तंत्रज्ञान

कंटेंट डिलिवरी नेटवर्क सर्विसेस (CDN Services) बद्दल माहिती हवी आहे

Submitted by वैजयन्ती on 17 November, 2014 - 01:43

आम्ही ऑनलाइन PMP Certification ट्रेनिंगसाठी वेबसाइट तयार करत आहोत.
ट्रेनिंगचे विडिओ आणि इतर साहित्य ठेवणे / आमच्या साइटवर चांगल्या वेगाने डिलिवर होणे यासाठी कंटेंट डिलिवरी नेटवर्क (CDN Services) सर्विसेस वापरायचा विचार आहे. या सर्विसेस बद्दल आणि सप्लायर्स बद्दल काही माहिती नाही. या सर्विसेस बद्दल माहिती मिळवणे हा या धाग्याचा उद्देश आहे.
अशा सर्विसेस बद्दल माहिती असेल किंवा वर उल्लेख केलेल्या वेबसाइटसाठी कोणाच्या काही सूचना असतील तर जरूर सांगा.

वॉटर प्रूफिन्ग बाथरुम्स आणि त्या लगतच्या भिंतींसाठी

Submitted by mansmi18 on 16 November, 2014 - 04:16

नमस्कार,

घरातील बाथरुम लगतच्या भिंतीमधे ओल आलेली आहे. एका वॉटरप्रूफींग मधल्या माणसाकडुन वॉटर प्रुफिंग करुन घेतले. त्याने बाथरुममधल्या फ्लोअर मधे दोन होल्स पाडुन त्यात एक केमिकल टाकले जवळपास ५० लिटर..(र, २५०/लि. प्रमाणे.)पण नंतरही ओल कायम आहे. (जवळपास २० हजार खर्च झाले आहेत.. त्या माणसाला विचारले तर तो काहीतरी सबबी देत आहे) काही प्रश्नः
१. वरील प्रोसेस बरोबर वाटते का?
२. डॉ. फिक्सिट कोणी वापरले आहे का? ते इफेक्टीव आहे का?
३. (पुण्यात) कोणी वॉटरप्रुफिंग करुन घेतले असेल आणि चांगला अनुभव असेल तर त्या काँट्रॅक्टर/कंपनीचे नाव शेअर कराल का.
४. साधारण एका बाथरुम साठी (८ X 10) किती खर्च येतो?

संपूर्ण जगाची सफ़र अवघ्या ५,०००/- रुपयात

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 31 October, 2014 - 07:26

आज सर्वत्र चिंतामणी प्रदर्शित होत आहे. एक जाहिरात तुमचं आयुष्य बदलू शकते का? हे वाक्य या चित्रपटाच्या प्रसिद्धीत ठळकपणे समोर येत आहे. चित्रपटात नेमकं काय आहे हे मला ठाऊक नाही, पण या वाक्यावरून सुमारे तीन दशकांपूर्वी आकाशवाणी पुणे केन्द्रावर रात्री ऐकलेले एक नाटक आठवले. ह्या नाटकाचे कथासूत्र मला लक्षात होते पण नाटक जसेच्या तसे पुन्हा कधीच कुठेही पाहायला / वाचायला / ऐकायला मिळाले नाही. माझ्या आठवणीत असलेल्या कथासूत्रानुसार मी पुर्वीच यावर एक स्वैर रुपांतरीत कथा लिहीली आहे.

संगीत समारोह ध्वनिमुद्रित करताना ध्वनिमुद्रणाचा दर्जा कसा सांभाळावा ?

Submitted by षड्जपंचम on 21 October, 2014 - 06:00

संगीत समारोह ध्वनिमुद्रित करताना ध्वनि मुद्रणाचा दर्जा कसा सांभाळावा कुणी सांगू शकेल का? मुख्यत: एखाद्या मोठ्या सभागृहात बर्याच वेळा गाणे किंवा वाद्यवादनाशिवाय इतर आवाज येतात … तसेच आवाज घुमतो आणि रेकॉर्डिंग खराब होते.

professional पद्धतीने हे कसे केले जाते तेही सांगावे ……

जावा की SQL,PLSQL

Submitted by sneha1 on 14 October, 2014 - 09:52

आय आयटी मधे नवीन आहेत त्यांच्यासाठी सोपे काय आहे? जावा की SQL,PLSQL? इथले जाणकार मदत करू शकतील का?
धन्यवाद!
-------------------------------------------------------
सॉरी, मी सकाळी खूप घाईत पोस्ट टाकली..ऑफिस मधून रिप्लाय देता आला नाही. आता नीट सान्गते.
मी ओरॅकलचा कोर्स केला, SQL , PL / SQL चे दोन्ही सर्टिफिकेशन केले. मग जावाच क्लास केला आणि नवीन जॉब मिळाला. सध्या तरी थोडे कठिण वाटते आहे. SQL , PL / SQL च्या जॉबचा अनुभव नाही पण ते सर्टिफिकेशन करताना तरी सोपे वाटले होते.

