इश्क आणि इष्क

Submitted by फारएण्ड on 25 November, 2008 - 21:06

काहीच्या काही कवितांप्रमाणे काहीच्या काही लेख अशी कॅटेगरी असती तरे तेथे टाकला असता. सध्या येथेच टाकतो Happy

आम्ही पूर्वी बरेच उत्खनन करून "दिल" बद्दल संशोधन केले होते. त्यात ठेवण्याजोग्या वस्तूंबद्दल अजूनही चालू आहे. पण बरीच दिले बर्‍याच गाण्यांत हरवल्यामुळे अथवा चोरीला गेल्यामुळे त्यात अडथळा येत आहे. पण शब्दकोषाचा पहिला खंड निघायला १२ वर्षे लागू शकतात तर एवढ्या मोठ्या कामाला एवढा वेळ लागतो यात विशेष ते काय?

पण हे शोधत असताना या "इश्क़" ने बरेच हैराण केले (शब्दाने. प्रत्यक्षात नव्हे) व त्यामुळे आम्हाला तो विषय मधे घ्यावा लागला. आता यासाठी पुन्हा आणखी उत्खनन आले कारण सध्या इश्क़ फक्त अधूनमधून भेटतो आणि पूर्वी त्याच्या जोडीने असणारा हुस्न तर गायबच झालाय. आजकालच्या हीरॉइन्स पाहता तो का कालबाह्य झाला असावा ते लगेच कळते. तर या संशोधनातून आत्तापर्यंत हाताशी आलेली महिती अशी:

या गोष्टीची दोन रूपे प्रचलित आहेत. पहिला 'इश्क़'. हा साधारण लखनौ ते लाहोर या भागात मिळत असावा व मुख्यत: पुरुषांकडे असावा. कारण प्रेमात 'हुस्न' आणण्याची जबाबदारी लैला वगैरेंची तर 'इश्क़' आणण्याची मजनूंची. एकतर इतर अनेक रीतींप्रमाणे स्त्रियांना इश्क़ असण्याची बंदी असावी, फक्त हुस्न चालत असे. काही गाण्यांचा नीट अभ्यास करून हे इश्क़ नक्की काय आहे ते काढायचा प्रयत्न केला, पण त्यात बराच गोंधळ झाला

"तेरा हुस्न रहे, मेरा इश्क़ रहे, तो ये सुबह ये शाम रहे ना रहे" इथपर्यंत ठीक होते. पण

"तू हुस्न है मै इश्क़ हू, तू मुझमे है मै तुझमे हू" याला आम्ही भौतिकशास्त्राचे नियम लावायला गेल्यामुळे फारच प्रॉब्लेम झाला. कारण "अ" मधे "ब" आणि "ब" मधे परत "अ" असे झाल्यावर समोरासमोर ठेवलेल्या आरशात ज्याप्रमाणे वाकून वाकून पाहिले तरी आपली प्रतिबिंबे संपत नाहीत त्याप्रमाणे ही चेन संपणारच नाही. त्यामुळे इश्क़ आणि हुस्न यांचे नक्की नाते सांगता येत नाही.

म्हणून जरा पुढच्या काळातील गाणी बघितली तर आधी असलेली माहिती बरी होती असे वाटते, कारण "इमली से खट्टा" असलेली गोष्ट "गुड से मीठा" कशी असू शकेल? त्यात तरूण पिढी तर वीकेंड ला करायच्या गोष्टी म्हणजेच इश्क़ समजते ("किसी डिस्को मे जाये जाये, किसी होटल मे खाये") नाहीतर एकदम या इश्क़ला "कमीना", "कम्बख्त" अशा शिव्याच घालते.

"हुस्नो इश्क़ की राहोमे...दिल डूबा" ऐकून ही दोन ठिकाणे आहेत व जेथे जाताना भरपूर पाणी लागते असा समज करावा तर "इश्क़ समंदर दिलदे अंदर" हे कळते.

"ये इश्क़ इश्क़ है इश्क़ इश्क़" यापासून तर भावी संशोधकांनी दूर राहावे. कारण ते ऐकल्यावर इश्क़ काय आहे पेक्षा काय नाही हा प्रश्न पडेल.

कोणाला विचारायला जावे तर "इश्क़वालोंसे न पूछो" म्हंटल्याने ती ही सोय नाही. पण एकूण हा इश्क़ जरा सुसंस्कृत (किंवा हा संधी आपल्याला मान्य असेल तर "सूर्दू") लोकांकडे जास्त असावा. याउलट दुसरा "इष्क़"

हा दुसरा "इष्क़" मात्र एकदम लावणीच्या किंवा तमाशाच्या फडातच निर्माण होत असावा. "मला इष्क़ाची इंगळी डसली", "... आज इष्क़ाचा फुलबाजा उडवा", "... हौस इष्क़ाची हळुहळू पुरवा" वगैरे मधून त्याची खात्री पटते. तेव्हाचे मध्यमवर्गीय किंवा सुसंस्कृत लोक एकदम इष्क़ाबद्दल काही बोलत नसत. पहिला इश्क़ हा प्रेमाच्या जवळ जात असावा कारण "इश्क़ मेरा बंदगी है, इश्क़ मेरी जिंदगी है" हे आणि "प्यार जिंदगी है" हे साधारण सारखेच वाटेल, पण सर्वसामान्य लोकांचे रोल असताना त्यातील स्त्रियांच्या तोंडी "इष्क़ तुझ्यावर करीते मी रे, सांगितल्याविण ओळख तू रे" किंवा "इष्क़ा, काय देउ तुला, भाग्य दिले तू मला" वगैरे टाकण्याची कोणी डेअरिंग केलेली दिसत नाही. त्यामुळे हा फडातच राहिलेला दिसतो.

