सरस्वतीची चिरंजीव मुले

मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - सरस्वतीची चिरंजीव मुले

Submitted by संयोजक-मभादि on 19 February, 2022 - 11:27

मराठी भाषेत उत्तमोत्तम कवी, गायक ह्यांना तोटा नाही. आपले थोडेसे अधिकच लाड ह्या बाबतीत झाले आहेत की काय, असंही कधीकधी वाटतं. लता मंगेशकर, भीमसेन जोशी ही नावंच घ्या ना! ह्यातले अनेक लोक आता आपल्यात नाहीत. परंतु 'केशवसुत कसले मेले? केशवसुत गातचि बसले!' असं गोविंदाग्रजांनी म्हटलं, तसंच ह्या सार्‍यांचंही आहे. ह्यातल्या अनेकांची वयंही झाल्याचं आपल्याला कळत नाही, इतकं त्यांच्या शब्दांत आणि गाण्यांत चैतन्य आहे. सरस्वतीची ही मुलं खर्‍या अर्थाने चिरंजीव झाली आहेत म्हणा ना! असं असलं, तरी रूढार्थाने आपण त्यांची जयंती साजरी करू शकतो, आणि त्यांच्या कलेचा आनंद नव्याने लुटू शकतो, हे तर आहेच.

Subscribe to RSS - सरस्वतीची चिरंजीव मुले