मोबाईल कॉल हिस्टरी

Submitted by हर्ट on 6 October, 2014 - 10:53

मला एक मदत हवी आहे त्वरित. धन्यवाद.

मोबाईलमधे जी कॉल हिस्टरी असते ना.. कुणाचे फोन आलेत, कुणाला केलेत आणि कुणाचे मिस झालेत तर ती यादी प्रिपेड आणो पोस्टपेडसाठी वेगवेगळी असते का? जर ह्या यादीतून एखादा फोन डीलीट झाला असेल तर (म्हणजे फोन नंबर डिलीट झाला असे म्हणत नाही तर यादीतून फक्त डीलीट झाला असेल तर ) तो परत त्या यादीत आणता येतो का? कसे?

आणखी एक, आपल्या मोबाईलला दोन प्रकारच्या मेमरीज असतात. एक जी फोनच्या आत असते आणि दुसरी जी फोनमधे टाकलेली असते. ही दुसरी मेमेरी बाहेर काढता येते. तशी ही पहिली मेमेरी बाहेर काढता येते का?

फोटोची साईज कमी करायची आहे

Submitted by वेल on 1 October, 2014 - 12:07

मायबोलीवर काही फोटो अपलोड करायचे आहेत. १६३ केबी पासून ४५० केबी साईज आहे. मोबाईलने काढलेल आहेत फोटो. मोबाईलमध्ये क्रॉप करून साईज थोडी लहान झाली. पण तरी ४५० केबीची साईज २५० केबी च्या खाली उतरत नाही. काही ऑनलाईन वेबसाईटस वापरून पाहिल्या त्या इमेज साईज कमी करायच्या ऐवजी वाढवत आहेत.

शब्दखुणा: 

xsd files कशा compare कराव्यात?

Submitted by sneha1 on 19 September, 2014 - 23:23

मला दोन xsd files compare करायच्या आहेत. दोन्हीमधे सुरुवातीचे काही एलिमेंट्स सारखे आहेत, पण शेवटचे वेगळे आहेत. काही एलिमेंट्स ना सब रूट्स पण आहेत. दोन्ही फाईल्स भरपूर मोठ्या आअहेत.
मला दोन्हीची तुलना करायची आहे. म्हणजे फाईल A मधले असे एलिमेण्ट्स हवेत जे B मधे नाहीत, आणि ह्यामधे रूट लेव्हल, सब लेव्हल, सगळेच एलिमेंट्स हवेत जे additional आहेत. कोणी मदत करू शकेल का प्लीज?

नाव सुचवा IT Company साठी

Submitted by श्रीनिका on 19 September, 2014 - 10:10

कसं असतं ना मनाचं.. कुणी आपल्याला मदत करतयं म्हटलं की अजून मदत मागावीशी वाटते Happy
नवरोजींच्या मित्राला IT Company साठी नाव हवयं. म्हणून आजचं साकडं....

मदत/ माहिती हवी आहे

Submitted by रश्मी. on 11 September, 2014 - 07:29

हॅलो मला एक मदत हवी आहे. माझ्या मैत्रिणी च्या भावाने, जो सन्गणक शिकत आहे,नवीन हार्ड डिस्क बसवण्याकरता जुन्या हार्ड डिस्क मधुन बॅक अप घ्यायला सुरुवात केली. पण काही कारणामुळे जुन्या डिस्क मधल्या बर्‍याचश्या फाईल्स/ डॉक्युमेन्ट्स उडुन गेले. जे होत असते.

दुर्दैवाने त्यातली गाणी आणी काही नवीन गोष्टी तो सिडी वर कॉपी करायचा विसरला. त्याने नेटवरुन सर्च केला, पण काही समजत नाहीये.

याला काही उपाय आहे का? की जेणे करुन त्याला त्या फाईल्स परत बघता येतील?

Pages

Subscribe to RSS - तंत्रज्ञान