कुजबूजः "ठिय्या आंदोलन"

Submitted by योग on 24 November, 2008 - 08:19

कुजबूज

खर तर एक अतीशय नम्र विनंती करून देखिल इथल्या महान कुजबूज लेखिकेने दाद न दिल्याने शेवटी या पामराने ते काम हाती घेतले. अब ये हमारी औकात नही है हे पूर्ण माहित असूनही औकात असणारे बहुतेक सर्व एकतर स्वच्छता मोहिमेत किव्वा अवघ्या जगताचा अन्धार दूर करण्यात गुंतले असल्याने ही नसती उठाठेव का काय ती आम्ही उचलली आहे. तुम्हिही पेलून घ्या म्हणजे झाल.

तर, गझल कार्यशाळा बंद झाल्यापासून आपली अंतरीक तळमळ किव्वा बोटांतील स्फुरण यास "लेआऊट" न मिळाल्याने अलिकडील बर्‍याच कविन्नी गुलमोहराखाली एक ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.. खर तर सर्व जगात "लेऑफ" चा हाहाक्कार माजला असताना असल्या निरर्थक कामासाठी यान्ना वेळ तरी कसा मिळतो असा प्रश्ण आम्हाला पडला होता.. किम्बहुना "अर्था"च्या बद्दल चर्चा करणारे कवितेशी सम्बन्धीत कसे असा बी प्रश्णही उपसथित करून देखिल या आन्दोलनाचा वा आंदोलकांचा जोर जराही कमी झालेला नाही. अर्थात कार्याशाळेसारखी कुठलिही बन्धने नसल्याने या फ़्री फ़ॉर्म आन्दोलनात फ़ार उत्साहाने भाग घेतला जातोय असेही ऐकीवात आहे. ठिय्या आंदोलनात "चार ओळी तरी पहाव्या लिहून" ही थिम असल्याने तिरळे, चारोळी, संपुटके, स्फ़ुट, करूणाष्टके या अश्या कुठल्याही काव्य प्रकराचा "गजर" चालू आहे.

यातील काही निवडक कवितातील निवडक मिसरे (चुकून मिश्रा लिहीणार होतो, पण भलतेच आन्दोलन पेटायचे) :
कवितेची लक्षणे:
शब्दामाजी जी मोकाट, नसे अर्थाचा बोभाट
साक्षात यमकाचे पेकाट, ती एक कविता !

डायेटींगः तीला सांगायचे आहे की:
या घरात काहिही नविन खायला नसत
सर्व काही कालचच उरलेल असत
कुणाला त्याचही भान नासत
त्याच काय करायच हे फ़्रीजलाही कळत नसत
इथे भुकेलेल कुणीच नसत..

माझे जीवन माझी लाँड्री:
मि उद्यापासून येणार नाही
इथे रहायला जमणार नाही
दारात खेकसून भैय्या गेला
परत फ़िरून आला नाही..
मि धुण शिकलो नाही
कधी बनियनही धुतला नाही
भैय्या नसल्याने लोचा झाला होता
घराचा धोबीघाट झाला होता
..
..
बादली भरून ठेवली आहे
रीन ची वडी घेतली आहे
नव्या ब्रशचा आधार आहे
माझा विचार पक्का आहे
बनियनपेक्षा गोणपाट बरा आहे.

मिलन सुपारी: दुपारवेळा
उतरली गळ्यात अलगद माझ्या
ढेकर दिल्यावर दुपार वेळी
दाटुनी आला मग नाकामधूनी
गन्ध तीचा मदमस्त आगळा

व्याकुळले मग पंचप्राण मम
चाखण्यास ती लालसर सोळा
श्वास दाढेचे मग वाढले कडकड
मुखात येताच मिलन सुपारी भुगोळा...

अशा एक ना अनेक "नाना"विध कविता करता करता शेवटी सन्ध्याकाळ येवून ठेपली. एव्हाना उन्हाने सर्व कवयित्री भगिनींचे सनस्क्रीम वितळून गेल्याने त्यांच्या सावल्याही "सावळ्या" झाल्या होत्या. त्यातूनही आंदोलकान्ना स्फुरण चढत होते:

सांज सावळी
मि येथे एकटी सावळी सावळी
माझे पाकीट गर्दीत मारले जीने तिही होती सावळी
हर हर महादेवी म्हणते प्रत्त्येक मावळी
ठिय्या आंदोलनाचे आम्ही गोन्धळी.

