पंचवीस वर्षांपासून मला वाटत आलेली वाचनाची ओढ अकस्मात एके दिवशी संपुष्टात आली. एके दिवशी जाणवलं की आपलं रूपांतर 'हातात पुस्तक धरू न वाटणाऱ्या माणसामध्ये' झालं आहे. आपलं मन आता, 'आयुष्यात कधीच काही न वाचणाऱ्या माणसाचं मन', झालं आहे. पंचवीस वर्षं म्हणजे काही जोक नाही.! एवढ्या काळात वाचन हा काही केवळ फावल्या वेळातला टाईमपास राहिलेला नव्हता. तो जगण्याचा भाग होऊन बसला होता. रिलॅक्सेशनचा एक खात्रीशीर मार्ग होऊन गेलेला होता. हळूहळू माझी माझ्यापुरती ओळख बनून गेलेला होता.
दुपारी मरणझोप लागली. एका सूफी फकीराचा मृत्यू झाला होता. जनाजा कबरस्तानाच्या दिशेने निघाला होता. मी त्यात सामील होतो. डोक्याला रुमाल बांधलेला. जनाजा हळूहळू पुढे सरकत होता. दोन्ही बाजूंनी लोक. कुणी फक्त चालत होते. कुणी पुटपुटत होते. बुरखे घातलेल्या स्त्रिया दिसत होत्या. एक पुरुष हाताने त्यांना वाट करून देण्याचा इशारा करत होता. जनाजा घाटावर पोहोचला तेव्हा थोडावेळ दर्शनासाठी खाली ठेवला गेला.
एकदा मोदी, Xi जिनपिंग व तात्या बढाया मारत असतात. जिनपिंग म्हणतात “ आम्ही आख्ख्या जगाला सटर फटर आणि स्वस्तात वस्तू पुरवतो. आमच्या उत्पादनाशिवाय जगाची घडी पार विस्कटून जाईल.“
आदरणिय मोदी जी म्हणतात “आम्ही संपूर्ण जगाला संगणकिय सेवा पुरवतो. आमच्या तत्पर सेवेशिवाय जग पार कोलमडुन पडेल.”
तात्या म्हणतो “ एक वेळ संगणकिय तत्पर सेवा, सटर फटर स्वस्त वस्तू यांशिवाय जग चालेल. पण आम्ही जगाला हास्य पुरवतो आणि जगाची २४/७, बारामाही , विनाशुल्क करमणूक केली नाही , जगाला दर दुसर्या दिवशी फिदीफिदी हसविले नाही तर जग तर विनाशाच्या उंबरठ्यावरच पोचेल.”
सर्दी (रस : बीभत्स)
शेजारचा राजू माझ्याच वयाचा.
नेहमीच आमच्याकडे यायचा.
त्याला वारंवार व्हायची सर्दी.
नाकात व्हायची मग भलतीच गर्दी
सोबत शुभ्र रुमाल असायचा.
सारखा सारखा नाक पुसायचा.
एकदा आला आमच्याकडे टोकाची सर्दी घेऊन.
आणि नेमका रुमाल घरी विसरुन.
सर्दीने झाला होता प्रचंड बेजार..
खेळाचा वगैरे सुचतही नव्हता विचार..
अशातच त्याला एक मोठी शिंक आली.
नेहेमीच्या सवयीने ओंजळ नाकावर गेली.
पाठोपाठ तीन चार जोरदार शिंका आल्या
आणि उजवी ओंजळ भरुन गेल्या.
नमस्कार मायबोलीकर मंडळी!
ज्या उत्कटतेने तुम्ही गणेशोत्सवाची वाट पाहतो होता, त्याच उत्कटतेने तुम्ही वर्षभर या धाग्याची वाट पाहत होता, हे त्या गणरायानचे आम्हांला सांगितलं.
यंदा मीम्ससाठी विषय आहे मराठी चित्रपट आणि मराठी मालिका.
काही काही मराठी चित्रपट आणि मराठी मालिका यांचे पिसे मायबोलीकरांना अधूनमधून लागत असते आणि मग तुम्ही काय करता?
तेच इथे करायचे आहे मीम्सच्या रूपात.
मीम्स तयार करताना काही गोष्टी लक्षात ठेवू.
१. आटपाट देशातल्या आधीच्या पिढ्या नशिबवान होत्या. त्याच्यानं त्यांना आपोआप बरे नेते मिळत गेले. आटपाट देशातली जेनझी पण स्मार्ट आहे. त्यामुळे तेही डिझर्व्हिंग नेत्यांच्या हातात देश सोपवतील, अशी आशा आहे.
प्रॉब्लेम फक्त मधल्या पिढीचा झाला होता. ही आख्खीच्या आख्खी पिढी येडझवी निपजली.
जल्लोष
पृथ्वीवरचा दहा दिवसांचा गणेशोत्सव जवळ आला, तशी स्वर्गा मध्ये पण थोडी अस्वस्थ हालचाल सुरू झाली..., विशेषत: देवी मंडळींमधे.
एलिफंट पॉईंटवर सुसाट वारा सुटला होता आणि त्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. माझी छत्री उलटी होऊ नये म्हणून माझी एक वेगळीच कसरत सुरू होती. तेवढ्यात समोर एक मोठे झाड दिसले आणि आडोशासाठी मी धावतच त्या झाडाखाली जाऊन उभा राहिलो.
एवढ्यात एक माणूस माझ्यासमोर आला आणि म्हणाला,
“साहेब, तुम्ही खूप मोठे कलाकार दिसताय!”
मी मनातल्या मनात विचार करू लागलो—हा नेमका कोण असावा?
थोड्याच वेळात तो पुन्हा म्हणाला,
“तुमचा चेहरा खूप बोलका आहे... खूप काही सांगून जातोय!”
पुणे म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
छात्रो , मित्रों 'सेम' असतं !
काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा
तरीसुद्धा,
पुणे म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
छात्रो , मित्रों 'सेम' असतं !
चहा बिहा विकलात तरी
प्रेम करता येतं;
डून स्कूलला शिकलात तरी
प्रेम करता येतं !
जंतर मंतर हुकलात तरी
प्रेम करता येतं
पुणे म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
छात्रो , मित्रों 'सेम' असतं !
"तुझ्या नवऱ्याला मी एका बाईबरोबर लक्ष्मीरोडला पाहिलं आज शॉपींग करताना, लक्ष दे बरका त्याच्याकडे, आज जरा गडबड आहे. उद्या निवांत बोलते तुझ्याशी."
गाडेबाईनी दिपाला काल फोनवर असे काही सांगितल्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. आज सकाळपासूनच घरातल्या भांड्यांचा आवाज वाढला होता. मुलांनी अमुक भाजी नको म्हटल्यावर "जे केले आहे ते खा गुपचूप" असा सज्जड दम भरला गेला होता.
"आम्हीच मर मर मरायचं, आम्हाला कुठं शॉपींगला न्या म्हटलं तर लय कामं निघत्याय ऑफिसची. त्या सटवीबरोबर बरं वेळच वेळ असतो हिंडायला"