gratitude

Submitted by mee_na on 24 December, 2008 - 04:41

प्रिया आली होती आज, निरोप घ्यायला. किती खुष होती.divorce घेतांना कुणी ईतके कसे खुष असु शकते? तिने आनी मी खुप प्रयत्न केले होते आजचा दिवस येउ नये म्हणुन. मी तिला स्वयंपाक शिकवला. computer वापरायला शिकवले. तिनेही खुप मेहनत घेतली सगले शिकायला. पण तिच्या नवरयाचे एकच टुमणे..काय तर म्हणे तिला घरकाम अजिबात येत नाही, नोकरीपण नाही. अरे... असे नववधुला येते का घरकाम पट्कन... थोडा वेळ लागतोच. आणी तिला काहीही येत नव्हते असे थोडी होते. मला तर तिच्या पेक्शा कामाची जास्त सवय.. तरि पण मी stupid mistakes करायचे सुरवातिला. पण आमचे हे सांभाळुन घ्यायचे. किती सांगीतले त्याला समजावुन. पण बहुदा त्याला हे लग्नच नको होते.... असो.
पण जातांना प्रिया म्हणाली, शिल्पा you are lucky. your parents gave you all rounder personality. my parents never took time to teach me cooking else i would not have been in this situation. हे वाक्य एईकले आणी मन भुतकाळात गेले....

शाळेत शीकत असनांना ...

अग ... आपल्या पिंकीची पत्रीका दाखवली. राजयोग आहे तिच्या नशीबात. बघ तु ती नक्की मोठी राजकारणी होणार बघ. उगीच नाही तिचा जन्म झाला त्या दिवशी म्रुणाल गोरे नेवडुन आल्या , ....... ईति बाबा

अहो पिंकीच्या आई,पोरगी हुशार बघा तुमची. १० वर्ष वय तिचे पण collegeच्या मुलांना मागे टाकते english मधे.नक्की खुप मोठी writer/ novelist होउ शकते बघा. आता पासुन आपण मेहनत घेउ तिला घड्वायला. मी घेतो मेहनत सगळी....... इति english चे सर.

अहो पिंकीचे बाबा, तुमची मुलगी फार हुशार आहे computer मधे. college मध्ल्या मुलांना जे जमत नाही, ते सगळे programming करते ती. नक्की computer engineer करा तिला. मी सगळे शिकवतो तिला. ....... इतिcomputer चे सर.

पिंके... हे बघ शिकुन घे स्व्यंपाक. अग जरुरी असतो तो. अग पोकळ मिरचीची भाजि करतांना आधी फक्त मीठ घालायचे. भाजीचे पाणी सुटुन त्यात जी भाजी शीजते त्याची चव काही वेगळीच होते ....... इति वहीनी.

आलीस.. चला आज रुद्र शिकायचे ना. काय पड्ले आहे त्या picture मधे.. जाउ दे.... इति गुरुजी.

अग झाडांना ईतकुसे पाणी घातले तर कसे पुरेल....... शेजारच्या काकु.

हे काय सगळे हे करा ते करा.. माझ्याच मागे का ? जिणे नकोसे केले आहे सगळ्यांनी ..... ... इति पिंकी

तीन वरर्षी नंतर...
वेळ बाराविच्या रिझल्ट नंतरची...

अग पिंकी, तु आपली computer engineer होच कशी. का पण ??...
अग मग तुला छान नवरा मिळेल. हे बघा ते राजकारण घाला चुलित.. engineer झाली की राजकारण करता नाही येत असे थोडीच आहे ?
पण engineer मुलीला चांगला नवरा मिळेल की राजकारणी बाईला ?
आणी ते writer fiter पण नको. पुस्तके लिहुन लग्न पण होत नाही का पोटही भरत नाही. आणी engineer असुन लेखीका नाही का होता येनार.
म्हणुन म्हणते चांगले मार्क मिळाले आहेत enginnering ला admission घे कशी...... इति आई.