या सावळ्या रंगात मग रात्र उत्तरोत्तर अधिकच रंगत गेली असे कळले.. त्या "रात्र रंगाची", "नशा" चढताना कुठे विट्ठल माउली तर कुठे चक्क मोनालिसाचे दर्शन आम्हाला होवू लागले.. सारा निव्वळ द्रुष्टीकोनाचा खेळ झाल. अगदी दृष्ट लागण्य सारखा सोहळा होता तो.. नाहितर "माझिया आंदोलनाला लावू नका डोळे" (नजर) अस तिथल्या माउलिन्नी उगाच म्हटल नसत..

पण, परंतू या आंदोलनाने आधिच हैराण झालेल्या गुलमोहर रक्षकांना मात्र खावू का गिळू असे होवून बसल. या आन्दोलनातील कविता दिवसभर गळी उतरवल्याने इथल्या महिला वर्गाला चक्क "अजीर्ण" झाल्याची लेखी तक्रार सरकार-दरबारी नोन्दवली आहे:
"कवितेच अजीर्ण झाले आहे, एकामागून एक आग्रह होतो आहे, नाव वेगळे असले तरी रेसीपी तीच आहे, हे नक्कीच संजिव कपूरच कारस्थान आहे, नुसत बघूनच डोळे फ़िरायची पाळी आली आहे, पाचक रस झिरपतच नाहियेत, थोडी थोडी गॅप घेवून वाढले तर पचायला बरे पडते.."
यावर आन्दोलनातील कवितांच्या आग्रहाने प्रभावित झालेली एक नविन पेशंट गुलमोहरावर आली म्हणली:
"पित्त"
"तू कितिही नाही म्हणलीस तरी हे पित्तच आहे
पण सांगायच कस हाच मनात पेच आहे
हो म्हणलीस तर उपासाच संकट आहे
नाही म्हणलीस तर ओकारीची शक्यता आहे
उपास करायचा का ओकारी काढायची
एव्हडाच एक प्रश्ण आहे
बाकी तुलाही पित्तच आहे.

या अशा बोलण्यावर काय कप्पाळ प्रतिक्रीया देणार अस म्हणून वैतागून खर तर बर्‍याच लोकांनी याकडे दुर्लक्ष केल होत पण नेमकी एका "सत्यवचनी" गृहस्थाने जाहीर विनंती करून याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले:
"स.न.वि.वि." (यातला दुसरा वि दीर्घ लिहीला म्हणून शाळेत बाईन्नी मराठीच्या पत्रलेखन या प्रकारातून आम्चे दोन मार्क कमी केल्याचे आठवते!) अशी आदरपूर्वक आदबीने मायन्याची सुरुवात केल्यावर पुढे मजकूर काय असेल याची उत्सुकता होती पण त्यान्नी खास पुणेकर स्टाइल मधे एका वाक्यात "इथे कविता लिहू नयेत अन्यथा कुत्रे अंगावर सोडण्यात येईल" असे लिहील्याने या वार्ताहाराला या ठिय्या आंदोलनाकडे विशेष लक्ष देण भाग पडल. तरिही कुत्रे अंगावर सोडल तर बातमी होत नाही, माणूस कुत्र्याला चावला तर होते असे काहिसे अस्पष्ट कानावर आले.

अन्यथा गुलमोहरावरील इतर धांगड धिन्गा आमच्या नजरेतून सुटला नसता..तरिही थोडी फ़ार कुजबूज आमच्याही कानी आलीच:
सुजा पण रुजू नका असा मोलाचा सन्देश तपश्चर्येतून पुन्हा गुलमोहरावर आलेल्या पेशव्यान्नी दिल्यानंतरही “मि रुतून बसलो आहे” पायाखालची वाळू सरकलि आहे असा एक आकांत परागकण यान्नी केल्याचे कानावर आले. अलिकडे नेपाळमधे जंगलात साधना करून पुन्हा "माणसात" परतलेल्या buddha incarnation ची चर्चा अन पेशव्यांचे अचानक दर्शन यात काही "झेनदुवा" आहे का याची आम्हाला शंका आहे. ईथल्या ठिय्या आन्दोलनात अनेकांच्या अनेक कलाक्रुती भरडून निघाल्या त्यामूळे खर्‍या साहित्त्याला लेखक व वाचक दोन्ही मुकले असल्याचा सूर ऐकू आला. आन्दोलन, आकांत, अन जागतीक मंदी अस इतक उदासीन वातावरण असतानाही "मी माझ्या बापाशी कधी बोललो नाही, तो हिटलर होता, जर्मन मधे लिहायचा" असे म्हणत नानान्नी एकीकडे सहानुभूती मिळवली तर दुसरीकडे या भकास वातावरणातही आता युध्धानेच ही आर्थिक मंदी मार्गी लागेल अशी एक sadistic pleasure असलेली चर्चा करायला केदारजोशी यान्नी मागे पुढे पाहिले नाही. माणसाने किती अर्थाच्या मागे धावायचे याला काही सीमा? तरिही इतकी उतरती कळा लागली असताना कुठल्याही लिखाणाला चांगलीच दाद द्यायची यावर ठाम विश्वास असणार्‍या दाद ने "smile please" म्हणून वाचकांना थोडे हसवायचा प्रयत्न केला.

