आयुष्याचे कुरुक्षेत्र

परत फिरू दे

Submitted by पॅडी on 11 March, 2024 - 23:51

तूच ठरविली समरभूमी अन्
पलटण तुझीच सैन्य; लढाई
शस्त्रसज्ज मी कधीच नव्हतो
व्यूह तुझे अन् तुझी चढाई

पुरुषार्थाची न च अभिलाषा
रथ, अंबारी तूच वळवतो
नीती-अनिती बोट मधाचे
रोज थकवतो...पुन्हा पळवतो

आसक्तीचा कोंभ लकाके
कुणी ठेविला देही रुजवून
काय तुझा तो उदात्त हेतू
मी शब्दांतून येतो उगवून!

कौतूक कसले ओझे झाले
नकोत अक्षर कवचकुंडले
परत फिरू दे आज; माधवा-
व्यर्थ जिण्याची सहस्त्र शकले...

विषय: 
Subscribe to RSS - आयुष्याचे कुरुक्षेत्र