पिंके... हे बघ मुलीला कमाई करता यायलाच हवी. तु typing चा class कर. मुलीच्या जातीला ते काम पटकन मीळते. घर ही सांभाळता येते. चुल आणी मुल बाईला सुट्ले आहे का कधी ? .........इति आजी.

शेजारच्या काकांनी १००० career options चे पुस्तकच आणले आहे. आता बसा वाचत. सारी सुट्टी पाण्यात.

खरेच मी लहान असल्यापासुन सगळे किती स्वप्न बघतात नाही का? मी कोण होणार या वर माझ्या पेकशा या लोकांनीच जास्त विचार केला आहे. जणु काही मी जन्माला आल्या पासुन मी मोठेपणी कोण होणार याची चिंता सर्या विश्वाला आहे. पण मलाही या सगळ्यात खुप interest आहे. खरेच मी कोण होउ ? का आई म्हणते तशी software engineer होउ ?
software engineer म्हणजे typing, आणी computer पण आले.
आजी आणी आई खुष. अर्थातच आई चे logic काहीही.... छे..

anyways ...all friends are going for engg. मला पण खुप आवडते computer. एकदा का त्याच्या समोर बसले की खायची प्यायची आठ्वण नाही राहत. वेळ कसा गेला कळत पण नाही. कमी मार्क असुनपण admission मिळते आहे. chalo lets become computer engineer....... इति पिंकी.

दहा वर्षानंतर.....
आज प्रिया येउन गेली आणि मी विचार ककरत बसले...

खरच कीती लोकांचे रुण आहे माझ्यावर. किती लोकांचे संस्क्रार आहेत माझ्यावर.. असंख्य. कितीतरि लोकांनी मला आपले मानले, मी कुणी तरि व्हावे म्हणुन ते झट्ले. माझे english, computer चे सर... English चच्या सरांना मी काका म्हणायचे. काकांनी मला स्वत्रंत्र विचार करायला शिकवले, आजीने मुलीचा स्वाभीमान दीला, स्वयंपाक करत असतांनाच स्वताचे अस्तित्व जपण्याचा सल्ला आणी कला. गुरुजी तर किति तरि
वेळा movies अर्धवट सोडुन माझ्यात काहीतरी वेगळे असावे म्हणुन मला शिकवायला यायचे ९० वर्षाचे असुनही खड्या आवाजात मंत्र शीकवायचे. वहीनींनी मला modern cooking दिले, आईने रोजचे, आजीने जुने पदार्थ.
आणी बाबांनी मला शिकवले "माणसाने कुठेही गेले तरि तीथल्याप्रमाणे राहता आले पाहीजे राज महालात राज्या सारखे, झोपडीत तिथल्या लोकंसारखे" हे जमावे म्हणुन ते आम्हा भावंडांना five star hotelमधे पण घेउन गेले आणी शेतावर पण.
या सगळ्या आणी अश्या अनेक लोकांच्या मेहनतितुनच तर मी तयार झाले. आज मला सगळे आठ्वुन gratitude वाट्तो आहे. प्रियाला खरेच म्हणावेसे वाट्ते. Yes I am lucky, as I was always surrounded by good people, my people. ...

गुलमोहर: 

खरेच लहानपणी मोठ्यांच्या काही गोष्टी, काही नविन शिकण्यासाठी त्यांचे मागे लागणे..
जाम राग येतो तेव्हा. पण आता त्या सगळ्या गोष्टींचा त्रयस्थपणे विचार केला कि जाणवते किती भाग्यवान आहोत आपण ते.

खुप छान.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

आपल्या जडण घडणीत मोलाचा वाटा असणार्या किती लोकान्ना आपण लक्शात ठेवतो? क्रुतज्ञता फार मोठी गोश्ट आहे.

खुप आवडले.... स्वतः बद्द्लच वाचतिये अस वाटले...