एकीकडे हा गदारोळ चालू असताना दुसरीकडे ATS, मालेगाव, यावर तीच चर्चा वेगवेगळ्या BB वर चालू होती. vpuranik यांनी मराठी मनुष्य या ज्वलंत विषयाला हात घातल्याने त्यांचे हात चांगलेच भाजून निघाल्याच आम्हाला कळल. दूरदेशी (LA) राहून भारतीय स्थानिक प्रश्णांना अशी उगाच झणझणीत फोडणी घालणार्‍यांन्नी यातून काय तो धडा घ्यावा. तरी हात किती भाजले याची "आकडेवारी" मागवून त्याची रितसर चौकशी करण्याचे दूर देशीच्या "डॉक्टरांचे" मनसुबे आहेत असही कळल.

बरीचशी जुणि ज़ाणती होतकरू मंडळी ही साफ़सफ़ाई, सामाजिक स्वच्छता, सार्वजनिक बान्धिलकी, मदत गट, अशा अभियानांमधे अडकून पडल्याने सध्ध्या गुलमोहरावर फ़क्त या ठिय्या आन्दोलकांचा सुळसुळाट आहे. स्वच्छता अभियानात मात्र "स्त्रीयांचे भारी हाल होतात" पुरुषान्ना काय चालून जात असा एकांगी सूर आल्याने त्या बाबतीत जाये तो जाये कहा असा तात्विक प्रश्ण निर्माण झाला आहे. आम्चे इथले दिवंगत मित्र धोंडोपंत म्हणले असते, "शिंची एक चिमूट भरून चुट्टा ओढायचा तर कुठे "बसावे" हा प्रश्ण आहे!" चुट्टा तम्बा़खू शिवाय काहिन्ना कळ येत नाही हे वेगळे सांगायला नको, किम्बहुना तोही एक आरोग्याचा प्रश्ण आहेच, त्याचेही अभियान हवेच.

गायब हस्तव्यावसायिक, चित्रकारांची वानवा, छायचित्रकारांची "नीलकमलातील" भुन्ग्यागत स्टेप बाय स्टेप होणारी अधोगती, कथा, कादंबरी, ललित पैकी नक्की काय याचा उडालेला वैचारिक गोन्धळ, व्यंगचित्रातील नावालाही न उरलेल व्यंग, आपल्या खमंग फोडणि अन वेगवेगळ्या रेसिपींन्नी इथे घमघमाट पसरवणारे अन अलिकडे परागंदा झालेले मायबोलिकर, विनोदाच्या नावाखाली आम्हाला पहावी लागणारी "पाळीव प्राण्यांची" सर्कस.... हे सर्व पाहता जागतिक मंदी इथेही येवू घातलीये का असा प्रश्ण पडतो. नाही म्हणायला आपल्या गत "वैभवाची" साक्ष म्हणून एकाच दिवाळि अंकाच्या पाच लिन्क्स मुखपृष्टावर ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील पंचतारांकीत विभागापेक्षा सारेगमप च्या उपग्रह वाहिनी बीबी वर जास्त “हीट्स” आहेत हे बहुदा संचालकांच्या नजरेतून सुटले आहे.
पुढील दिवाळी अंकात, "पाऊसनाट्यम" (ट वर आघात होतोय, याची मराठी गझल्-व्याकरण कारांन्नी विशेष नोन्द घ्यावी!) याची थोडी ओळख, माहिती देवून मग त्यावर थेट मा.बो. वर्षाविहाराची विडीयो क्लिप दाखवण्याचा बेत आहे असे कळले. अगदीच नाही तर गेला बाजार मातीत बुडलेले हात पाय दाखवण्याचा विचार आहे असे कळले.(या अंकातील ते करंज्या करणारे हात उलटे नाहीत ना याची अस्मादिकास जाम म्हणजे सॉल्लीड भिती होती..). या जोडीला बाल्-गोपालांसाठी एक ते दहा पाढे वाचन, संगीत प्रेमिंसाठी "संगीत चक्र" (भुईचक्र loaded with songs), खवैय्यांसाठी "शेवयीच्या लवंग्या" चे प्रात्त्यक्षिक इत्त्यादी कल्पनातीत गोष्टी करण्याचे विचार आहेत असे कळले. सम्पादकांच हे "कल्पनेच वारूळ" बुजलं नाही तरी भिजेल नक्कीच! मा.बो. करांन्ना अशी व्हरायटी नक्कीच आवडेल यात आम्हाला तिळमात्र शंका नाही. त्याबद्दल पुन्हा कधितरी..