शेवटी दोहोंतील फरक समजावण्यास एक उदाहरण उपयोगी पडावे: एखाद्या तरूणाने एखाद्या तरूणीला "चलो इश्क़ लडाये सनम" म्हंटले तर काय फार फार तर ती नकार देइल किंवा आरशात स्वत:चा चेहरा पाहून यायला सांगेल. पण त्या ऐवजी "चल इष्क़ाचा खेळ खेळू" म्हंटले तर मार खायचे धंदे! तेव्हा इच्छुकांनी त्याचा जपून आणि स्वत:च्या जबाबदारीवर वापर करावा Happy

गुलमोहर: 

>>> "इष्क़ तुझ्यावर करीते मी रे, सांगितल्याविण ओळख तू रे" किंवा "इष्क़ा, काय देउ तुला, भाग्य दिले तू मला" "चल इष्क़ाचा खेळ खेळू"
:):-)

    ***
    अर्धा रिकामा की अर्धा भरलेला
    वाद कशाला घालायचा ?!
    पूर्ण भरलेला मागवायचा.

    फारेंड,
    लेख आवडला.. Happy

    ~~~~~~~~~
    दक्षिणा...... Happy
    ~~~~~~~~~

    मस्त लिहिलस अमोल! Happy

    सहिच.

    <<हुस्न तर गायबच झालाय. आजकालच्या हीरॉइन्स पाहता तो का कालबाह्य झाला असावा ते लगेच कळत.>>:)

    वाह वा! काय व्यासंग आहे! सहीच फारेंडा Lol

    ------------------------------------------
    'घोड'चूक जरी केली, तरी होतो 'गाढव'पणाच! Proud

    मस्त रे इष्काचं पोस्ट मार्टेम.. Happy

    --
    आता काय सही ठेवावी बरं..?

    >> ज्याप्रमाणे वाकून वाकून पाहिले तरी आपली प्रतिबिंबे संपत नाहीत
    >> एकतर इतर अनेक रीतींप्रमाणे स्त्रियांना इश्क़ असण्याची बंदी असावी, फक्त हुस्न चालत असे.
    सही लिहीलेय. खूप हसले. पण ते दात दाखवणारी किंवा हसून गडबडा लोळणारी भावली इथं कशी द्यायची ते माहिती नसल्यानं Happy

    अरे सगळ्यात गाजलेले इश्क राहिलेच कि रे. जिनके सर हो इश्क कि छांव !!! Happy

    पुढचा भाग लिहि रे ....

    फारएंड, इस इश्क ने कर दिया नाकाम वरना....
    मस्तं झालाय लेख. सगळीच हिंदी मराठी इश्कं घ्यायची झाली तर धोधो वाहिला असता लेख, नाही?
    (माझा लेक लहानपणी 'ये इसको उसको ये इसको उसको' असं 'ये इश्क इश्क है इश्क इश्क' म्हणतोय असं समजून ओरडत घरभर फिरत असे)
    -----------------------------------------------------
    दम लिया था न कयामत ने हनूज
    फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

    उशीरा भेटलात, गुरू.....जी !

    विशाल कुलकर्णी.
    नवी मुंबई.

    इष्काचं पोस्ट मार्टेम.... लय भारी.

    लोकहो धन्यवाद. छोटा झालाय हे खरे. 'मेरे मेहबूब तुझे...' मधल्या हुस्न व इश्क यांच्या टकरीतून सांडणार्‍या गाण्यांबद्दल वगैरे लिहायचे होते, पण फारसे काही सुचेना. तेव्हा उगाचच शब्द उकरून काढण्यापेक्षा जेवढा जमला तेवढा टाकला Happy

    हा वाचलाच नव्हता मी Sad मस्त खुस्खुशीत झालाय. दिलवाला पण वाचून काढला, तो पण मस्त Happy

    मस्तच लिहीलंय की ..

    हे 'इश्क' आणि 'इष्क' प्रकरण मला माहीतच नव्हतं .. "इष्क़ तुझ्यावर करीते मी रे, सांगितल्याविण ओळख तू रे" किंवा "इष्क़ा, काय देउ तुला, भाग्य दिले तू मला" >>> Lol

    त्यामुळे इश्क़ आणि हुस्न यांचे नक्की नाते सांगता येत नाही.
    << काहीतरी नातं सांगायचा प्रयत्न केलाय ' जवानी झिन्दाबाद' मधे Proud

    हुन्स इश्क कि यही कहानी
    हर दिल कि जानी पहचानी
    मिला जहां पर आग और पानी
    दुनिया कहती उसे जवानी !

    थोडक्यात हुस्न + इश्क = आग + पानी = जवानी Biggrin


    एकतर इतर अनेक रीतींप्रमाणे स्त्रियांना इश्क़ असण्याची बंदी असावी,

    <<< Biggrin बरोबर
    घईंनी मात्रं थोडं उल्लंघन करून अ‍ॅश ला एक डुएट आणि एक सोलो देऊन म्हणून घेतलय
    इश्क बिना क्या जीना यारा, इश्क बिना क्या मरना
    गुड से मीठा , इमलीसे खट्टा.. हर सच से सच्चा, हर झूठ से झूठा वगैरे वगैरे पण अर्थात तरीही त्यातही पुरुषी आवाजाचा कोरस घुसडलाच आहे Proud

    हुस्न इश्क पासून पुढे मला एकदम शक्ती कपूर बोलतोय असं वाटत होतं. त्याच्या आवाजात, त्याच्या तोंडी अगदी फिट्ट बसते जवानी चे हे रसग्रहण. Proud

    Pages