काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या.
बघा आवड्तायेत का?
अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो
शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा
वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका
पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस असेल तर)
ग्यालरी- मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन
छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन
परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'
परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ
दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन
थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव
नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
मन - साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू
ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग
विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी
विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड
श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी
IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन
चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर
लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना
-------------------------------------------------------------------------------------------
सध्या इतक्याच आहेत...
तुमच्या डोक्यात सुद्धा असतीलच ना
इथे लिहून माझं कलेक्शन वाढवा 
http://www.misalpav.com/node/
http://www.misalpav.com/node/16257
फ्याशन - शिंप्याच्या हातून
फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका
हे जाम आवडले
@चीमुरी तो माझाच लेख आहे..
@चीमुरी
तो माझाच लेख आहे.. काळजी नसावी
वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात
वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
मस्त आहेत सगळ्या व्याख्या.
कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील
कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन
>>>>>>> हे मुलामुलींचे असायला हवे....
सगळ्याच व्याख्या मस्त,
सगळ्याच व्याख्या मस्त, प्रसन्न
खुलाश्याकरता धन्यवाद
खुलाश्याकरता धन्यवाद
मस्तच. पान्ढरे केस -
मस्तच.
पान्ढरे केस - अनुभवाच्या नावाखाली डोक्याचा ताप लपवणे
मला वेन्धळेपनाचे प्रसन्ग
मला वेन्धळेपनाचे प्रसन्ग असलेलि link मिळेल का?
(No subject)
सही रे !
(No subject)
छान
मस्त व्याख्या
मस्त व्याख्या
मस्तच आहेत...
मस्तच आहेत...
मस्त रे विधुर: जन्मठेपेतून
मस्त रे
विधुर: जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
फ्याशन- शिंपी चुकला मापात अन्
फ्याशन-
शिंपी चुकला मापात अन् फ्याशन आली लोकात
मस्त, मस्त!
मस्त, मस्त!
{कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील
{कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन
>>>>>>> हे मुलामुलींचे असायला हवे....}
आशू२९,
९० टक्के मुले (मुली नव्हे) कॉलेजमध्ये मजा मारायला जात असतील; पण त्यांच्या डोक्यात हे पक्के असते की पुढे आपल्याला काहीतरी नोकरी-धंदा-व्यवसाय करायचा आहे.
९० टक्के मुली (मुले नव्हे) कॉलेजमध्ये मजा मारायला जात नसतील; पण त्यांच्या डोक्यात हे पक्के असते की पुढे आपल्याला काही (शक्यतो) नोकरी-धंदा-व्यवसाय करायचा नाही; लग्न करून नवर्याघरी जायचे आहे.
व्याख्या मस्तच! आपले
व्याख्या मस्तच! आपले मायबोलीकर आणि मायबोलीकरणी खूप हुषार आहेत. नक्कीच याच्या दुप्पट व्याख्या होतील.
सर्व वाचकांचे आभार.....
सर्व वाचकांचे आभार.....
वीज :हवी तेव्हा साथ सोडणारी
वीज :हवी तेव्हा साथ सोडणारी मैत्रीण .
काळा चष्मा(गॉगल): दुसर्याकडे
काळा चष्मा(गॉगल): दुसर्याकडे टक लावून बघण्याचे साधन.
शिक्षकः वर्गात विद्यार्थ्यांची झोप मोडणारा प्राणी.
कन्स्ल्टन्ट- कोणीही न बोलवता
कन्स्ल्टन्ट- कोणीही न बोलवता उगवणारा आणि सल्ला देणारा प्राणी
विश्वशान्ती -- आवडला
विश्वशान्ती -- आवडला

बेवडा/बेवडी - जिवंतपणी
बेवडा/बेवडी - जिवंतपणी स्वर्गाची सफर करून येणारी व्यक्ती
नवीन पाककृति: बिघडलेल्या
नवीन पाककृति: बिघडलेल्या पदार्थाचे 'गोंडस' वर्णन.
किंवा नवीन पाककृति : दोन
किंवा
नवीन पाककृति : दोन फसलेल्या पदार्थांतून निर्माण होणारा तिसराच पदार्थ
भारी!!! 'साखर' ज्ज्जाम
भारी!!!
'साखर' ज्ज्जाम आवडली..
(No subject)
Pages