एकंदरीत ठिय्या आन्दोलनाच्या या गलक्यात इथली सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडल्याचे निदर्शनास आले: मुखपृष्ठाच्या भलत्याच लिंक वर भलतेच दिसते आहे. काल परवा "मराठ्यांचा इतीहास" पाहिला गेलो तर "सोबतीचा करार" वर जावून पोचलो.. "सुपंथ धरावा" म्हटले तर चम्पक च्या रंगीबेरंगी वर जावून थडकलो. यातून काही सर्वसमावेशक असे मार्केटींग वगैरे हेतू आहे काय याची शंका येत आहे. मराठी चा खास हट्ट धरणार्‍या (read वाट्टेल ते वाट्टेल तिथे टाइपणार्‍या) इथल्या मा.बो. करांसाठी आता "कानोकानी" नावाचे नवे पान उघडले आहे म्हणे. इथल्या चर्चा, विषय अन नवनवीन सदरे याला कुठलाही निर्बंध न राहिल्याने हा लोंढा या नविन पानावर ढकलला जातोय अस काहींच मत आहे तर "हे मा.बो. च्या वाढत्या व्याप्तीच लक्षण आहे" असाही एक मतप्रवाह आहे. समांतर हितगूज चालवायचे मनसुबे असणार्‍यांन्ना ही मोलाची संधी आहे तर"मला ऐकू आलेली चुकीची गाणी" या कारट्याचा हा "पुनर्जन्म" आहे असे आम्ही मानतो. उद्या तिथेही हौशी गौशी साहित्त्यिकांचा राबता वाढला तर त्याच नाव बदलून "कानाखाली .. .. " अस करणार का असा एक परखड सवाल विचारावासा वाटतो.

एकंदरीत हा "सुपातून जात्यात" असा प्रकार आहे काय अशी मात्र शंका आहे..

या सर्वाला जबाबदार कोण, हे सर्व कधी बदलणार, यावर तूर्तास तरी वार्ताहाराकडे काही ठोस उत्तर नसल्याने मुखपृष्ठावरील अशा अनेक लिन्क्स च्या खचात खच्ची होवून जाण्याआधी तुम्ही गुलमोहरावरील कायदा, सुव्यवस्था, शांती, सत्वगुण यासाठी पसायदान मागा:
"दुरितांचे तिमीर जावो...."

ता.कः हे सर्व "विनोदी साहित्त्य" यात लिहीले आहे याची वाचकान्नी नोन्द घ्यावी.

गुलमोहर: 

योग, धन्यवाद. तुम्ही माझ्या मनातील दु:खाला लिहून काढले! अहो त्या कवितेच्या धाकाने आजकाल मायबोली वाचायची भीति वाटू लागली आहे. आपले गद्यच मधे नधे तोडून दोन ओळित लिहीले की कविता होते असे वाटायला लागले आहे. जसे:

आहे काय नि नाही काय?

आपले गद्यच ...
मधे मधे तोडून,
दोन ओळीत लिहीले
की कविता होते.
आहे काय नि नाही काय?
जेंव्हा मनातील हळव्या भावना,
काव्य लिहा म्हणतात
पण यमक जुळत नाही,
तेंव्हा आपले गद्यच ....
आहे काय नि नाही काय?

>>बाकी तुलाही पित्तच आहे.

