या जिन्याखाली जाऊन बसले. असेच एक-दोन दिवस गेले, येणारे-जाणारे त्यास बाहेर बोलवत पण ते अंगावर येई. मग कुणीतरी त्याच्या मालकाला कळवले. ते तिथे गेले, त्यास बाहेर काढले, व जखमांना उपचार केले. डॉक्टर म्हणाले की, ह्याला आता अजिबात बाहेर जाऊ देऊ नका, नाहीतर.. म्हणून त्यास त्यांनी पहील्यांदा बांधले. ते शांत राहीना; भुंकणे सतत चालू राहील्यामुळे, त्यास त्यांनी नाईलाजाने सोडले. त्याच क्षणी त्याने भिंतीवरुन ऊडी मारली व पसार झाला. जे व्हायचे ते झालेच. परत त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला व पुन्हा त्यास अधिकच जखमी केले. पुन्हा हे महाशय त्याच जिन्याखाली लपले. आता मात्र तो फारच जखमी झाला होता व येणा-या- जाणा-यांवर भुंकतही होता. तेथील लोकांनी ताबडतोब मालकांना सांगितले. ते आले व त्याची अवस्था पाहून म्युनिसीपालटीला फोन केला आणि त्यास घरी घेऊन आले.
थोड्यावेळाने श्वासपथक आले. त्यांच्या पिंजरागाडीत आणखीही काही कुत्रे होती. ह्याला जणू काही पुढचे कळाले. हा अंगणात होता; तो जागचा उठला व घरात गेला. मालकांनी त्यास खास केक आणला होता, जाण्याआधी त्यास खाऊ म्हणून. तो त्याला खाण्यास देऊ लागले पण त्याने तो खाल्ला नाही. देवघरात गेला, काही क्षण तेथे बसला. उठला, घरातील प्रत्येक खोलीत जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जवळ गेला, अंगावरुन हात फिरवुन घेतला व तसाच बाहेर जाऊन स्वतः त्या पिंजरागाडीत बसला. जातांना भुंकलाही नाही. हा प्रसंग त्या गल्लीतील अनेकांनी पाहीला आहे व ते आजही ह्याची आठवण काढतात.

त्यांचे नियम / प्रशिक्षण

YellowLabradorLooking_new.jpg

कुत्र्याला शिक्षण देऊन त्यास आणखीही काही महत्वाच्या कामासाठी निवडायचे असेल तर त्याची पहीली चाचणी असते. शिक्षक एक चेंडू लांबवर फेकतात. जो कुत्रा तो चेंडू परत आणून देतो तो कुत्रा शिक्षण-योग्य आहे असे मानतात. कुत्रा प्रशिक्षक त्या कुत्र्याच्या मालकाच्या मदतीने त्यास शिक्षण देतो. एका प्रकारात त्यांना एखाद्या पासवर्डची ओळख दिली जाते. उदा, जर कुत्र्याला एखाद्याच्या अंगावर धावुन जायला भाग पाडायचे असेल तर त्या कुत्र्याचा मुड अचानक हिंस्र करावा लागतो. ह्यासाठी ते मालकाला एक पासवर्ड म्हणण्यास सांगतात, त्यांनी तो शब्द उच्चारता क्षणी प्रशिक्षक त्या कुत्र्यास काठीने मारतो. तसे केल्याने तो कुत्रा रागावेल असे बघितले जाते. कालांतराने तो पासवर्ड उच्चारला की, कुत्रा एकदम हिंस्र होतो व मालक सांगेल त्याच्या अंगावर धावुन जातो.

एकाने सांगितले की, कुत्रा एखाद्या गल्लीत, मोकळ्या जागेत स्वतःची मालकी स्थापीत करतं. त्यासाठी ते चार दिशांना जाऊन एकेका जागी लघवी करतं; हीच त्याची सीमाआखणी. दुसरा कुत्रा आला की, त्यास तो वास येतो आणि त्यानुसार त्यास कळतं की, हे राज्य कोणाचंतरी आहे. त्यास ते राज्य बळकावायचं असेल तर अर्थातच त्या दोघांची मारामारी ठरलेलीच. ती होते, बलाढ्य कुत्रे जिंकते व त्यावर कब्जा घेते. नियम असा आहे की, एका ठिकाणी दोन कुत्रे नाही! मात्र ह्याउलट जर ती कुत्री असेल आणि जागा कुत्र्याने आखलेली असेल तर एका भांडणानंतर -जे अगदी लुटूपुटू असते- त्यांच्यात समेट होऊ शकतो; पण एकदा तरी भांडण होतेच. आणि तिस-या प्रकारात जर बाहेरुन आलेली कुत्री असेल तर, आणि जागा कुत्रीनेच आखलेली असेल तर ती, आलेल्या पाहुणीला त्याजागेत राहू देते- भांडणाशिवाय!!

