डिआईवाइ

सोपा D I Y मास्क. शिवणकाम नसलेला.

Submitted by Srd on 17 October, 2020 - 03:30

टाकाउतून उपयोगी, मास्कपट्टी.
( D I Y . बिनशिवणकामाचा)

रुमालाची किंवा त्या मापाच्या ( १८ इंच) कोणत्याही कापडाची त्रिकोणी घडी करून नाकातोंडावर बांधली की सोपा मास्क तयार होतो. शिवणकाम नको काही नको.

पण एक अडचण आहे म्हणजे नाकाच्या बाजूने पोकळ जागा राहते. रुमाल घट्ट बांधला तर नाक चेपते. तरीही थोडी हवा जातेच. चष्मा असल्यास काचांवर वाफ धरते.

त्यासाठी एक प्लास्टिकचा तुकडा बनवला. तो कोणत्याही रुमालाएवढ्या कापडात बांधून मास्क तयार होतो. फोटोत तो वरती ठेवलेला दाखवला आहे पण आत घडीमध्ये ठेवून नाकावर येईल असा धरून रुमाल बांधायचा.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - डिआईवाइ