काळपुरुष

मृत्यू एक सखा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 2 November, 2017 - 02:03

मृत्यू एक सखा

मनाच्या कोपऱ्यात
दडून असतो मृत्यू
काहीच वैर नसतं
तरी भासतो शत्रू

कधीच न पाहीलेला
काळपुरुष दिसतो
शेजारचे दार ठोठावले
तरी मी टरकतो

मीच वैर जपतो
इथे तिथे लपतो
नेहमी झिडकारले
तरी तो जीव लावतो

जगणं जरी छळतं
तरी कुठं कळतं
मन याच्या भयानं
दूर दूर पळतं

देहाचा खुळखुळा
होतो जेव्हा नादहीन
वाट बघत असतो
एक मित्र नवीन

आवाज न करता
येतो मज जवळ
आश्वासक हात
घालतो कवळ

Subscribe to RSS - काळपुरुष