कुत्रा पाळण्याचा एकमेव तोटा असा की, तुम्ही त्यास एकटे ठेवुन जाऊ शकत नाही. सध्या त्यांच्यासाठी पाळणाघरं झालेली आहेत पण ती फार महाग वाटतात. त्यामुळे त्यास बरोबर घेऊन जाणे दरवेळी शक्य होतेच असे नाही. म्हणून मग एखाद्याला घरी रहावे लागते. पण कुत्र्यामुळे मिळणा-या अनंत वात्सल्यपुर्ण क्षणांसमोर तो त्रास फिका पडतो.

खात्री आहे की, इतरांकडेही कुत्र्यांबद्दल सांगण्यासारखे अनेक किस्से असतील; म्हणून ते ऐकण्यासाठी येथेच थांबतो.

[लेखातील चित्रे विकीपेडीयावरुन साभार]

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आणि मांजरींना नख असतात की, फक्त समस्त मार्जारवर्गीय प्राण्याप्रमाणे त्या ती ईच्छेनुसार आतमध्ये घेउ शकतात >>> हो हो असतात. पण एखादीला अपवादाने नसली तरी हुशारीवर परिणाम होत नाही असं मला म्हणायचं होतं Happy

पंत, बोलू या एकदा या विषयावर. तुमची एक्झॅक्ट रीक्वायरमेंट समजली की सल्ला देणं सोप्प जाईल.

>>> रीक्वायरमेंट...असं काही नाही ...हौस म्हणुनच पाळायचय ...
रीक्वायरमेंट १) कुत्रं कुत्र्या सारखं / कोल्ह्या सारखं दिसणारं पाहिजे...पग नको ते फक्त जाहिरातीतच छान दिस्तं
रीक्वायरमेंट २) कुत्रं फेरोशियस पाहिजे ...लोकं घाबरली पाहिजेत Proud पामेरीयन... गोल्डन रेत्रेवर वगैरे नको .
रीक्वायरमेंट ३) कुत्रं चिवट असावं ..त्याची अति काळजी घ्यायला लागु नये ( पग्स, गोल्डन रीट्रेवरची फार काळजी घ्यावी लागते म्हणे )
रीक्वायरमेंट ४) जास्त भुंकणारं नको ...च्यायला ती पामेरीयन कुत्री उगाचच च्याव च्याव करत राहातात ...घाबरत तर कोणीच नाही ..उगाचच साउंड पोल्युशन Proud

ऑप्शन १) सायबेरीयन हस्की (इथे मिळणार का?)
ऑप्शन २) ग्रेट डेन( परवडणार का ?)
ऑप्शन ३) कारवानी( ...ह्म्म.....हा माझ्या मते बेस्ट ऑप्शन आहे ...)
ऑप्शन ४) रॉटवायलर (जरा जास्तच फ्रोशीयस अस्तं असं ऐकुन आहे...च्यायला मलाच चावेल की काय अशी भीति वाटत राहील Proud )
ऑप्शन ५)अल्सेशीयन ( केसाळ असतं ....लास्ट ऑप्शन ......हे घरी आणलं तर त्याच्या सह मला ही घरातुन बाहेर काढतील बहुतेक :फिदी:)

एनी सजेशन्स ....अदर ऑप्शन्स ?

बाकी ....ह्या लेखाने लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्या ..आमच्या गल्लीत प्रत्येका कडे कुत्रं होतं ...आमचा मोती ..विवेक ची लुसी ...धनुचं टॉम्या ...राहुल्याचं स्कुबी ....
.
.
आमचा मोत्या ...गावठी च होता ..पण एकदम पांढरा शुभ्र ...आजोबान्नी कुठुन आणला होता देव जाणे ....पण मोत्या खूपच भित्रट होता ....नुसतं भुंकायचा ...दुसर कुत्रा आली की पळुन जायचा ...:फिदी:

