व्हिडीओ

तुझा विरह!

नेहमीप्रमाणे आज मित्राच्या घरी त्याच्या शॉर्ट फिल्मच्या स्टोरीबद्द्ल आंम्ही काही महत्त्वाच बोलत बसलो होतो. सहजच म्हणुन मी त्याच्या कप्युटरवरुन यु ट्युबवर काही नवीन व्हिडीओ आले आहेत का ते चेक करत होतो. आणि त्याचवेळी मला एक व्हिडीओ भेटला. एका मांजराचा होता तो! जो आपल्या साथीदाराच्या जाण्याने अगदी दु:खी झाला होता. ती मांजर गतप्राण होऊन त्याच्यापुढे पडले होते आणि तो मात्र तिला हलवुन उठवण्याचे निष्फळ प्रयत्न करत होता. ते पाहुन मन कसेसेच झाले. प्राण्यांनाही भावना असतात याची जाणीव मला त्यावेळी झाली. तो व्हिडीओ पाहताना मात्र माझे डोळे अक्षरशः अश्रुंनी डबडबले होते.

व्हिडिओ क्लिप स्प्लीटींग

0

माझ्याकडे एक व्हिडीओ आहे १३ मिनीटांचा. यु ट्युब वर फक्त १० मिनीटांचा व्हिडेओ अप्लोड करता येतो असे वाटते. कारण माझा व्हिडीओ दोन वेळेस रिजेक्ट झाला.

त्या १३ मिनीटाच्या व्हिडीओ चे दोन छोटे भाग केले तर ते चालेल असे वाटते.

ते कसे करतात?