उद्योजक

तडका - भाव वाढीत

Submitted by vishal maske on 20 October, 2015 - 11:26

भाव वाढीत

का असं करतात लोक
ते अजुनही गुप्त आहे
जे काही खपत आहे
ते सुध्दा लपत आहे

ज्याचा तुटवडा भासेल
त्याचे भाव भडकतात
प्रत्येक वाढत्या भावामध्ये
सामान्य लोक अडकतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पैसा

Submitted by vishal maske on 18 October, 2015 - 21:20

पैसा

पैशासाठी जगतात लोक
पैशासाठी मरतात लोक
पैशांसाठी तर कधी-कधी
माणसांनाही मारतात लोक

पैसे मिळवण्या माणसांमध्ये
नको ती हिंमत आली आहे
माणसं झालेत कवडीमोल
पैशाला किंमत आली आहे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

सप्तरन्गी बिझीनेस ग्रुप

Submitted by कविता१९७८ on 11 October, 2015 - 11:19

नमस्कार,

आम्ही नुकताच सप्तरंगी नावाचा बिझिनेस गृप सुरु केलाय. वेगवेगळ्या ठीकाणावर घरगुती व्यवसाय करणार्‍या महीलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा या दृष्टीने या गृपकडुन प्रयत्न केला जातोय. या ग्रुप मधे असणार्‍या प्रत्येकीने आपली आणि ग्रुप मधल्या दुसर्‍या प्रत्येकीच्या व्यवसायाची जाहीरात आपल्या व्हॉटस अ‍ॅप आणि फेसबुक फ्रेंड सर्कल मधे करुन नेटवर्क वाढवायचं अशी आयडीया आहे.

विषय: 

तडका - जाहिराती मधून

Submitted by vishal maske on 2 October, 2015 - 20:28

जाहिराती मधून

लक्ष आकर्षीत करण्यासाठी
भलता आटा-पिटा असतो
पण त्याची पडताळणी हवी
किती खरा,किती खोटा असतो

देखीव पणात अविश्वासाची
सरळ डोळ्यात धूळ असते
कित्तेक जाहिरातीं मधून तर
केवळ दिशाभुल असते,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - डेली रूटींग

Submitted by vishal maske on 27 September, 2015 - 21:09

डेली रूटींग

त्याच-त्याच गोष्टी करून
कधी मनंही विटले जातात
रोज-रोजच्या गोष्टींपासुन
मुद्दामहून टर्न घेतले जातात

कोणी सांगण्याची गरज नाही
आपणंच समजुन घ्यावं लागतं
कितीही टर्न घेतले तरीही
डेली रूटींगवर यावं लागतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - आपण

Submitted by vishal maske on 12 September, 2015 - 21:45

आपण

कुणी-कुणी काय केले आहे
यावर सर्वांचा डोळा असतो
दुसर्‍यांच्या प्रत्येक कामाचा
आपल्या मनात ताळा असतो

पण आपण काय करायला हवे
आपल्या लक्षात आले पाहिजे
अन् आपण जे करू शकतो ते
आपणहूनच केले पाहिजे,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रॉपर्टी

Submitted by vishal maske on 29 August, 2015 - 22:49

प्रॉपर्टी

ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे
त्याला त्याची किंमत कळते
कित्तेक कित्तेक कामांसाठी
प्रॉपर्टीनेच तर हिंमत मिळते

स्वाभिमानाची मनामध्ये
प्रॉपर्टी ताकत भरू शकते
तर कधी आपलीच प्रॉपर्टी
आपल्याला घातक ठरू शकते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कांदा खाण्यासाठी

Submitted by vishal maske on 25 August, 2015 - 07:47

कांदा खाण्यासाठी

हल्ली चर्चा-चर्चांना लागलेला
कांदा भाववाढीचा वास आहे
रोज कांदे खाणारांचाही आता
बिना कांद्याचाच घास आहे

वाढत्या भावामुळे कदाचित कांदे
दैनंदिन जेवनातुन हरवले जातील
अन् कांदा खाण्यासाठी मात्र
आठवडी दिवस ठरवले जातील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कांद्याच्या धंद्यात

Submitted by vishal maske on 23 August, 2015 - 21:22

कांद्याच्या धंद्यात

कांद्याचा तुटवडा भासताच
व्यापार्‍यांनी भाव वाढवले
ज्यांनी कांद्याला घडवले
कांद्याने त्यांनाही रडवले

व्यापारी मित्रांनाही कांदा
शेतकर्‍यांनीच पुरवला आहे
मात्र या कांद्याच्या धंद्यामधून
शेतकरी जणू हरवला आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - उद्योजक