नंतर त्याला खरुज की काय म्हणतात ते झालं ..डॉ म्हणाले ...मारुन टाकावं लागेल .:(
..आणि माझ्या डोळ्या समोर त्याला इन्जेक्शन देवुन मारलं ....मी सहावीत होतो तेव्हा ....आजही ..तब्बल १४ वर्शान्नी ही तो क्षण आठवुन कसंसच होतं !!! Sad
Sad

आमची हनी. भटकी होती, आमच्या सोसायटीच्या आवारात असायची. घरी आणायला परवानगी नव्हती, पण तिचं खाणं-पिणं, आठवड्याला एक दोनदा मांसाहार वगैरे आमच्याकडे. खूप चलाख आणि हुषार होती.

honey.jpg

मायबोलीवर इतके श्वानप्रेमी भेटतील असे अजिबात वाटले नव्हते. Happy खूप नवी माहिती मिळतेय. असुदे ह्यांच्या कडे तर माहितीचे कोठार आहे असे दिसतेय. वरचा हनीचा फोटो पाहून नक्कीच ती खूप जीव लावणारी असणार अशी जाणीव होतेय.

आमचा मोत्या ...गावठी च होता ..पण एकदम पांढरा शुभ्र ...आजोबान्नी कुठुन आणला होता देव जाणे ....पण मोत्या खूपच भित्रट होता ....नुसतं भुंकायचा ...दुसर कुत्रा आली की पळुन जायचा ...

>>

माबो वरुन उचलुन आणलावता क्काय आजोबांनी. Proud

कुत्रे पाळायचा, त्यांच्या संगतीत रहायचा अजिबातच अनुभव नाही पण
पंत तुमच्याकरता एक सल्ला:
ऑप्शन १ मध्ये :सायबेरीयन हस्की लिहिलं आहात. आमच्या मित्राकडे आहे ह्या जातीचा कुत्रा. दिसायला एकदम उमदा वगैरे आहे. पण त्याचे केस प्रचंड झडतात. घरभर पडतात. त्याचाही विचार करा.

सायो, पंत;
सैबेरीयन हस्की मूळचा सैबेरीयामधला. इथल्या वातावरणात केस गळतील यात नवल नाही. Happy पण असं मात्र नाही की भसाभसा गळतात. नाहीतर त्याचा मेक्सिकन हेअरलेस डॉग झाला असता ना. Wink

दिवसातून एक दोन वेळा केसातून ब्रश / ब्रश ग्लोव्ह ने कोंबिंग केल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह. हाकानाका.
एकदम स्टर्डी ब्रीड आहे. स्पोर्टीपण. मिळेल इथे.

पंत, एकंदरीत तुम्हाला. विचित्र तोंडांचे (बॉक्सर, बुलडॉग, पग वगैरे) नकोय). प्रेमळ, लाळघोटं असलेल ब्रीड नकोय, ईझी टू मेन्टेन हवय.

बीन बोम्बाबोम्ब म्हणजे कारवानी / बॅसेंजी Happy

आता एक एक ऑप्शन बघूया.

ऑप्शन १) सायबेरीयन हस्की (इथे मिळणार का?) "हो"
ऑप्शन २) ग्रेट डेन( परवडणार का ?) "बजेट किती आहे त्यावर अवलंबून. फिडींग कॉस्ट म्हणाल तर ती नॉर्मलच आहे"
ऑप्शन ३) कारवानी( ...ह्म्म.....हा माझ्या मते बेस्ट ऑप्शन आहे ...) "माझाही लाडका ऑप्शन पण एकतर लोकांकडून कौतुक होईल ह्या अपेक्षेत राहू नका. दुसर म्हणजे पळवायला जागा आहे ? एक कुत्रं एक एकरभर जागा सहज सांभाळतं. विचार करा."
ऑप्शन ४) रॉटवायलर (जरा जास्तच फ्रोशीयस अस्तं असं ऐकुन आहे...च्यायला मलाच चावेल की काय अशी भीति वाटत राहील ) "नाही चावणार. ब्रीडलाईन बघून आणा."
ऑप्शन ५)अल्सेशीयन ( केसाळ असतं ....लास्ट ऑप्शन ......हे घरी आणलं तर त्याच्या सह मला ही घरातुन बाहेर काढतील बहुतेक ) "का ? केसाने गळा कापेल म्हणून ? Light 1 मस्त ब्रीड आहे हो. पण घरच्यांना आवडत नसेल तर राहूच द्या."

एनी सजेशन्स ....अदर ऑप्शन्स ?

