कथा

राजाराम सीताराम एक ............भाग ११.........पिटी परेड

अधांतरी

"पाच मिनिटात निघू" पर्स खांद्याला अडकवत सविताने गाडीच्या किल्ल्या विनयसमोर नाचवल्या.
चहाचा घोट घेत विनयचे डोळे टी. व्ही. वर खिळले होते.
"तू ऐकतोयस का?"
वाफाळलेल्या कपातून घोट घेत त्याने तिच्याकडे पाहिलं.
"तू ऐकतोयस का असं विचारलं मी."
"नाही"
"नाही काय? टी. व्ही. नंतर बघता येईल."
"बातम्या ऐकायचा प्रयत्न करतोय."
"असं काही विशेष घडलेलं नाही. दिवसभर तेच तर ऐकवतात. नंतर ऐक. दिवस रिकामा असतो तुला." विनयच्या कपाळावर आठी उमटली.
"तू ठेवू देतेस का दिवस रिकामा?" चढ्या आवाजात त्याने विचारलं.
"नाही ना, दिला तर नुसत्या झोपा, खाणं आणि टी. व्ही. एवढंच करशील तू."

....... ए .... वेटर...!!.......

जय हो !

सेठजींकडे स्वामीजींचे आगमन झाले .
स्वामीजींच्या भरगच्च कार्यक्रमाचा प्रचार अन् प्रसार व्हावा ह्यासाठी पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले .
सर्व काही सुरळीत सुरु होते . शांतपणे .
पण काही नवशिक्या अतिउत्साही तरुण पत्रकारांनी नाक खुपसलेच .
' स्वामीजी ! आपण प्रत्येक ठिकाणी फक्त श्रीमंतांनाच आपल्या आतिथ्याचा लाभ देता असे का ? ' एकाने विचारले .
' सुंदर ! अतिशय सुंदर ! ! ' स्वामीजी मंद स्मित करून म्हणाले , ' अशा प्रश्नांनीच आमची भूमिका स्पष्ट होण्यास मदत होते . '

चपलेवर चप्पल

"हल्लो, अरे काय? येऊ ना परवाच्याला?"
"अगं हो, ये की, मी वाट पाहतोयच."
"अरे मग सांगणार कधी?"
"आत्ता सांगतोय ना?"
"बरं. शार्प अ‍ॅट ट्वेल्व, चालेल?"
"के, डन!"

मनालीशी बोलून फोन बाजूला ठेवत विनायक हापिसातल्या खुर्चीवर रेलत-रेलत 'जाने कहाँ गए वो दिन' मोड मधे गेला. चारेक वर्षांपूर्वींची ओळख, मग जवळीक अन् मग बरंच काही. ती मॅरीड असूनही आपण गुंततोय हे जाणूनही गुंतत गेला. तिचंही तसंच काहीसं. चूक-बरोबर, खरं-खोटं सार्‍याचा विचार बाजूला ठेवत दोघे एकत्र आलेले. दिवस, भेटी, ओढ सारंच हवंहवंस. आजही क्षण अन् क्षण तसाच जिवंत, हुबेहूब.

भयानक : भाग ७

भयानक भाग १
भयानक भाग २
भयानक भाग ३
भयानक भाग ४
भयानक भाग ५
भयानक भाग ६

------------------------------------------------------------------------------------------
मागील भागावरून पुढे..

नाना सांगत होते -

मित्र

तो : हल्ली कोणाच्या जवळ जायचं म्हटलं कि भीती वाटते...
मित्र : हं.....
तो : खूप त्रास होतो यार..... आपण आपल्या परीनं नातं टिकवायचा प्रयत्न जेवढा करतो ना तेवढा नाही प्रतिसाद मिळत.... मग तुटत जायला होतं आतून....
मित्र : हं.....
तो : किती कोरडे reply देतोयेस .... काय करू विचारल्याशिवाय बोलणार नाहीस ना.....? सांग ना काय करू....?

पुनर्जन्म

ह्या कथेचा काही भाग "वाट चुकलोच" ह्या नावाने काही महिन्यांपूर्वी टाकला होता पण पूर्ण करता आली नव्हती. ती नव्या नावाने पूर्ण करून टाकीत आहे.

धन्यवाद!

===================================

मध्यवर्ती कारागृह, कळंबा, कोल्हापूर!

गेट उघडले, आणि साधारण तीशीच्या आसपासचे चार तरूण बाहेर पडले...तब्बल पंचवीस महिन्यांनी ते बाहेरच्या जगात पाऊल ठेवत होते आज!

आजच हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला होता आणि म्हणूनच सेशन्स कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेले हे चार तरूण नवा जन्म मिळाल्यासारखे अगदी भेदरल्यासारखी तोंडे करून बाहेरच्या जगाकडे बघत होते!
स्वप्नील, संपत, बंड्या आणि चिमाजी!

जंगलराज

जेव्हा माकडाला कळले की माणसाचे पूर्वज अगदी त्याच्या सारखेच होते तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही . माझा वंश इथे संपूर्ण पृथ्वीतलावर राज्य करतोय ! अन इथे ? इथे तो सिंह राज्य करतोय ! काहीही झाले तरी आता मात्र चूप बसायचे नाही , रानात तरी आपले राज्य असेलेच पाहिजे , आपल्या वंशजांचं नाव राखायला नको ? माकडाने विचार केला .
पण सिंहाच्या शक्ती पुढे आपलं कसं चालणार ?
त्याला तर सगळेच घाबरतात .
आपल्याला कोण साथ देणार ?
पण माणसा जवळ तरी कुठे फार मोठी शक्ती आहे तरीही तो सा-या जगावर राज्य करतोय ना ? कशाच्या बळावर ? डोक्याच्याच ना ? मग आपण ही डोकं लढवायला शिकलं पाहिजे , अगदी त्यांच्या सारखंच !

माझ्या पहिल्या प्रेमाची शेवटची गोष्ट!!!

आज मला तुझा फक्त थोडा वेळ हवाय, माझ हृदय मोकळ करण्यासाठी...
आज आयुष्यात पहिल्यांदाच कुणाशी तरी अगदी खर बोलतोय, समोरची व्यक्ती नक्की कोण आहे याची खात्री नसतानाही आज एकदाच मन मोकळ कराव वाटलं.....