सुकटीची चटनी

सुकटीची चटनी

Submitted by प्रगती जाधव on 27 February, 2013 - 23:33

सहित्यः
१ मुठ सुकट, २ चमचे मिर्ची पावडर, १कान्दा, १ लसुनाचा कान्दा, मीठ,तेल.

क्रुती:
प्रथम सुकटिची डोकी काढुन घ्यावीत.
गरम तव्यावर ती सुकट परतुन घ्यावी. भाजलेल्या सुकटिला आणखिन जास्त चव येते.
मग ती सुकट,मिर्ची पावडर, कान्द्याच्या फोडी,लसनाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ एकत्र घेउन मिक्सर मधुन बारीक करुन काढावे.
आता गरम तव्यात थोडेसे तेल गरम करुन त्यात बनवलेली चटनी परतुन घ्यावी.
ही चटनी ताण्दळाच्या भाकरी (भाकर ही उकडीची आणी चुलिवरील खापरीची असावी) बरो बर छान लागते.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सुकटीची चटनी