माझे पर्सनल चॉईसेस सांगतो

ईम्प्रेसिव्ह : ग्रेट डेन, रॉटवायलर, मॅस्टीफ, सेंट बर्नार्ड, कॉली, न्यू फाउंडलंड.
लो मेन्टेनन्स : डॉबरमन, बॉक्सर, कारवानी, पश्मी, विमरेनर, डाल्मॅशियन, पॉईंटर.
छोटे पण क्यूट : फॉक्स टेरीयर, बुलडॉग, कॉकर स्पॅनियल, बीगल, डॅशहंड, बुल टेरीयर.

अ‍ॅन्ड लास्ट बट माय ऑल टाईम फेवरेट ऑल्सेशियन (जर्मन शेफर्ड)

च्यामायला अम्या मला माणसांच्या पण एव्हड्या ( अर्थातच नसणारच माहित मला, कारण मला माहित असलेल्या जाती दोनच ! चित्पावन आणि इतर Wink Light 1 ) जाती माहित नाहियेत.

रच्याकने कुत्र पाळतांना ब्रीडलाईन बघुन घ्या म्हणे. आणि आम्ही जरा कुठं पुटपुटलो की मुलीची आजी देशस्थ होती ना पण ? की जगबुडी झाल्यासारखे अंगावर या आमच्या. Proud

नतद्रष्ट्या Lol

कुत्र पाळतांना ब्रीडलाईन बघुन घ्या म्हणे. आणि आम्ही जरा कुठं पुटपुटलो की मुलीची आजी देशस्थ होती ना पण ? की जगबुडी झाल्यासारखे अंगावर या आमच्या >>> हे पटलंच !!

असूदे, थॅन्क्स. किती केस गळतात वगैरेचं माहित नव्हतं मला. पण म्हटलं कानावर घालावं.

मानुषी, मला कुत्र्याचा काहीच अनुभव नाही. समोरुन कुत्रा येताना दिसला की मी आपली रस्त्याची दुसरी साईड पकडते. उगाच सलगी वगैरे करायला लागला तर काय घ्या. Wink

दात्यांनी बक्षिस लावलय. लॅब चावलेला दाखवा, १००० रु मिळवा.
अम्या तुला लॅब चावला ! अजुन किती अधःपतन होणारे तुझं देव जाणे ! श्याआआआआ. Proud

झरतृष्टा, उर्ध्वपतन व्हायचे दिवस संपले माझे.

बादवे दात्याचे १००० रुपये कसे उडवायचे याचे काही प्लान्स ?

आज मी कपडे इस्त्री करत होते तर वीनी एका सिल्क साडीवर जाउन झोपली. ती साडी गावाला जाताना न्यायची आहे म्हणून तिला दुसृया साडीवर झोपायला जागा करून दिली. दोघी मस्त पैठ्णीत झोपल्या. सो क्युट. कुत्र्यांचे किती कौतूक होउ शकते त्याला अंत नाही.

इथे पेडिग्रीचे म्यानेजर आहेत त्यांचा कुत्रा फिरून आला कि त्याचे पाय धुऊन घेतात. Happy

अमा,

बालपणी एका ओळखीच्या डॉक्टरांकडे बघितला होता हा प्रकार. कुत्राही निमूट बाथरुममध्ये जाउन उभा रहायचा. कुत्र्याला स्वतंत्र बेड तर होताच पण मच्छरदाणीही होती.

रच्याकने << कुत्रा फिरून आला कि त्याचे पाय धुऊन घेतात. >> हे मी चुकून " कुत्रा फिरून आला कि त्याचे पाय धुऊन तीर्थ घेतात." असं वाच्ल... Light 1

लय भारी! Happy
>>>>नखांच्या संखेवरुनही कुत्र्याचा स्वभाव ओळखता येतो.
>>>> नखांच्या संख्येचा आणि कुत्र्याच्या शहाणपणाचा थेट संबंध असतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.. <<< हे वाक्य तर टण्याचे चक्क
अरे इथे या वाक्यान्वर तुटून पडायला अजुन बुप्रावादी आले नाहीत का? Wink
नै म्हणल, एरवी आम्हि हाताच्या पन्जावरुन माणसाचा स्वभाव्/वृत्ती/भूत-भविष्य समजु शकतो असे म्हणले तर मात्र अगदी (कुत्र्यासारखे) वस्सकन अन्गावर येतात. पण कुत्र्याचा स्वभाव कळू शकतो म्हणल्यावर मात्र हूं की चूं करत नाहीत! Proud
असो, विषयान्तर नको
लेख छाने, लहानपणी पाळलेले कुत्रे आठवले Happy

