सुमित्रा भावे

'हा भारत माझा' - सुमित्रा भावे

Submitted by माध्यम_प्रायोजक on 28 November, 2011 - 09:14

अण्णा हजार्‍यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी 'जनलोकपाल विधेयक' संमत व्हावं, या मागणीसाठी आंदोलन छेडलं, आणि बघताबघता अख्खा देश या आंदोलनात सामील झाला. उपोषणं, मोर्चे, चर्चा, वादविवाद असं कायकाय घडू लागलं. या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं अशक्य होऊन बसलं. या ऐतिहासिक परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीनं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'हा भारत माझा' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गोव्यात भरलेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज या चित्रपटाचा प्रीमियर शो झाला. मायबोली या विचारप्रवर्तक चित्रपटाची माध्यम प्रायोजक आहे.

हा भारत माझा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 23 November, 2011 - 23:02

अण्णा सुखात्म्यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांची पत्नी, लग्न झालेली मुलगी वर्षा आणि राघव व इंद्र ही दोन मुलं. अण्णा हजार्‍यांच्या आंदोलनानं देश ढवळून निघाला, आणि नेमकं तेव्हाच अण्णा सुखात्म्यांच्या कुटुंबातही एक वादळ निर्माण झालं. राजकीय पक्षांशी बांधिलकी असणार्‍या, नसणार्‍या, तरुण, वृद्ध स्त्रीपुरुषांना अण्णा हजार्‍यांच्या आंदोलनानं विचारात पाडलं, नेमकं तेव्हाच अण्णा सुखात्म्यांच्या कुटुंबासमोर एक मोठाच पेच निर्माण झाला.

Pages

Subscribe to RSS - सुमित्रा भावे