Lol

शेवटी झक्कींनांही मोह आवरला नाही. मग आमच्या सारख्यची काय कथा. Rofl

झक्की.. Lol
कुठे दडवून ठेवलं हो तुमचं काव्य?
असो. ह्या निमित्ताने ते बाहेर पडल्याचं क्रेडिट (आयला, हा बहूतेक विंग्रजी शब्द!!) 'योग'ला!

शुध्द मराठीत 'हाय काय नि नाय काय' असे म्हणतात का हो?

दिवे घ्यायला सांगू नको ना? Happy

--
भेटण्याआधीच ठरलेली असते वेळ जेव्हा जायची-
शहाण्या मुलासारखी खेळणी आवरून घ्यायची..!!

नोस्टॅल्जिया :

ते-तुझे सुन्दर दिवस
र-डतखडत कविता पाडण्याचे
ड्या-श ड्याश करत टिपे गाळणे
चा-तक थोडाच त्याला चोच लावेल !

रं-धा मारून कवितेचा
ग-लितमात्र केलंस गुलमोहराला

ती-र मारून काव्यांचा
न-यनी पाणी काढलेस

दि-वाभितागत कुठे गेलास?
व-टसावित्री वाट पहाते
स-त्यवानाची गुलमोहराखाली !

तुम्ही गुलमोहरावरील कायदा, सुव्यवस्था, शांती, सत्वगुण यासाठी पसायदान मागा:
"दुरितांचे तिमीर जावो...." >>>

मनाचे श्लोक जाऊन "मनचे श्लोक' येऊ लागले आहेत....त्यामुळे "कवितांचे समीर जावो"...असे म्हटले तर ते वावगे ठरू नये!

कुठे दडवून ठेवलं हो तुमचं काव्य?
धन्य! आता हेहि 'काव्य?' कालीदासादि सर्व संस्कृत कवि, बालकवी इ. सर्व मराठी कवि, नि येथील सर्व गझलकार यांचा एव्हढा घोर अपमान?

>>करंज्या करणारे हात उलटे नाहीत ना याची अस्मादिकास जाम म्हणजे सॉल्लीड भिती होती.. Happy

>>बाकी तुलाही पित्तच आहे... >> Lol
१ नंबर लेख.

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

कित्ती कित्ती छान लिहिलं आहेस, योग..... Happy

>>तू कितिही नाही म्हणलीस तरी हे पित्तच आहे
>>बाकी तुलाही पित्तच आहे.

ता. क. Lol

ता.कः हे सर्व "विनोदी साहित्त्य" यात लिहीले आहे याची वाचकान्नी नोन्द घ्यावी. >> हे आधी लिहायच ना.. Happy

दाद,
धन्स! भरून पावलो... Happy
सत्त्या,
लयीच धसका घेतलेला दिसतोयस..:) पण मि हतबल आहे कारण ता.क. हे मराठी साहित्त्यात लेखनाच्या शेवटी लिहीतात, सर्व जेवणाच्या शेवटी ताक पितात तसेच..

पित्त खास आहे Lol
------------------------------------------
'घोड'चूक जरी केली, तरी होतो 'गाढव'पणाच! Proud

योग .. थंडी बाधते, पाणी बाधत तशी तुला कविता बाधली आहे Rofl :ह हगलो... काय पण स्माईली आहे. २-३ वाचला हा टकल्यावर काय होइल ह्याची खात्री नाही.. असो

>>योग .. थंडी बाधते, पाणी बाधत तशी तुला कविता बाधली आहे Lol
मात्र योग, हितगुजावरच्या कविते बाबतीत काहीच नाही.... बहुतेक गुलमोहराच्या आंदोलनाचा ज्वर हितगुजला पण लागला आहे.

हा हा, असे चालू आहे काय सध्या... Happy

धमाल धमाल योग म्हणतात तो हाच का? Biggrin सहीच.

~~~~~~~~~~~~
ज्याचा त्याचा प्रश्न!!
~~~~~~~~~~~~

ओहो,
हाय काय नी नाय काय?
कसं काय?
बरं हाय का नाय हाय?
काय खरंय?
काय खोटंय?
कोण हाय?
कोण नाय.....
माझं नवं काव्य Lol

Biggrin
************************
अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधिला पेटली न वात...
************************

पल्ली !!! तू
फारच विनोदी
कविता करतेस
हां हल्ली!!! Lol

हि माझी नवकविता आहे... Happy