>>>> एनी सजेशन्स ....अदर ऑप्शन्स ? <<<
पन्त, तुम्ही सरळ पुण्याच्या तुळशीबागेत जावा अन सॉफ्ट्टॉईज मधल कुत्रच काय, वाघ देखिल आणलात तरी प्रॉब्लेम नाही कसलाच! Proud

मला नक्की आठवत नाही, पण वाचल्यासारखे वाटतेय.
पाळीव कुत्रा लहान मूलांवर प्रेम करतो, त्यानी केलेला अत्याचारही (शेपूट ओढणे, कान ओढणे) सहन करतो, पण त्याच्यासमोर जर एखादे लहन मूल खाली पडले, तर त्याचा क्रूर स्वभाव जागृत होतो.
खरे आहे का ? का मी दुसर्‍या प्राण्याबद्दल वाचले असेल ?

लिंब्या...:D

कुत्रा पाळायची आम्हा भावडांनाही खुप आवड! लहानपणी १८ नखी, २० नखी, २१ नखी असा आमचा पण वाद चालायचा. आमचा गुड्डु - फॉक्स टेरीयर (मिक्स ब्रीड असावा) ...उभे कान, बुटका आणि लांबलचक! ९वर्ष राहिला! १८ एप्रिल २००४ मधे गेला तेव्हापासुन तो दिवस आम्ही काळा दिवस म्हणुन पाळतो. Sad

दिनेशदा, तसे काहि असावे असा नियम वा गृहितक नाही. आगापिछा माहित नसताना कोणत्याही कुत्र्याकडून प्रेमाची अपेक्षा करणे भाबडेपणाचे ठरु शकते.
उलट कुत्र्याचे लहानपण कसे गेलय त्यावर त्याचा स्वभाव अवलम्बुन असतो, माझ्या समोरच्यान्कडील केस आहे, जर्मन शेफर्ड पिल्लु जेव्हा आणले तेव्हा घरातील एक द्वाड लाडकं दोडक पोरग, त्या पिल्लाला जाम छळायचे (लहान पोरे देखिल क्रुर होऊ शकतात), त्या पिल्लाला सतावायचे, सहामहिनेवर्षभरात हे जर्मनशेफर्ड चान्गले उन्चेपुरे झाल्यावे त्या पोराचे काही चालेनासे झाले, शिवाय तो परगावि गेला, पण कुत्र्याने लहानपणातील त्याच्या सन्गतीतले दोनतिन महिने व काही शनिवार रविवार चान्गलेच लक्षात ठेवल्याने, आता कोणतेही लहान मुल दिसले तरी हा कुत्रा चक्क त्यान्च्या अन्गावर धावुन जातो, एकदा तर आमच्या धाकटीच्या मागे पार आतल्या स्वयम्पाकघरापर्यन्त येऊन झडप घालुन झटापट केली होती ज्यात धाकटीच्या पाठीवर ओरबाडले गेले होते. त्याच्या कचाट्यातुन तिला कसेतरी सोडवले! या गोष्टीला पाच पेक्षा जास्त वर्षे झाली असतील!
तर् सान्गायचा मुद्दा हा की, कुत्रे प्रेमळ असू शकते, प्रोव्हाईडेड द्याट त्याचे बालपण तशाच पेठी वा भटक्या "सुसंस्कृत" वातावरणात गेलेले असेल.! Happy
मात्र, सहसा कुत्री लहान मुलान्वर प्रेम करतात असेच बहुसन्ख्य अनुभव आहेत (माझेही) (माझ्याकडे एक फोटो आहे, कधी जमल्यास टाकेन!)
एखादे मुल समोर पडल्यास, क्रुर स्वभाव जाग्रुत होतो असे म्हणता येत नाही, पण कुत्र्यान्च्या मुलभुत जैविक धारेनुसार, "कुस्ती खेळण्याची" खुमखुमी मात्र नक्कीच जाग्रुत होते, मात्र अशा वेळेस, चावल्यासारखे दाखवुनही कुत्रे चावत नसते असा अनुभव आहे, खरे तर, त्याचे बालपण, त्याच्याच जातीच्या सवन्गडि कुत्र्यान्बरोबर जाणे आवश्यक असते ते न गेल्याने, व समोरील लहान मुल खेळगडीच वाटल्याने ते जे काय करतात तो त्यान्चा खेळ असतो, क्रुरता असतेच असे नाही.

लिंबू, छान लिहिलय. मलाही आमचाच पाळीव कुत्रा चावला होता लहानपणी. (माझाच पाय पडला होता त्याच्या शेपटीवर ) पण माझा कुत्रांवर राग नाही, त्यांचाही नसतो. अनेकदा आपणहून कुत्रे जवळ येतात माझ्या.
आमच्या सोसायटीतला ब्राउनी, तर कितीही काळानंतर घरी गेलो, कि जवळ येतो. फार अपेक्षा नसते त्याची, डोक्यावर थापटले कि झाले. पण ते बघून बाकीचे कुत्रे माझ्याजवळ आले तर त्याला चालत नाही, तो त्यांना हुसकावून लावतो.

दिनेशदा, अनुमोदन. माझ्या घरचाच किस्सा आहे. दीड वर्षाची डॉबरमन फिमेल आणली होती. तीला ब्रीड केली. माझ्या घरी ती येउन साधारण तीन ते चार महिने झाले असतील. मुलगा एक दीड वर्षाचा असेल, फार्फार तर दोन. त्याची आणि त्या कुत्रीची उंची साधारण एकच असेल. तो तीच्या पाठीच्या आधाराने उभा रहायचा. पण तीने कधीच नापसंती दाखवली नाही. एकदा तर चक्क माझ्या समोर घडलेला किस्सा. मी बघतच राहिलो कारण काही करायला वेळच मिळाला नाही. मुलगा कुत्रीच्या जवळ उभा होता आणि मुठीत केस पकडायचा प्रयत्न करत होता. मी चिमटे काढणं म्हणत नाहीये कारण तो केवळ बोटं न वापरता संपूर्ण हात वापरत होता. नेमकं सांगायच तर त्याने कुत्र्याच्या कमरेकडची लूज चामडी पकडून पिळायचा प्रयत्न केला. ती एक दोनदा पुढे जाउन निसटली पण हा धावत जाउन तीला पकडत होता. आपण पळालो तर हा पडेल हे तीला समजत होतं. पण ह्या त्रासापासून सुटका कशी करुन ग्यावी हे कळत नव्हतं.

अचानक मला दिसलं की तीने मुलाचा हात तोंडात पकडून बाजूला केला. मला अपेक्षा होती की मुलगा भोकाड पसरेल, किमानपक्षी रडेल वा तीला घाबरेल तरी. काहीही घडल नाही म्हणून मी मुलाचा हात तपासला तर त्यावर साधी लाळही नव्हती. एका सेकंदाच्या काही भागात तीने प्रतिक्षिप्त क्रियेने केलेली हालचाल होती ती. ह्यात तीने दाखवलेला संयम कौतुकास्पद होता.

आता एक गोष्ट लक्षात घ्या. डॉबरमॅन हे फेरोशियस ब्रीड म्हणून बदनाम आहे. पण माझ्यामते तो एक डीटरमाईन्ड कुत्रा आहे. तो लहान वयात ट्रेन होतो. नंतर तुम्ही त्याला ५ १० % मॅनेज करु शकता.

मानुषी, त्याला आमच्या फार्मवर ठेवून द्यायला आणला होता त्याच्या मालकाने. त्याला ते पसंत नव्हतं. मी त्याच्याशी बोलत असताना विदाउट एनी ईंडिकेशन माझ्या तोंडावर झडप मारली. मी मागे सरकलो पण तोपर्यंत त्याने माझ्या ओठात दात रुतवला होता. नो वॉर्निंज, नो इंडिकेशन्स, नो रिग्रेटस् . हि डिड ईट डेलिबरेटली.

लिंबूदा, तुम्ही म्हणताय ते बर्‍याच प्रमाण अचूक आहे. कुत्र्याच्या निकोप मानसिक वाढीसाठी सोशलायझेशन आवश्यकच. अदरवाईज जर्मन शेफर्ड हे एक ब्रीलियंट ब्रीड. शिवाय शेफर्डस प्राण्यांविषयी बराच सहनशील असतो. अर्थात त्यात मनुष्यप्राणी आलाच.

शेवती पळणार्‍या प्राण्याचा पाठलाग करुन त्याला पकडणे हे कुठल्याही शिकारी प्राण्याच्या रक्तातच असते. हे इन्स्टिंक्ट कधी जागृत होईल सांगता येत नाही.

Pages